Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अपुर्व माझ्या कंपनीत अत्याधुनिक व्यायाम शाळा आहे तिथे मी रोज सकाळी १ तास व्यायाम करतो मला काही प्रश्न आहेत जर मी तुला व्य.नी. केला तर काही मार्गदर्शन कर्शील काय.

व्हेरी गुड धागा!! पिवळा डांबिस - Fri, 22/11/2013 - 10:54 व्हेरी गुड धागा!!
ह्या असल्या रीमार्कमुळॅच मराठीची ब्याकहाट चालू आहे. यू नो मराठी लेस अ‍ॅन्ड इंग्रजी मोअर अशी लँग्वेज यूज केल्यामुळे हल्ली मराठे वर्ड्स रीमेम्बर करायला डिफीकल्ट जाते. यावर काहीतरी वर्काऔट मस्ट हवे यू नो. तरच प्युअर मराठी यूज मधे राहील. नाहीतर आहेच अल्डरटेड मिक्स्ड कल्चर.

व्हेरी गुड धागा!! पिवळा डांबिस - Fri, 22/11/2013 - 10:54 व्हेरी गुड धागा!!
ह्या असल्या रीमार्कमुळॅच मराठीची ब्याकहाट चालू आहे. यू नो मराठी लेस अ‍ॅन्ड इंग्रजी मोअर अशी लँग्वेज यूज केल्यामुळे हल्ली मराठे वर्ड्स रीमेम्बर करायला डिफीकल्ट जाते. यावर काहीतरी वर्काऔट मस्ट हवे यू नो. तरच प्युअर मराठी यूज मधे राहील. नाहीतर आहेच अल्डरटेड मिक्स्ड कल्चर.

म्हणजे जवळ जवळ रोज असेच ! फक्त मनाच्या आरोग्यासाठी त्याला आसनांची आणि प्रार्थनेची जोड दिली आहे. वेळ -४५ मिनिटे , ४ सुर्य नमस्कार मस्ट. एकूण ४५ मिनिटे घरच्या घरी. टूरवर अस्लो की हॉटेल मधल्या खोलीत सहज शक्य होते. आणि दिवसभर उत्साही वाटते. कधीकधी संध्याकाळीदेखील सुचनाबर्हुकुम शवासन करतो , थकवा पार पळून जातो. कोणाला हवे असल्यास व्य. नि . करावा. चांगला विषय काढल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार. पण माझ्या व्यायामाने वजन कमी होत नाही. मला खाण्या-पिण्याबद्दल जरा मार्गदर्शन हवे आहे. त्या हर्बल पावडरीचा उपयोग होतो म्हण्तात पण अशी सवय शरिराला घातक अथरु शकेल का ?

विटेकर, हर्बल पावडर म्हणजे नक्की कुठली? मेदारी इत्यादी अशी नावं असलेली उत्पादनं का? तसं असल्यास फारसा फरक पडत नाही. फोकस ऑन द बिग-टिकिट आयटम्स. असं समजा एक गाडी ढकलायचीय, ती ढकलण्यात एका लहानग्याचा जोर किती फरक पाडेल?... तितकच या पावडरीचं वजन कमी होण्यातलं योगदान असेल. तेंव्हा मुळात व्यायाम करा, भरपूर पण चांगलं खा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, सातत्य ठेवा, मोटिव्हेटेड रहा. हीच त्रिसूत्री आहे.

तुम्हाला हर्बल लाईफ पावडर म्हणायचे आहे का?माझ्या बाबांना आणी बर्याच ओळखीच्या लोकांना त्याचा फायदा झाला आहे

अशा प्रकारचे व्यायाम केल्याने फ्रेश वाटत असेल हे नक्की. चरबी कमी होऊन स्नायु मजबूत होण्याबद्दल तुमचा स्वतःचा काय अनुभव आहे? कुतुहल म्हणून विचारत आहे. @विटेकर हर्बल पावडरी वगैरेत काही अर्थ नाही असे वाटते. साखर, बेकरीत बनलेल्या वस्तू आणि लोणची वगैरे भरपूर तेल असलेले पदार्थ बंद केलेत तर बराच फायदा होईल असे वाटते.

अशा प्रकारचे व्यायाम केल्याने फ्रेश वाटत असेल हे नक्की. चरबी कमी होऊन स्नायु मजबूत होण्याबद्दल तुमचा स्वतःचा काय अनुभव आहे?
कळला नाही प्रश्न? `या' व्यायामाचं म्हणताय की एकंदरित व्यायामाचं? सविस्तर विचारता का जरा?

सर्किट ट्रेनिंग पद्धतीचं रहस्य असं आहे की यात कमीत कमी रेस्ट असते. म्हणजे सांगायचं झालंच तर तुम्ही अगदी प्रचंड दमलातच, तर १० सेकंद स्लो चाला खोलीतल्या खोलीत आणि पुढे सुरु. अशा प्रकारच्या व्यायामात तुमचा हार्ट रेट सतत `अप' रहातो ज्याने शरीरात आणि पर्यायाने स्नायूंपर्यंत जास्त ऑक्सिजन पोहोचतो. तसंच, यात कार्डिओ बरोबरच स्नायूंचं बळकटीकरण या दोन्ही गोष्टी एकत्र होतात, स्नायूंना पुरेपूर ताण दिला जातो, ज्यातून त्यांची झीज होते, आणि मग पुढे त्यातूनच स्नायूंची वाढ होते. स्नायूंची वाढच मेदाच्या कमी होण्यास प्रेरक असते. तसंच कार्डिओव्हास्क्युलर फिटनेस सुधारण्याचंही बायप्रॉडक्ट मेद कमी होणे हे असतंच. तेंव्हा सर्किट ट्रेनिंग प्रकारात ब-याच अंशी या दोन्ही गोष्टी साध्य होतात. बरं, यातले व्यायामप्रकार केवळ आपल्या शरीराचं वजन वापरून करण्याचे असल्याने जागा, किंवा साधनांची विशेष गरज नाही. लागणारा वेळही कमी. या सर्व कारणांमुळे गृहिणी, किंवा फार व्यस्त दिनचर्या असणारी मंडळी, यांना हा विशेष जमणारा प्रकार आहे. अर्थात, हाच आदर्श व्यायाम असं नव्हे. पण स्ट्रेन्ग्थ गेन, व फॅट लॉस हे दोन्ही साध्य करायचं असेल तर हा प्रकार नक्कीच परिणामकारक ठरतो.

आणि बरेच प्रकार आलटून पालटून केल्याने दमणूक कमी होईल, कंटाळाही येणार नाही.

मी तर म्हणतो, ऒन अ लायटर साइड, बट खरंच; एखाद्याला हे सगळं काही असं रूटीन, रेजिम वगैरे नको असेल, तर सरळ दणदणीत गाणी लावावी उडत्या चालीची, इंग्रजी असल्यास उत्तम, आणि दार बंद करून (लाज वाटत असल्यास *blum3* ) नाचावं मनमुराद दमेस्तोवर.... \m/ गंमत नाही; इट डज द सेम जॊब, बट मेक्स इट अ बिट मोअर एन्जॊएबल.

नाचावं मनमुराद दमेस्तोवर.
हे एकदम बेस्टच. संगीतामुळे एक वेगळीच मजा येते. यानिमित्ताने वेगवेगळे संगीतप्रकार शोधले जातात. अरबी बेलीडान्स संगीत, मोझार्टादिंचे संगीत, चिनी,जपानी,थायलंडचे संगीत, कव्वाली, जुनी आवडती हिंदी गाणी, असे काहीबाही यासाठी शोधणे, हाही एक आनंद. असा नाच मी बरेचदा करतो ( पण आता नियमितपणे करायला हवा) मुक्तपणे नाचताना सहेतुकपणे शरिराच्या जास्तीतजास्त विविध प्रकारच्या हालचाली केल्यास उत्तम. उदाहरणार्थ गिरक्या घेणे, जमिनीवर लोळणे, उड्या मारणे, पोट आतबाहेर करणे, तोंडाचा आ वासणे, डोळे मोठे करणे, जीभ बाहेर काढून गर्जना करणे, हीव भरल्यासारखे करणे, असे जे जे सुचेल तसे वाट्टेल ते करणे. घरात लहान मूल असेल, तर त्यालाही बरोबर घ्यावे. सुरुवातीला थोडा वेळ हालचाली हळू हळू कराव्यात, मग गति वाढवावी. शेवटली काही मिनिटे लालित्यपूर्ण नृत्यासारखे सावकाश करावे. या सर्वांसाठी वेगवेगळे संगीत निवडावे. सुरू करण्या आधी थोडेसे पाणी प्यावे. चक्कर आल्यासारखे वाटल्यास लगेच थांबावे. एकदम अति करू नये, हळूहळू वेळ वाढवत न्यावी.

सर्किट ट्रेनिंग ने फायदा नक्कीच होतो. व्यायामाची पद्धत, मात्रा योग्य हवी; सोबत सकस आहार, प्रोटीन, कॅल्शियम चं आहारातील भरपूर प्रमाण; या बाबी मात्र जरूरीच्या आहेत. कारण वजन कमी होणं, किंवा ते वाढणं... याला अनेक फॅक्टर्स कारणीभूत असतात.

हा वीस मिनिटाचा व्यायाम, आणि चाळीस मिनिटे सायकल चालवणे, यात जास्त फायदेशीर कोणते असावे? फायदा म्हणजे पोट, वजन जमी करणे, एकंदरित स्टॅमिना वाढवणे, असे गृहित धरले आहे.

असं बघा, की सर्किट ट्रेनिंग मधे टार्गेट होणारे स्नायू सायकलिंग पेक्षा जास्त आहेत. सायकलिंग हा उत्तम कार्डियो व्यायाम आहे. मी म्हणेन की २० मिनिटं स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंग प्रकारचा व्यायाम करा + ४० मिनिटं सायकलिंग करा = सुपर अवर होईल. मच बेटर ऑप्शन.

एक ७० किलोचा माणूस जर सहा किमी ताशी या वेगाने २० मिनिटे धावला तर त्याच्या १४० कैलरी (नेट) जळतात.एकशे चाळीस कैलरी म्हणजे पंधरा ग्रॅम चरबी( एक ग्रॅम चरबी म्हणजे ९ कैलरी). जर तो बटर फ्लाय तर्हेने २० मिनिटे पोहला तर ३३० कैलरी (नेट) जळतात. (हा सर्वात कठीण व्यायामाचा आणि थकविणारा प्रकार आहे आणि हे केवळ निष्णात पोहणार्याचे काम आहे ). सुदृढ व्यक्तींनी एकदा ट्रेड मिल वर पळून पहावे एक समोसा खाल्ला तर ३०८ कैलरिज आपल्या शरीरावर चढतात तर ब्लैक फोरेस्ट पेस्ट्री मध्ये २८५ कैलरिज. तेंव्हा जर आपण सामोसा(किंवा तत्सम पदार्थ) खाणार असाल तर आपल्याला किती मिनिटे धावायला लागेल त्याचा विचार करणे आवश्यक आहे. जर वेल्लाभट यांचा व्यायाम करून आपण जर काही अधिक खाणार असाल तर त्याचा उपयोग नाही. उगाच नंतर वेल्लाभट यांना दुषणे देऊ नका. व्यायाम रोज जर वीस मिनिटे "नेमाने" केला आणि त्यानंतर भूक लागली म्हणून अधिक खाल्ले नाही तर रोज पंधरा ग्रॅम म्हणजे साडे चारशे ग्रॅम महिन्याला आणि वर्षाला साधारण साडे पाच किलोने वजन कमी होईल. असो वजन कमी करणे यावर कित्येक लोक पी एच डी करून श्रीमंत झाले. वजन कमी करणे हि एक अब्जावधी रुपये कमावणारा उद्योग जगभरात आहे.तो असा सहज शिळोप्याच्या गप्पांचा विषय नाही. हा प्रतिसाद अतिशहाणपणाचा वाटण्याची शक्यता आहे याची मला जाणीव आहे पण हे कटू सत्य आहे

स्टेपिंगनेही खूप कॅलरी कमी होतात. १८९ (६० किलो - २० मिनिटं)
वजन कमी करणे यावर कित्येक लोक पी एच डी करून श्रीमंत झाले. वजन कमी करणे हि एक अब्जावधी रुपये कमावणारा उद्योग जगभरात आहे.तो असा सहज शिळोप्याच्या गप्पांचा विषय नाही.
हे बाकी खरं आहे. इतका बागुलबुवा केला जातो या `फॅट' चा.... की विचारू नका.

एक ७० किलोचा माणूस जर सहा किमी ताशी या वेगाने २० मिनिटे धावला तर त्याच्या १४० कैलरी (नेट) जळतात.
डॉक्टरसाहेब, तासाला ६ किमी धावून नाही चालूनही पूर्ण होतात. मी रोज ५ किमी चालतो मला ५० ते ५५ मिनिटे लागतात. माझे वजन ११७ किलो आहे. माझ्या ह्या वजनालाही वरील वेळेत चालणे शक्य होते. ७० किलो वजनाच्या माणसास धावल्यास ताशी वेग ६ किमी पेक्षा नक्कीच जास्त मिळेल. हा प्रतिसाद तुमचे विधान खोडून काढण्यासाठी नसून चालण्यात आणि धावण्यात तितक्याच उष्मांकांचे (कॅलरीज) ज्वलन होते का ह्या माझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी आहे, आणि म्हणूनच मी माझे वजन, रोजचा व्यायाम वगैरे तपशिल दिला आहे. खाण्यावर पूर्वी नव्हतं पण सध्या तरी नियंत्रण आहे.

साहेब, हा सहा किमी तशी वेग मुद्दामच गृहीत ठेवला होता याचे कारण बरेचसे वजनदार लोक यापेक्षा जास्त वेगाने सुरुवातीला तरी पळू/ चालू शकणार नाहीत. अन्यथा तरुण माणसे याच्या दुप्पट वेगाने पळू शकतात. चालण्यापेक्षा धावण्यात जास्त उष्मांक जळतात कारण धावताना आपल्याला उडी मारून आपले वजन उचलावे लागते आणि चालताना उडी मारली जात नाही. म्हणूनच धावले तर लवकर दमायला सुद्धा होते. शिवाय ते आपल्या गुडघ्यांसाठी हानिकारक असू शकते. त्यामुळेच हृदयरोग मधुमेह रक्तदाब इ आजारावर वेगात चालणे सांगितले जाते. आपण करत तेवढा व्यायाम (पाच किमी पन्नास मिनिटात) योग्य आहे. फक्त हा नियमित (कमीत कमी आठवड्यात चार वेळा) करणे आवश्यक आहे. आणि जसेजसे सवय होईल तसे आपण आपला वेग वाढवत न्या. म्हणजे आपला फिटनेस वाढेल आणि वजनही कमी होऊ शकेल.

धन्यवाद. धावण्याची सवय नाही (पूर्वीही नव्हती). चालण्याची सवय (व्यायामासाठी म्हणून) गेली अनेक वर्षे आहे. गुडघ्यांचा त्रास आहेच. (फाटलेली कार्टीलेजिस). शंभरएक मिटर्स च्या पुढे धावू शकत नाही. त्यामुळे स्ट्रेस टेस्ट (ज्यात ट्रेड मिलवर धावावे लागते म्हणतात) अजून केलेली नाही. बाकी नुसत्या चालण्याने दम वगैरे कांही लागत नाही. असो.

सर्किट ट्रेनिंगला !! खायचा चालु आहेचकी पहिल्यापासून..म्हणुन १०० किलो चे थोडे १०-१५ ग्रम कमी होतील बघू.. कंटाळा न करता..

मला एक प्रश्न पडतो बर्‍याचदा. अर्थात व्यायाममाहात्म्य नाकारणे मूर्खपणाच आहे. पण वजन महत्त्वाचे की फिटनेस? समजा पाहिजे त्यापेक्षा तुमचे वजन जरा जास्तच आहे पण पळापळी ट्रेकाट्रेकी करताना जर टेकीस येत नसाल तर त्याचा तोटा काय?

अगदी तरूण वयात वजन जरा जास्त असले तरी शक्ती पुष्कळ असल्याने थकायला होत नाही, मात्र वय जसजसे वाढेल, तसे जास्त वजनामुळे त्रास होऊ लागतो, तस्मात वजन नेहमी आटोक्यात असणे बरे. उदाहरणार्थ मागे एका धाग्यात 'अगदी सोपी फिटनेस टेस्ट' दिली होती, ते तरुण वयात जमते, पण वाढलेया वयात वजन तेवढेच असून जमत नाही. अर्थात जास्त वजन हे चरबीचे आहे, की हाडा-स्नायुंचे, हेही महत्वाचे. यासाठी एक टेस्ट मोठ्या इस्पितळातून करवून घेता येते, त्यात अमुक किलो हाडे, अमुक स्नायु, अमूक चरबीचे वजन असे येते. ती करवून घेणे उपयोगी ठरावे.

हे सर्किट ट्रेनिंग डायरेक्ट २० मिनिटं सुरु करता येतं का? इतकं दमवणारं असेल तर अचानक सुरुवात करून त्रासही होऊ शकेल ना? तसेच मधे गॅप पडणार असेल, अगदी ४-५ दिवसांचाही, तर त्यानंतरही याच पद्धतीने चालू ठेवायचं का? मी साधे सूर्यनमस्कार काही गॅपनंतर परत आधीसारखेच सुरु केले तर त्रास झाला होता आणि डॉक्टरनी मला छान झापले होते.

नाही नाही; असं काही नाही. शेवटी प्रत्येकाची कुवत नावाचीही एक गोष्ट असते. तुम्हालाच असं नाही, सगळ्यांनाच म्हणून सांगतो. एकदम २० मिनिट जमेल असं मुळीच नाही. नवखा दमणारच. तेंव्हा अगदीच झोक जायला लागला तर थांबायचं सरळ. कुणी हंटर घेऊन बसलेलं नाही. अगदी पार आउट नाही झालो; पण दमलो, तर १०-२० सेकंदाची चीटिंग करावी... काही हरकत नाही. तसंच, एखादा प्रकार नाही जमला त्यातला, तर त्याबदल्यात तुम्हाला जमतो तो प्रकार करायचा... शेवटी व्यायाम महत्वाचा नाही का. यात हवी ती व्हेरिएशन्स करता येतात आणि केलीच पाहिजेत. तरच मजा आहे. वर दिलेलं रुटीन हा एक नमुना आहे. तेंव्हा सावकाश, हळू हळू वाढवत न्या, हरकत नाही. बिन्धास्त. *smile* :-) :) +) =) :smile:

सुंदर उपयोगी धागा ! फक्त एक महत्वची सुचना: अगोदर कुठल्याच व्यायामाची सवय नसलेल्या किंवा बर्‍याच खंडानंतर व्यायाम सुरू करत असलेल्या आणि विषेशतः ४०+ वय असलेल्या सर्व व्यक्तींनी व्यायाम सुरू करण्या अगोदर वैद्यकीय तपासणी करून घेतलेली बरी. महत्वाची गोष्ट म्हणजे वजनासे काहीसे बँकेतल्या शिलकीसारखे असते: भरणा केलेली रक्कम (खाल्लेल्या कॅलरीज) - खर्ची घातलेली रक्कम (खर्च केलेल्या कॅलरीज) = बाकी (वजन) अर्थात प्रत्यक्षात हे गुणोत्तर इतके एकदम सरळ नसून काही प्रमाणात प्रत्येकाच्या शरीराच्या चयापचयाच्या गुणधर्माप्रमाणे (मेटॅबोलीझम कॅरॅक्टेरिस्टीक्स) बदलते... पण घोपट्मार्गाने बरोबर आहे. वजन ताब्यात असणे अत्यंत महत्वाचे पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे तो जीवनदर्जा (quality of life). चांगला जीवनदर्जा म्हणजे १०० टक्के आरोग्य अथवा महाराष्ट्रश्री नाही तर नेहमीच्या व्यवहारातल्या आणि आपल्या आवडीच्या अशा गोष्टी मजेत करण्याइतके उत्तम आरोग्य असणे. योग्य वैद्यकीय काळजी व नियमीत व्यायाम यांच्या संयोगाने मधुमेह, हृदयविकार, इ असलेल्या व्यक्तींचाही जीवनदर्जा उत्तम असू शकतो. या लेखात म्हटल्याप्रमाणेच व्यायामात खूप श्रमापेक्षा खूप नियमितपणाला जास्त महत्व आहे.