मग ते मुलांना का द्यायचे?
त्यांचे स्वत्व त्यांच्याकडे असेलच ना? आणि त्यांच्यासाठी हेच 'खरं' जग आहे ना?
भूतकाळात गुंतून काय मिळणार?
तसे तर मग कार चा प्रवासपण नको. बैलगाडीनेच जायला हवे. घुंगरांचा आवाज ऐकत ऐकत. किंवा इ.स.१२०० मधली मराठी हीच शुद्ध म्हणून तीच वापरून कसे चालेल?
अशी अनेक उदाहरणे घेता येतील.
आमच्यावेळी 'नव्हते हो असले'
किंवा
आपण 'हे जपायला हवे' हे तरी किती काळ आळवत बसणार?
मग ते मुलांना का द्यायचे?
त्यांचे स्वत्व त्यांच्याकडे असेलच ना? आणि त्यांच्यासाठी हेच 'खरं' जग आहे ना?
+१००
"मुलांनी आपण जगलेल्या जगापेक्षा वेगळ्या (जास्त चांगल्या) जगात जगावे"
पण तरीही ते
"आपण जगलो त्या जगापेक्षा वेगळे नसावे"
या दोन विचारांतला प्रचंड विरोधाभास सहज विसरला जातो हे एक प्राचीन काळापासून चालत आलेले वैश्विक आश्चर्य असावे :)
त्या परदेशातच रहातात, हे लेख वाचता वाचताच जाणवले होते.
भारतीय संस्कृती / परवचा / स्तोत्रे याबद्दल रडारड करणारे अमेरिकेत रहातात.
मुघलानी कसे लुबाडले / हिंदुनो जागे व्हा असे संगणारे सौदीत राहून पैसे मिळवतात.
आणि मराठी भषा जगलीच पाहिजे वगैरे लेख लिहिणारे आपल्या पोरान्ना डॉन बॉस्कोत घालतात.
इंटरनेटावरचा हा आता न्हेमीचाच अनुभव झालेला आहे.
Albert Einstein ने एक वाक्य लिहिल होत...
"I fear the day that technology will surpass our human interaction.
The world will have a generation of idiots."
मी महाविद्यालयात ३ तासाचं लेक्चर देते त्याकरता power point चा वापर करून प्रेझेन्टेशन बनवते.
बाकी सोनालीताई, तुम्ही कुठल्या महाविद्यालयात सलग तीन तासांचं लेक्चर नेहमी देता?
नाय जरा नांव सांगा म्हंजे तिथल्या लेक्चरर्सची युनियन करता येते का ते पाहू!!!
पोटेंशियल युनियन लीडर,
पिवळा डांबिस
बदल हे जिवंतपणाचे लक्षण आहे. जे बदल सोयीचे असतात ते टिकतात. गैरसोयीचे पण एक फॅशनम्हणून अंगिकारले जातात ते कालांतराने गळून पडतात. (नविन फॅशन आल्यावर.).
प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये विचारांत तफावत आढळतेच. आज आपल्या मुलांचे वागणे आपल्याला 'वेगळे' वाटत असेल तर आपण लहान असताना आपल्या आई-वडीलांचे त्या काळातील 'वाटणे' सुद्धा वेगळेच असायचे. कांही बदल सावकाश झाले (जसे आपल्या बालपणी) तर हल्ली यांत्रिकीकरणाच्या युगात आयुष्य वेगवान झाले आहे त्यामुळे बदलही फार झटकन होत आहेत. इतके की आपल्याला (सावकाश बदलांच्या सवयीच्या पिढीस) ते बदल स्विकारणे अंमळ कठीण जाते आहे.
आपले मुल ज्या जगात जन्मलेले आहे ते जग आपल्या बालपणाच्या काळापेक्षा खूप खूप वेगळे आहे. ह्या वेगळ्या जगानेच आपल्या मुलांवर 'वेगळे' संस्कार केले आहेत. हे 'वेगळेपण' आपल्याला स्विकारण्यास त्रास होतो कारण आपण सतत 'त्यांच' आणि 'आपलं' आयुष्य ह्यांची तुलना करण्याची गल्लत करीत राहतो. ह्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची 'आपल्याला' गरज आहे. आहे ह्याच (त्यांच्या) जगात जे चांगले आहे ते त्यांनी आत्मसात करावं ह्या बद्दल जागरूक राहावं. आज मिपावर (आणि इतर संस्थळांवर) आपण जेवढे सहज आणि तत्परतेने व्यक्त होतो ती सुविधा आपल्या लहानपणी होती का? संवाद हरवलेला नाही, संवादाचं स्वरूप बदललं आहे.
संस्कार म्हंणजे काय? एखाद्या वस्तुमानाचे एका स्थितीतून दुसर्या स्थितीत स्थित्यंतर होण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया. सोन्यावर 'संस्कार' करून दागिने घडवितात. हिर्यांवर पैलू पाडण्याचे 'संस्कार' करतात. तसेच, मुलांमधून एक जबाबदार व्यक्ती घडविण्याचे 'संस्कार' करावेत. पाढे, परवचा, श्लोक, सण-वार इत्यादी गोष्टी मर्यादित स्वरूपात महत्त्वाच्या आहेत पण ते म्हणजे संस्कार नव्हेत. मुलांना आजच्या जगातही वागण्यातील सुचिता, विचारातील स्वच्छता आणि परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्याची गरज ह्या मार्गाने संस्कार केले पाहिजेत. बाकी त्यांना कॉम्प्यूटर, वॉट्स अप, मोबाईलवरील गेम्स खेळू द्या लक्ष देऊ नका.
पेठकर काकांशी सहमत !
कोअर किंवा व्हॅल्यु सिस्टम असणे महत्वाचे , बाह्य बदल अपरिहार्य आणि आवश्यक ही आहेत. त्याचा फार बाऊ नसावा. म्हणजे कॉम्पुटर गेम खेळताना हिंसक होत नाही ना हे पाहणे महत्वाचे. आणि त्यासाठी मुलांशी सतत संपर्कात राहणे महत्वाचे ! संस्कार कसे करावेत हा खरेच मिलियन डोलर चा प्रश्न आहेच पण त्याचे सोपे उत्तर , जे मुलांनी करावे असे वाटते ते आपण स्वत: करणे ! म्हणजे मुलांनी सोशल व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर प्रथम आपण सोशल असले पाहीजे. आपण मित्र मंड्ळी - नातेवाईकांना घरी बोलावले पाहीजे. फोन न करता ही जाता यावे अशी ४-२ घरे आपल्यासाठीपण असली पाहीजेत. आपण वॉतस अप अथवा चेपु वर सतत असू तर मुले ही असणारच !
या दोन वर्षातील जाणवणारा फरक सांगतो..दर शनिवारी मुलाला शाळेत सोडण्या- आणण्याचे काम माझे असते. त्यावेळी शाळेबाहेर अनेक आया उभ्या असतात.परवा-परवा पर्यंत या कोंडाळे करुन गप्पा मारत उभ्या असायच्या. पण आता मोबाईल मध्ये डोके घालून बसलेल्या असतात. आणि हा बदल सार्वत्रिक आहे. हे मी भारतातील - पुण्यातील सांगतोय. लोक आता फोन करण्याऐवजी स्टेट्स अपडेट करतात.गप्पा मारायला वेळ कुणाला आहे?. बदलांचा वेग इतका सुपर फास्ट आहे.
( परवा एक स्टेट्स अपडेट पाहीला .. वैकुंठात पोचलोय .. बॉडी अजून आली नाही ..! ही अतिशयोक्ती नाही , खरेच असा स्टेट्स आला होता आणि त्याखाली श्रद्धांजली च्या कॉमेंट . नशीब कोणी " लाईक " केल नव्ह्ते.)
मग अशा वातावरणात मुले तेच नाही का करणार ?
आणि त्याचा मर्यादित वापर त्यांनी करायलाच हवा हे त्याना कळायला हवे असेल तर त्यातील सारासार विवेक संभाळण्याचे भान पालकांना हवे ! यंत्रे - सुविधा आपल्यासाठी आहेत , आपण त्यांच्यासाठी नाही याची स्पष्ट जाणीव आपल्या " वागणुकीतून" मुलांना करुन द्यायला हवी. म्हणजे बदल आपण आपल्यात केला की तो आपोआप मुलांच्यात उतरतो. याला शॉर्ट्कट नाही
एका मुलाखतीतील रजनी तेंडुलकरांचे वाक्य आठवले - "संस्कार करायचे म्हणून काही असत नाही , ते घरातील वातावरणामुळे आपोआप होत असतात."
मुक्तपीठीय लेख. फोरम चुकल्याला आहे...
मुलांना सो कॉल्ड संस्कृतीचे ढोस पाजत रहायचं, आणि खडू-फळा वापरून शिकवायचा विचार "ऐकणार्याला चालेल का?" म्हणून मुदलातच रद्द करून टाकायचा - हा विरोधाभास भारी आहे.
अबे का शाला मस्करी हाय का काय? शाला ते षोनाली डिक्रा काय तरी चांगलं सांगटे ते टुमी शांत र्हाऊन आयकू नाय शकते काय?
हे तुमी जुने मिपाकर लोक्स. शाला मॉनिटरबी चा हिकडं टायमपास करु र्हायला काय?
काय रे कुनी नवा डिकरा आला सालेमंदी तर तेला तुमी बोलून पन नाय देत काय?
- ते मॅथ्स मदला टेबल कंदी बाय्हार्ट न झालेला प्यारमुझ 'चप्पल'वाला. :)
प्रतिक्रिया
बदल्ते विश्व
स्वत्व
स्वत्व म्हणजे व्यक्तित्व……
मग ते
+१
मग ते मुलांना का द्यायचे?
मग ते मुलांना का द्यायचे? त्यांचे स्वत्व त्यांच्याकडे असेलच ना? आणि त्यांच्यासाठी हेच 'खरं' जग आहे ना?+१०० "मुलांनी आपण जगलेल्या जगापेक्षा वेगळ्या (जास्त चांगल्या) जगात जगावे" पण तरीही ते "आपण जगलो त्या जगापेक्षा वेगळे नसावे" या दोन विचारांतला प्रचंड विरोधाभास सहज विसरला जातो हे एक प्राचीन काळापासून चालत आलेले वैश्विक आश्चर्य असावे :)आपल्या भावना पोहोचल्या....
व्वा छान, असाही विचार करणारी
कदाचित भारतात चित्र वेगळं असू
.
एकदम राईट.
खरं आहे.
प्र. का. टा. आ.
Albert Einstein
वावा
जुन्या बाटलीत नवीन दारू
मग?
कान धरलेली स्मायली >>> मापी .
(No subject)
बाकी काही असूदेत, ह्या
महाविद्यालयात ३ तासांचं लेक्चर?
ओ पिडां
जोखिम !
कसली हौस ही?
शिर्षक ! शिर्षक !!
त्यात ३ तासाचे लेक्चर
सलग तीन तास आमी कालीजात पण
?
संस्कार.
+१
+१
सुंदर प्रतिसाद
बरोबर
मुक्तपीठीय लेख. फोरम
+१००
...
अबे का शाला मस्करी हाय का काय
उत्तरे
=))
नवीन सदस्यांवर जिलबी न
माझी मुलं ह्या चक्रात अडकू
(No subject)
***
@नवीन लेखकांची रॅगींग
फक्त मराठीत?
धागा वर काढत आहे.