Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हहं मला व्यक्ति:श भीक द्याला आवडत नाही. मी कधीतरी लहान मुलांना खायचे पदार्थ घेवून द्याचे. असेच एकदा कोथरूड स्टँडला एका मुलाला मी आणि मैत्रिणीने एका मुलाला वाटी केक घेवून दिले, आणि थोड पुढे जावून त्या मुलाने एका मोठ्या माणसाच्या हातात ते दिले. त्या दिवसापासून मी खायचे ही काही देत नाही. लग्न झाल्यावर नवर्‍याला हे जरा रुड वाटले, कारण त्याला सवय होती सिग्नलला कोणी भीक मागितली तर द्याची. पण मी त्याला आता असे करू देत नाही. मागच्या रविवारी कल्याण भेळला गेलो होतो, निघताना मी कुल्फी खात बाहेर आले तर एक भिकारी बाई अक्षरशा माझ्या मागे लागली ती कुल्फी दे म्हणून.

रुईया कॉलेजच्या समोरून जात असताना एक भिकारी मागे लागला. सोबत चालणा-या मित्राकडे बोट दाखवून गमतीत म्हटलं 'इस्के पास पाचसों का छुट्टा है इस्के पास मांगो' दादर स्टेशन पर्यंत त्या भिका-याने माझ्या मित्राचा पिच्छा सोडला नाही.

एकदा एका नाक्यावर एक १०-१२ वर्षाचा मुलगा भिक मागायला माझ्या गाडी जवळ आला. म्हणाला, 'साहेब, मी गरीब आहे. दोन रुपये द्या.' मी म्हणालो, 'तीस रुपये देतो. माझी गाडी धुवून पुसायची.' तो दुसर्‍या गाडीकडे निघून गेला. बोरीवलीला एक भिकारी बसस्टॉपवर भिक मागायचा. पायी चालत जवळ-जवळच्या ३-४ स्टॉप्स वर भिक मागून झाली की रिक्षा करून पुढच्या स्टॉपला जायचा. असा तो कांदिवली पर्यंत फेर्‍या मारायचा. एका भिकार्‍याच्या बँक खात्यात २५ लाख रुपये होते.

एक उपाय. आपणच भिकार्‍याकडे हात पसरायचे. ए मेरे पास बिलकूल नही है। तु ही दे दे ना। तुझे क्या कोइ भी भिक देगा मेरेको कोइ नही देगा।

२ दिवसा पूर्वी पेपर ला सर्वे आला होता. सिग्नल ला भिक मागणार्‍या मुलांचे दिवसाचे कमीत कमी उत्पन्न ३०० रुपये आहे.