अत्तिशय म्हणजे अत्तिशय आवडली कथा. अनपेक्षित कलाटण्या, पण वास्तवापासून अजिबात दूर न जाता, 'वचन' ह्या शिर्षकाशी प्रामाणिक राहात केलेला, हृदयस्पर्शी शेवट हा तर कथेचा अत्युच्य बिंदू म्हणावा असा.
तो दुरवर तळ्याकाठी जाउन डोळे मिटुन शांत बसुन राहतो.रात्री भजन,किर्तन दणदणते.गार वार्यावर बाहेर हा शांतपणे किर्तन ऎकत बसतो,कधीतरी मग तिथेच डोळा लागतो.सकाळि जाग येते ती पक्षांच्या किलबिलाटाने,सार्या तळ्यावर धुक्याची चादर पसरलेली असते,कालची सगळी मंडळी परतलेली असतात,देवळाच्या आवारात हा कचरा पडलेला.तो निश्वास टाकतो आणि कोपर्यातला झाडु हातात घेउन देउळ झाडायला घेतो.
हा तळ्यावर जातो, पाणी घेउन येतो,समयांच्या उजेडात वेतोबाला छान अभिषेक करतो.फुलांनी सजवतो.मग तेलाची कळशी उचलतो,आणि दीपमाळांपाशी जातो,पुढील दोनेक तासात तो सर्व दीपमाळा प्रज्वलीत करतो, सोनेरी प्रकाशात देउळ उजळुन निघतं,कृतार्तथेने तो वेतोबाला हात जोडतो, तिचा सुखी संसार पाहुन त्याचं मन भरुन येतं
ह्या दोन परिच्छेदात 'त्याचं' पूर्ण व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर उभे राहते.
एक सुंदर कथा. अभिनंदन.
वा स्पांडोबा वा, मस्तच. अतिशय आवडली तुमची गोष्ट.
वातावरण निर्मीती तर झकास, एखादी भयकथा असेल असे गृहित धरुन वाचायला सुरुवात केली होती. शेवटी पोचेपर्यंत आता घाबरवेल, पुढे घाबरवेल असे वाटत होते.
मांडणी, वातावरण निर्मीती, लेखन शैली यांना १०० पैकी १०० गुण.
अप्रतिम खिळवून ठेवणारी शैली.
राहून राहून कुठल्यातरी थोर लेखकाची आठवण करुन देणारी. असं कुणाचं तरी वाचलंय असं जाणवून देणारी.
(तुलना थोरवीसाठी आहे, उणीव दाखवण्यासाठी नाही.)
बाकी थोडंसं शुद्धलेखन वाढायला हवं.
एकदा लिहून झाल्यावर शांत वाचलंस तर जमेल!
(मात्रा, वेलांट्या, उकार) नि
टिपिकल प्यारे मोड> त्रिपुर नावाच्या असुराचा नाश करणारा त्याचा वैरी म्हणून शंकराला 'त्रिपुरारि' असं म्हणतात. तो असुरवधाचा दिवस साजरा करायचा म्हणून त्रिपुरारि पौर्णिमा प्यारे मोड ;)
'अरि' ला पहिली वेलांटी असते ना?
कृष्णाचं नाव 'मुरारि'.
मला वाटतं 'हरि' मध्ये पण पहिलीच वेलांटी.
उच्चार करुन पाहिलं पहिलीच असावी.
मराठी तज्ज्ञ धनंजय रावांना बोलवा. अन्यथा संस्कृत तज्ज्ञ बॅटमॅन आहेच. ;)
या सर्व उदाहरणांत र्हस्व वेलांटीच आहे संस्कृतनुसार, मराठीत मात्र बहुतेकवेळा मूळ र्हस्वाची लिहिताना दीर्घ वेलांटी होते. अर्थात उच्चारात फार कै फरक आपण करत नै. पण आदतसे मजबूर झाल्याने अशी र्हस्व वेलांटी पाहिले की ऑड वाटते खरे.
धन्स प्यारे काका
करतो बदल :)
शु.ले च्या चुका आहेतच,पण या गुगल ने मराठी टायपिंग चे "मेघ" वर्जन आणल्यापासून हे असे प्रॉब्लेम व्हायला लागलेत. मला ग म भ न वापरता येत नाही
शिवाय पूर्वपरीक्षण मध्ये एक आणि प्रकाशित झाल्यावर वेगळच दिसतं :(
अस देऊळ असेल तर बघायला आवडेल :)
जीएच्या आयुष्यात असाच प्रसंग घडला असे वाचल्याचे आठवते (पण नक्की नाही..चुभू द्या-घ्या)..
पळून जाण्याच्या आणाभाका..प्रियकराचे वाट पहाणे - आणि तिचे न येणे !!
देवळासमोरच्या दीपमाळेसारखं सुरेख मनाला भिडणारं लेखन. सगळं पहावं लागणारा वेतोबाही असहाय झाल्यासारखा वाटला क्षणभर. सगळा परिसर, वेतोबा, गाभार्यातला काळोख अन देऊळ ही सुद्धा अगदी जिवंत पात्रं होऊन आली आहेत. मस्तच! असं लिहिणार असशील तर इतकी वाट बघायची जरूर तयारी आहे!
जवळपास सर्वांच्याच डोळ्यांपुढे चित्र उभे राहिले इतकी सुरेख वातावरणनिर्मिती आहेच. माझ्याही मन:चक्षुंसमोर कथेतील वातावरण आणायचा प्रयत्न केला, तसे ते आलेही पण तरीही काहीतरी खटकलेच.
अर्थात कथेत उणीवा काढण्याचा प्रयत्न अजिबात नाही. पण मंदिराच्या वर्णनात काही ढोबळ चुका झालेल्या आहेत.
देवळासमोर तीन पुरुष उंचीच भव्य महाद्वार दिसतं.
जुन्या मंदिरांना इतकी भव्य महाद्वारे मी तरी कधीच पाहिली नाहीत. सर्वसाधारणपणे जेमतेम वाकून जाता यावे इतक्याच उंचीची प्रवेशद्वारे असतात. भव्य महाद्वारे ही तशी अलीकडची कल्पना.
महाद्वार्च्या शेजारी दोन कोनाड्यात जय-विजयांच्या भग्न मूर्ती,
जय विजय हे मंदिरांच्या तटबंदीतल्या द्वारांमध्ये कधीच कोरलेले नसतात. ते असतात एक तर सभामंडपाच्या प्रवेशद्वारांत अथवा गर्भगृहांच्या दारात.
दहा पायऱ्या चढून आपण आत येतो.समोर अतिप्रचंड असा नंदी
वेतोबाच्या मंदिरापुढे नंदी कसा आला? वेतोबा म्हणजे भैरवनाथ अथवा काळभैरव. हा वेतोबा जरी शंकराचा अवतार मानला तरी त्यांच्या मंदिरांत नंदी नसतो. मग नंदी इथे असण्याचे कारण काय असावे? तर त्याचा उलगडा कदाचित लेखाच्या ह्या ओळींत होतो.
वडाच्या बुंध्याशी असलेले एक मोठे शिवलिंग.
म्हणजे मूळात पूर्वी गाभार्यात शिवपिंडी असावी. आणि नंतर मूर्तीभञ्जकांच्या हल्यामुळे ती उद्ध्वस्त केल्यामुळे बाहेर ठेवली गेली असावी आणि मग नंतर कधीकाळी गाभार्यात वेतोबाची स्थापना झाली असावी.
एरवी शांत असणारे देऊळ वर्षातून दोनदा गजबजते. महाशिवरात्र आणि त्रिपुरारी पोर्णिमा
चैत्रातल्या उरसाचा उल्लेख कसा काय नाय आला ब्वॉ?
बहुतेक ग्रामदेवतांचे उत्सव चैत्रामध्ये होतात. निदान घाटावरच्या तरी. कोकणातल्या दैवतांचे माहीत नाय ब्वॉ.
बाकी मंदिर परिसर खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराशी बराचसा मिळताजुळता आहे असे निरिक्षण नोंदवतो.
तिथेही असंच कोट असलेलं मंदिर, वड, वडाखाली मूर्तींचे भग्नावशेष, वीरगळ असे सर्व काही आहे फक्त नंदी आणि दीपमाळा नाहीत.
लेखकाचे कल्पनास्वातंत्र्य म्हणून सोडून द्या हो! =))
बादवे हे बघा आरवलीच्या वेतोबाचे ३ पुरुष उंचीचे प्रवेशद्वार. आणि महाद्वारातले जयविजय.
कोकणात जत्रांचे उत्सव बहुधा पालख्या झाल्यानंतर असतात. म्हणजे शिमग्यानंतर. उरूस मुसलमानांचा. जत्रा हिंदूंच्या.
नंदीच्या बाबत गोव्यात प्रचंड गोंधळ बघायला मिळेल. कारण लोकांनी पोर्तुगीज अत्याचारानंतर ज्या मूर्ती सापडल्या आणि लपवता आल्या त्या कशातरी लपवल्या आणि स्थैर्य मिळाले तशा मग कोणत्याही देवळात नेऊन ठेवल्या. चंद्रेश्वर भूतनाथ हा मुळात शिवगण, नंतर शिव स्वरूपात मानला गेल्याचे एकाने सांगितले. त्या देवळात नंदी आहे. गोव्यात नंदी कुठे बघायला मिळेल याची काही शाश्वती नाही. ओल्ड गोव्याला तर एका नंदीलाच वाटेवरचा देव म्हणून पुजतात. मात्र कोकणात अशा उलथापालथी झाल्या नसाव्यात.
पुरातन ग्रामदैवते ही शंकरापेक्षाही जुनी दैवते होती. त्यांची देवळे अगदी लहान घुमट्या वगैरे स्वरूपात असल्याने आक्रमकांपासून सुरक्षित राहिली आणि नंतरची शंकर आणि कृष्ण, गणपती इ. देवळे मोठी आणि वैभवशाली असल्याने फोडली गेली. कालांतराने अशा रक्षक देवांना शंकराचे अवतार वगैरे समजले गेले. हळूहळू त्यांची देवळे मोठी होत गेली. अशी देवळे सहसा अगदी साध्या घरासारख्या बांधणीची पहायला मिळतात. माझ्या आठवणीत बसणीतल्या महालक्ष्मी, रवळनाथ देवळांवर कौलारू छपरे होती.
अहो, लेखकाच्या कल्पनास्वातंत्र्याबद्दल आदर आहेच.
बाकी मी लेखकाने उल्लेखलेल्या प्राचीन मंदिराबद्दल बोलत होतो. तुम्ही जो फोटो दाखवताय ते काम तुलनेने बरेच अलीकडचे आहे. :)
बाकी इथे उरुस हिंदूंच्या जत्रेला पण म्हटले जाते. मुसलमानकाळात रूढ झालेला शब्द आहे तो. उत्सवाचा उरुस झाला. इथे चिंचवडात भैरवनाथाचा उरूस, वडगाव मावळातल्या पोटोबाचा उरुस असे लै फेमस आहेत.
तुम्ही जो फोटो दाखवताय ते काम तुलनेने बरेच अलीकडचे आहे. Smile
आहे ना! पण कथाही आजच्या काळातलीच आहे ना! देवळाचे जीर्णोद्धाराचे काम झाले असेल!! :D
स्पा, तुझ्या बाजूने एवढी उत्तरे दिली. बदल्यात माझ्या लेखाला प्रतिसाद मागत नाहीये. आता पुढची भूतकथा लवकर लिही!
=)) =))
कथा आजच्या काळातली असू दे की पण जीर्णोद्धार झालाय किंवा कसे हे लेखकाने कुठेच सुचित केले नाहीये. किंबहुना एकंदरीत लेखनाच्या धाटणीवरून मंदिर अतिशय जुने आहे असाच वाचकाचा ग्रह होतोय. :D
बाकी पुढची भूतकथा लवकर लिही याच्याशी प्रचंड सहमत.
सुंदर कथा. स्पा असे काही लिहू शकतो असे वाटले नव्हते. अर्थगाैरवासाठी भारवी फेमस होता. आता हा पण होणार की काय ??? स्पा, तुला आपल्याकडुन एक पियुष, दादर पेशल ;-)
प्रतिक्रिया
*****
चांगली कथा आहे.
वातावरणनिर्मिती छान. आवडली
जबरदस्त...
+1 Awesome...
कथा आवडली.
सुंदर. कथा वाचताना प्रत्यक्ष
सुंदर !
वर्णन जब्राट चित्रदर्शी आहे
अवतरले... अवतरले...! बय्राच
अप्रतिम साहित्यकृती.
सुरेख वर्णन
वातावरणनिर्मिती अप्रतिम!
मिपावर स्वागत!
जबरा....
अतिशय आवडली कथा.
अतिशय आवडली कथा.
झकास...मस्त...
+१०००००
अगदी
शेवट चटका लावून गेला.
भारी रे भो
मस्त रे ...पुर्वार्धातील
मस्त!
छान!
टॅब/बोल्या वर टाईप केलं असावं
(No subject)
अप्रतिम खिळवून ठेवणारी शैली.
त्रिपुरारी(रि??) पौर्णिमा..त्रिपुरा नव्हे !!
'अरि' ला पहिली वेलांटी असते
या सर्व उदाहरणांत र्हस्व
धन्स प्यारे काका
ग्रेट प्लोट... सुपर्ब!
__/\__
सुरेख तपशील अन वेधक मांडणी.
जबरी वातावरण निर्मिती
सुंदर लेखण, चित्रदर्शी
मस्त कथा
मला वाटलं लेखनसन्यास घेतलास
सुरेख लिहिलंस
मस्त लिहिलय… वाचताना अक्षरशः
जबर्या
सुंदर वर्णन
जवळपास सर्वांच्याच
ओ इतिहासकार
अहो, लेखकाच्या
आहे ना!
=))
वल्लीचा प्रतिवाद करणे बाकी
सुंदर कथा. स्पा असे काही लिहू
Pagination