Welcome to misalpav.com
लेखक: निनाद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सिनेमा तसा स्त्री पुरुष संबंधांवर मोकळेपणाने चर्चा करतो. पण काही जणांचे म्हणणे असे पडले की इतके उत्तान लिखाण असू नये. संयतपणे लिहिले जावे. माझे म्हणणे असे आहे की, चित्रपट जे दाखवेल ते मी लिहितो. चित्रपटाची मांडणी संयत असेल तर ते लेखनात येईलच. नसेल तर नाही येणार. तुम्हाला काय वाटते? लिखाण कसे आहे? कसे असावे?

तुम्हांला फ्रेम बाय फ्रेम सिनेमा उलगडायचा आहे का सिनेमाची कथा सारांशरुपात मांडायची आहे? सिनेमाची कथा स्त्री पुरुष संबंधांविषयी आहे हे मान्य. मोकळेपणे ह्या विषयी लिहिणे आणि उत्तानतेकडे झुकणारे लिहिणे ह्यात फरक अहे असे मला वाटते. तो फरक ओळखून लिखाण कोणतयही प्रकारे गलिच्छ वाटणार नाही असे लिहिणे, ह्यात कौशल्य आहे असे मला वाटते.

मला बहुतेकवेळा फ्रेम बाय फ्रेम सिनेमा उलगडायला आवडते. पण ते अगदी फ्रेम बाय असतेच असे नाही. जाणवलेले ठळक प्रसंग लक्षात राहतात ते लिखाणात उमटतात...
लिखाण कोणतयही प्रकारे गलिच्छ वाटणार नाही असे लिहिणे, ह्यात कौशल्य आहे असे मला वाटते.
हे तर निश्चितच! :)

नेट वर असेलही कल्पना नाही. मी एस बी एस नावाच्या चॅनलवर पहिला...

एक वेळ बघायला असे टाईमपास सिनेमे बरे असतात! परीक्षण लिहिलंय छानच.