Welcome to misalpav.com
लेखक: रामबाण | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

खरंच किळसवाणा प्रकार आहे हा. लांगूलचालनाची प्रथा आपल्याकडे तशी जुनीच. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चोख निकषांवर आधारित पुरस्कार आपल्याकडे असतात तरी कुठे? तळमळीने लिहीलेला लेख आवडला. जे.पी.

एक गोष्ट खटकली.....वर जी पद्म पुरस्कारांच्या नामांकनाची यादी आहे.....त्यात खुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच नाव आहे (जर ते तेच असेल तर....) हे कसे काय? त्यांची शिफारस कुणी केली असेल?

तसं त्यांना आधीच पद्मविभूषण मिळालंय, आता फक्त भारतरत्नच बाकीय... त्यांची शिफारस कोणी केली माहिती नाही पण त्यांनी यंदाच्या पद्मसाठी प्रितीश नंदींची शिफारस केली आहे

१९९२ साली म्हणजे मौलाना आझाद यांच्या मृत्यूनंतर जवळपास ३५ वर्षांनी, त्यांना मरणोपरान्त भारतरत्न दिलं गेलं, त्यांच्या विचारांची एक प्रकारे खिल्लीच उडवण्याचा हा प्रकार होता. यात खिल्ली काय आहे? स्वतः सत्तेत असताना स्वतःलाच पुरस्कार देऊ नये इतकेच त्यांचे मत होते. ते सत्तेत नसताना दुसर्‍यांनी दिलेला पुरस्कार घ्यायला त्यांची नकार नव्हता. त्याप्रमाणे त्याना नंतर पुरस्कार दिला तर त्यात गैर काही नाही. सध्या सचिनच्या गरम तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याच्या नादात हे सरकार आहे :) सचिनला कुणीही कधीही कसलाही पुरस्कार दिला तरी तो त्याला लायकच आहे. कुणी पोळी भाजुन घ्यायचा प्रश्न येतोच कुठे? आणि सचिनला काँग्रेसने नसता पुरस्कार दिला, म्हणून तो काही भाजपात गेला नसता . :) सचिनने भ्रमवृंदी भाजपाची डाळ शिजू दिली नाही , हे वास्तव ज्याना स्वीकारता येत नाही, ते लोक काँग्रेसच्या पोळीकडे बघत बसतात. :) -------.................. डाळ पोळी चापून हाणणारा उद्दामरत्न

तुमचं बरोबर आहे, बाकी कुलदीप नय्यर यांनी ते लिहिलंय ,त्यांना पण मौलाना आझादांना तेवढंच अभिप्रेत असेल असं वाटत नाही. आपणच म्हणजे राजकारण्यांनी, राजकीय पक्षांने पुरस्कार सुरु करायचे आणि आपणच म्हणजे राजकारण्यांनीच, आपल्याच पक्षातील लोकांनी वगैरे घ्यायचे याला त्यांचा तात्विक विरोध असावा. अर्थात हा माझा अंदाज. तवा गरम आहे म्हटल्यावर पक्ष कोणताही असो कोणीतरी पोळी भाजणारच, त्याला इलाज नाही :-)

आधी फक्त नय्यर यांनी सांगितलेले किस्सेच लिहिणार होतो पण थोडंथोडं अॅड करता करता लेख मोठा झाला. लोकसंख्येच्या तुलनेत विचार नाही केला तर?

'खैरात' म्हणताना तुलनात्मक प्रमाण हवं असं मला वाटतं. जर एखादा पुरस्कार एकूण अ‍ॅप्लिकेबल जनतेच्या (अओयीसाठी १०० कोटींपैकी फक्त १/१० म्हंजे १० कोटीच घेतोय, उर्वरीत ९०%वयाने लहान, कमी शिक्षण/कलेचा अभाव वगैरे म्हणून सोडून देऊ) ०.००१३% लोकांना दिला जातोय (एकूण जनतेच्या तर ०.००००१३% लोकांना) तर त्याला खैरात म्हणता येणार नाही इतकेच. बाकी या पुरस्कारासाठी योग्य कोण अयोग्य कोण यावर भाष्य करण्याइतके मला समजत नसल्याने पास!

'खैरात' म्हणजे 'संख्येने अनेकांना दिलेले पुरस्कार' असा अर्थ नसून 'पात्रतेचे कुठलेही निकष न वापरता दिलेले पुरस्कार' असा अभिप्रेत असावा.

'पात्रतेचे कुठलेही निकष न वापरता दिलेले पुरस्कार'
तसाच

पात्रतेचे निकष आहेत असे वाटते. या दुव्यावर पद्म पुरस्कारासाठी निवड कशी होते ते दिले आहे. मला या पद्धतीत फार मोठे दोष दिसले नाहीत. (काही सजेशन्स करेनही पण ती 'सजेशन्स' इतपतच, आग्रही मागणी करण्यासरखे वैगुण्य दिसले नाही).

या पुरस्काराचे काही फायदे मिळतात का? उदा: फुकट विमानप्रवास ,रेल्वेप्रवास , केंद्र -राज्य सरकार कडुन काही सवलती ? कदाचीत सवलत मिळण्यासाठी काहिजण पुरस्कार मिळवण्याच प्रयत्न करत असतील असे वाटते .

प्रतेयक देशातील पदांचा अग्रकम-मान ठरलेला असतो, तसं आपल्याकडे ज्याला Warrant Of Precedence म्हणतात, त्यानुसार देशात 1.राष्ट्रपती, 2.उपराष्ट्रपती, 3.पंतप्रधान 4.राज्यपाल, 5. माजी राष्ट्रपती, उपपंतप्रधान, 6.लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश यांच्याखालोखाल भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींचा नंबर येतो. प्रोटोकॉलमधे माजी पंतप्रधान / मुख्यमंत्री/ नियोजन विभागाचे उपाध्यक्ष / राज्यसभा आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते यांच्या बरोबरीचा दर्जा भारतरत्नला असतो भारतरत्नसाठी The Award does not carry any monetary grant असं लिहिलं असलं तरी काही विशेषाधिकार free air travel वगैरे आहेत असं वर्तमानपत्रात वाचण्यात ऐकण्यात आलंय. पद्म पुरस्कारासाठी तरी काही फायदे नाहीत म्हणजे तसं गृहमंत्रालयाच्या वेबसाईटवर लिहिलं आहे...
No cash allowance or any facility/benefit in terms of concession etc. in rail/air travel is attached to these awards.
फक्त सर्टिफिकेट आणि मेडल घ्यायचं राष्ट्रपतींच्या हस्ते

एक लाख नेत्र शस्त्रक्रिया करणारे आणि टीनपॉट एक्टींग करणारे दोघेही 'पद्मश्री'. स्वताचे पैसे खर्चून हजारो कुश्ठरोगी बरे करणारा फक्त 'पद्मविभूषण' आणि हजारो धावा करुन अब्जावधी कमावणारा आणि वर सरकारकडून टॅक्स माफीची अपेक्षा करणारा 'भारतरत्न.' . . . वेटरऽऽऽऽ...एक भारतरत्न आण रे.. (हॉटेल भारत अनलिमीटेड- पैसे देणार्याला खायला मिळणार नाही ,चकटफूंना लाईपटाईम खादाडपास मिळेल-हुकुमावरुन..)

लेखाशी सहमतच आहे. पण नोबेल इ. मध्येदेखील गडबड होतेच- उदा. ओबामाला शांततेसाठीचे नोबेल मिळणे. काय कर्तृत्व होते म्हणून त्याला मिळाले? असो. पण आपल्याकडची खैरात बाकी मज्जाच मज्जा आहे. नै म्हणजे सर्व पद्मपुरस्कारप्राप्त लोकांत निम्मे तरी जेन्युइन असतील असे समजले तरी उरलेल्या निम्म्यांचे काय =)) वायझेडपणा आहे.

ज्यांना मोठेपण मिळवता येत नाही तेच पुरस्कारांसाठी अडून बसतात. केवळ पुरस्कार मिळाला म्हणून एखादी व्यक्ती जनतेच्या स्मरणात दीर्घकाळ राहिली आहे असे उदाहरण अजून तरी पाहिलेले नाही. खऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना प्रतिष्ठेची भीक मागावी लागत नाही. सचिनच्या पुरस्काराबद्दल एवढेच वाटते की पुरस्कार स्वीकारून आपली किंमत वाढणार आहे की कमी होणार आहे याचा अंदाज येण्याइतके शहाणपण त्याच्याकडून अपेक्षित आहे.

सुंदर माहितीपूर्ण लेख. (लेखक रामबाण नि मूळ लेखक नय्यर साहेब दोघांचेही आभार) सगळ्याच क्षेत्रांची राजकारण्यांनी वाट लावलीये. ...

वाजपेयींची गाणी म्हटल्यावर पद्मजा फेणाणीबाईंनाही पुरस्कार मिळाला होता ना?

१९७८ च्या दरम्यान श्री लंकेचे पूर्व राष्ट्रपती आर प्रेमदासा हे पाचगणी येथे ( त्या वेळी तेच बहुदा उप राष्ट्रपती होते ) भारत सरकारचे पाहुणे म्हणून आले होते.त्यावेळी मी टेलीफोन ऑपरेटरच्या नोकरीवर होतो. त्याकाळी चटकन बाहेर गावी फोन लावून मिळणे दुरापास्त होते. ते ज्या हॉटेल मधे उतरले होते तेथील माणसाने जरा लवकर प्रयत्न करा एवढीच विनंति केली होती. माझ्या मनात आपण एक व्ही व्ही आय पी ला काही मदत करीत आहोत याची कल्पनाही नव्हती. फोन झाल्यावर खुद्द प्रेमदास यानीच मला फोन केला आभारासाठी. भारतात हिंडलो पण इतकी कामात तत्परता आपल्यातच दिसली.असे ते म्हणाले. हे पुराण सांगायचे कारण जर नय्यर मला अगोदर भेटते व पद्मश्री चा " अजब" निकष त्यानी ऐकवला असता तर मी प्रेमदास यांच्या वशिल्याने " पद्मश्री" नसतो का झालो. आता आडनाव नावाचे साम्य असून तो पुरस्कार दुसर्यालाच गेला असता तर दुर्दैव. बाकी आपला लेख वाचून मला पद्मजा फेणाणी हिला पदमश्री कशी मिळाली याचे कोडे सुटले. अटलजी दाउ टू ?

त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करणारे डॉ..... त्यांना पद्मभूषण का पद्मश्री मिळाली होती. कुमार सानूनं प्रणवदांना गाणं ऐकवायची धमकी देऊन पद्मश्री मिळवली तर शेफालीखानला ('ते'लाच काही लोक सैफअली खान म्हणतत) मातोश्री सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष असल्याचा 'योगायोग' कारणीभूत होता.

नुयोर्क मधील डॉ.राणावत यांनी वाजपेयी यांच्या एका गुढ्ग्याचे ऑपरेशन केल्यानंतर त्याना पद्मश्री मिळाली. त्यानंतर वर्षाने त्यांनी वाजपेयी यांच्या दुसर्या गुढ्ग्याचे ऑपरेशन केल्यानंतर त्यांना पद्म भूषण मिळाली. राणावत याना भारत रत्न मिळवण्यासाठी काय करावे लागले असते याची कल्पनाही करवत नाही.

''खैरात' म्हणताना तुलनात्मक प्रमाण हवं असं मला वाटतं.'' बरोबर हि तुलना लायकीच्या संबंधातील असते एखाद्याची लायकी नसताना बक्षीस इत्यादी प्राप्त झाल्यास त्या बक्षिसाची खैरात झाली असे म्हणतात असे मला वाटते .

खैरात म्हणजे खूपजणांना दिले जाते केवळ एवढेच नव्हे तर कसेही, कोणत्याही निकषाशिवाय, केवळ देणार्‍याला वाटले म्हणून खिरापतीसारखे वाटलेले पुरस्कार असा अर्थ आहे. खैरात म्हणजे दयाबुद्धीने दिलेले दान.

बाकी लेख विचारकरायला लावणारा आहे. म्हणजे ह्यात विचार करण्यासारखं काही नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. ज्याची सत्ता त्याच्या हाती दोरी. म्हणजे पुढे पुढे चेपुवर जास्त लाईक करणार्‍यांना किंवा मिळणार्यांना सुद्धा एखादा ह्या कॅटॅगिरीतला पुरस्कार मिळावयास हरकत नाही... मेरा भारत महान (का लहान?) - वाट्या....

पूर्वी अनेकदा पद्म पुरस्कारांची विकी यादी काढून त्यातले चित्र विचित्र "योगायोग" आणि टायमिंगचा उहापोह केला होता. पण तो स्वतःच्या समजूतीसाठी रविवारच्या चहा पोह्यांबरोबर. असा थेट from horse's mouth लेख (नय्यर) तरीही अतिशय संयतपणे मांडलेला प्रथमच वाचला. खूपच नवीन इतिहास समजला पुरस्कारांचा आणि उडदामाजी काळे गोरे असेच वाटले राजेंद्रप्रसाद - लाझारूस, अटलजी - पद्मजा अशी उदाहरणे समजल्यावर. तरी हे पद्मश्री आहेत. पण भारतरत्न च्या यादीतली काही रत्ने मला अजून काही झेपली नाहीयेत -- १. झाकीर हुसेन (तबलानवाज नाही माजी राष्ट्रपती) २. व्ही व्ही गिरी (अजून एक काँग्रेसी राष्ट्रपती) ३. गुलझारीलाल नंदा (एक औट घटकेचे पंतप्रधान) ४. एम जी रामचंद्रन (फिल्म अभिनेते, तमिळनाडूचे मुख्यमंत्री) आधी आणि नंतर कोणाला भारत रत्न दिले गेले हे तर पार वैताग आणणारे प्रकरण आहे १. एम जी आर यांना १९८८ मध्ये आणि डॉ. आंबेडकरांना १९९० मध्ये -- काही थोडा तरी ज्येष्ठता, मान्यता, पात्रता याचा विचार ? २. सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई आणि राजीव गांधी या तिघांना एकाच वर्षी - १९९१ मध्ये पूर्ण वेगळ्या काळातले तीन नेते - पुन्हा तोच प्रकार ३. झाकीर हुसेन आणि गिरी यांना १९६३ आणि १९७५ मध्ये तर सरदार पटेल, आंबेडकर, मौलाना आझाद यांना ९० च्य दशकात व्यक्तिगत मला कसलाही आकस नसला आणि त्यांनी बरीच चांगली कामे केली हे पूर्ण मान्य केलं तरी राजीव गांधी यांना भारत रत्न मिळण्यासारखं काय काम होतं हे मला कधीच समजलेलं नाही. भारत रत्न अशा सर्वोच्च आणि मोजक्या व्यक्तींना देण्यात आलेल्या पुरस्कारात ही स्थिती आहे तर पद्मश्री ची सत्ताधार्‍यांनी खैरात केली यात नवल नाही. त्यात अशा उदाहरणांचाच एक भला मोठा लेख होईल इतके मटेरिअल आहे. अक्षय कुमार, ऐश्वर्या राय, धोनी आणि पं. हृदयनाथ मंगेशकर व अमीन सायानी या सर्वांना २००९ या एकाच वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला हे वानगीदाखल पुरेसे व्हावे.

अहो हे काहीच नाही ! नटरंग मधील "अप्सरे" वर खुश होऊन आपल्या मा . मुख्यमंत्र्यांनी एक मुंबईत नवा कोरा फ्ल्याट दिल्याचे घोषित केलेले !

अहो, मुद्दा का सोडताय? विषय गळ्यात घालण्याच्या पुरस्कारांबद्दल सुरु आहे ना आत्ता? 'अशोक'चक्र, नि इतर चक्कर नंतरसाठी ठेवा की! ;)

विषय गळ्यात घालण्याच्या पुरस्कारांबद्दल सुरु आहे ना आत्ता?
मी पण आधी गळ्यात पडून नंतर पदरी पाडून घेतलेल्या बक्षीसा बद्दलच बोलतोय तुम्ही काय ह्या विषयावर पुढे मागे कुटायला घेणार आहत कि काय?

अप्सरेचा दावा होता की ती म्हाडाची लॉटरी जिंकली..तरीही काही लोक असे आरोप करतात ह्याचे तिला फार वाईट वाटले म्हणे;)

आता जाऊ द्या ना घरी .. या वाक्याचा मुख्यमंत्र्यानी असा अर्थ लावला . :)

राजकारण राजकारण फक्त पद्म पुरस्कारांच्या बाबतीत होत अस नाही तर खालचे पुरस्कार जसे "राष्ट्रपती शौर्य पुरस्काराच्या" बाबतीत हि होते. माझ्या वडिलांनी १९७१ च्या भिवंडीच्या जातीय दंगलीत अग्निशमन दला तर्फे जीव धोक्यात घालून ८ स्त्रियांचे प्राण वाचवले. यात ते स्वत: हल्लेखोरांच्या हल्यात जबर जखमी झाले होते. त्यावेळची हि बातमी वर्तमान पत्रात आली होती. १९७२ साली ठाणे महानगर पालिकेने त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली. पण वडिलांच्या वरिष्ठांना हि बाब काही पचनी पडली नाही व त्यांनी हे प्रकरण पुढे जावूनच दिले नाही. १० वर्षानंतर जेव्हा वरिष्ठांनी स्वत: ची शिफारस याच पुरस्कारासाठी केली, तेव्हा वडिलांचे प्रकरण परत बाहेर आले. शेवटी नाईलाजास्तव वरिष्ठांना दोघांची शिफारस करावी लागली आणि दोघांना पुरस्कार जाहीर झाला. जर वरिष्ठांना पुरस्कार जाहीर झाला नसता तर तेव्हाही त्यांनी वडिलांना पुरस्कार मिळून दिला नसता.