Welcome to misalpav.com
लेखक: मारवा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

दोन स्त्रीयांमधले (किंवा पुरुषांमधले) आकर्षण समजु शकत नाही पण तरीही स्वतःच्या लैंगिकतेबद्दल शरम न बाळगता आणि लोक काय म्हणतील ह्या आणि असल्या फालतु मुद्द्यांना फाट्यावर मारुन लग्न केल्या बद्दल शॅनॉन आणि सीमा ह्यांचे अभिनंदन..!!

वधु-वधु (आता वर कोण आणि वधु कोण हा एक संशोधनाचा विषय आहे =)) ) एकमेकांना अगदी अनुरुप आहेत हे निरीक्षण नमूद करतो. ;)

खरं तर सगळंच अगम्य आहे. हा निसर्गाचा चमत्कार मानावा का शाप हेच कळत नाही. वैयक्तीक मताचा झालेला नको इतका उदो उदो असावा की सामाजीक/कौटुंबीक दडपणाचा ढीलेपणा मानावा? समाजाच्या संकेताला विरोध मानावा की खरच शास्त्रीय कारण मानावं? असे अनेक प्रश्न घेऊन इथेच थांबावे ते बरे. - वाट्या...

हा निसर्गाचा चमत्कार मानावा का शाप हेच कळत नाही.
प्रत्येक गोष्टीकडे चमत्कार किंवा शाप म्हणून बघण्याची काही गरज नाही. आता एक उदाहरण देतो. पूर्वी अनेक डावऱ्या मुलांना मारून मुटकून उजव्या हाताने सर्व गोष्टी करायला लावायचे. का, तर समाजात डाव्या हाताने काही गोष्टी करणं शिष्ट, शुभ समजलं गेलेलं नाही म्हणून. समजा, त्या काळात सगळेच असे मारून मुटकून उजवे झालेले असताना कोणीतरी डाव्या हाताने लिहिताना दिसलं तर असाच प्रश्न विचारणं कितपत योग्य ठरलं असतं? थोडक्यात जे आहे हे असं आहे. शाप-चमत्कार नाही, तर सत्य वास्तव आहे. चला, नुसतेच प्रश्न विचारून थांबण्यापेक्षा स्वीकारूया आणि पुढे जाऊया.

कायच्या काय उदाहरण आहे …. डावा उजवा आणि लेस्बिअनचे लग्न काही तरी संबध आहे का ? हे म्हणजे असे आहे मला जुलाब होत आहेत कारण काल तीन वेळा लाईट गेली होती.

अस हाय का सगळ . मी समजत व्हतो की जेंडर रेशो कमी आसल्यामुळ आमाला लग्नासाठी पोरी मिळत् नायत . =)) :-)

बाकीच्यांच्या स्वीकारण्याचा प्रश्नच कुठे येतो हो! बिवी-बिवी राझी तो क्या करेगा काझी! हा लग्न, प्रेम ह्या ज्याच्या त्याच्या वैयक्तिक बाबी आहेत. आपल्याला (समाजाला) हस्तक्षेप करण्याचा काही-एक हक्क नाही.

>>हे सर्व करतांना त्यांनी बुरसटलेल्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव पडु दिला नाही. -- हे अत्यंत अनावष्यक आणि अपरिपक्व मनोवृत्तीचं प्रदर्शन. समलैंगीकतेला समाजमान्यता मिळतेय म्हणजे समाज उत्क्रांतीच्या फार मोठ्या टप्प्यावर आला आहे हा आणखी एक कुतर्क. समलैंगीकतेला लग्नसंस्थेत प्रवेश मिळाला म्हणजे लग्नसंस्था आणि त्याआधारीत कुटुंबव्यवस्थेला फार काहि क्रांतीकारी सुधारणा आणणारी पर्वणी असा विचार तर प्रचंड विनोदी.

>>समलैंगीकतेला समाजमान्यता मिळतेय म्हणजे समाज उत्क्रांतीच्या फार मोठ्या टप्प्यावर आला आहे हा आणखी एक कुतर्क. >>समलैंगीकतेला लग्नसंस्थेत प्रवेश मिळाला म्हणजे लग्नसंस्था आणि त्याआधारीत कुटुंबव्यवस्थेला फार काहि क्रांतीकारी सुधारणा आणणारी पर्वणी असा विचार तर प्रचंड विनोदी. मी तुमच्या मताशी २००% सहमत आहे!!! असे असेल तर मग विधवा पुनर्विवाह ही तरी कशी काय सुधारणा म्हणता येईल? मुलगी वयात आल्यावर लग्न न लाऊन देता १८ वर्षांची होऊ देण्याची वाट पाहणे हि तरी कसली सुधारणा! हि सगळी लग्नव्यवस्थेला आणि समाजाला वाममार्गाला लावायची लक्षणे आहेत. जातीबाह्य लग्ने, विधवा पुनर्विवाह बेकायदेशीर ठरवा! सतीची प्रथा पुन्हा चालू करा. मुलींची वयात येताच लग्ने करा. तेव्हाच समाजाची घडी सुरळीत राहील.

>>असे असेल तर मग विधवा पुनर्विवाह ही तरी कशी काय सुधारणा म्हणता येईल? -- विधवा स्त्रिचे शरीर संबंधातुन संतती, संगोपन, याला सामाजीक मान्यता. हि ती सुधारणा. >>मुलगी वयात आल्यावर लग्न न लाऊन देता १८ वर्षांची होऊ देण्याची वाट पाहणे हि तरी कसली सुधारणा! -- अपत्य पालन आणि संगोपनासाठी शारीरीक आणि मानसीक तयारी. >>हि सगळी लग्नव्यवस्थेला आणि समाजाला वाममार्गाला लावायची लक्षणे आहेत. -- हो ना. डोण्ट टेक दॅट वाम मार्ग. >> जातीबाह्य लग्ने, विधवा पुनर्विवाह बेकायदेशीर ठरवा! -- घ्या ना पुढाकार. >>सतीची प्रथा पुन्हा चालू करा. -- अवष्य. तुमच्यापासुनच सुरुवात करुया काय? >>मुलींची वयात येताच लग्ने करा. -- इतकं फ्रस्टेट व्हायचं कारण काय? तुम्हालाही मिळेल कि लग्नाला मुलगी. थोडं सबुरीने घ्या. नाहितर एखादा बाप्या पकडा... हा.का.ना.का. पण बारशाला बोलवा हां समस्त मिपाकरांस. >>तेव्हाच समाजाची घडी सुरळीत राहील. -- तुमचा कळवळा बघुन आनंद वाटला. आता मुळ मुद्दा: >>थिंक अगेन.. -- प्रतिसाद देण्यापुर्वी आपण हि तसदी घेतली होती काय? तसं वाटत नाहि.

१-विधवा स्त्रिचे शरीर संबंधातुन संतती, संगोपन, याला सामाजीक मान्यता. हि ती सुधारणा. ज्या देशात या समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता आहे त्या कायद्यात सर्व प्रकारच्या प्रोव्हिजन्स केलेल्याच असतात. त्यात अशा जोडप्यांनी क्रुत्रीम पध्दतीने गर्भधारणा करणे, अशा संतती ला कायदेशीर मान्यता, सामाजिक हक्क इत्यादी आनुषंगिक सर्व बाबींचा उहापोह झालेलाच असतो.मुळात कायदा जेव्हा मान्यता देतो तेव्हाच हे सर्व विचार चिंतन करुनच आनुषंगिक प्रोव्हिजन्स आलेल्याच असतात. प्रस्तुत विवाह जेथे झालेला आहे तेथे तो पुर्णपणे कायदेशीर आहे. व तसाच जगात सर्वत्र व भारतात होईल तेव्हा मग लेस्बीयन्स वर अन्याय होणार नाहीत. आणि ही सर्व लढाई कायदा लागु करण्यासाठीची च आहे.

पण सद्यः विवाहसंस्था स्त्रि+पुरुष या नैसर्गीक पुनरुत्पादन सिस्टीमवर आधारलेली आहे. नव्या पिढीची जबाबदारी तिला जगात आणणार्‍या दोन्हि घटकांना देण्याचं प्रयोजन विवाहसंस्थेत आहे. शिवाय भिन्नलिंगी व्यक्तींना परस्परांप्रती जे काहि व्यक्त करायचं आहे त्याला शक्य तितका मोकळेपणा देण्याचा त्यात प्रयत्न आहे. हि संस्था निर्माण होताना त्यात कृत्रीम गर्घधारणेचा विचार नव्हता म्हणुन तिला बुरसटलेली म्हणावं काय ? समलिंगी विवाह, पॉलीगॅमी आज ना उद्या सर्वमान्यता पावेलच, पण म्हणुन आजची परिस्थिती सती प्रथेसारखी भयावह आहे असं म्हणावं काय ? आणि सर्वात महत्वाचं, या सर्व घडामोडी नवीन समाज धारणांच्या संदर्भातुन प्रगल्भपणे हाताळाव्या कि त्यात ग्लॅमर शोधुन उथळ थिल्लरपणा करावा?

मला पडलेले काही प्रश्न १. ह्या सीमा वाहिनी भारतात राहणाऱ्या भारतीय आहेत कि भारतीय वंशाच्या आहेत? २. ह्या लग्नाला ह्या ब्लॉग मध्ये "भारतीय समलैंगिक विवाह " असेच का फक्त म्हटले आहे ? शेनोन वाहिनी भारतात स्थायिक होणार आहेत का? ३ हे बड्या लोकांचे मेक अप करणारे कायम बायले का असतात ? ४ हे सर्व बघता उद्या "Zoophilia" असणाऱ्या लोकांचे पण लग्न होणार का ? झालेच तर प्राण्याच्या बाजूने कोण कोण येणार ? विवाह सोहळा एन्जोय करणारे सर्व पब्लिक हे कमरेचे काढून डोक्यावर बांधणारे दिसत आहे . ह्या शेनान वाहिनी तर फेमेल नाही तर शिमेल दिसत आहेत

ह्या शेनान वाहिनी तर फेमेल नाही तर शिमेल दिसत आहेत एखाद्या बाईचा बांधा पुरुषी आहे म्हणुन असले उद्गार काढले जाणे अप्रशस्त ठरते. "शिमेल " हा खासकरुन खुप अप्रस्तुत उद्गार वाटतो. नुसतेच पुरुषी दिसणे किंवा बायल्या दिसणे म्हणणे वेगळे. पण हे मर्यादा ओलांडुन लिहिल्यासारखे वाटले. हे सर्व बघता उद्या "Zoophilia" असणाऱ्या लोकांचे पण लग्न होणार का ? झालेच तर प्राण्याच्या बाजूने कोण कोण येणार ? "Zoophilia" शब्द मी पहिल्यांदा ऐकला पण एकुण संदर्भावरुन यातुन तुम्हाला एका प्राण्याचे आणि मानवाचे असलेले शरीरसंबंध सुचित करायचे असावेत. याबाबतीत २ गोष्टी लक्षात घ्याव्यातः १. २ समलिंगी मानवांमधले शरीरसंबंध हे परस्पर संमतीने होत असतात (अपवादात्मक बलात्कार सोडुन द्या). माणूस - पाणी प्रकारात मात्र प्राण्याच्या रुकाराचा प्रश्न येत नाही . हे संमतीने झालेले प्रणय म्हणता येणार नाही. त्यामुळे तुलना अप्रस्तुत आहे. २. समलिंगी संबंध हे केवळ शारीर पातळीवर असत नाहित तर ती मनाची एक गरज असते. मुळात प्रेमसंबंधातुन निर्माण झालेले बहुतेक सगळे शरीरसंबंध शरीराइतकीच मनाची भूक देखील भागवतात. माणूस - प्राणी शरीरसंबंधात असे होत नसते. भिन्नलिंगी व्यक्ती शारीर पातळीवर उदात्त असतात आणि समलिंगी लिंगपिसाट असतात असा काहिसा समज झाला असल्यास तो पुर्णपणे चुकीचा आहे. माणूस - प्राणी संबंध मात्र माणसाची विकृत लैंगिक इच्छा पुर्ण करण्यासाठीच असतात. आपल्या पाळीव प्राण्यावर आपल्या बायको / नवर्‍यासारखा प्रेम कराणारा (री) पुरुष / बाई खुपच अपवादात्मक गणला(ली जावा (वी)

बर्‍याच वेळा रुढीविरुद्ध काही गोष्टी पाहून काहींच्या मनात येते की ही मोकळीक कुठवर जाणार - प्राणी/लहान मुले/अचेतन शरीर यांच्यापर्यंत तर ही मोकळीक जाऊन ठेपणार नाही ना? वगैरे चिंता वाटतात. पण एक लक्षात घेतले की "निरामय संबंध" = उभयतांच्या परस्पर संमतीतून प्रस्थापित झालेला संबंध की या चिंता वाटण्याचे कारण नाही.

फोटो आवडले. लेस्बियन तर आवडतातच म्हणजे त्या प्रकाराबद्दल लैगिक दृष्टीने समजून घेऊ शकतो (कदाचित पुरुष असल्याने) होमो लोकांच्या बाबतीतली लैंगिकता इम्याजीन करून किळस येते. अर्थात सामान्य जीवनात त्यांना वेगळे काढणारातला मी नाही. कदाचित बायकांनाही असेच काहीसे वाटत असावे. रच्याक्ने, दोघींचाही बांधा मजबूत आहे. शिवाय स्माइल इतकी अंगावर येते आहे कि दात कृत्रिम आहेत असं वाटतंय.

लग्न हाच एक प्रॉब्लेमॅटिक विषय आहे,तर लेस्बियन लग्नात किती काँप्लिकेशन्स असतील? सत्यनारायण,पहीला दिवाळसण,पाडवा, झालेच तर अधिक मास ,डोहाळेजेवण यांचे काय? घटस्फोट झाल्यास प्रॉपर्टीचे वाटप कसे? मुलांची कस्टडी कोणाकडे? (दत्तक घेतलेल्या /घेतल्यास) पुढे ४९८ अ लावायचे झाल्यास कोणाला लावणार वगैरे.... जाणकारांनी प्रकाश टाकावा

घटस्फोट झाल्यास प्रॉपर्टीचे वाटप कसे? मुलांची कस्टडी कोणाकडे? (दत्तक घेतलेल्या /घेतल्यास) लग्नाचा अट्टाहास फक्त एकमेकाला बांधण्यासाठी नाही तर एकमेकाला प्रोटेक्ट करण्यासाठी केला जातो. लिगली जर ते दोघे कपल असतील तर आपल्या नंतर आपल्या जोडीदाराला आप्ले सग्ळे हक्क अन प्रॉपर्टी मिळावी असा हेतु असतो. तेच मुलांचही. डायवोर्स मात्र बघायला हवा. अर्थात रिलेशशिप घट्ट जुळल्यानेच विवाहाच पाऊल उचलल जात, आणि पाश्चिमात्त्य लग्नात, लग्नाच्या वेळीच एक कॉट्रॅक्ट साएन कराव लागत वधूवरांना, की इफ धिस डज नॉट वर्क ऑउट हाऑ शुड वी पार्ट. विच थिंग्ज आय वुड लाइक टु शेअर अ‍ॅन्ड विच नॉट.

जोरदार पाठींबा आहे. विचार व मने न जुळलेल्या भिन्नलिंगी विवाहांपेक्षा विचार व मने जुळलेला समलैंगिक सोहोळा सॅक्रीड (मराठीत?) नक्कीच म्हणावा. सीमा व शॅनन यांना शुभेच्छा.

समलैंगीकतेला विवाहाची आवष्यकता का पडावी? लैंगीक संबंधातुन जन्मणार्‍या नव्या पिढीची** जबाबदारी स्विकारणार्‍या सामाजीक संकेताचं नाव म्हणजे विवाह. आता आडातच नसेल तर पोहर्‍याला कशाला उगाच सामाजीक संकेताच्या ओझ्याखाली दाबायचं आणि कॉम्प्लीकेशन्स वाढवायचे? ** नवी पिढी जन्माला आलिच पाहिजे, किंवा विवाह झालेल्या जोडप्यांचच मुल हवं, नसल्यास विवाह रद्द असं काहि होत नाहि. पण विवाह व्यवस्था नेमकी आहे काय? स्त्री आणि पुरुष हे निसर्गाने निर्माण केलेले डायपोल्स. त्यांच्या संयोगातुन जी ऊर्जा निर्माण होते कि भूतकाळाचा वर्तमानाशी आणि वर्तमानाचा भविष्याशी सांधा जुळवते. या सांधा जुळवण्याच्या प्रक्रियेला सशक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याची व्यवस्था म्हणजे लग्नसंस्था. समलैंगीकतेचा य व्यवस्थेशी काहिच जोड बसत नाहि. मग विवहाची उठाठेव कशाला??

इन्शुरन्स (मिनेपोलीस मध्ये काही महीन्यापूर्वी समलैंगिक विवाहास मान्यता मिळाली. माझी इन्श्युरन्स कंपनी आहे त्यांना काही अपडेट करावे लागले.), इस्टेट आदि बाबींमुळे लग्नबंधन आवश्यक वाटत असावे हा कयास.

मला 'फ्रेंड्स' या मालिकेत बघितलेलं सुझान आणि कॅरोलचं लग्न आठवलं.. ते इतकं सुंदर दाखवलंय, की हा विषय हेटाळणीचा वाटेनासा झाला तेव्हापासून...

>>वधुला भावांनी डोली त बसवुन आणणे आदी सर्व अगदी साग्रसंगीत करण्यात आलं. थट्टा नाही, पण दोन्ही वधूच!! नक्की कोणतीला डोलीत बसवून आणलंनीत?? विवाह वैगरे मान्य. पण हे फक्त लैंगिक आकर्षण असेल तर ते असं किती दिवस टिकणार, कारण लग्न म्हणजे फक्त तेवढी एकच गोष्ट नव्हे. प्रेमच असेल तर मग लग्न कशासाठी? लग्नाशिवायही एकमेकींसोबत राहू शकल्या असत्या की !!

प्रेम् असलेल्या भिन्नलिंगी व्यक्ती देखील लग्नाशिवाय एकत्र राहु शकतातच की. कितीजण असे राहतात. नगण्यच ना? तेवढ्या प्रमाणात समलिंगी व्यक्ती सुद्धा लग्नाशिवाय एकत्र राहतात. पण लग्न हा एक विधी आहे. कुठल्याही धर्मातला असु देत. आपण म्हणतो तसे ते बंधन नाही. ते एक वचन आहे, ती एक कमिटमेंट आहे. या सगळ्या गोष्टी लग्नाशिवायदेखील होउ शकतात. पण तरीदेखील भिन्नलिंगी व्यक्ती लग्न करतातच ना? ते केवळ एक सामाजिक गरज नाही. त्यातुन अजुनही भावनिक संबंध प्रस्थापित होतात. भिन्नलिंगी विवाहसंबंधात देखील नेमके असेच होते.

भिन्नलिंगी विवाहसंबंध हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध नसुन ते निसर्गनियमानुरुप आहेत असे नमूद करु इच्छितो. ज्या निसर्गाने माझ्यासारख्या सामान्य माणसात भिन्नलिंगी व्यक्तींविरुद्ध आकर्षण निर्माण केले त्यानेच समाजातील काही व्यक्तींमध्ये समलिंगी आकर्षण निर्माण केले आहे. त्या आकर्षणाला आणि ओढीला मनाविरुद्ध मारुन आणि डावलुन भिन्नलिंगी व्यक्तीमध्ये जीवनाचा आनंद शोधणे हे मुळात विकृत आणि निसर्गनियमाच्या विरुद्ध आहे असे वाटते. पुर्वी समलिंगी व्यक्तींबद्दल कीव वाटायची. आता असे वाटते की त्यात कीव वाटण्यासारखे काहिच नाही. त्या व्यक्तीही जीवनाचे सुख पुरेपुर उप्भोगत आहेत. फक्त वेगळ्या मार्गाने. निसर्गत: त्यांची आवड वेगळी असेल तर त्यात कीव किंवा घृणा वाटण्यासारखे काही नाही. शॅनोन आणि सीमाला सुखी सहजीवनाच्या शुभेच्छा.

आपलं मत अगदी असंच ! कम्युनिस्ट म्हणतात डेमोक्रसी परव्हर्ट आहे आणि डेमोक्रसी वाले असेच म्हणत असतात कम्युनिस्टा बद्द्ल. ते लेस्बो व होमो आपल्या सगळ्याना अशीच विकृत माणसे समजत असतील !

सुंदर सोहळा! नवपरिणित जोडप्याचे अभिनंदन...

नवपरिणित जोडप्याला शुभेच्छा....! सोहळ्यातील फोटो छानच. प्रत्येकाला आपापल्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. आता आपल्या भारतीय आणि पारंपरिक मनाला असं काही पचवनं तसं अवघड जातं. 'आता त्यांचं पुढं कसं' या प्रश्नाच्या भोवती फिरत राहीलो की प्रश्नांचा गुंता निर्माण होतो त्याचीही उत्तरं त्यांच्याजवळ आहेत. लग्नसंस्था, कुटुंबसंस्था, समाज मान्यता अशा या आणि नव्या विचाराप्रवाहात आजची सामाजिक परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे असे वाटायला लागते. आपल्या आजूबाजूला नित्य नियमाने अशा गोष्टीं घडत गेल्या की त्याचं अप्रुप वाटणार नाही. प्रत्येकाला सन्मानानं जगता यावं हे महत्त्वाचं. -दिलीप बिरुटे

जोवर तुम्ही अश्या लोकांच्या सहवासात येत नाही तोवर तुम्हाला काहीतरी वेगळी भावना असते. मी सिंगापुर् मध्ये अस एक जोडप अगदी त्यांच्य घरात जाउन येउन पाहिलय. सुरवतीला खूप एंबॅरॅस व्हायच मलाच, पण मग हळु हळु त्यांचा एकमेकाबद्दलचा स्नेह पाहिला. त्या दोघी ज्या पद्धतिने एकमेकाला स्पर्श करायच्या ते पाहीलं (स्पर्ष इन द सेन्स ऑफ व्हाईल कम्युनिकेटींग). आन भावनिक पातळीवरची त्यांची एकमेकाबरोबरची ओढ ही जाणवली. मग खरच मी माझ्या लग्नाकडे पाहू लागले. इट वॉज जस्ट अ कंपेरिझम ऑफ रिलेशन्शिप. इट वॉज अमेझींग! त्यांच्यात वर्चस्व अस नव्हत. रिलेशन सांभाळायची धडपड नव्हती. एल रिलॅक्स असा अ‍ॅटीट्युड होता. दोघीही माझ्यापेक्षा दहाबारा वर्षाने मोठ्या होत्या, अन त्या काळात त्यांच्या विशीत त्यांनी हे वास्तव स्विकारल होत, अन त्याच्यानुरुप त्या दोघी एकमेकाबरोबर राहील्या होत्या. त्यातल्या एकीलाही पुरुष कधी पुरुष म्हणुन आवडलाच नाही. अन सुरवातीपासून त्या, प्रेमात पडायच्या वयात; एकमेकीच्याच प्रेमात पडल्या. बाकी असे विवाह थाटमाटात का करतात? त्यामुळे कदाचित प्रसिद्धी मिळते म्हणुन लहाण मुले असल्या त्यांच्यात नैसर्गिकरित्या नसलेल्या भावना उगाचच स्वतःवर लादून घेउ शकतात.

बाकी असे विवाह थाटमाटात का करतात? त्यामुळे कदाचित प्रसिद्धी मिळते म्हणुन लहाण मुले असल्या त्यांच्यात नैसर्गिकरित्या नसलेल्या भावना उगाचच स्वतःवर लादून घेउ शकतात.
हे खरं तर सर्वसाधारण भिन्नलिंगी विवाहांनाही लागू पडतं की. ज्यांच्या मनात भिन्नलिंगी भावना नसतात त्यांच्यावर इतका काळ हे 'वास्तव' लादलं जायचंच.

लहान मुलांना वृत्तपत्रातल्या बोभाट्याशी काहीच संबंध नसतो. त्यांच्यासाठी संस्कारक्षम वयात जे मोठ्या हौसेमौजेने करतात तोच खरा बोभाटा. या बोभाट्यापोटी कितीतरी समलैंगिकांना यापलिकडे काहीतरी असू शकतं याचा प्रत्येकाला शोध लावावा लागतो. त्यापोटी स्वतःशी झगडा द्यावा लागतो. अनेकांना हा ताण सहन न होऊन ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. 'Researchers have found that attempted suicide rates and suicidal ideation among lesbian, gay, bisexual, transgender, queer, and questioning (LGBTQQ) youth is comparatively higher than among the general population.[1][2][3][4][5][6] LGBT teens and young adults have one of the highest rates of suicide attempts.[7][8][9] According to some groups, this is linked to heterocentric cultures and institutionalised homophobia in some cases, including the use of LGBT people as a political wedge issue like in the contemporary efforts to halt legalising same-sex marriages.' मी तर म्हणेन की होऊदे अजून बोभाटा.

हे खरं तर सर्वसाधारण भिन्नलिंगी विवाहांनाही लागू पडतं की. ज्यांच्या मनात भिन्नलिंगी भावना नसतात त्यांच्यावर इतका काळ हे 'वास्तव' लादलं जायचंच. हॅट्स ऑफ़ टु यु !!!