Welcome to misalpav.com
लेखक: मृत्युन्जय | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मुरगन इडली म्हणजे स्वर्गारोहण ! आण्खी एक वैशिष्ट्य . सांबार वाटी असते पण चमाचा दिला नव्हता. ओरपा हाताने . म्हणजे बघा, ईडली घ्यायची आणि त्या केळीच्या पानावरच सांबार / चट्णी ओतायची ! आणि मग ..... आ क्र म ण ! त्या मानाने सर्वनन( उच्चार सार्व्ण) भुवन चे नाव जास्त झाले आहे. ते ही ठीकच आहे पण हल्ली त्याचे मद्रासी स्वरुप जाऊन अधुनिक झाले आहे.

बंगळूरातील .. एम टी आर .. हौस फिटते सौदिन्डियन खाण्याची ! मलबारी, तामिळ , तेलगु , कानडी अशा विविध छटा असल्या तरी मराठी माणसाला फार विशेष वाट्त नाही. कानडी स्व्यंपाक सर्व सौदिन्डियन मधे उजवा अशी माझी आवड आहे ! बाकी बंगलोरात चालुक्य चा दोसा खाणे यासाठी बरेच पुण्य गाठीशी हवे ! अस्ला मसाला दोसा जगात कुठेही मिळत नाही. दुधाची ताकावर साठी - विद्यार्थी ( गांधीबाजार ) , गणेश ( उच्चार गनेश - जयनगर ), बल्लाळ रेसिदेन्सी (रेसीदेन्सी रोड) , अडिगा ( जय नगर ) कामत आणि शांतिसागर यांचे दोसे ही चालतील.

धण्यवाद सरजी. चार महिने बंगळुरात राहण्याचा योग आला होता दोनेक वर्षांमागे पण केंगेरीजवळ आणि दोघा बंगाल्यांसोबत राहिल्याने ही ठिकाणे काही कव्हर करता आली नाहीत. बंगाली तेच्यायला नुस्ते नॉनव्हेज नॉनव्हेज करत मरत असायचे त्यामुळे जरा मागेच पडलं हे ऑथेंटिक खाणं. आता मात्र जाईन तेव्हा अवश्य खाईन तिथे!

खर आहे.. एकदा भुवनेश्वर मध्ये बंगाल्याबरोबर आठवडाभर होतो. मी शुद्ध शाकाहारी आणि हा साला माश्याशिवाय नाव काढेना ! शेवटी एका स्थानिक रिक्षावाला पकडला आणि त्याने ज्या ठिकाणी नेले... शुद्ध शाकाहारी खाणावळ होती ! तृप्ती म्हणजे काय याचा अखंड अनुभव ! आणि इअतके विविध प्रकार .. फक्त मिठाया नव्हेत तर भाज्या आणि स्टफड मटेरियल ! अप्रतिम ! त्यानंतर दोन वर्षांनी पुरीला आई- वडिलांसोबत गेलो होतो . ती खाणावळ शोधून काढली अणि चेपून आलो! भारतातील सर्व प्रांतात उत्तम शाकाहारी पदार्थ मिळतात आणि त्या त्या भागात तेच खावे.. शक्य तर नोन होटेल्स टाळून गल्लिबोळ धुंडाळावेत, उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. थोडी रिस्क घेण्याची तयारी हवी . पाटण्यच्या गांधी मैदानाच्या बाजूला बेलफळाचे सरबत विकतात. २ रुपये ग्लास . .. हायला शप्पथ सांगतो , हलाहलाचा दाह शांत होईल .पण धाडस हवे.बाटलीतील पाणी पिनार्याला ती मजा नाही.

ओरिसामध्ये कधी गेलो नाही. बंगालमध्ये २ वर्षे राहिलो-कलकत्त्यात. नॉनव्हेज खात नसतो तर कसा जगलो असतो देव जाणे तिथे. बंगाली व्हेज हा अंमळ टर्न ऑफच प्रकार आहे माझ्यासाठी.

आता कबूल करायला हरकत नाही. कोलकात्यात मासे कमीच खाल्ले :( माशाचा वास कैक दिवस सहन होत नसे. पुढेपुढे खाऊ लागलो अन मग मात्र प्रेमात पडलो. पाबदा, हिलसा ऊर्फ इलिश, रोहू अन सरताज म्हणजे भेटकी हे माझे खाल्ले. त्यापुढे जास्त नै. प्रॉन ऊर्फ चिंगडी तेही खाल्ले. माछेर झोल चांगली असते पण आपल्या गोवन/मालवणी फिश करीसारखी खंग्री नसते. चिंगडी माछेर मलाई करी हाही एक वेगळा पदार्थ खाल्ला-नारळाच्या दुधासोबतची प्रॉन करी. बाकी सर्वांत आवडलेला पदार्थ म्हणजे भेटकी. आखूडशिंगी बहुदुधीसारखे बहुमांसी स्वल्पकाटी म्हणता येईल त्या माशाला. त्याची ती डिश भेटकी पातुडी म्हणजे पानांत भेटकी माशाचे तुकडे करून वाफवले जातात. त्याची चव निव्वळ अप्रतिम लागते. जण्रल करी ऊर्फ झोलसुद्धा मस्त उत्तम लागतो. पण ज्याचा इतका उदोउदो केला जातो त्या हिलशात मात्र कै दम वाटला नै. दोनतीनदा खाऊनही कैच वाटलं नै. एक तर ढीगभर काटे त्यात परत टेस्टपण लै खास नै. असो, (अंमळ) जुन्या आठवणी जाग्या झाल्या या निमित्ताने.

हा प्रतिसाद वाचल्यावर मनुष्याने लगेच उठून त्या त्या ठिकाणी जावे. असो. भारतवारीत (म्हन्जे पुढील दोन तीन वर्षात) येईन तेंव्हा जाण्यासाठी हा धागा वाचनखूण म्हणून साठवावा म्हणते.

बहुधा माझे पुण्य पुरेसे नसावे गेल्या तीन वर्षात या चालुक्य बद्दल कधी ऐकले नाही त्यामुळे योग आला नाही. गुगलून पाहिले तर एक हॉटेल चालुक्य - म्हणजे राहण्याचे हॉटेल - रेस्टॉरंट नव्हे, दिसते आहे बसवेश्वर नगर मध्ये. तेच का अजून दुसरे कुठे आहे.. बाकि आडिगा उत्तम. बंगलोरात आवडलेले म्हणजे अडयार आनंद भवन आणि अर्थात एम टी आर. - बिशि बेळे भात, खारा भात (म्हणजे उपीठ) (सगळीकडे स्पेलिंग bath), एका प्लेटला एकच मिळणारा अप्रतिम वडा. आणि हो अनलिमिटेड थाळी.. फारच तयारीने जावे लागते. पण त्यातले सांबार / रसम माझ्या तेलूगू चवीला सरावलेल्या जिभेला थोडे गोड आणि कमी चवीचे वाटते. बाकी झकास.. सगळ्यात एक नंबर इडली आणि वडा मिळतो ब्राम्हिन्स कॉफी बार नामक एका अतिशय लहान जागेत .. ही आप्पासारखीच आणि त्याहून जुनी एक इन्स्टिट्युशन आहे. याहून भारी इडली, वडा आणि फिल्टर कॉफी कोणी बनवूच शकणार नाही. (अजून मुरुगनची चव नाही पाहिलेली त्यामुळे त्याशिवाय इतर)

चालुक्य - रेसकोर्स रोडला .. विधानभवानाच्या मागे .. बसवेश्वरांचा पुतळा आहे त्याच्या बरोबर समोर. होय तिथे राहण्याची सोय आहे पण तेच बसवेशवर नगर का हे माहीत नाही. दहा वर्शे उलटून गेली त्यामुळे आता को ओर्डिनेट्स स्मृतीतून पुसट होऊ लागले आहेत. ब्राह्मिन्स कॉफिबार - शंकर पुरम चा ना ? क्लासच आहे. पण त्याची मुरुगन बरोबर तुलना नको , दोन्ही इडल्या आपआपल्या जागी महान आहेत. एक कानडी तर एक मद्रासी , दोन्हीची घराणी वेगळी. आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे - ती एक संस्कृतीच आहे. तो भाग ही जुन्या कन्नडिगांचा आहे. विद्वत्प्रचुर चेहर्याचे अनेक कानडी आप्पा तिथे गहन चर्चा करताना दिसतील. तिथून केशव- कृपा अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे अनेक वेळा जाणे व्हायचे ! तिथली चट्णी.. वॉव .. तोंडाला पाणी सुटले.

Hotel Chalukya 44, Race Course Road, Basaveshwara Circle, High Grounds, Bangalore, Karnataka 560001 ‎ 080 2226 6866 याच हॉतेल्मध्ये रेस्त्रो आहे.आणि दारात कार लावून कारमध्ये बसून खायची पद्धत आहे. "कामत" आणि "पै" ची कर्नाटकी पातळ भाकरी ( जोल्डा रोटी - आपला जोंधळा) खाल्ली की नाही ? कधीतरी जायला हरकत नाही, पण वांग्याच्या भाजीचा चिखल करतात, आप्लं तेल वांगे दहावेळा तोंडात मारेल त्याच्या.

हे बेंगळुरूच्या खाद्यसंस्कृती बद्दलचे प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवा. परत बेंगळुरूला गेलो की या ठिकाणी जायचा बेत आहे - तेव्हा वाचनखूण सापडली पाहिजे :) का वेगळा लेखच लिहिताय बेंगळुरू बर?

प्रतिसाद आवडल्या गेला आहे बंगलोरचे प्रतिसाद इथे नकोत हे इतक्या सभ्यपणे लिहिल्याबद्दल --/\-- नोंद घेण्यात आली आहे. यापुढचे प्रतिसाद पुणे खाद्यसंस्कृतीवरच दिले जातील. (बंगळूरच्या तीन आधी पुण्यातच तीस वर्षे मनसोक्त खादाडी केली आहे..)

>>पुणेकर जेव्हा कुजकटपणा करतात तेव्हा मण्यारीचे विष सुद्धा त्यापुढे फिक्के पडेल. एरवीची शब्दलीला ज्याला लोक कुजकटपणा म्हणतात ते म्हणजे उगाच शाही बिर्याणी बरोबर तोंडी लावायला दिलेल्या सॅलॅड सारखे असते. सहमत. मस्त लिहीलंय. काल एफ.सी रोडवर (याला काही लोक एफ.सी. कॉलेज रोड असेही म्हणतात)यानामध्ये सिझलर्स खाल्ल्यानंतर कॅफे चॉकोलेडमध्ये एक लार्ज वॉलनट कॅड बी खाताना काहीसं असंच डिस्कशन चाललं होतं. पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही यावर एक छोटासा परिसंवादही (हो, परिसंवादच !! ;) ) घडला.

पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही
आता शिक्रणालादेखिल चंगळीच्या यादीत टाकले तर, यादीतील आयट्म्सची संख्या वाढणारच ! ;)

आप्पा गेले असं ऐकलं आहे. :( मटार उसळ घेतल्यावर अतिशय मऊ आवाजात - "शेव देऊ का? ताजी आहे." असं विचारलं होतं एक दोन वेळा. दस्तुरखुद्द प्रेमाने विचारतायत म्हटल्यावर काय बिशाद. मग एका बिस्किटाच्या (पारलेचा मोठा पत्र्याचा डबा) डब्यातून वर्तमानपत्रात ठेवलेली खरोखर ताजी आणि केवळ अप्रतिम शेव आप्पा बशीमध्ये द्यायचे. आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

अप्पा जाऊन २ वर्षे झाली असावीत. अजुन म्हणजे, अप्पाकडची खिचडी काकडी केवळ अप्रतिम.. खरच तुम्ही म्हणता तसे आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

कित्येकदा !! कँम्पवरून आठवले , काय खावे तिथे ? मार्जोरिन ला आईसक्रीम बर्गर किंग ला किंगसाईज बर्गर नायाब , रेडिओ ला खिमा गार्डनपासला वडापाव फुटबॉल, बियरचा प्युयर ड्राफ्ट आणि बिलीयर्डचा मुड असेल तर टुन्स ला बसाव

शोभलात हो ! आला का अभिमान वर. म्हनलेत स्वतास शहाने.. केलीत जहिरात... शोभलात हो पुनेकर !

झालय असं की ह्या लेखाचं ब्याकग्राउंड मला माहितीच नाहीये.. म्हणुन मला लेखाचा "निर्भेळ आनंद" घेता आला..!!! (पण काय हाणलाय च्यामारी.. वगैरे मजा नाही घेता आली!!) लेख उत्तम जमुन आलाय..!!! अगदी फक्कड..!!

यांचे जरा सविस्तर पत्ते मिळतील का? मनिषात पाणीपुरी - गणेशची लस्सी आणि ....सुजाताची मस्तानी खाउ शकतो... कधी मथुराची मस्तानी (जे एम रोड) ट्राय कर. आणि सिझलर्सचा विषय निघालाच आहे तर दोन ठिकाणं : शांग्रीला (कर्वे रोड) आणि रविराज (भांडारकर रोड).

मनिषा - कर्वेनगर मध्ये. कर्वे नगर मध्ये ३ गणेश भेळ आहेत. एक जोशी स्वीट्स समोर, एक चितळे (देवेश बंधु) शेजारी आणि एक त्यापासुन थोडेसे पुढे जाउन मयुर हॉटेलच्या अलीकडच्या गल्लीत. हे जे तिसरे गणेश भेळ आहे त्यासमोर मनिषाची पाणीपुरी आहे. त्यांची मसाला पुरी देखील मस्तच. गणेश लस्सी मोदी गणपतीजवळ आहे. स्टेशनवरचे कैलास देखील चांगले आहे. मथुरा, शांग्रीला आणि रविराज ट्राय किया जायेगा. धन्यवाद.

लॉ कॉलेज रोड चे योको सिझलर्स बेस्ट्.आणि नंतर सिझलिंग ब्राउनी खायला विसरु नका तेच ते...केकवर आइस्क्रीम आणि वर गरम चॉकलेट ओतुन

मला कल्याणि नगर मधलं बाऊंटी सिझलर खुप आवडलयं. ईतर कुणी ट्राय केलयं का? तसचं ईस्ट स्ट्रीट वरचं चायनीज रुम आणि जहांगीर बाहेरचा वहुमन कॅफे या पण लई भारी जागा आहेत :)

सॉमट्न, भोलेनाथ किंवा पालथा पण चालेल मुनीवर्यः एका सेकंड ह्यांड गाडीची पार्टी मागण्यापेक्षा तुमच्या नव्या जॉब ची पार्टी द्या. (नवा पगार आल्यावर पण चालेल)

लेख एकदम छान जमला आहे. माझ्या मते फक्त नगर येथे लस्सी मध्ये आइसक्रीम टाकून मिळते. (चूक भूल द्यावी / घ्यावी). नगरची दूर्गासिगची अंजीर लस्सीची चव छानच आहे. आपण नगरच्या लस्सीवरून पुणेकरांच्या खाद्यसंस्कृती वर कसे काय वळाला ? तसेच पुण्याचे लोक लग्नाचा बस्ता बा^धण्यासाठी नगरमध्ये येतात आणि संपूर्ण लग्नाचे व-हाड नगरची लस्सी पिल्याशिवाय परत जात नाही.

मीही नगरच्या लस्सीबद्दल बरेच ऐकले होते. ट्राय केली दोन तीन ठिकाणी. एक पेय म्हणून चांगले असेल वगैरे पण ती खरी लस्सी नव्हे. खरी लस्सी पंजाबात किंवा मग दिल्लीतही बर्‍याच ठिकाणी मिळते. अगदी अस्सल मटक्यातली लस्सी म्हणतात तशी 'मलाई मार के' प्यायल्यास जेवण करायला नको असे वाटते. फारच पोटभरीची असते.

स्टेशन जवळचे कैलास माझे फेवरिट आहे. मिसळीबाबत बोलायचे तर बेडेकर आणि श्रीकृष्ण अजूनही दर्जा टिकवून आहेत. (श्रीकृष्णमध्ये शेवटचं खाऊन सुध्दा २ वर्षे होवून गेली आता), रामनाथ कधीच आवडली नव्हती, नुसतंच तिखट जाळ पाणी, चव म्हणून नाही. रिलॅक्स ची पावभाजी खायचा योग आला नाही,तसंही मला व्यक्तिशः पाव भाजी आवडत नाही. नॉन व्हेज मध्ये मला आवारे आवडते. पण मस्तानी मध्ये मात्र सुजाताची पूर्वीची क्वालिटी नाही राहिली राव.खत्रींची पॉट मस्तानी ट्राय केली होती, चांगली वाटली.

मस्तानीचं माहीत नाही. पण खत्री मध्ये आईसक्रीमचा लै वाईट अनुभव आलाय. शहाळ्याचं आईस्क्रीम म्हणून घेतलं तर ते त्यात चक्क ओलं खोबरं किसून घातलेलं असावं असं लागत होतं. शहाळ्याच्या चवीच्या अगदी जवळपासही नव्हती ती चव.

@पण मस्तानी मध्ये मात्र सुजाताची पूर्वीची क्वालिटी नाही राहिली राव.>>> येकदम बराबर.मस्तानी/आईस्क्रीम खाताना डालडा तूपासारखा राप येतो तोंडात. @खत्रींची पॉट मस्तानी ट्राय केली होती, चांगली वाटली.>>> येस येस.. खत्री इज व्हेरी खत्री! फणसाचं आईस्क्रीम पण भारी एकदम! पण वरती सुडक्या म्हणतो तसं को को ... नट'च आहे नुस्ता! ते नॅचरल्स'लाच बेस्ट मिळतं... गार/कडक शाहाळं खाल्ल्याच फील येतो. :) आणखिन म्हणजे गुजर मस्तानी हाऊस कुठे गायबलय हल्ली..कळत नाही..मस्तानी'चे जनक ते! आमच्या सिंहगडरोडवरची शाखा चालू होऊन बंद कधी झाली ते कळलं सुद्धा नाही.सिटीप्राईड-सातारा रोड,जवळची शाखापण कधीच उडाली. त्यांच्याकडची बाजीरावमस्तानी/दही आईस्क्रीम..आणी पायनॅपल संडे लै मंजे लैच भारी होतं. :)

आमच्या पोरांच फेवरीट.. अनेक वाटाघाटी या एका डिशवर झाल्या आहेत . शीतल चे वडई सांबार पण लै खास !

बरयाच आइसक्रीम मध्ये Hydrogenated oil असते शेल्फ लाईफ दीर्घकाळ राहावे म्हणून. डालडा हा त्याचाच प्रकार. कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर असे आइसक्रीम न खाल्लेलेच बरे किंवा कधीतरी कमी प्रमाणात खावे. त्यापेक्षा घरगुती पध्दतीने बनवलेले खव्याचे आइसक्रीम चांगले. त्यातही फॅट नसते असे नाही पण Trans-Fat नक्कीच नसते.