आखुड शिण्गी , बहुगुणी , दुधाची सर्व आहे ..
ई व्ही २ . साधारण ५:५० ला जाते.. एबीएस - एअर बॅग सोडून सर्व अन्यथ्जागा भरपूर ..
आणि पिक अप आणि बिल्ट क्वालिटी हवी असेल तर ह्युंडाईची आय १० घ्या ..पण जागा कमी आहे त्या मधे ..
बाकी भन्नाट पळते !
मला स्वतःला तरी @३वर्षं अॅव्हीओ-युवाचा चांगला अनुभव आहे (हॅचबॅक श्रेणीतली बसण्यासाठी ऐसपैस,@१४-१५ किमी/लि.) पण आता ते मॉडेल बंद झाले (नवीन सेल्-युवाची माहिती नाही) त्यामुळे मित्राकडे असल्याने बघितलेली आय-ट्वेंटी चांगला पर्याय वाटतो.
कारचा प्रदीर्घ आणि लाखो किमींचा (शहर आणि सफरी) वापर आत्तापर्यंत झाल्याने काही रेकमेंडेशन्स देऊ शकतो.
तुम्ही आधी इंजिनकडून सुरुवात करा. ते निश्चित करुन मग कार ठरवा. कारण बाकी सर्व अॅस्थेटिक्स दुसर्यातिसर्या नंबरवर येतात.. आधी महत्वाचं इंजिनच.. कारण देखभाल खर्च,स्पेअरपार्ट्स उपलब्धता, सर्व्हिस, रोजचा इंधनखर्च, विमा, रिसेल व्हॅल्यू अशा बर्याच गोष्टी इंजिनवरच अवलंबून असतात.
फियाटचं क्वाड्राजेट
टाटा विस्टा - डिझेल क्वाड्राजेट १.३ लीटर इंजिन.
एक अत्यंत एफिशियंट आणि स्मूथ चालणारं इंजिन आहे. इंधन वाचवण्यासाठी उत्तम, पण ताकदीत कुठे कमी नाही. आत्ताची कार तीन वर्षे चालवतोय, डिझेल इंजिनवर पेट्रोल इंजिनच्या पिकअपचा फील मिळतो. टचवुड, लहानसादेखील प्रॉब्लेम नाही.
हे इंजिन इतकं उत्तम आणि एस्टॅब्लिश्ड आहे की ते १० वेगवेगळ्या कार्समधे वापरलं जातं. बाहेरचा डबडा वेगळा पण आत हृदय हेच.
मी आठवतील ती नावं खाली देतोय. या सर्व डिझेल गाड्यांत (त्यांच्या डिझेल मॉडेलमधे) हेच एक फियाट क्वाड्राजेट सीडीआरआय इंजिन आहे.
टाटा विस्टा
टाटा इन्डिगो मान्झा
मारुती स्विफ्ट
रित्झ
स्विफ्ट डिझायर,
फियाट स्टाईल,
मारुती SX4,
लिनीआ,
ग्रँड पुन्टो
पैकी लिनीआ, मान्झा, SX4, स्विफ्ट डिझायर आकाराने मोठ्या सेडान गटातल्या असल्याने त्या तुमच्या बजेटच्या बाहेर जातात.
उरलेल्या गाड्यांत आता गाडीच्या त्याच उत्तम इंजिनावर उगीच जास्त वजन / लोड न देणारी पण त्याचवेळी जास्तीतजास्त इंटर्नल स्पेस देणारी अशी गाडी आता आपल्याला पहायची आहे.
स्विफ्टची एकूण लांबी कमी असल्याने पुढच्या सीट व्यवस्थित अॅडजेस्ट करुन आरामात लेगस्पेस केली तर मागच्या सीट्सना पाय ठेवणंही कठीण होतं. त्यामुळे ही गाडी दिसायला काहीजणांना बरी वाटत असली / कॉम्पॅक्ट वाटत असली तरी लेगस्पेस आणि एकूण आतील प्रशस्तपणाबाबत डावी आहे.
फियाट पुन्टो ही गाडी चांगली असावी, कारण मी टेस्ट ड्राईव्ह करुन पाहिली नसल्याने ड्रायव्हर सीटच्या लेगस्पेसविषयी सांगू शकत नाही. पण तिच्या मागच्या भागात बसल्यावर ती काही फार स्पेशस वाटली नाही.
रित्झ ही गाडी बाजारात हल्ली फारशी चालत नाही, बहुधा मध्यंतरी सिरियस प्रॉब्लेममुळे कंपनीने या कार्स रिकॉल केल्या होत्या म्हणून लोक मागणी करत नसावेत किंवा उत्पादन बंद असावे, रिसेल व्हॅल्यूची तर मारामारच आहे.
आता राहिली टाटा विस्टा. त्या प्रकारातल्या इतर गाड्या टेस्ट ड्राईव्ह करुन अत्यंत प्रशस्त लेग स्पेस आणि एकूणच ऐसपैस इन्टेरियरसाठी तसंच अत्यंत आरामदायक ड्रायव्हिंग सीट पोझिशन, कंट्रोल पोझिशन्स यासाठी, तसंच ताकदवान इंजिन, पेट्रोलप्रमाणे पिकअप असे गुण मनात ठसल्याने आणि आधीच ईअरमार्क केलेलं फियाट क्वाड्राजेट डिझेल इंजिन यात असल्याने ती पसंत केली.
त्याखेरीज तपासलेल्या गाड्यांपैकी फोर्ड फिगो ही कारही विस्टाइतकीच उत्तम होती. थोडी बुटकी असल्याने सरळ आत न बसता झुकून सरकून घ्यावे लागत होते हाच बारीकसा तोटा. ड्रायव्हिंग पोझिशन फिगोची जास्त आरामदायक होती.. पण अगदी नकळत इतक्याच पातळीने.. बाकी सर्व तोडीस तोड. केवळ डिस्काउंट वगैरे कमर्शियल कारणांनी फिगो रद्द झाली अन्यथा ती घेतलीही असती.
विस्टा घेऊन तीन वर्षे झाली. यापूर्वी सँट्रो आणि मरिना या दोन कार बरीच वर्षे मोडेस्तोवर वापरल्या आहेत. त्यामुळे विस्टा ही एकुणात पहिलीच कार होती आणि तुलनाच नसल्याने तिच्या प्रेमात आहे असा प्रकार नसूनही या तीन वर्षात रोज या निर्णयाचा आनंद होतो.
तुम्ही दिलेल्या बजेटमधे थो SS डंसं अॅडजेस्ट करुन येऊ शकणार्या काही डिझेल गाड्या (इकॉनॉमी आणि ताकदीसाठी)
मी सुचवून पाहिल्या. आता तुम्हाला निर्णय घेणं सोपं झालं असावं.
आता भाग राहतो सर्व्हिसचा. टाटाची सर्व्हिस केंद्रे भरपूर आहेत आणि आत्तापर्यंत मला "एक्सेप्शनल" म्हणता येईल इतकी उत्तम सेवा मिळाली आहे. अगदी जिथे आहे तिथून एक फोन करताच ३५ किलोमीटर दूर येऊन विनामूल्य कार चालू करुन जाण्यापर्यंत. (बॅटरीची वायर लूज झालेली असणे या क्षुल्लक दोषासाठी)
फियाट आणि टाटाचे संयुक्त सर्व्हिस नेटवर्क असल्याने विस्टाऐवजी फियाटचे पुन्टो किंवा इतर मॉडेल घेतलेत तरी सर्व्हिस टाटाचीच.
पेट्रोल गाडी घेणार असाल तर वरील प्रतिसाद रद्दबातल समजावा.
तुमच्या प्रतिसादाशी सहमत..
पण फियाटचे क्वड्राजेट, व रेनॉल्डचे १.५ DCI यांत मला रेनॉल्डचे इंजीन जास्त आवडते, तुम्ही DCI इंजीन असलेली गाडी चालवून पाहीलीय का?
रेनाँ - निसान यांची कोणतीच कार कधी चालवलेली नाही. अर्थातच इंजिनविषयी ऐकून माहिती आहे आणि त्याविषयी एकूण फीडबॅक्स भारीच आहेत. पण थेट अनुभव नाही बुवा..
फोर्ड डिझेल इंजिन्सही तांत्रिकदृष्ट्या एकदम उच्च आहेत असं दिसतं. फियाट क्वाड्राजेट आपल्याइथे खूप अॅक्सेप्ट झालं आणि दहा मॉडेल्सवर किमान ८-१० वर्षे ट्राईड अँड टेस्टेड, हा एक अॅडव्हान्टेज.
मला जाणवलेला मुख्य फरक म्हणजे, DCI जास्त स्मूथ आहे, शिवाय माझी वेरिटो, ४थ्या गियरला ३०-४० ला आली तरी नॉक करत नाही (याचा अर्थ मी तशी चालवतो असा नव्हे :) ) आणि तिथुन सरळ ८० पर्यंत उचलता येते, दुसरीकडे मित्राची फिगो, डावुन गियर करावीच लागते.
"(वेरिटो ही सेडानच नाहिये इथून माझे मत सुरू होते. फक्त इंजिन पहायचं तर ट्रकच्या चॅसिज जातात रस्त्यावरून त्या पॉवरफुल इंजिनवाल्या असतात) Wink"
तुमची सेडानची व्याख्या सांगता का? आम्हाला बुवा तीन कप्प्यावाल्या गाड्या सेडान वाटतात :)
मी आठवतील ती नावं खाली देतोय. या सर्व डिझेल गाड्यांत (त्यांच्या डिझेल मॉडेलमधे) हेच एक फियाट क्वाड्राजेट सीडीआरआय इंजिन आहे.
मारुती ने फियाटचं क्वाड्राजेट इंजिन वापरण कधिच बंद केलं आहे. आता मारुती k-series नावाचं सुझुकी मेड इंजिन वापरते (सर्व गाड्यांमधे). फियाट ही पुर्वी पासुन उत्क्रुष्ट इंजिन बनवणारी कंपनी.
क्वाड्राजेट इंजिन बद्दल सहमत.
रित्झ ही गाडी बाजारात हल्ली फारशी चालत नाही, बहुधा मध्यंतरी सिरियस प्रॉब्लेममुळे कंपनीने या कार्स रिकॉल केल्या होत्या
सिरियस प्रॉब्लेम झालेली आणि रिकॉल केलेली गाडी रित्झ नव्हे. ती गाडी होती Maruti A-Star.
Faulty A-Star
उलट रित्झ ही मारुती ची one of the best selling car आहे.
बाकी सहमत.
चुकीच्या दुरुस्तीबद्दल अत्यंत आभारी आहे. एकुणात जेव्हा हे इंजिन आलं त्या नंतरच्या काळात (२००३ नंतर) या या कार्सनी ते वापरलं असं मनात नोंदवलं गेलं होतं. त्यामुळे हेच इंजिन घ्यावं हा निर्णय झाला होता. मारुती आता ते वापरत नाही ही माहिती नवीन आहे. धन्यवाद. स्विफ्टमधे मात्र अगदी नुकतेच पाहिले तर हेच इंजिन होते. बाकीच्या मॉडेल्सनी स्विच केले असेल..
होय होय.. ए - स्टार गाडी ती...
रित्झ आणि ए- स्टारमधे गोंधळ झाला.. :) शेप सारखाच असतो की काय यांचा?
रित्झचा आकार लहान असावा विस्टा पेक्षा.
हां तेच म्हटलं ! रिट्झ मधे बाजारातील एक आदर्श डिझेल इंजिन आहे. One of the best diesel hatchbacks around. Just wonderful. ढुंगणावर लाथ घातल्यासारखं (पण ट्रेंडी) असं मागचं डिझाईन आवडत असेल तुम्हाला तर रिट्झ डिजेल कव्वा गाडी आहे.
मारूती रिट्झ अन ऑम्नी या गाड्यांसाठी काय वेगळे डायवर लोक्स जन्मास येत असतात काय?
इतक्या बुंगाट दामटणारे लोक्स रस्त्यावर सहसा दिसत नाहीत. अपवाद ट्रक क्याट्यागिरितल्या काही लोकांचा ;)
मारुती अजुनही फियाटचं क्वाड्राजेट डिझेल इंजिन वापरते.
या इंजिन ला गमतिने all india engine असेही म्हणतात.
सुझुकि अजुन त्यान्चा डिझेल इंजिन वर काम करते आहे.
मारुती अजूनही फियाट क्वाड्राजेट इंजिनच वापरत आहे.
स्वतःचं के सिरिज इंजिन हे फक्त पेट्रोल मॉडेलसाठी आहे. डिजेल इंजिन फियाटच आहे.
http://www.marutisuzuki.com/swift/technology.html
DDiS हे तेच क्वाड्राजेट आहे.
सध्या टाटा कंपनी विस्टा मोठ्या प्रमाणात विकायच्या मूडात असल्याने तिला बेल्स अँड व्हिसल्स मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत. उदा. फुकट नॅव्हिगेशन सिस्टीम, टचस्क्रीन ऑडिओ, स्टिअरिंगवर फोन्/ऑडिओ कंट्रोल्स डिकीत लाईट वगैरे वगैरे.
धागाकर्त्यांना विनंती व सुचवणी(सजेशन) कि थोडे बजेट ताणा, अन वर गविंनी दिलेल्या प्रतिसादास माझं शेपूट जोडून पहा.
शेपूट १ :
इंजिन नंतर सर्वात म्हत्वाची ती एबिसीडी असते. 'एबीएस' 'एबीडी' 'एअरबॅग्स' इत्यादि.
सेफ्टी फीचर्स सगळ्यात आधी पहावेत. मग नंतर बाकी सगळे.
शेपूट २ :
डिझेल गाडी अल्टीमेटली स्वस्त पडते. पेट्रोल कार वाल्यांनी कितीही 'डेली रन' गुणिले 'पेट्रोल कॉस्ट' इत्यादी गुण गायीलेत तरीही डिझेलच घ्या. पेट्रोल गाडी घेऊन भर उन्हात काचा उघड्या ठेऊन फिरणारे लोक पाहिले की कीव येते ;)
(माझी सध्याची गाडी : मांझा एलान)
काही प्रश्न..
* गाडी कुठे वापरणार आहात? शहर् /गाव?
* महिन्याला किती किमी?
* ठेवणार आहात की दोन चार वर्षाने विकणार? रीसेल व्हॅल्यु हा निकष आहे का?
* प्रवास कसा असणार? कुटुंबात किती लोक आहेत?
* नविन शिकणार की येते? चालवण्याची पद्ध्त कशी आहे? कशी गाडी आवडते?
* "लुक्स" हा निकष आहे का?
* इतर काही खास उपयोग? फर्माइश?
मी चार वर्षापूर्वी तुम्ही दिलेल्या किमतीच्या रेंज मध्ये असलेल्या सर्व गाड्यांचा तौलनिक अभ्यास करून
मारुती wagon R ची निवड केली. लिटर मागे किलो meter चांगले आणि मुख्य म्हणजे आतमध्ये उंची चांगली आणि सामान ठेवण्यासाठी इतरांच्या तुलनेत जागा अधिक. विमान तळावर अथवा रेल्वे प्रवासासाठी याचा फायदा भरपूर होतो.
कायद्याच्या बंधनात वेग ठेवल्यास तक्रारीला जागा नाही.
माझे बजेट आणि गरज साधारण तुमच्या प्रमाणेच होत्या.
मी सहा महिन्यांपुर्वी स्विफ्ट डिझायर पेट्रोल घेतली. माझा अनुभव असा आहे,
आवडलेल्या गोष्टी :
१) उत्तम मिलेज - मला नाशिक हायवेला साधारणपणे २३ kmpl मिळते. (जर गाडी ७०-८० या स्पिड्ला चालावली तर )
पेट्रोल साठी इतके मिलेज म्हणजे खुपच झाले.
२) देखभाल खर्च - अजुन नवी असल्याने काहीच नाही. पण मारूती fortpoint ची सर्वीस खुपच छान आहे. घरी येऊन गाडी घेऊन जातात. proactively फोन करतात.
३) डिकी - full sedaan एवढी नसली तरी चार जणांसाठी sufficient आहे. माझी सध्याची गरज भागली जात आहे.
४) interior - मलातरी डिझायरचे interiors अपमार्केट वाटतात. आतमध्ये बसल्यावर रॉयल फिलींग येतो..
५) ओवरटे़कींग - मला तरी कधी दम लावावा लागला नाही.
६) हाय स्पिड - जास्त जोरात पळवताना स्टेबल राहते . ( मी एकदाच १३० किमी/तास ला चालावली). १०० ला कधी येते ते कळतच नाही.
७) इंजिनचा आवाज - जर सर्व काचा बंद असतील तर आतमध्ये जाणवतच नाही की गाडी चालू आहे ते...very low engine noice and vibrations.
न आवडलेल्या गोष्टी :
१) Reverse parking - Reverse Parking चा डिस्प्ले पहिल्या महिन्यातच उडाला. मारूतीने खुप प्रयत्न केले पण Nippon ची सर्विस चांगली वाटली नाही. (nippon is manufaturerer of reverse parking system).
2) A/C - A/C चा फिल्टरमध्ये झाडाची पाने सारखी अडकतात आणि त्यामुळे कधीकधी burning smell येतो. फिल्टर साफ करणे जरा कटकटीचे आहे.
३) pick-up at moderate speed - तुम्ही जर ४०-४५ स्पिडला आणि ४ थ्या gear वर असाल आणि एंजिन जर २००० RPM जवळ असेल, तर जरा गाडीचा pick-up कमी जाणवतो. अशावेळी overtake करताना तिसर्या gear ला गाडी आणावी लागते. (जर चढ जरी आला तरी तिसरा gear टाकावा लागतो).
एक टाकी फुल आणि दुसरी रिकामी असेल तर चांगला मायलेज मिळतो.
जेव्हा नवीन नवीन चालवत होतो, तेव्हा हायवे वर all clear असले तरी ७०-८० च्यावर पळवली नाही. तसेच क्लचचा कमी वापर, योग्यवेळी गिअर बदलणे यामुळे मायलेज चांगला मिळतो. जसा चालवण्याचा अनुभव वाढला तसा गाडीचा वेग ही वाढू लागला आहे त्यामुळे हल्ली मला कमी मायलेज मिळतो.
http://www.carblogindia.com/maruti-swift-dzire-registers-a-mileage-of-42-kmpl/
दोन लिटर ..हा हा हा...
नशिब माझे...!!! २३ लिटर / किमी असे नाही म्हणाला ते..
बाकी खालील लिंक वाचून तुम्हाला डिझायर पेट्रोल ३० किमी/लिटर देऊ शकते यावर विश्वास बसायला हरकत नाही.
http://www.zigwheels.com/news-features/news/maruti-suzuki-dzire-registers-bizzare-mileage-figures/16237/
@योगी/आरोह-स्विफ्ट डिझायर सेडान असल्याने माझ्या बजेटबाहेर आहे.आणि फोक्सवॅगन जीटीआय सुद्धा
@शैलेन्द्र- गाडी शहरात वापरणार,महीन्याला साधारण १२०० की.मी., प्रवास मुंबै,पुणे,नाशिक,कोकण, साधारण ४-५ जण एकावेळी बसतील. लुक्सचा निकष नाही पण गाडी उंच असेल तर सरळ बसता येते वाकुन शिरायला लागत नाही.३-४ वर्षानी विकणार.चालवता येते.
गवि-तुमच्या डीटेलिंगवर आपण फिदा.पण गाडीचे रनिंग जास्त नसल्याने पेट्रोल कारच घेइन (हा निकष चूक असल्यास सांगावे )आणि पेट्रोलमध्ये CRDi सारखे इंजिन असते का हि एक शंका आहेच.फोर्ड फिगो proce/comfort रेशोमध्ये उजवी वाटत आहे.
@रमेश आठवले-वॅगन आर VXI शेवटचा ऑप्शन म्ह्णुन ठेवली आहे.
हॅ हॅ हॅ.. सगळेजण असंच म्हणतात.. यापूर्वीची हिस्टरी आहे का हे सिद्ध करण्यासाठी? मग खरं.
आजरोजी डिझेलही किंमतीने वाढत असलं तरी किंमतीत फरक आहेच... डिझेल गाडीला पर्याय नाही. डिझेल गाडी घेतली आणि जरा बेतानेच थोडीथोडी चालवली तरी काही ड्यामेज नाही.. एकदाच सुरुवातीला जास्त किंमत.. पण पुढे चारपाच लाँग ट्रिपमधे पेट्रोलचा खर्च असा काही येईल की सुरुवातीचा फायदा पुसला जाईल.
साध गणित,
पेट्रोल गाडी पाच लाखाची, डिझेल सहा लाखाची धरु, चार वर्षात(गाडीचे आयुश्य) एक लाख वीस हजार(किमान -१,००,००० +४% ब्यांकेत पडले तर मिळणारे व्याज) वसुल करायचे आहेत.
मोजा बोटे!
माझ्या गणिता नुसार रोजचे किमान साडे बेचाळीस कि.मि. किंवा चार वर्षात बासष्ठ हजार किमि चालवली तर ती वसुली होइल.
सध्या घरात चार चाकाच्या २ आहेत. इतर २ दुकानाच्या कामाच्या आहेत.
डिझेल स्वस्त पडते.
लोनचे हप्ते. डेप्रिसिएशन. रिसेल व्हॅल्यू. मग दिवसाचे रनिंग. प्लस पेट्रोल व डिझेल यांची दररोज वाढणारि किंमत.
आता मोडा बोटे :)
ब्यांक व्याज वसूल करतेच. टोलनाक्यावर टोल द्यावा लागतोच. गाडीत बसून रस्त्यावर उतरलो, की घासलेट भरायला खिशातले पैसे नगद जातात. टोटल सेव्हिंगचा हिशोबच लागत नाही तिथे त्या क्षणी.
मूळ सीड मनी काय लाख दीड लाख भरला तो भरला. गाडी हातात आली.
हप्ता तर जाणारच! होऊ दे चर्चा ;)
मायलेज छान , भरपूर जागा , उंची चांगली , डिकी मध्ये बरीच जागा, नवीन सोयी- कोलप्सिबल स्टेरिंग,पावर मिरर आणि पावर विंडो, पावर स्टेरिंग …मस्त कौटुंबिक कार, स्पेअर्स स्वस्त , रिसेल किंमत चांगली येते
महिन्याला १००००-१२०००?
मग डीझेल गाडी टॅक्सीवाल्यांनाही नाही परवडणार.. :)
महिन्याला १५०० च्या वर रनिंग असेल व CNG option वापरण्याजोगा नसेल तर डिझेल गाडी घ्यावी.
मी वॅगन आर VXI घेतली २०११ मध्ये. अतिशय अप्रतिम कार आहे. मेटेनंन्स पण फार नाही करावा लागत. मायलेज १५ ते १७ किमी देते. चालवताना फार मजा येते. k-series इंजिन आहे. नवनीत ठाणे ह्यांची सर्व्हिस फार उत्तम आहे. लेग स्पेस कार मध्ये फार चांगली आहे.
प्रतिक्रिया
इंडिका घ्या
आय ट्वेंटी
कुठेही कशीही वापरायची असेल तर...
आज काल दोन तीन लेखात
मिळमिळीत/ सपक/ तकलादू इत्यादी
हम म्हणजे पुचाट च्या विरोधी भन्नाट
पुचाट
कारचा प्रदीर्घ आणि लाखो
तुमच्या प्रतिसादाशी सहमत..
रेनाँ - निसान यांची कोणतीच
मला जाणवलेला मुख्य फरक म्हणजे
वेरिटो.
"(वेरिटो ही सेडानच नाहिये
तीनकप्पे
मी आठवतील ती नावं खाली देतोय.
चुकीच्या दुरुस्तीबद्दल अत्यंत
हां तेच म्हटलं !
अवांतर
मारुती अजुनही फियाटचं
या इंजिन ला गमतिने all india
येकदम करेक्ट...
फियाट इंजिनच चालू आहे
गवि साहेब
बेस्ट प्रतिसाद.
बातमी
काही प्रश्न..
मारुती wagon R
फोक्सव्यागन पोलो जि टी आ
स्विफ्ट डिझायर
१) उत्तम मिलेज - मला नाशिक
टाकी फुल करून
कोणाची?
गमतीचा भाग सोडा, पण पेट्रोल
एक टाकी फुल आणि दुसरी रिकामी
एक टाकी फुल आणि दुसरी रिकामी
रिकाम्या टाक्या गॅस पकडतात
२ लिटर
हा हा हा
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद
३-४ वर्षानी विकणार.
पण गाडीचे रनिंग जास्त
हिस्टरी कशाला?
६ गाड्या वापरून झाल्यात.
ब्यांक व्याज वसूल करतेच.
वॅगन आर VXI
Specifically VXI ka, LXI and
डिझेल गाडि/पेट्ररोल गाडि
महिन्याला १००००-१२०००?
राजेंद्र मेहेंदळे साहेब, वॅगन आर घ्यावी. फार उत्तम कार आहे.
CNG बद्दल कोणीच का बोलेना?
Pagination