Welcome to misalpav.com
लेखक: नगरीनिरंजन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ननि, रितसर प्रिंटाउट काढून बसला होतात काय 'ज्ञानसाधने'ला? नाई, तुमची लि़ंक डायरेक्ट प्रिंट काढा म्हणतेय! ;) बाकी लेख चान चान! गायत्री वगैरे टाळता आले तर बघा जरा.

गायत्री मंत्राचा उल्लेख न करता आणखी काही वापरता आलं असतं असं वैयक्तिक मत आहे. टाळावा हा निव्वळ एक सूचनावजा सल्ला होता. तरीही उगाच्च स्वतःचा अभ्यास दाखवण्यासाठी लेखाचा फोकस दुसरीकडे वळवण्याचा कोणताही मानस अथवा हेतू नव्हता, नाही, नसेल. लेखकाचं मत आलेलं आहेच. त्यानुसार आवश्यक वाटल्यास संपादकांना सांगता येण्याचा पर्याय खुला आहेच. कुणालाही अनुचित वाटल्यास संपादकांना सांगून देखील माझा प्रतिसाद संपादित करता येईलच.

लेख उत्तम =)) अन काडीची विनोदबुद्धी नसलेल्या सांस्कृतिक तालिबान्यांना फाट्यावर मारणेच उत्तम.

या वेळी रेतन करताना गोठ्यात गायत्री मंत्राचे पठण केल्यास
अलिकडेच अमेरिकेतील म्हैषाचुस्टेट्स युनिव्हर्सिटीत झालेल्या संशोधनानुसार याकामी 'गाय'त्री मंत्रा ऐवजी 'म्हैसत्री' मैत्र जास्त पॉवरर्फुल असल्याचे सिद्ध झालेले आहे. सदर मंत्राच्या सीड्या लवकरच चीनमधून भारतात येत आहेत.

हाण तिच्यायला! जबरी जोडे मारले आहेत राव. ते पैठणी अंमळ बावन्नखणी च्या वळणाने वाटतंय बगा!

>>रेडकाऐवजी कालवड झाल्यास हे अत्यंत नाखूश होऊन अनावर होऊन हल्ला करू शकतात, नाखूश नाय व्हतीन त मंग काय व्हतीन सोयरं.... म्हसाडाला कालवड कुढं व्हत आस्ती का राव... त्ये डोबाड येक तं टोणगा देयीन नाहयतं पारडू तरी.... म्हशीला कालवड म्हयी लयीच फापाललो ना राव... बाकी लेख मात्र य्येक लंबर.... पिढ्यानपिढ्यांचा पांढरपेशा मावळी शेतकरी

तेवढंच थोडं दाताखाली खडा आल्यागत टोचलं, पण दुर्लक्ष करता येण्याजोगं.

पारडी शब्द काय आठवला नाय गड्या हो. सगळं आयुष्य शहरात गेल्यावर कालवड शब्द आठवला हेच काय कमी आहे? बाकी म्हैस म्हणजे प्रतिसृष्टीतली गाय आणि पारडी म्हणजे प्रतिसृष्टीतली कालवड असं पुराणात म्हटलेलंच आहे ना!

म्हैस म्हणजे प्रतिसृष्टीतली गाय आणि पारडी म्हणजे प्रतिसृष्टीतली कालवड असं पुराणात म्हटलेलंच आहे ना!
रिअली? रेफ्रन्स बघायला आवडेल, कारण इतर ग्रंथांच्या तुलनेत माझे पुराणांचे वाचन अगदीच तुटपुंजे आहे.

विश्वामित्र त्रिशंकूसाठी प्रतिसृष्टी निर्माण करायला गेला त्यात मूळ वस्तूंच्या बिघडलेल्या प्रतिकृती तयार झाल्या असं काहीसं वर्णन आहे.

धन्यवाद. विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली इतपत ऐकून होतो पण त्यापुढचे डीटेल्स माहिती नव्हते.

असे काही नाही. त्रिशंकूचा उल्लेख रामायणात आला आहे. त्यात बिघडलेल्या प्रतिकृतींचे वर्णन कोठेही नाही. उलट विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीमुळे सर्व देवता, असूर, ऋषीलोक लै घाबरले आणि विश्वामित्राला शरण गेले आणि त्यांनी ती नक्षत्रे तशीच ठेवून त्यात खाली डोके केलेल्या त्रिशंकूला प्रकाशमान ठेवण्यात अनुमती दिली. हा पहा खाली डोके केलेला त्रिशंकू (crux) चित्र विकीपेडियावरून a

कोणत्या पुराणात आहे माहित नाही पण माझ्या आईकडून त्रिशंकूची गोष्ट ऐकली होती तिच्यात असंच सांगितलं होतं. लोकांमुखी अशा कथा गंमतीदार स्वरूपात रहातात.

लेख भारीच. फक्तः बीजारोपण करताना म्हशीने संपूर्ण डोके झाकले जाईल असा चादरीचा पदर घेणे आवश्यक आहे. हे नक्की कशाचे विडंबन होते ते झेपले नाही.