Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

स्त्रियांचे राज्य आले तरी त्या पुरुषांनी केलेल्याच चुका पुन्हा कशा करतील? कल्पना मुळातच गंडलेली आहे.

त्या पुरुषांपेक्षा कमी नाही हे सिध्द करणे जास्त महत्वाचे वाटते. आणि यानंतर जो पुरुषांचा उठाव होउन स्त्रिसत्ता उलट्वली जाईल तेंव्हा मात्र पुरुष जुन्या चुका करणार नाहित स्त्रियांना वारेमाप सूट देताना त्या डोक्यावर बसणार नाहित याची काल्ज़ी घेतील तसेच त्याना गुलामिच्या ओज्या खाली घुसमटू ही देणार नाहित वजगात एक समतोल काही काळ निर्माण होइल

त्याकाळी सर्व पुरुष मोठाले केस वाढवत, पोलकी, साड्या, सलवार-कमीज वगैरे घालत. नाक, कान वगैरे टोचवून त्यात दागिने घालत. समुद्रावर पोहताना बिकिनि घालत. चवचाल स्त्रियांनी न्याहाळून बघितले, तर "बाप, भाऊ नाहीत का तुला ?" असे म्हणत अंग झाकत लगबगीने निघून जात. 'वारमर्दांना' काही अण्णा, अप्पा वगैरे विकत घेऊन नाचगाणी करायला लावत... सिनेमातील पुरुषांचे 'आयटम साँग' स्त्रियांमधे फार लोकप्रिय असत.

आयला आणि पुरुष बायकांना लाजत लाजत "मै तुम्हारे बच्चे का बाप बनने वाला हु" किंवा "हमारे घर मे एक नन्हा मेहमान आने वाला है" किंवा "अग ऐका ना गडे. आज माझ्यासाठी येताना कैरी घेउन ये ना" असे काही सांगणार की काय्? बाकी मी पॉपकॉर्न घेउन बसलो आहे. कहितरी मज्जा येणार अशी आशा आहे.

अग ऐका ना गडे. आज माझ्यासाठी येताना कैरी घेउन ये ना
च्या ऐवजी अगं ऐकलंत का? आज किनै आमची मित्रांची मंगळागौर आहे. येताना दुकानातून दोनचार खंबे आणि पिशवीभरून चखणा आण ना प्लीऽऽज!!! असं ऐकवतील याची शक्यता जास्त वाट्टेय ;)

मंगळागौरच. डोहाळजेवणात तर साग्रसंगीत बेत असतो. आंबवलेलं द्राक्षाचं पन्हं, (उपवासाचा) कोंबडीचा कीस, खारवलेले शेंगदाणे, मटनखिचडी, तंदूरचपाती, इ.इ. झालंच तर (आरोग्यदायी) व्होडकासव, अन सोबत काही शास्त्रापुरते नेत्रसुख ;)

उद्या स्त्रियांचे राज्य आल्यास फार अत्याचार होउ नयेत यासाठी पुरुषांनी आत्तापासुनच घरातील कामे करायची सवय लावुन घ्यावी असा उच्च संदेश मिळतो आहे

या वर्षीच्या युथ फेस्टमध्ये रुईया कॉलेजने 'शेवटचा जन्म पुरुषाचा' ही एकांकिका केली होती. उत्तेजनार्थ बक्षीसांत पहिली आली होती. त्याची आठवण झाली.