Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सुंदर लेखनचित्र मांडलंयत हो आशू राव.. :)

तंतोतंत वर्णन .. आम्ही पण हेच केलयं .. दर शनिवारी शाला सारवायला लागायची ... आमची पण शाळा - जीवन शिक्षण मंदिर . चप्पल तर नव्हतीच पण , छत्री- स्वेटर अस्ले लाड नव्हते त्यामुळे निसर्गाचे सानिध्य होते. आणि भिजला म्हनून लगेच सर्दी होत नव्हती. थंडिच्या दिवसात शनीवारी सकाळी शाळेला जायचे जीवावर यायचे !

शिक्षण मंदिर आहे होय? मला वाटलं आमच्या जीवभौच्या कथांचं मंदिर आहे. बाकि त्यांच्या कथा पण सामान्य जीवना वरच्या पण शैक्षणीक दर्ज्याच्या असतात. कधी तरी त्या पण वाचत चला/अनुभवा.

आमची शाळा तर जीवन शिक्षण शेती शाळा होती. भात लावायला पण शिकवायचे!

तो भात नव्हे. गुडघा गुडघा चिखलात लावायचे भाताचे रोप! =))

शेणानं सारवायला लागलं नाही तरी बाकी बराच प्रकार असाच होता. स्पर्धा आहे च्या नावाखाली प्लेग्रुप पासून ट्युशन लावणार्‍या पालकांना लाख लाख सलाम!

स्पर्धा आहे च्या नावाखाली प्लेग्रुप पासून ट्युशन लावणार्‍या पालकांना लाख लाख सलाम! + १ >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> आणि स्पर्धेच्या नावाखाली शिक्षण सम्राटांच्या घशात लाख लाख रुपये घालणारे पालक पण धन्य ( पण खरे तर त्यांची पण काही चूक नाहीये परिस्थिती अशी आहे कि...च्यामारी मरुदेत बोलू तितके कमी आहे.)

सेंटी केलं राव तुम्ही.. माझं गाव १९९२-९३ मधे ना-धड-खेडं-ना-शहर असं होतं.. आम्हा पोरांना शेण शोधायला लै हिंडायला लागायचं. नंतर शाळाच बदलली. आता त्या सरकारी शाळेत फरशा बसल्या..

एवढी सुंदर शाळा आमच्या नशिबात नव्हती.. पण जी होती ती छान होती.. आता मुला साठी शाळा शोधायचे दिवस आले. काल सकाळीच वहिनीने फोन करुन सांगितले की अबीर जुन मध्ये २ वर्शाचा होत आहे तेव्हा तुला ह्या नोव्हे - डिसेंबर मध्येच अ‍ॅडमिशन घ्यावी लागेल. २५ हजार + फिस असते. ऐकुन झोप उडाली ते उडालीच.. प्ले ग्रुप मध्ये टाकणं खरच गरजेच आहे का? आणि काल पेपर मध्ये आलं होतं की आता एप्रिल मे मध्येच अ‍ॅडमिशन करायच्या (ह्यावर वहिनी म्हणे की हे नाट्क मागच्या वर्षी पण झालं होत, काही फरक पडला नाही..) मुळात पुण्यात चांगल्या शाळा कोणत्या??? अक्षरनंदन बद्दल ऐकुन होते पण ती शाळा बंद पाडायच्याच मागे लोक लागलेत असे दिसते.. (सॉरी हो आशु भाऊ.. हायजॅक केला तुमचा धागा.. पण शाळा कोणती हा ज्वलंत मुद्दा आहे सध्या घरात.. रहावलं नाही म्हणुन लिहीलं)

खालील शाळा चांगल्या आहेत असे ऐकुन आहे: १. सेवा सदन २. बाल शिक्षण ३. परांजपे हाय्स्कूल ४, अभिनव इंग्रजी ५. मिलेनियम बाकी आपल्याकडे काही फर्ष्ट ह्यांड नॉलेज नाही.

हा ज्वलंत विषय आहेच...कुठ्ल्या शाळेचा फॉर्म घेण्यासाठी पहाटेपासुन किंवा आदल्या दिवशीपासुन रांग लागते यावर तिचे स्टेटस ठरते...सेवा सदन,न्यु इंडिया,बाल शिक्शण या शाळांजवळ राहणार्‍या लोकांना विचारा

आम्हीपण हेच केलय. शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्याने सकाळी सकाळी शाळेची जमीन शेण बुतारा घेवुन सारवावी लागत असे, बुतारा मुलांसाठी आणी मुली हाताने डि झाइन काढुन सारवत असत. बाकीचे झाडांची पाने गोळा करत व हिवाळ्यात हीच पाने शेकोटी साठी वापरली जात. बाकी शेण गोळा करायला गावातलाच कोणी की ज्याच्याकडे गाईम्हषी असत. बाकीचे नंतर.....

आजच्या शाळा पाहिल्या की 'शाळा शिकून कोणाचं भलं झालंय' हे पटायला लागतं

आमच्या जुन्या सोसायटीत चिल्ल्या-पिल्ल्या मुलांची दाटी झालीये. तिकडे नेहमी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. एकदा वेशभूषा स्पर्धा (मराठीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन :) ) ठेवलेली होती. सोसायटीतल्या सोसायटीतच सूत जुळून आलेल्या एका जोडप्याच्या लहान मुलाला उघडा, कंबरेवर गुलाबी पानं, आणि एकूणच गुलाबी गुलाबी असा नट्टापट्टा केलेला पाहिला. त्याच्या चेह-यावर आणि छातीवर त्याची आई गुलाबी पट्टे ओढत होती. बाप बिचारा नुसता ते सगळं बघत बाजुला शांतपणे उभा होता. मी जाऊन सहज म्हटलं, 'काय जोकर झालाय का हा??' त्यावर त्याची आई भडकली. 'काय कौस्तुभ, ट्रायबल्स-मॅन आहे ना तो... दिसत नाई??' मी एकवार त्या मुलाकडे पाहिलं, मग त्याच्या बापाकडे पाहिलं. त्यानं मला एक केविलवाणं स्माईल दिलं आणि मी हसू आवरत तिथून सटकलो.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/general-knowledge-questions-related-to-farming-278265/2/ या उदाहरणांवरून मला श्रीमती ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या शाळेत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण झाली. त्यांच्या शाळेच्या तपासणीसाठी काही विद्वान गेले असता त्यांनी विद्यार्थ्यांना सामान्यज्ञानाचे काही प्रश्न विचारले - अमक्या खात्याचा मंत्री कोण? वगरे वगरे. विद्यार्थ्यांना उत्तरे देणे फारसे जमले नाही. ताराबाईंनी हा सगळा प्रकार पाहून घेतला आणि तपासनीसांकडून जेवणाच्या सुट्टीपर्यंत वेळ मागून घेतला. सुट्टीच्या वेळात त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या झाडांची पाने गोळा करून आणण्यास सांगितले. पाने गोळा झाल्यानंतर त्यांनी एकेका विद्वान तज्ज्ञाला ही पाने कोणकोणत्या झाडांची आहेत असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. विद्वान तज्ज्ञ अर्थातच गडबडून गेले. याउलट, ताराबाईंच्या विद्यार्थ्यांना त्या त्या पानाच्या झाडाचे नाव एवढेच नाही तर त्या झाडांचे औषधी गुणही तोंडपाठ होते.