Welcome to misalpav.com
लेखक: मारवा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

१)लग्न आणि सेक्स ह्या दोन पुर्ण भिन्न गोष्टींचा घोळ कुणा गाढवाने घातला ? २) कोणत्याही धर्माला / देशाला लोकांच्या बेडरुम मधे डोकावण्याचा काय अधिकार ? ३) LGBT समर्थक पॉलीगॅमी पॉलीअ‍ॅन्ड्री ला समर्थन देतात काय ?( रादर त्यांनी विरोध का करावा ?) ४) रीप्रॉडक्शन जर कॉन्ट्रॅक्ट बेसीस वर करता आले तर लग्न संस्था मोडकळीत काढता येईल काय ? ५) होमोसेक्युअल लोक हे १००% होमो सेक्स्युअल असतात की बाय क्युरीयस असतात?( तसेच हेटेरो सेक्स्युअल लोक १००% हेटेरो सेक्स्युअल असतील काय ?? ६) एका लेस्बीयन कपल मधील पोरीने कोणा परपुरुषाशी संबंध ठेवले तर (आजच्या कायद्याने ) त्याला व्यभिचार म्हनता येईल काय ( मुळात जिथं लग्नच इल्लीगल तर बाकीचे काय ?) वगैरे वगैरे

याला व्यभिचार म्हनता येईल काय व्याभिचार ही एक नैतिक संकल्पना आहे. कायदेशीर नाही (कायदेशीर पण आहे तशी. पण मूळ नैतिक). त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या अपरोक्ष केलेले कुठलेही विवाहबाह्य संबंध हे व्याभिचार मानायला हरकत नाही. अर्थात जोडीदाराच्या संमतीने दुसर्‍याशी संबंध ठेवले तर त्याला व्याभिचार म्हणावा की नाही ( उदा. स्वॅपिंग ) हा एक मजेशीर प्रश्न असु शकेल. :)

१)लग्न आणि सेक्स ह्या दोन पुर्ण भिन्न गोष्टींचा घोळ कुणा गाढवाने घातला ? कोणी एकाच गाढव याला जबाबदार नसावं.. २) कोणत्याही धर्माला / देशाला लोकांच्या बेडरुम मधे डोकावण्याचा काय अधिकार ? अधिकार नसलाच पाहिजे.. पण दुर्दैवाने जगात सगळीकडे हे घडते.. :( ३) LGBT समर्थक पॉलीगॅमी पॉलीअ‍ॅन्ड्री ला समर्थन देतात काय ?( रादर त्यांनी विरोध का करावा ?) प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकेल.. विरोध केलाच तर तो अशा प्रकारचा नात्यांमधल्या complicationsमुले असवा.. ४) रीप्रॉडक्शन जर कॉन्ट्रॅक्ट बेसीस वर करता आले तर लग्न संस्था मोडकळीत काढता येईल काय ? मला लग्न ही मानसिक गरज वाटते.. बाकी प्रत्येकाचा मत वेगळ असू शकेल.. ५) होमोसेक्युअल लोक हे १००% होमो सेक्स्युअल असतात की बाय क्युरीयस असतात?( तसेच हेटेरो सेक्स्युअल लोक १००% हेटेरो सेक्स्युअल असतील काय ?? http://en.wikipedia.org/wiki/Kinsey_scale या व्यतिरिक्त कल्पना नाही.. ६) एका लेस्बीयन कपल मधील पोरीने कोणा परपुरुषाशी संबंध ठेवले तर (आजच्या कायद्याने ) त्याला व्यभिचार म्हनता येईल काय ( मुळात जिथं लग्नच इल्लीगल तर बाकीचे काय ?) मृत्युन्जयरावांशी सहमत

६) एका लेस्बीयन कपल मधील पोरीने कोणा परपुरुषाशी संबंध ठेवले तर (आजच्या कायद्याने ) त्याला व्यभिचार म्हनता येईल काय ( मुळात जिथं लग्नच इल्लीगल तर बाकीचे काय ?) अहो हे लग्न ज्या ठिकाणी झालेल आहे तिथे लग्न पुर्णपणे कायदेशीर आहे आणि म्हणुन वारस डिव्होर्स आदिंच्या प्रोव्हिजन्स ही कायदयात अर्थातच आहेत.आणी बरयाच युरोपीय देशात कायदेशीर आहेत हे विवाह.

पाश्चात्य्/ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न हे करार या स्वरूपात असते. तिथे इस्टेट वगैरे गोष्टींसाठी अशा जोड्यांना लग्न करणे आवश्यक असते का? भारतात विधीवत लग्न न झालेल्या जोडप्याच्या मुलांना आणि पत्नीला नवर्‍याच्या मालमत्तेत हक्क आहे. मग वैयक्तिक स्वातंत्राबद्दल कमालीचे जागरूक आणि संपन्न अमेरिकेत तो तसा नाही का? हिंदू पद्धतीनुसार लग्न हा करार नसतो तर संस्कार असतो. आणि चांगली संतती निर्माण करणे हाच लग्नाचा हेतू समजला जातो. विवाह विधीतले मंत्र त्या अर्थाचेच आहेत. समजा ते विवाह विधी कोणाला मान्य नसतील पण ते हजारों वर्षे तसे आहेत हे नाकारता येणार नाही. मग या अशा समलैंगिक लग्नातून नैसर्गिकरीत्या संतती निर्माण होणे जर शक्य नाही तर हिंदू पद्धतीचे विवाह संस्कार हे केवळ फॅशन म्हणून त्याचा अर्थ समजून न घेता केलेले कृत्य आहे. एखाद्या हिंदी सिनेमात दाखवलेले हिरो-हिरॉइनचे लग्न जितपत खरे असते तितपतच हे हिंदू पद्धतीचे लग्न आहे असे मला वाटते.

मग या अशा समलैंगिक लग्नातून नैसर्गिकरीत्या संतती निर्माण होणे जर शक्य नाही तर हिंदू पद्धतीचे विवाह संस्कार हे केवळ फॅशन म्हणून त्याचा अर्थ समजून न घेता केलेले कृत्य आहे सहमत ! थिल्लरपणा आहे झालं , रहायचं आहे एकत्र तर रहा ना , लग्नाची बोंब कशाला? चीप पोप्युलरिटी आहे नुसती. वास्तविक " लग्न " ही संज्ञाच येथे लागू होत नाही . शयनेषु रंभा इतकीच त्याची व्याप्ती असू शकेल पुन्हा दोन्ही रंभाच ! शरिर संबंध हा महत्वाचा भाग आहे पण त्यापेक्षा अनेक मह्त्वाच्या बाबी लग्न संस्थेत अंतर्भूत आहेत. तो एक संस्कार आहे. हिन्दू धर्माचे सौदर्य त्यातील निसर्गानुरुपता मध्ये आहे. त्याचा व्यतास ताणायचा झाला तर जे नैसर्गिक नाही ते हिंदू नाही. म्हणजे लेस्बियन ( अथवा तत्सम अन्य) यांच्याबदल आदर नाही असा नव्हे.) प्रत्येक जीवाबद्दल ( प्राणीसुद्दा) आदर आहेच , सर्वेपि सुखिनं सन्तु .. पण तरिही अनैसर्गिक ते हिंदू नाही ! हिंदू पद्धतीने लग्न झाले याची हिंदू म्हणून लाज वाटते.

हे अनैसर्गिक ते हिंदू नाही या व्याख्येनुसार गे-लेस्बियनगिरी हिंदूच पाहिजे. त्यात अनैसर्गिक काय आहे ???

रहायचं आहे एकत्र तर रहा ना , लग्नाची बोंब कशाला?
लग्न म्हणजे एक कायदेशीर करार आहे. जो केल्याने एकमेकांच्या प्रॉपर्टिवर जोडीदाराच्या पश्चात अधिकार मिळतो, तसेच दत्तक घेणे, मुलांना कायदेशीर पालकत्त्व, आपल्या मालमत्तेवर त्यांचा हक्क जन्माने स्थापित होतो. थोडक्यात लग्न कायदेशीर 'लेजिटिमसी' व त्यायोगे मिळणारे हक्क मिळवून देते. या गोष्टी नको असतील तर भिन्नलिंगी जोडप्यांनाही लग्न करायची अजिबात गरज नसते.

तरी देखिल समाज भिन्नलिंगी जोडप्याचा पण छ्ळ करतो. भारतात लग्नाशिवाय सेक्स करायचा म्हटला तर जोडप्याना पोलिस खुप त्रास देतात.अगदी चोरुन त्याना सर्व गोष्टी कराव्या लागतात.

मला वाटतं की पार्कात, कठड्यावर बसलेल्या किंवा अगदी हॉटेलात झोपणाऱ्या जोडप्यांना त्रास देणाऱ्या पोलिसांना ह्या अश्या कायद्यांबद्दल काही माहीत असावं. त्यांना या ना त्या मार्गाने पैसे खायला मिळणार असतील तरच ते असा त्रास देतात. हां… सार्वजनिक जागी मात्र त्यांनी काही बेशिस्तीचे चाळे करू नये म्हणून कदाचित जोडप्यांना हटकत असावेत. पण तरीही ती जोडपी जर सज्ञान आणि थोडी धमक असणारी असतील तर बिनधास्त पोलिसांना नडू शकतात.

भारतात लग्नाशिवाय सेक्स करायचा म्हटला तर जोडप्याना पोलिस खुप त्रास देतात.
लग्न केल्यानंतरही उघड्यावर सेक्स केलात तर पोलिस त्रास देतीलच.

हिंदू लग्नात अशा विवाहाचा विचारच केलेला नाहीये. हिंदूच का, कुठल्याही धार्मिक प्रकारे लग्न केले तरी तोच प्रकार आहे. अन ते लिमिटेशन आहे धर्माचे. त्यामुळे मूळ उद्देश साध्य होत नसेल तरी कल्चरल प्रॅक्टिस म्हणून विधी केले, इतकेच. त्यामुळे मंत्रबिंत्र म्हणणे हा निव्वळ उपचार आहे. केला काय न केला काय, विशेष फरक पडू नये. शेवटी त्या संस्कारात प्रजा वाढवणे सोडून दुसरे आहे तरी काय? उगीच मंगलबिंगलाची लेबले लावण्यात अर्थ नै.

चांगली संतती निर्माण करणे हाच लग्नाचा हेतू समजला जातो. विवाह विधीतले मंत्र त्या अर्थाचेच आहेत.
पैसातै, लग्नाचा स्वानुभव नसल्याने खरोखर सिरियसली विचारतेय, हिंदू विधींमधे 'मी तुला आयुष्यभर साथ देईन, तुझ्या प्रत्येक सुखदु:खात, संकटात तुझ्यासोबत उभा/उभी राहीन' असं कुठेच नसतं का? हेतू संतती हाच असतो हे मान्य, पण त्यापलीकडे सहधर्मचारिता हा उद्देशही विधींमधे एक्स्प्लिसिटली सांगितलेला नसतो का?

असतो. पाणिग्रहण, कन्यादान, झाल वगैरे विधी. जाणकार अधिक सांगतीलच.

"धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च नातिचरामि" "सखा सप्तपदी भव" तेही आहेच की! पण बहुतेक मंत्र आहेत ते संततीविषयक आहेत. ही कन्या संततीसाठी वरत आहे, अशा अर्थाचे मंत्र आहेत. माझा मुद्दा इथे समलैंगिक विवाह करावेत की नाही हा नाहीच, तर अर्थ समजून न घेता केवळ उपचार म्हणून हिंदू पद्धतीने लग्न करणे हा आहे. मग त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले म्हणूनही काही बिघडत नव्हते. मात्र हिंदू विवाहविधी हे वर आणि वधू यांच्यासाठी आहेत. इथे त्या अर्थाच्या मंत्रांचे काही प्रयोजनच नाही! म्हणजे हिंदू पद्धतीचे लग्न या शब्दांनाच इथे काही अर्थ नाही. राहिली गोष्ट निव्वळ मौजमजेची. ते तर मेहंदी, भांगडा डोली इ गोष्टीत झालेच. मात्र या सगळ्या गोष्टी मूळ विवाहविधीत येत नाहीत. तर उत्तर भारतीयांच्या रूढी म्हणून येतात.

जर डोली भांगडा चालतं तर मंत्रांनी काय घोडं मारलंय? मंत्रही निव्वळ प्रिमिटिव्ह आहेत. "विवाहसंस्थेचा इतिहास" पाहिलात तर हेटेरोसेक्शुअल लग्नातले मंत्र म्हणतानाही जीभ अडखळते. चिकित्सा कुठवर करावी एवढाच प्रश्न आहे. टेक्निकली बरोबर असेल पण मग टेक्निकली चिकित्सा करायची तर बाकी गोष्टी 'नॉर्मल' केसमध्येही गंडतात.

मला काय चालतं अन काय नाही याचा प्रश्नच नाही! जे आहे ते असं आहे एवढंच मी सांगितलं. अर्थात हिंदू पद्धतीने लग्न करणारे कितीजण त्या मंत्रांचा अर्थ तपासायला जातात हा प्रश्नच आहे.

बेट्या
हा कोण? बाकी, जे आहे ते त्याची या केसमध्ये चिकित्सा करण्यात अर्थ नाही असे मला वाटते.

चांगला मुद्दा आहे. आपण लग्नात उच्चारल्या जाणाऱ्या प्रत्येक मंत्राचा अर्थ भटजींना विचारू शकतो. लग्न थोडे लांबेल एवढेच. मी तर म्हणेन सर्व मंत्र संस्कृत मध्ये असल्यामुळे बऱ्याच लोकांना कळत नाहीत. सर्व लग्न विधी शुद्ध मराठीत भाषांतर करायला काय हरकत आहे

"विवाहसंस्थेचा इतिहास" पाहिलात तर हेटेरोसेक्शुअल लग्नातले मंत्र म्हणतानाही जीभ अडखळते
उदाहरणार्थ ? एखादा मंत्र ??

कॉपी आत्ता माझ्याकडे नाही. घरी गेलो की मंत्र उद्धृत करतो. जेवढे आठवते त्यानुसार अग्रभोगाच्या संकल्पनेशी राजवाड्यांनी काही मंत्रांचा संबंध जोडलेला आहे. ते एक आहेच, शिवाय प्रजननावर दिलेला भर हाही आजच्या काळात टीकार्ह आहेच ;)

वर आणि वधू यांच्यासाठीच हे विवाहविधी असले तरी स्थलकालाप्रमाणे मंत्र बदलतात त्याप्रमाणे बदलत्या काळानुसार विधींमधे असा काही बदल हीसुद्धा एक गरज वाटू शकते असेही म्हणता येईल ना? शेवटी मानणे-न मानणे हाच भाग येतो असे एकूणात दिसतेय...

"तर अर्थ समजून न घेता केवळ उपचार म्हणून हिंदू पद्धतीने लग्न करणे हा आहे." पण कशावरून अर्थ समजून न घेता त्यांनी सर्व विधि केले असतील ? कदाचित संततिसंदर्भातील मंत्र वगळून विधि पार पडला असेल असे समजण्यास वाव का नसावा ? आणि त्यांना पुढे मूल दत्तक घ्यायचे असेल तर ? असेही विवाह पाहिले / ऐकले आहेत जे हिन्दू पध्दतीने झाले आहेत आणि ज्यात जोडप्यांनी मूल नको असे आधीच ठरवलेले होते

मग त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले म्हणूनही काही बिघडत नव्हते. मात्र हिंदू विवाहविधी हे वर आणि वधू यांच्यासाठी आहेत. इथे त्या अर्थाच्या मंत्रांचे काही प्रयोजनच नाही! म्हणजे हिंदू पद्धतीचे लग्न या शब्दांनाच इथे काही अर्थ नाही.
आजच्या घटकेला विवाहविधीचे मंत्र तो वर आणि ती वधू असेच आहेत. उद्या कोणाला आवश्यकता वाटल्यास त्यात पाहिजे तसे बदल करावेत. नंतर काही काळाने ते रूढी म्हणून चालून जातील. पण आज तरी त्या मंत्रांना अशा विवाहासंदर्भात काही अर्थ नाही. निदान या केसमधे किंवा अशा प्रकारच्या दुसर्‍या कोणत्या केसमधे विवाहविधीचे मंत्र नव्याने लिहिल्याचे वाचले नाही. कोणी लिहिल्यास स्वागतच आहे. रूढी आणि परंपरा या काळाबरोबर हळूहळू बदलत असतात.
असेही विवाह पाहिले / ऐकले आहेत जे हिन्दू पध्दतीने झाले आहेत आणि ज्यात जोडप्यांनी मूल नको असे आधीच ठरवलेले होते
त्या लोकांनीही केवळ हिंदू पद्धतीचा उपचार पाळला असेच म्हणेन. आतिवास यांनी म्हटल्याप्रमाणे लोक एका रूढीतून सुटण्यासाठी दुसर्‍या रूढीचा आधार कशाला घेतात हे कोडंच आहे!

आजच्या घटकेला विवाहविधीचे मंत्र तो वर आणि ती वधू असेच आहेत.
नाही हो, हिंदू विवाहपद्धतीतली सात फेऱ्यातली सात वचनं फारच जनरल आहेत. ती कुठच्याही विवाहांसाठी चांगलीच आहेत. आपल्या परंपरा कशा समृद्ध आहेत, आणि सर्वव्यापी आहेत हे सांगण्याऐवजी त्या कोत्या आहेत असं का म्हणणं हे विचारजंतीच नाही का? या वेबसाइटनुसार पहिलं वचन - एक जण म्हणतो मी तुझी आणि मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी घेईन. दुसरी व्यक्ती म्हणते मी तुझ्या घराची काळजी घेईन. (हे वचन तर आता कालबाह्यच झालेलं आहे, कारण दोघेही बऱ्याच वेळा नोकऱ्या करतात.) दुसरं वचन - पहिली व्यक्ती म्हणते तू मला आधार दे. दुसरी व्यक्ती म्हणते ठीक आहे, तू मला प्रेम आणि लक्ष दे. तिसरं वचन - जोडीने ते दोघे शहाणपण आणि समृद्धी मागतात. एकमेकांशी निष्ठा मागतात. चौथं वचन - त्यातली एक व्यक्ती दुसरीला मांगल्य, पावित्र्य आणल्याबद्दल धन्यवाद देते. दुसरी व्यक्ती पहिलीला आनंद देण्याची शपथ घेते. जोडीने ते मोठ्यांचा मान राखण्याची शपथ घेतात. पाचवं वचन - जगाचं भलं होवो, आपली मुलं चांगली होवोत, आपल्या नातेवाईकांचं भलं होवो इत्यादी इत्यादी. सहावं वचन - एक व्यक्ती म्हणते मी तुझं भलं करेन, दुसरी व्यक्ती म्हणते मी तुला चांगल्या कार्यात साथ देईन. सातवं वचन - दोघे एकमेकांना म्हणतात की आपलं नातं दीर्घकाळ टिको, आणि निष्ठा आणि सामंजस्य राहो. आपल्या जीवनात प्रेम राहो, आणि याच जन्मापुरतं नाही, तर पुढचे जन्मही टिकून राहो. ही वचनं इतकी सुंदर आहेत, की तो आणि ती किंवा ती आणि ती किंवा तो आणि तो यांनी एकमेकांना दिली तरी काहीही फरक पडत नाही.

समलिंगी विवाहाबद्दल विचार करताना पहिल्या पावलावरच ठेचकाळलो! >>>तुझी आणि मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी तुझी ठीक आहे पण 'मुलांची'- ही कुठून आणणार नि कशी आणणार? दुसर्‍याची दत्तक घ्या नि सांभाळा? काळजी घ्या? का? एकमेकांची काळजी घेऊ शकतील मे बी पण ह्यात पुन्हा अगदी समान पातळीवर दोघे असू शकतात का? कधीनाकधी एक 'नरा'च्या नि दुसरा 'मादी'च्या स्वरुपात असेलच की. मग आकर्षण समलिंगी कसं? काय लॉजिक असतंय कुणाला माहिती. असो! त्या गावाला जाण्याची इच्छा नाही.

अहो भाऊ नर-मादी काय करताय, भावनाओं को समझो. सातही वचनांचा रोख आपलं नातं, आणि त्यातून निर्माण होणारी नवीन नाती सुंदर करू, आपण एकमेकांवर प्रेम करू, एकमेकांचं भलं करू असा आहे. हे उदात्त विचार अंगीकारून नवीन नात्यासाठी वापरायचा की 'त्यात एक स्त्री- एक पुरुष नाहीत' असा फुटकळ तांत्रिक मुद्दा काढायचा?

दुसऱ्या एका वेबसाइटवर मला हे भाषांतर सापडलं. Seven Vows In Hindu Wedding The bride and the groom take the first step of the seven vows to pledge that they would provide a prospered living for the household or the family that they would look after and avoid those that might hinder their healthy living. During the second step of the seven pheras, the bride and the groom promise that they would develop their physical, mental and spiritual powers in order to lead a lifestyle that would be healthy. During the third vow, the couple promises to earn a living and increase by righteous and proper means, so that their materialistic wealth increases manifold. While taking the fourth vow, the married couple pledges to acquire knowledge, happiness and harmony by mutual love, respect, understanding and faith. The fifth vow is taken to have expand their heredity by having children, for whom, they will be responsible. They also pray to be blessed with healthy, honest and brave children. While taking the sixth step around the sacred fire, the bride and the groom pray for self-control of the mind, body and soul and longevity of their marital relationship. When the bride and the groom take the seventh and the last vow, they promise that they would be true and loyal to each other and would remain companions and best of friends for the lifetime.

एक रुढी मोडताना इतर रुढींच्या बंधनात अडकायची (थाटामाटात, विधीपूर्वक विवाह) माणसांना किती हौस असते ते पाहून गंमत वाटली. मानवी स्वभाव हे एक कोडं आहे हे पुन्हा एकदा पटलं!

ते रुढी ला मजा म्हणुन एन्जॉय करीत आहेत. नाहीतरी सात फ़ेरयामध्ये समलैंगिकांनी परस्परांसाठी काय वचने द्यावी घ्यावी याचा थोडी उल्लेख आहे. ते मुळात धर्मसंमत च नाही तर काय. आणी दुसरा हेतु हा की त्याविषयी चे गैरसमज दुर करुन त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा तो एक स्तुत्य प्रयत्न आहे.म्हणुन लपुन छपुन न करता त्यांनी टीपिकल हेट्रो मॅरेज सारखी मौजमजा करुन केलेल ते एक सरळ सेलीब्रेशन आहे.जस आपला काही संबंध नसतांना ही आपण गरबा अथवा भांगडा चा लग्नात समावेश करुन धमाल करतो तस. आणि त्या निमीत्ताने त्या खिश्चन लोकांना ही आपल्या इकडल्या परंपरा ची माहीती होते .

लेस्बियन किंवा गे अथवा होमो मुळात सेक्सची गरज म्हणुनच जवळ येतात.त्यातुन त्याच्या मध्ये जवळिक होत असावी. त्यामुळे लग्नानंतर त्याचा सेक्स कायदेशिर होत असावा इतकेच्. विवाह ही एक मानसिक गरज आहे हे पन्नाशी नंतर ठिक आहे.परंतु तरुन तरुणी फक्त मानसिक स्वाथ्य लाभावे म्हणुन लग्न करत असतील असे वाटत नाही.

मग भिन्नलिंगी विवाह काय मानसिक गरज म्हणूनच करतात काय? तिथे सेक्स करावासा वाटत नसता तर इतकी लोकसंख्या वाढली असती का =))

जुन्या काळी लग्न पत्रिकेत 'शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे' असे लिहित असत

अन हा जुना काळ लै जुनाही नव्हता, सत्तरेक वर्षांपूर्वीपर्यंतचे तरी कन्फर्म माहिती आहेच.

जुन्या काळी लग्न पत्रिकेत 'शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे' असे लिहित असत
+ १ असा मजकूर असलेली जुनी पत्रिका मी पाहिली आहे.

येस! ही पत्रिका मी स्वतः पाहिली नसली तरी तशा मजकुराचे उल्लेख लै पाहिले आहेत. खाली निनाद यांनी तशी पत्रिका स्वतः पाहिल्याचेही लिहिले आहे. जरा शोधाशोध केली तर अशी पत्रिका मलाही सापडेल कुठेतरी असे वाटते.

माझ्या कडे आहे.. माझ्या आई बाबांचीच बहुदा... मी जाऊन मग आईला ती रीतसर दाखवुन हा काय प्रकार आहे हेही विचारलं होतं.. आई नी एका नजरेतुनच "गप बस.. नाही तर थोबाड फोडीन" असा दम दिला..!!

हम्म, असे प्रसंग अनुभवले आहेत. दम दिला नसला तरी "तुला कशाला पाहिजे" इ.इ. ऐकलेलं आहेच. अर्थात तेव्हा राग येत असला तरी आज ओके वाटतं, समजा जे कळायचं ते सगळं कळालंही त्या वयात तरी नक्की फायदा काय जोपर्यंत प्रत्यक्ष काही होत नै तोपर्यंत? जरा समज येईपर्यंत तो सगळा एक खेळ वाटायचीच शक्यता जास्त.

अमान्य. कुठल्याही लग्नामागची भूमिका केवळ आता ठोकायला मिळणार अशी असेल तर त्या व्यक्ती विकृत आहेत असे समजावे. लग्न केवळ शरीराची गरज नाही. त्यासाठी लग्न करायची खरेच गरजही नाही. लग्न एक मानसिक गरज आहे. प्रेम ही देखल अशारीर पातळीवरची मानसिक गरज आहे. संभोग हा प्रेमाचा केवळ एक भाग झाला किंवा एक पुढची पायरी झाली.

बरंचसं आदर्शवादी. योग्य देखील. मात्र वास्तव बहुतांश वेगळं आहे. वय झालं म्हणून बरेच सुशिक्षित लग्न करतात. मात्र सुसंस्कारित असतीलच असं नाही. प्रेमाच्या अभिव्यक्ती म्हणून संभोग वगैरेचा विचार होईल अशी बर्‍याचदा पोच/झेपच नसते. कधी पोच असून देखील तशी परिस्थिती नसते.

लग्न ही मानसिक गरज आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर लग्न केल्याने कोणते मानसिक समाधान मिळते त्यावर लिहा ना राव. काय सकृत आनि काय विकृत ह्याची चिरफाड नंतर करुया.मानसिक गरजेसाठी लग्न करण्याची देखिल काय गरज आहे?अहो भाउ भारतात लग्नाशिवाय सेक्स मान्य नाही म्हणुन लग्न करावे लागते.आमच्या समाजात लग्नाशिवाय सेक्स ग्राह्य धरला जात नाही. तुमच्या समाजाविषयी माहिती नाही म्हणुन विचारतो आहे.

प्यारेचा प्रतिसाद वाचल्यावर ते " विकृत " वगैरे थोडे जास्त होते हे मान्य. ती विकृती आपण अमान्य ठरवुयात. पण लग्नाचा संबंध केवळ संभोगाशी आहे हे विधान अगदीच चुकीचे आहे. आनंद काय मिळतो हा प्रश्न विनोदात विचारणे वेगळे. पण लग्नातुन कुठलाही आनंद मिळत नसेल तर माणसाने लग्न करुच नये. समलिंगी आणि भिन्नलिंगी दोन्हीही. यात मग sexual orientation चा मुद्दाच आणु नये. मुळात या केसमध्ये दोन्ही समलिंगी व्यक्ती शारिरीक पातळीवर आधीपासुनच एकरुप झाले असावेत असे गृहीत धरुयात. ज्या समाजात ते राहत आहेत तिथेही समलिंगी संबंध अगदीच कॉमन नसले तरीही एक "अहो पापम" प्रकातातले कृत्यही मानले जात नाही. लिव्ह इन तिथे सर्वमान्य आहे. असे असताही त्या दोघींना जर लग्न करावेसे वाटले असेल तर ते नक्कीच शारिरीक गरजेसाठी असु शकत नाही. मग तो दोन मनांच्या मिलनांचाच मामला असु शकतो. शारिरिक गरजा तर काय अश्याही पुर्ण होउ शकतातच की. तुम्ही विवाहसंस्थेच्याच विरोधात असाल तरची गोष्ट वेगळी. मग त्यावर वेगळ्या पातळीवर चर्चा करुयात. ता.क.: ते विकृती वगैरे वाचुनही न भडकता प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभार.