मथुरा [ जे.एम. रोड ] इथे सिमला मिर्ची मसाला आणि तवा पराठा घ्यावा... हे कॉम्बिनेशन जालीम आहे.
पाणीपुरीसाठी टिळकरस्त्यावरील गिरिजाच्या कोपर्यात गाडी लावणार्या मावशींकडे जावे.
बेडेकर रस्श्याचे एक्स्ट्रॉ पैशे घ्यायला लागला असेल तर त्याला कुणी काही बोलो शकत नाही... तो उपकारकर्ता असल्याने त्याने उद्या मिसळीतील दाण्यांवर चार्ज लावला तरी कुरुकुर न करता जाणारे आहेत..
बेडेकर रस्श्याचे एक्स्ट्रॉ पैशे घ्यायला लागला असेल तर त्याला कुणी काही बोलो शकत नाही... तो उपकारकर्ता असल्याने त्याने उद्या मिसळीतील दाण्यांवर चार्ज लावला तरी कुरुकुर न करता जाणारे आहेत..
सहमत ! नाविलाज आहे !
पुन्हा पुन्हा तेच तेच लेख मिसळपाव वर लिहिणारे बरेच झालेत या मि.पा. साइटवर.
कृपया आधीचे लेख जरा वाचाल काय? बराच काथ्याकुट झालाय या विषयावर आणि आपण महाराष्ट्रात राहून कसले हो तुम्ही नगरकर, तुम्ही पुणेकर , मुंबईकर असे भांडता?
दुसरे असे कि ठाण्याची मामलेदाराची मिसळ खाणारे लोक हो सावधान आम्हाला शालेय जीवनात तिथे एक सुचना केली गेली होती खुद्द मालकांकडून कि याला तिखट्पणा आणण्यासाठी आम्ही चुन्याची निवळिचे पाणी वापरतो आता बोला.
काय रे लेको नगर आणि पुणे करत बसलाय.
आमच्या सातार्यात या. मोतीचौकात बामणेकडे झक्कास सातारी मिसळ खाऊन बघा. चिवड्याचेच चारपाच प्रकार असतात मिसळीत्.उगाच पुणेरी कंजूशपणा नसतो तिथे.
पोवई नाक्यावर भारत भुवन ची पुरीभाजी खाल तर बेट्ट लावून सांगतो अॅडिक्ट व्हाल.
सातारी मिसळीबद्दल मान्य. एकदम फर्मास. एकेकाळी पोवई नाक्यावर ४ ते ६ अश्या लिमिटेड पुणेरी वेळेत झक्कास मिसळ आणि भेळ मिळायची एका टपरीवर. आधी मिसळ संपणार की भेळ अशी स्पर्धा साधारण ५ वाजताच असायची. नाव विसरलो. रजताद्री पासुन थोडे पुढे चढावर होती. ही साधारण २४-२५ वर्षा पुर्वीची गोष्ट. अजुन मिळते का? शिवाय पालेकरांचे खारी पॅटीस अजुनही तितकेच कातिल असते का? आणि सध्या पेढे कोणाचे जास्त खमंग लाटकर की मोदी?
पालेकरांचे पॅटीस पुण्यात मिळायला लागले आहेत
त्यांनी पुण्यात तीन ठिकाणी आपली उत्पादने स्वतंत्र दुकानात आणली आहेत.
त्यापैकी भिकारदास मारुती जवळ - पुणे विद्यार्थी गृहाच्या मागच्या बाजूला एक दुकान आहे तिथे आता पालेकरांचे ताजे पॅटिस मिळतात. आणि इतर जास्त टिकणारे पदार्थ - नानकटाई, खारी वगैरे पण मिळतात.
आणि सध्या पेढे कोणाचे जास्त खमंग लाटकर की मोदी? >> ह्या लाटकरांचे मावसभाउ की कोणी कोल्हापुरात आहेत.
खत्री स्वीट नावाचं दुकान.
बरच जुनं आहे..
कुंदा घ्यायला गेलो तेव्हा थोडीशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी मग गप्पांच्या ओघात सांगितलं.
लाटकर आमचे मावसभाउच पण सातार्यात मोदींचा पेढा खाउन बघा. ब्येष्ट आहे. :)
तसे तर लाटकर आणि मोदी पण पाहुणेच लागतात. त्यानी काहितरी एक रिलेशन सांगितलं होते ते विसरलो.
ऑ .. अहो पुण्यात देखील संतोष बेकरीचे पॅटीस प्रसिद्ध आहे .. घोले रोड च्या बाजूला. म्हणजे डेक्कनच्या चितळे वरून सरळ पुढे गेल्यावर रस्ता जिथे संपतो तिथे डाव्या हाताल.
पॅटीस तर आहेच सुंदर पण तिथे अन्य बेकरी पदार्थ ही चांगले मिळतात. आणि "नोंद घेण्याजोगी" गर्दीही तिथे असते !
आम्ही कॉलेजचे बोअर पिरियड येथेच घालवले आहेत ....श्श्या.. गेले ते दिवस ! एक हातात सायकल घेऊन तो रस्ता पूर्ण तुडवायचा.. काय मजा होती!
ऑ .. अहो पुण्यात देखील संतोष बेकरीचे पॅटीस प्रसिद्ध आहे ..
ओ विटेकर काका
संतोष ।हॉटेलच्या पॅटीसची संतोष बेकरीच्या पॅतीससोबत गल्लत करू नका. संतोष हॉटेलचे पॅटीस बटाटा आणि खोबर्याची चटणी या पासून बनतो. त्यात बेकरीपदार्थाचा लवलेष सुद्धा नसतो. ही पॅतीस उपवासाला चालतात.
त्यांची चव अवर्णनीय. ज्याने खाल्ली त्यालाच माहीत अशी आहे.
हा हा हा, अहो मुळात सदाशिव पेठच पुण्यात नवीन आहे =)) इतके असून त्या पेठवाल्यांनी पुण्याच्या व्याप्तीबद्दल प्रवचने देणे म्हणजे काय म्हणावे त्याला विशेषण शोधतो आहे =))
एकदा दर्शन मध्येही सिझलर्स खाउन बघ. मस्त असतात. आणि तिथेच कटलेट आणि छोले भटुरे सुद्धा.
अतिशय उत्तम छोले भटुरे खायचे असतील तर मात्र मुंबैच्या (काला घोडा) बॉम्बे ब्ल्युज ला पर्याय नाही.
संपादकांना नम्र विनंती कि हा धाग्याला "फक्त पुणेकरांसाठी" म्हणून टयाग करावा . परत परत तेच आणि तेच !
ज्या लोकांना पुणे सोडून दुसरी कडे काही विशेष असूच शकत नाही त्यांना पुणेकर असे म्हणतात ह्या व्याख्येची प्रचीती आली !
भेंडी! मिसळपाव म्हणजे पुणेकरांचे राखीव कुरण झाले आहे :P
मिसळपाव वर प्रत्येक धागा उघडुन बघण्याचे कंपल्शन नाही हो. तुम्ही इग्नोर डिलिट मारा की. असल्या धाग्यांना अनुल्लेखानेच मारावे. फक्त ते परत परत तेच आणि तेच म्हणजे काय ते सांगा म्हणजे झाले. नाही म्हणजे हा लेख आधी कुठे वाचलाय का?
छान लेख.
जाता जाता : दिल्लीची लस्सी एकदम मस्त. आणि मिसळीचे म्हणाल तर कोल्हापुरी मिसळ आणि पुणेरी मिसळ वेगळी. खवैय्यांनी त्यात गफलत करू नये. माझी आवडती पुणेरी मिसळ कारण त्यात मटकी बरोबरच पोहे, उकडलेला बटाटा, शेव फरसाण, वरून बारीक चिरलेला कांदा, कोथिम्बीर, खोवलेला ओला नारळ, लिंबाची फोड असते आणि झणझणीत पणासाठी तर्री वेगळी देतात. कोल्हापुरी मिसळ आवडत नाही कारण ती नुसतीच तिखट जाळ असते. पसंद अपनी अपनी.
वरती एका प्रतिसादात खिचडीवाले आप्पा गेल्याचं वाचलं. ही बातमी कधीची आहे? कारण मी दीड महिन्यापूर्वी गेलो होतो तेव्हा तो होता. छान होता. वयोमानाप्रमाणे उत्साह कमी झाला आहे. आवाजसुद्धा कमी आहे. पण आहे. अजून गेलेला नाही.
कोनात दम असेल तर "नेवाळे" मिसळ फक्त २ पावामध्ये खावून दाखवा …. शरीरात जितकी भोके आहेत ना सगळीकडून धूर निघेल
प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला असला तरी उद्देशून मात्र अन्य अनेक तिखटमिसळवर्णनांना आहे.
मी काय म्हणतो, म्हणजे आपण शांतपणे विचार करुन पाहू.. एकदम डोक्यात राख किंवा अन्य शरीरछिद्रांत धूर असं नको..
कोणताही पदार्थ (बी इट मिसळ ऑर अदरवाईज) ही एक आनंदाने आस्वाद घेण्याची गोष्ट असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. अधिकाधिक तिखट किंवा मामलेदारपेक्षा तिखट वगैरे म्हणजे टेस्टीच असं नव्हे. आपल्याला काही मरणोत्तर आपल्या आतड्यांची बॅडमिंटनला लागणारी नेट्स बनवायची नाहीयेत.
तेव्हा खाऊन दाखवा.. नाही धूर / जाळ / राख / आग / रॉकेट / ज्वालामुखी वगैरे झाला तर...हां...हाही टेसदारपणा वर्णिण्याचा एक अतिशयोक्ती अलंकार आहे हे मान्य.. पण खरंच काही मिसळी इतक्या जास्त तिखट बनवल्या जातात की त्यात चटकदारपणापेक्षा जिभेचा अॅब्युस जास्त होतो. पहिले दोन घास झाले की घासाघासाला अधिकाधिक आग आग करणार्या या तिखटाची जात वेगळी असते आणि ते मजा वाटेल असं नक्कीच नसतं. अशा मिसळीला मी तरी उत्कृष्ट म्हणत नाही.
अशा आव्हानात्मक प्रकारे दर्शविण्यासारख्या पदार्थापेक्षा चवींचा एकूण मेळ कोणीही यावे आणि खाऊन पहावे, निश्चित आवडेल अशा स्वरुपाचा असलेला पदार्थ अधिक उत्तम असं मला वाटतं..
याचा अर्थ तुम्ही वर्णिलेली मिसळ वाईटच असेलच असंच नाहीच.. त्या निमित्ताने जे लक्षात आलं ते लिहिलं.. कारण धाग्यात यापूर्वीही गोड मिसळ / तिखट मिसळ असे (टायगर कडक पत्ती चहा- वाघासारख्या मर्दांसाठी) उल्लेख आलेले दिसले.. :)
करेक्ट!
खाण्यासारख्या जीवलग गोष्टींवर लोक अस्मितेच्या चर्चा कशा छेडतात याचं नवल आहे. आणि त्याही पुढे जाऊन मग वाचू नयेत अशी वर्णनं येतात, ते तर फार दुर्दैवी आहे.
डोळ्यासमोर आलेलं चित्र.
गविशेठ असे टपरीवर बसलेत. आता ते बसलेत म्हणजे एकटेच. काळ्या कडप्पाच्या टेबल टॉपवर अशा मस्त पाच सात प्लेट्स आहेत. त्यातल्या दोन-तीन मिसळ प्लेट्स संपलेल्या असल्यानं उगा तिथंच वाकड्ञा तिकड्या पसरल्यात. मिसळी च्या रश्श्यासाठी मोठ्या चमच्याबरोबर आलेला रश्श्याचा मग....
पाच सात पाव संपलेत. चार समोर आहेत. एका हातात पाव, दुसर्या हातात चमचा, मांडीवर मोठ्ठा नॅपकीन नि थोडा घाम आलेल्या चेहरा अशा पोझिशनमध्ये गवि शेठ म्हणतात...
>>>मी काय म्हणतो, म्हणजे आपण शांतपणे विचार करुन पाहू..
प्रतिक्रिया
हडपसरचं चालुये अजून..
सुजातामध्ये एकदाच मस्तानी दहा
सहमत.
कैलासचे फालुदा आईसक्रीम
मथुरा [ जे.एम. रोड ] इथे
बेडेकर
बेडेकर रस्श्याचे एक्स्ट्रॉ पैशे घ्यायला लागला असेल तर त्याला कुणी काही बोलो शकत नाही... तो उपकारकर्ता असल्याने त्याने उद्या मिसळीतील दाण्यांवर चार्ज लावला तरी कुरुकुर न करता जाणारे आहेत..सहमत ! नाविलाज आहे !तुम्ही नगरकर, तुम्ही पुणेकर , मुंबईकर असे का हो भांडता?
अहो असे भांडल्याने युनिटी कमी
हो का? बरं.
पुणेकर आणि पुणे परीपूर्ण आहेत
आम्ही चुन्याची निवळिचे पाणी
ते तिकडे ठाणे मुबंईत! पुण्यात
!!
आता तुम्हाला तुच्छ भावच बघायचा असेल तर तोच दिसणार.
घ्या आता! गैरसमज दूर करण्याला
काय रे लेको नगर आणि पुणे करत
सातारी मिसळीबद्दल मान्य. एकदम
सातार्यात राजवाडा चौपाटीला
मोती चौकात पुरोहित कडे सुंदर
पालेकरांचे पॅटीस पुण्यात
आणि सध्या पेढे कोणाचे जास्त
बामणेचा
सहमत आहे ..........
संतोषमधील पॅटीस ??
ऑ .. अहो पुण्यात देखील संतोष
मस्त खुसखुशीत लेख !!!
जाता जाता, आमच्यासारखे
हा हा हा, अहो मुळात सदाशिव
एकदा दर्शन मध्येही सिझलर्स
@मा. वल्लीशेठ लेण्याद्री
भेंडी!
मिसळपाव वर प्रत्येक धागा
पुणेकरानं लेखकावर मात केली की
नाही म्हणजे हा लेख आधी कुठे
भागाकार करुन बघा मग.
आपल्या मायबोली भाषेत त्या
काही का म्हणेनात. उत्तर काय
फारच सुन्दर लेख ...
फारच सुन्दर लेख ...
छान लेख.
छान लिहीलंयस रे एमजे!
वा!
वरती एका प्रतिसादात खिचडीवाले
वयाचा उल्लेख करता आणि "तो"
नेवाळे मिसळ
कोनात दम असेल तर "नेवाळे"
:)
चवींचा एकूण मेळ कोणीही यावे आणि खाऊन पहावे, निश्चित आवडेल!
नेमके अन मार्मिक!!! धुराची
डोळ्यासमोर आलेलं चित्र.
Pagination