Welcome to misalpav.com
लेखक: मृत्युन्जय | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

गविंशी सहमत. नेवाळे मिसळ घरापासून तशी जवळच आहे. पण कधीच खात नाही. कारण एकच. महाप्रचंड तिखटपणा. काही वेळा तर मला वाटते आपली मिसळ जास्तीत जास्त तिखटच हवी अशी ओसीडी आहे की काय त्याला. बाकी चिवडा, फरसाण घरी असलं की मात्र मटकीची उसळ घरी बनवायची आणि त्याच्याकडून मस्तपैकी रस्सा-तर्री पार्सल आणायची आणि मिसळीवर थोडीशी टाकायची मग अफलातून चव येते आणि आग आग पण होत नाही. बाकी पुण्यातल्या श्री मिसळ, बेडेकर मिसळीकडून भ्रमनिरासच झालाय. पौडातली हॉटेल दिपक मधली मिसळ सर्वोत्तम असे वैयक्तिक मत.

वल्ली तुम्ही नेवालेच्या समोर असलेली शशीची मिसळ खाल्ली का ? ती पण मस्त असते …मल तीच आवडते

बुवांची आवडती करंट मिसळ पण जोरदार आहे बरं का आणी पिं.चिं. मधली 'दे धक्का' मिसळ पण भारी आहे... बेडेकर रामनाथ मला पण नाही आवड्त

दे धक्का तर आमच्या बिल्डींगच्या खालीच. पण त्याच्याकडे नुसता कांदा लसूण मसाल्याचा रस्सा असतो. मटकी वैग्रे बिलकुल नै. पण चव आहे.

"मिपा" वर मिसळीबद्दल एकदम जोशात चर्चा चालू आहे. मिसळ साधी / तिखटजाळ / फिकी कशी का असेना मिसळ ती मिसळ ! या चर्चेमुळे कुठे काय खायला मिळते याची योग्य माहिती मिळ्त आहे. वेगवेगळ्या शहरात कोणता पदार्थ कुठे मिळतो याची छान माहिती मिळते. असो. अजून माहिती येउ द्या, मी जरा मिसळ चापून येतो.

पण खरंच काही मिसळी इतक्या जास्त तिखट बनवल्या जातात की त्यात चटकदारपणापेक्षा जिभेचा अ‍ॅब्युस जास्त होतो. पहिले दोन घास झाले की घासाघासाला अधिकाधिक आग आग करणार्‍या या तिखटाची जात वेगळी असते आणि ते मजा वाटेल असं नक्कीच नसतं. अशा मिसळीला मी तरी उत्कृष्ट म्हणत नाही>> अगदी नेमकं. :)

आपल्याला काही मरणोत्तर आपल्या आतड्यांची बॅडमिंटनला लागणारी नेट्स बनवायची नाहीयेत. खो खो हसलो .. खरे आहे तुमचे म्हणणे आणि म्हणूनच ठाण्याच्या मामलेदार वर आमची फुली ! गड्या आपली बेडेकर बरी , अधिक चवीसाठी ते तिखट नाही तर तिखट जीभ वापरतात.. आणि तुम्हाला घाम फोडतात!

पिंपरीतलं पॅटीसही अफलातून असतं. पूर्वी बजाज ऑटो समोर जयश्री ची मिसळ मिळायची. कवि, नेवाळे पेक्षा ती मला आवडायची. रोड वाईडनिंग मधे गेलं ते. आतल्या बाजूला ब्रम्हा रिजेन्सी च्या बाजूला आहे आता बहुतेक ते. टेल्को भोसरी रोड वर हॉटेल मयूर च्या मिसळीबद्दल ऐकलंय. कुठे आहे माहिती आहे का? बाकी बाबा रामदेव ची दाल बाटी, चुरमा, मसाला खिंचीयां मस्त.

हो. टिपिकल सिंधी पद्धतीचे पॅटीस. जयश्रीची मिसळ खाल्ली होती. फारशी आवडली नाही. ब्रह्मा शेजारीच आहे ती. मयूर मिसळ अजून खायचा योग आला नाही. एच ए कॉलनीमधल्या नाशिककरचा वडा अफलातून असतो.

चापेकर चौकातली वराडेची भुर्जी. तिथल्या पाट्या हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होउ शकेल.

हाहा. याबाबत आपला पास. अंडीसुद्धा खात नसल्याने कधी भुर्जीच्या गाडीवर जायची वेळच आली नाही. :)

अंडीसुद्धा खात नसल्याने कधी भुर्जीच्या गाडीवर जायची वेळच आली नाही.
मग, पनीर भुर्जी करून खा. मस्तं लागते.

अगदी. कधीमधी हाटेलात पनीर भुर्जी खाल्ली जाते. घरी करायचा कधी प्रयत्न केला नाही.

पनीर भुर्जी सारखा भिकार पदार्थ अजिबात आवडत नाही ,इतका छान तो पनीर त्याचा भुसा करायचा पटत नाही विशेता: पनीरचे इतर चांगले उपयोग असताना , हे माझ मत आहे कोणीही उगाच उचकू नका !!! :)

नका ओ नका. आमच्यासारख्या शाकाहारी 'बनलेल्यां'ना तोच एक सहारा आहे. उगाच बुर्जी खाल्ल्याची मौज करुन घेता येते.

अगदी अगदी. बरेच लहान असताना आंब्याऐवजी पेरू अधिक प्रिय होता ते दिवस आठवून अं.ह. झालो. अर्थात त्यामागे गोडाचा अंमळ तिटकारा आणि आंबे खाताना हात बरबटून घेण्याचा तिटकारा हे फॅक्टर जास्त होते.

ही बातमी तशी अवांतर आहे पण खाण्याशी संबंध आहे म्हणून.. राजेश कुमारचे वजन सध्या १५२ किलोग्रॅम इतके आहे. राजेशला त्याच्या रोजच्या आहाराबद्दल विचारले असता मिळालेली माहिती नक्कीच डोळे विस्फारणारी आहे. राजेश कुमार दररोज तब्बल ४० अंडी खातो, सोबत ५-६ किलो चिकन, सात लिटर दूध, ६-७ किलो फळे आणि ३० पेक्षा जास्त चपात्या. याबद्दल राजेश स्मितहास्यात प्रतिक्रीया देतो की, हा सगळा माझा आहार मोठा असल्याने मी दिवसातून ७ ते ८ वेळा जेवतो. लवकरच भारताकडून 'डब्यूडब्यूई'मध्ये दिसणार 'नवा खली'!

सांगलीला रामविश्वासचे श्रीखंड/आम्रखंड केवळ अप्रतीम....... ( पुण्याच्या चितळ्यांना /दारच्या पणशीकरांना यांच्याकडे काही वर्ष म्हशी धुवायला / पाणी भरायला पाठावायला पाहीजे) महाराष्ट्र बँकेचा-वडा, सांभाची पाणी-पुरी व गणेशचे पोहे खाल्यावर आत्मा तृप्त होतो, हे सांगली-पुणे-बेंगलोर-मुंबई इथे प्रत्येकी ३ते४ वर्ष खव्वयेगीरी केल्यावरचे माझे ठाम मत आहे. (वर्षातुन एखाद्या वेळीच जरी सांगलीला गेलो तरी हे चुकवत नाही) वि.सु. वडा बँकेत मिळत नसुन, लागुन असलेल्या बोळात मिळतो पण नाव महाराष्ट्र बँकेचा-वडा असेच रुढ झाले आहे. सांगलीत कुणालही पत्ता विचारावा

यांच्याकडे काही वर्ष म्हशी धुवायला / पाणी भरायला पाठावायला पाहीजे का बुवा? त्यामुळे काय फरक पडणारे? जर ती चव चांगली असेल तर आणि चवीचं शिक्रेट ते शेअर करणार असतील तर (जी शक्यता कमीच) उपयोग आहे. म्हशी धुवून जर श्रीखंडाला ती चव येणार असेल तर आम्हाला तसे नकोच! आणि तुम्ही म्हणताय तिथले श्रीखंड चांगले असेल तरी ठीकच आहे. शेवटी घराच्या जवळ जे उपलब्ध असेल ती चव आपली बनत जाते. तसेही घरी श्रीखंड केल्यावर प्रत्येकाच्या घरच्या पदार्थाची चव निराळी आणि चांगलीच असते.

अप्रतिम वगैरे नाही पण चांगले असते . चितळे हेच अस्सल ! बाकी चालू द्या . रच्याकने मिरजेच्या 'विटा डेअरी" च्या चक्क्याचे श्रीखंड खाल्ले आहे का ? मी त्यांचे तयार श्रीखंड ही खाल्ले आहे पण जायफळाची मात्रा थोडी अधिक उगाळतात, च्यायला पाटावर आडवे ! तसे आमच्या विट्याच्या राजहंस डेअरीचे श्रीखंड ही तोडीस तोड असते ! आणि तो सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानाजवळील कढी-वडा? हल्ली पुण्यात ही मिळतो म्हणे . आणि भड्ंग विसरलात काय ?

शनिपाराच्या जवळच्या "श्री" मिसळ चे नाव कोणी घेतले नाही ह्याचे आश्चर्य वाटले. मला तरी फार आवडायची ती. तिथले बटाटेवडे पण. बादशाही चे ( न्यू पुना रेफ्रेशमेंट ) चे बटाटेवडे पण मस्त असतात.

बात अगर बटाटावडा की निकली ही हय तो "प्रभा विश्रांती गृह" पेक्षा सुंदर बटाटावडा अजुन माझ्या तरी खाण्यात नाही. राजमाता, ठाणे आणि शिवदीप पुणे आर क्लोज सेकंड

चांगला ब. वडा खाऊन अनेक वर्षे लोटलीत असे जाणवले. मला वाटते चार ते पाच वर्षात चांगला ब. वडा खाल्लेला नाही. खरेतर बटाटेवडाच वर्षातून एकदा खाल्ला जातो.

बात अगर बटाटावडा की निकली ही हय तो "प्रभा विश्रांती गृह" पेक्षा सुंदर बटाटावडा अजुन माझ्या तरी खाण्यात नाही
+१११११११११११११११११११११११११११११ चांगले उत्तम वडे अनेक ठिकाणी मिळतात पण प्रभा म्हणजे सर्वोत्कृष्ट!