दुसर्याच्या जागेवर धंदा करून तिसर्याच्या खिशातले पैसे काढणे कसे काय कायद्यात बसते माहित नाही. कबुतरे आणि भटकी कुत्री यांच्याबद्दल अतिशय सहमत आहे. कबुतरांनी आमच्या एका फ्लॅटच्या खिडक्या-गॅलरी यावर कब्जा केला आहे. दर वेळी तिथे गेले की तिथल्या खिडक्या साफसूफ केल्याशिवाय रहाता येत नाही. भटक्या कुत्र्यांनी आमच्या मांजरांना घराबाहेर जाणे अशक्य करून ठेवले आहे. आमचा एक आवडता बोका आमच्या डोळ्यादेखत या कुत्र्यांनी मारला तेव्हापासून त्या कुत्र्यांना कोणत्याही उपायाने हटवा ही माझी मागणी आहे. मुन्शिपाल्टीला अर्ज करून कोणी लक्ष देत नाही. मुन्शिपाल्टीची तत्कालीन अध्यक्षा आमच्या शेजारीच रहाते. तिचा स्वतःचा एक बोका या कुत्र्यांनी मारला पण ती तरी लक्ष घालायला तयार नव्हती. "कुत्रे पकडायचे कॉण्ट्रॅक्ट एकाला दिलं आहे, पण मी आजपर्यंत त्याला कधी कुठे पाहिला नाही." हे मुन्शिपाल्टीच्या अध्यक्षीणबैंचं उत्तर. आणखी काही बोलायची हिंमत आहे??
भटकी कुत्री अन गाय यांच्याबद्दल अतिशय सहमत.
काय आव आणतात हे भटकी कुत्री वाले. एकेकाला धरुन बदडावेसे वाटते. आमची मुले सोसायटीत खेळु शकत नव्हती. रात्री हे दंगा यांचा. मी तर यावेळी जाउन मुद्दामहुन भांडण काढणार आहे भारतात आले की. ते विचारतात, आपही बताईये हम क्या करे? आता सांगणार आहे, घरला घेउन जा ही २०० कुत्री आणि पाळ. रस्त्यावर नकोत.
आम्ही जयपुरला गेलो होतो तेव्हाचा हा किस्सा.
तिथे जलमहाल पाहायला रात्री गेलो होतो, तर माश्यांसाठी खाऊ विकत घ्या म्हणून ३-४ पोरे मागे लागली होती. म्हणे सोनेरी मासे येतात खायला. रात्री अंधारात सोनेरी मासा येवो वा चंदेरी डोळ्यांना काय कप्पाळ दिसणार?
हद्द म्हणजे काही मठ्ठ लोकं हा खाऊ(कणकेचे गोळे) विकत घेऊन त्या तलावात सोडतदेखील होती.
कुठल्याश्या दुकानात एक पोस्टर पाहिले होते या भुतदयावाल्यांचे. त्यात सुखी जीवनासाठी खालील उपाय(?) दिले होते.
१. कुत्र्याला खायला द्या. शत्रूचा नाश होईल.
२. कबुतराला दाणे द्या. धंद्यात बरकत येईल.
३. गायीला चारा द्या. ग्रहपीडा दुर होईल.
४. मुंग्यांना साखर द्या. कर्ज मुक्ती होईल.
५. कावळ्याला खाणे द्या. पितर तृप्त होतील.
चारावाली गाय, ह्याबाबत सहमत..
आमच्या इथे पण एक चारावाली गाय घेवून एक बाई बसते.नुसते बसून ती दिवसाला ५०० ते ६०० रु, कमावते.
पुढे मागे हाच धंदा मोठ्या प्रमाणात काढावा म्हणतो.
अतिक्रमणाविषयीच बोलायचे तर अजुनही अनेक उदाहरणे घेता येतील
१.१० बाय १५ चा गाळा आणि पुढे १५ फूट ओपन टू स्काय (बहुधा सोसायटीच्या कॉमन मालकीची) जागा अडवणारे हॉटेलवाले,वेल्डिंगवाले,गॅरेजवाले,गोडाउनवाले,बेकरी आणि डेअरीवाले
हे फक्त जागा अडवत नाहीत तर नियमाप्रमाणे धुरासाठी चिमणी न लावता वरच्या लोकांना धुराचा त्रास देणे (हॉटेले),सतत ठाकठोक आवाज करुन वेळीअवेळी शांततभंग करणे,दुधाचे चिकट ओघळ,गंजलेले सामान इतरत्र वाटेत ठेवणे असे सौजन्यशील प्रकारही करतात. आणि महापालिका अतिक्रमण विभाग ,पोलिस व लोकल दादा,भाउ,आण्णांकडे तक्रार करुन काही फायदा होत नाही (त्यांचा हप्ता वाढत असेल फारतर)
बाकी वकिली अनावश्यक व्यवसाय आहे याच्याशी असहमत.. एकदातरी रोड अॅक्सिडेंट्,पोलिस केस,लॉक अप,जप्ती,जमानत यापैकी कशात सापडाल तर समजेल
धर्मगाय हा व्यवसाय आहे आणि त्यामधून काही लोक आर्थिक लाभ मिळवतात. त्यापासून पुण्यप्राप्तीचा मानसिक लाभ होतो अशी काही लोकांची समजूत असेल, पदपथावर चालणा-या लोकांना त्याचा थोडासा उपद्रव होतो.
आरोग्यपेये विकणा-यांचाही व्यवसायच आहे, त्यापासून शारीरिक लाभ होतो अशी काही लोकांची समजूत असेल, कदाचित ती खरीही असू शकते. याचा कोणालाच उपद्रव होत नाही,
कबुत्तरपालन हा व्यवसाय कसा? ती पाखरेही फारसा त्रास देत नाहीत. फक्त कधीकधी घरात घुसून घाण करतात. एरवी दिसायला सुरेख असतात.
सार्वजनिक-श्वान तारण हा व्यवसाय कसा? हे प्रकरण मात्र समाजाला अतीशय तापदायक असते. एक मनेका गांधी सोडली तर मला तरी याचा कोणी पुरस्कर्ता दिसत नाही. तरीसुद्धा माणसांना मिळत नसेल एवढे संरक्षण या मोकाट कुत्र्यांना का मिळते ते समजत नाही. आमच्या वाशीतली कुत्री तर इतकी माजली आहेत की त्यांनाही बहुधा विशिष्ट ब्रँडची (मराठी शब्द?) बिस्किटेच लागतात. त्यांना खायला घालण्यासाठी उदार (?) पुण्यप्राप्तीइच्छुकांनी रस्त्यावर टाकलेले इतर अनेक अन्नपदार्थ तसेच पडून राहिलेले दिसतात. "तुला नाही मला, घाल कुत्र्याला" ही मराठी म्हण यांनी मोडीत काढली आहे.
या उपक्रमांबाबत डोळस सिंहावलोकन आवश्यक आहे या निष्कर्षाशी सहमत. पण ज्याचा कोणाला उपद्रव होत नसेल अशा गोष्टी तुम्हाला आणि मला अनावश्यक वाटल्या तरी इतर कोणाला त्या चांगल्या वाटत असल्या तर त्यांना त्या करू द्याव्या असे माझे मत आहे.
प्रतिक्रिया
काही व्यवसाय हे मुळातच अनावश्यक असतात..
*
फालतू उद्योग करण्याची
चौपाटीवर एलेक्ट्रॉनिक मशीनचा
हा धर्मगाय वाला बिझनेस भारी
मुळात व्यवसाय करणे ही पण एक
हम्म
वकिली हा अनावश्यक व्यवसाय आहे
भटकी कुत्री अन गाय
आम्ही जयपुरला गेलो होतो
+ ६....
भटके कुत्रे, कबूतरे आणि
छान बिजीनेस आहे हा!
शिवाय दूध फुकट !
बरोबरच दही,ताक,लोणी,तूप आणि
हाहाहाहाहाहा~
अजुन काही व्यवसाय
व्यवसाय की उपक्रम?
लेखन आवडले...