Welcome to misalpav.com
लेखक: गवि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हा पठ्ठ्या सुरुवातीपासूनच असा उभा रहाताना दिसतो आहे. मस्तच!

इथे आगोदरच येऊन गेलेले पिल्लांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यातले काही फोटो एकत्र पोस्ट करतोय.. एकत्रित पाहण्यासाठी केवळ. egg B D C E F G H I J

आता मात्र कळत नाहीये, एवढ्या उंचावर त्यांना उडायला कसं शिकवणार आहेत ते आईबाप?

आधी कडेवर घेऊन फिरवून आणतील (उंचीची भिती घालवायला). एकदा भिती गेली की आपल्या चोचीत पिल्लाचा एक पाय पकडून उडायला मदत करतील आणि एकदा का उडता यायला लागलं की, 'आयला! आई-बाबांना नं काडीचीही अक्कल नाही' असे म्हणायला पिल्ले मोकळी होतील.

केव्हढ उंच आहे घुबडु. बाकी गुटख्यावरुन पिताश्री म्हणजे सुतावरुन स्वर्ग वाटतय. :D माताजीसुद्धा "दमले बाई म्हणुन तोबरा हाणु शकतात."

काल रात्री पिल्लं दिसेचनात, म्हणून नीट शोधलं तर त्यांनी जन्मल्यास पहिल्यांदाच तो मानसिकरित्या ईअरमार्क केलेला दीड बाय दीड फुटाचा घरटं नावाचा चौकोन सोडून वळचणीत दुसर्‍या टोकाला भ्रमंती सुरु केली होती. सकाळी पाहिलं तेव्हा परत आली होती दोघंजणं. माझ्या या कॅमेर्‍याचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे बर्‍याचदा उत्तम क्षण पकडण्याच्या कामी धोंड ठरतात. फोटो काढण्याचे बटण क्लिक केल्यावर कसलासा काउंटडाऊन सुरु होतो आणि तो अडकत अडकत कित्येक सेकंदांनी किंवा कधीकधी मिनिटभराने फोटो निघतो. मोक्याचा क्षण टिपला जात नाही. तरीही आज पिल्लांची तुलनात्मक उंची, पिसं जोराजोरात साफ करणं, मानेचे व्यायाम :) असे बरेच फोटो मिळाले. व्हिडीओमधे पिल्लांच्या माना किती लवलवतात ते दिसेल. एकदा मोठ्या पिल्लाने मान खांद्याच्याही खाली लटकेल इतकी खाली वळवली. दचकायलाच झालं, पण तो चमत्कारिक फोटो निघेपर्यंत पोज बदललेली. तरीही व्हिडीओत थोडी झलक दिसेल मानेच्या लवचिकतेची. इतक्या माना का वेळावतात कोण जाणे मधेच.. आवाज नीट ऐकू येण्यासाठी की खरंच मानेच्या लवचिकतेची प्रॅक्टिस? :) व्हिडीओ शेवटपर्यंत बघा कारण, व्हिडीओच्या शेवटाकडे लहान पिल्लाने दिलेली खुन्नस कम मला घाबरवणारा पंख फुलवलेला पवित्रा लाजवाब.. आणि दोन्ही पिल्लांनी घसे फुग्यासारखे फुगवून सोडलेली हवा, यामुळे त्या कुकरशिट्टीचा उगम नेमका कुठे असतो ते आवाजासहित दिसेल. पूर्ण व्हिडीओ पहावा. प्रतिमा: मोठ्या पिल्लाच्या पंखांतली आणि पोटावरची जवळजवळ सर्व शुभ्र बालपिसं जाऊन त्याजागी प्रौढ घुबडाची मोठी रंगीत पिसं आली आहेत. A B G C वेगवान पीससफाई: D

तुमच्या कॅमेर्‍याच्या सगळ्या मर्यादांसकट त्याने जे काम बजावलंय ना, त्याला तोड नाही. जगातल्या कोणत्याही वेबकॅमला असं काम मिळालं नसेल कधी! त्या कॅमेर्‍याला तुमच्याबरोबरच धन्यवाद! डिलेड शॉटचं काहीतरी सेटिंग असावं. पण आता त्या पिलांच्या लक्षात न येता अ‍ॅडजस्ट करता येईल का कोणजाणे!

अप्रतिम. मानेचे व्यायाम हे घुबड समाजातील 'योगा'चे प्रकार असावेत. प्रत्येक आकलनिय आणि अनाकलनिय आवाजाला त्यांचा प्रतिसाद पाहता आता निदान एखादा कावळा वगैरे आल्यास त्याला हुसकावून लावण्याचे धाडस आणि कसब त्यांच्यात आले असावे असे वाटते आहे. अजून महिन्याभरात ती उडू शकतील आणि एक सक्षम घुबड नागरीक म्हणून नांवारुपाला येतील अशी शक्यता आहे. ह्या घुबड संगोपनातील कर्तव्यपूर्तीचा आनंद लवकरच तुम्हाला मिळेल. प्रथम तिथे अंडी पाहिल्यापासून ते थेट घुबडांनी स्वबळावर स्वपंखांनी उडून जाई पर्यंतच्या प्रवासातील तुमची मानसिक आणि भावनिक स्थित्यंतरं, उत्सुकता, काळजी, कौतुक, समाधान, मनाची गुंतणूक वगैरे वगैरे वर एक तपशिलवार लेख तयार ठेवा. हा लेख एक अहवाल लेखन आहे. तो लेख तुमच्या थेट भावभावनांचे शब्दचित्र असावे......घाई नाही, घुबडांनी घरटे सोडून आपल्या सर्वांना टाटा-बाय बाय केल्या नंतर.... पण वाट पाहात आहोत.

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

पिल्लं आता त्या वळचणीच्या एरियात मोकळेपणी बागडत असतात. मोठ्या पिल्लाने उडण्याचे काही धडे घेतलेत का हे कळलेलं नाही. सुटीच्या दिवशी अधिक काळ निरीक्षण केल्यानेच कळेल. लहान पिल्लाच्या पंखातली पिसंही आता प्रौढ घुबडासारखी झाली आहेत. तेही लवकरच उडण्यासाठी तयार होईल असं दिसतं. एका पायावर उभं राहणं हा दुसर्‍या पायाला विश्रांती देण्याचा प्रकार आहे की उगीच आपली स्टाईल हे माहीत नाही. A B बाकी जबरदस्त इंटरेस्टिंग असा काही अपडेट नाही. घुबडाकडे पहायला मिळणारा वेळही कमी झालाय.

मस्तच की! दुसरंही आता बर्‍यापैकी मोठं दिसतंय!

गवि, हे सगळं वाचतोय. आसुसून वाचतोय. या दोघांची बातमी वाचायला रोज उत्सुकता लागून राहते. एक सांगतो, हे दोघेही जेव्हा उडून जातील, त्या दिवशी, पाठवणीच्या वेळेस पोरीचे आईबाप रडतात तसे रडणार तुम्ही! ग्यारंटी. (आणि आम्हीही! :( )

एक पाय असाच टक करायची सवय असावी पक्ष्यांना. माझे पक्षीही (चिमुकले आहेत. तुमच्या घुबीजच्या पायाच्या पंजा एव्हढे.) जेंव्हा शांत एकेठिकाणी बसतात तेंव्हा एक पाय असाच टक केलेला असतो. अन एका पायावर बसुन डुलक्या मारतात. (आमची ही कार्टी फार दंगेखोर आहेत. घराचे मालक होउन बसलेत दोघेही,)

एका पायावर उभं राहणं हा दुसर्‍या पायाला विश्रांती देण्याचा प्रकार आहे की उगीच आपली स्टाईल हे माहीत नाही. आँ ! तुमाला "पक्षीयोगा" म्हाईत नाय ? ते त्योच करत्यात न्हव? ;) बाकी ही नविन पिढी आईबापांच्या सततच्या सहवासाविना मस्त वाढतेय हे बघून गार्गार वाटलं !

गवि किमान २-३ दिवसांतून जे काय असेल ते डकवाच. मला तर बिका म्हणतायत तसं 'दाटून कंठ येतो..' असं म्हणायची वेळ जवळ आलेय असं वाटतय.. "परक्या परी असा मी, येथे फिरुन येणे! असं गवि सांगतायत... "घुबडं ओळखतिल काय हो गवि तुम्हाला?, ज्यांनी त्यांच बाळंतपण केलं" असा ही एक चित्रपटात शोभेल असा प्रश्न पडला..

आपण तरी आपले(म्हणजे आईचे) बाळंतपण केलेल्या डॉ ला ओळखतो काय? :) पण आशा आहे की या सुरक्षित जागी ही पिल्लेच नंतर त्यांचे(किंवा जोडीदाराचे) बाळंतपण करायला येतील नंतर.

एक दिवस तुमचा 'रिचर्ड पार्कर' उडुन जाईल..... अगदी पाठी वळुन न पहाता. आणि तुम्ही-आम्ही इवलसं तोंड करुन राहू. :) पिल्लांचा हा अंड्यापासुन इथवरचा प्रवास पहायला फार आवडलं गवि. शतशः धन्यवाद.

गवि, घुबड पिल्लाम्चे इथपर्यंत संगोपन केल्यावर, त्यांचे नामकरण आणि टॅगिंग (स्थलांतरित पक्षांचे करतात तसे) करणे शक्य आहे काय?

लहान पिल्लूही आता मोठ्याइतकेच मॅच्युअर झाल्यासारखं दिसतंय. उडण्याविषयी काय प्रगती ते मात्र कॅप्चर करणं शक्य झालेलं नाहीये. ही वळचण सोडून ते बाहेर उडाले तर फोटोग्राफीही अवघड आहे. मला वाटतं की दिवसा ते बाहेर पडणं शक्यच नाही कारण आसपासचे पक्षी त्यांना नुसते पाहूनही फारच कल्ला करतात. त्यामुळे तब्येतीत तपशीलवार उड्डाणशिक्षणाचा वर्ग घेण्याचा अवसर दिवसा त्यांना मिळेल असं वाटत नाही. आणि तसेही ते सिरियसली नॉक्टर्नल.. अर्थात पक्के निशाचर असल्याने रात्रीच शिकत असतील उडायला.. (अशी समजूत.) A दिसेनासे झाले की उडून गेले असं समजायचं.

टिपिकल जुन्या हिंदी चित्रपटात हिरोचे बालपण एका प्रसंगात संपून त्याच प्रसंगाच्या कंटिन्युअशनमध्ये तो मोठा होतो तेव्हा पब्लिक शिट्ट्या टाळ्या वाजवुन थिएटर पार डोक्यावर घेते. ( जसे छोटेपणीचा हिरो पळत आहे आणि तो पळत असताना कॅमेरा पायांवर आणि अचानक मोठे पाय आणि कॅमेरा थोडा मागे आणि ढँटडढॅण.. खर्या हिरोची एन्ट्री. किंवा छोटेपणीचा हिरो सायकल चालवताना आणि पुढच्या प्रसंगात बाईकवर मोठेपणीचा हिरो( तेव्हा एक गाणेही..) ) तसे काहीसे हे फोटोज पाहताना वाटले आणि ह्या दोन बेट्यांची वर बघतानाचीही पोझ अशी आहे कि च्यामारी येऊत दे ना आता कोणी शत्रु बित्रु.. भिरकवायला आम्ही अगदी रेडी आहोत.... ह्या फोटोजसाठी शिट्ट्या..टाळ्या..पैशाचा खणखणाट... अगदी पैसा वसूल...

काय भरभर वाढली जोडी ! आतातर एका पायावर तप करणारी जोडी एकाच उंचीची दिसतेय. अचानक डोळे उघडून भरारी घेतिल असेच दिसताहेत !!