इंग्रजीत शिव्या घालणे हुच्च्भ्रू पणाचे लक्षण मानणारी फार मोठी जमात अस्तित्वात आहे. बाकी लेखातील वाक्या वाक्यातुन आत्मचरित्र उघडत गेल्याचा भास झाल्याने लेख आवडल्या गेल्या आहे :)
मी खुपच कमी शिव्या दिल्या असतील ! पण हल्ली काय झाले आहे आहे कोणास ठावुक पण तोंडात शिव्या यायला लागल्या आहेत.विशेषतः टिव्हीवर राजकारणी मंडळी दिसली माझा संयम सुटतो ! ;) हल्ली दुचाकी वरुन प्रवास करताना माझ्या मागे उगाच मिनीटाला १०-१५ वेळा हॉन वाजवणारा आला की यथेच्च शिव्या हासडतो. आत्ता पर्यंत शिव्या देण्या म्हणजे बरेच सोज्वळ शब्दच वापरले जायचे उदा.अरे ए बैल्,गाढवीच्या,सुकटीच्या वगरै.पण हल्ली शब्दांना धार चढली आहे असे जाणवु लागले आहे. एबीपी माझावर कार्यक्रमा मधे राजकिय नेत्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांच्या जाहिराती आल्या की मी तोंडभरुन शिवीसुमने उधळतो...
बाकी विलायती शिव्यांबाबतीत सहमत ! असल्या शिव्या देणारे मुल मुली या मराठी असल्या तरी शिव्या देताना देखील अगदी स्टेटस सांभाळुन दिल्या सारखे आंग्ल शिव्या देतात. फक ही सगळ्यात आवडती शिवी या मंडळींची ! पण मराठी शिव्या यांनी ऐकल्या की अगदी आपण काय भयंकर आणि त्यांच्या भाषेत सांगायच झाल तर चीप ऐकत आहोत असा आविर्भाव दिसुन येतो.
तश्या हल्ली एक एक शिव्या नीट ऐकु लागलो आहे,हल्ली माझी आवडती शिवी भोसमारीच्या ही आहे. ;) बाकी व्यक्त केलेल्या मनोगताशी माझे अनुभव देखील मिळतेजुळतेच आहेत.
तुम्ही आगरी शिव्या कधी ऐकल्या आहेत का ? बेक्कार ! ;) मध्यंतरी व्होडाफोन ने जुजु असलेल्या अनेक जाहिराती बनवल्या होत्या.मला त्यातल्या काही फारच आवडल्या होत्या...म्हणुन तू-नळीवर जुजुच्या जाहिराती शोधत होतो आणि तेव्हाच आगरी जुजुचा साक्षात्कार मला झाला ! तो आगरी जुजु पाहिले आणि म्हंटले बास्स ! ;)
जाता जाता :- चुतिया ही शिवी {खरं तर ही शिवी नाही} मी जेव्हा पहिल्यांदा ऐकली होती तेव्हा काही तरी भयानक अर्थ असलेला हा शब्द आहे असे वाटले होते,पण नंतर त्याचा खरा अर्थ समजला. या बद्दल देखील तूनळीवर THE REAL MEANING OF CHUTIYA असे शोधावे,तुमचे प्रबोधन केले जाईल याची खात्री देतो.मुंलीचे म्हणाल तर त्या देखील बिनधास्तपणे शिव्या देतात,फक्त बर्याच वेळा मी नाही त्यातली हे दाखवणे त्यांच्यासाठी फार महत्वाचे असते...यावर देखील तूनळीवर भरपुर मटेरिअल सापडेल.
@ कपिलमुनी आणि पेठकर काका,
खरंय अगदी खरंय मी शिव्या हासडतो ते त्यांना ऐकता येतील अश्या नाही ! मनातले फस्ट्रेशन बाहेर काढण्यासाठी,कुठेतरी संताप व्यक्त करण्यासाठीच.हल्ली हिंदुस्थानी लोक माज करु लागले आहेत्,त्यांच्याच मस्तवालपणा आणि मग्रुरी वाढली आहे की काय तेच कळेनासे झाले आहे.४ चाकी वाले विशेषतः मोठ्या गाडी बेफाम उधळणारे माझ्या बर्याचदा डोक्यात जातात ! हायवेवर ६०-६५ च्या स्पीडला कार चालवताना मधेच कारचा दरवाजा उघडतात आणि पचाकन पान थुकतात...त्यांच्या मागे दुसरी गाडी आहे,दुचाकी चालवणारा आहे त्यांच्या अंगावर हा पिचकारीचा स्प्रे उडेल याची अजिबात तमा न बाळगता हे गाण्या सुसाट चालवत असतात्.मध्यंतरी ठाण्याच्या कॅडबरी समोरील उड्डानपुला वरुन मी दुचाकी चालवत होतो तेव्हा एकदम वेगाने एक सुमो गेली आणि त्याच्या मधील एका व्यक्तीने जळती सिगरेट खिडकीतुन बाहेर फेकली ती तशीच माझ्या शर्टावर येउन पडली नशिब ती माझ्या शर्टाच्या आत किंवा हेलमेटच्या आत शिरली नाही,मी जोरात ओरडलो ! ते एकुन त्यांनी सुमोचा वेग कमी केला आणि बाईकला उड्डानपुलाच्या भिंतीला दाबण्याचा प्रयत्न केला,त्यांची सगळी भाषा माजोरडी आणि शिवीगाळ करणारी होती...माझा जीव आणि दुचाकी मोठ्या मुश्किलीने वाचली.या सर्व प्रकारांनमुळे हल्ली पारा लवकर चढतो की काय ते कळत नाही. माझ्या सारख्या नोकरदार मंडळींना रोज अश्या आणि अनेक समस्यांना रोज तोंड देउन घरदार चालवावे लागतो...तेव्हा मनोमन शिव्या देउन फस्ट्रेशन कमी करणे हाच काय तो तात्पुरता इलाज केला जातो.तोंडावर शिव्या देण्याची शक्यता ही जवळपास नाहीच.
हल्ली हिंदुस्थानी लोक माज करु लागले आहेत्, त्यांच्याच मस्तवालपणा आणि मग्रुरी वाढली आहे....
हे शंभर टक्के खरे आहे. मलाही तसा अनेकदा (मोजता येणार नाही इतक्यावेळा) अनुभव आला आहे. मीही शिव्या घालतो. माझा वरील प्रतिसाद असाच माजोरीपणा करणार्या दुचाकी स्वारांबद्द्ल आहे. सरसकट सर्व दुचाकी स्वारांबद्दल नाही. मी ही एके काळी दुचाकीस्वार होतो. माझा मुलगा आजही दुचाकीस्वारच आहे. पुण्यातले कित्येक दुचाकी स्वार असुरक्षित अंतरात चारचाकी समोर येतात त्या भ*** स्वतःच्या जिवाची पर्वा नसते त्याचा जीव वाचवयला आपल्याला करकचुन ब्रेक मारावा लागतो. कांही बोलल्यास बाह्या सरसावतात. कित्येकांना मीही खाली उतरून बाह्या सरसावून हिसका दाखवतो. पण ही (पायात कडमडायची) वृत्ती मोडून काढता येत नाही. शिवाय रहदारीत चारचाकीवाल्याला दुचाकीस्वाराचा पाठलाग करता येत नाही. पुण्यात मुली/महिला दुचाकीस्वारांचा माजुरडेपणा, अडविल्यास उद्धटपणा खुपच अनुभवास येतो. त्याच बरोबर महिला दुचाकीस्वारास गौण लेखणे, मुद्दाम त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना घाबरविणे आदी प्रकार चारचाकीवाल्यांकडून होतानाही दिसतात. ह्या माजुरड्या दुचाकीस्वारास आणि चारचाकीवाल्यांस शिव्या घालणे हा एकच मार्ग आपल्या वैफल्याला वाट करून देणारा असतो. ह्यावरून माझे आणि पत्नीचे अनेकदा खटके उडाले आहेत. त्यावर 'स्टिअरींगच्या मागे बस आणि मग जिवाचा शांत पणा दाखव' असे सांगावे लागते. एकदा तर बायकोला 'तुला आवडत नसेल तर तू आपली बसने किंवा रिक्षाने जात जा.' असेही सांगून झाले आहे. आधीच बाहेरच्या टिनपाट प्रकृतीच्या दुचाकी स्वाराचा माजुरडेपणा सहन न होऊन संताप आलेला असतो आणि त्यावर गाडीच्या आंत त्याच नाटकाचा दुसरा अंक (तोही घरी जाऊन नाही, तिथेच, ताबडतोब) सुरु असतो. अशावेळी डोके शांत ठेवायला आपण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वगैरेंची अवलाद असायला पाहिजे. सामान्य माणसाला शक्य नाही.
सगळे चारचाकीवाले आणि सगळे दुचाकीस्वार माजुरडे नसतात. हल्लीच्या जगात अचानक आणि अमाप पैसा (कुठल्याही मार्गाने) हाती आलेले, नगरसेवकांचे, स्थानिक राजकारण्यांचे पिद्दे चारचाक्या अक्षरशः उडवतात आणि इतरांना जाणूनबुजून त्रास देतात. दुर्दैवाने, अशांची संख्या जास्त आहे. त्यातून त्यांना असुरी आनंद मिळत असतो. माझ्यासारखा वयस्क आणि कुटुंबवत्सल माणूस तर त्यांच्यासाठी अगदी सॉफ्ट टार्गेट असतो. पोलीसही अशांपुढे हतबल झालेले पाहिले आहेत. नियमानुसार आणि एक जबाबदार नागरिक म्हणून वावरताना आपल्याला कोणी वाली नाही ही भावना प्रकर्षाने जाणवते. असो.
मला जर एका दिवसाचा हुकुमशहा केलं तर सगळ्यात त्या संपूर्ण दिवसात मी फक्त एकच काम करेन. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या पॉलिटिशियन्स, त्यांचे चमचे, बिल्डर, सरकारी नोकर आणि स्कॉर्पियो, एन्डेव्हर, पजेरो, सुमो, ट्रॅक्स, अॅव्हेन्जर, फॉर्च्युनर, लॅन्डक्रूजर यांच्या डायव्हर आणि मालकांची यादी करायची आणि मग एक सर, एक गोली.
तु त्याला उगाच तसचं सोडुन दिलस. खाली खेचुन तुडवायचा. पुण्यात कुठेतरी असाचं किस्सा झालेला. एका मुलीच्या पँटमधे मागुन जळती सिगारेट टाकलेली. ह्यांना जागीचं ठेचलं नाही ना तर ह्यांच्या कारवाया वाढत जातात.
जर्मन वर्मन धाग्यातला यशो आणि स्वॅप्स यांचा प्रतिसद वाचुन हा धागा आठवला !
फक ही सगळ्यात आवडती शिवी या मंडळींची !
अशोंनी छान प्रवचन दिले आहे... ऐकण्या सारखे आहे ! ;)
https://www.youtube.com/watch?v=kmqZIAw8vzY
माझं स्पष्ट मत आहे; शिव्या हा भाषेचा एक अलंकार आहे. त्याला नाकारून किंवा वाईट म्हणून काही होत नाही.
किती, कुठे, कुठल्या, आणि महत्वाचं म्हणजे, कशा आणि कुणी शिव्या द्याव्या, यावर सगळं अवलंबून असतं. तेंव्हा ते कळलं पहिजे. उठसूट वाक्यागणिक २ शिव्या निरर्थक घुसडणारे शिव्यांची मजा घालवतात. याउलट पुलंच्या रावसाहेबांसारखी लोकं एकच्च्च अशी परफेक्ट टायमिंग ला हासडतात, की त्या ठिकाणी कुणीही उपस्थित असो; त्याला ते गैर वाटत नाही, उलट गेलंच तर चेह-यावर हसू देऊन जातं.
तेंव्हा या भाषेच्या अलंकाराची ग्रेस सांभाळता आली पाहिजे.
विश्वास ठेवा, एकदा कधी तुम्हाला जरा वैफल्य आलं, चिडचिड झाली, तर एकटयात द्या हवं तर पण नुसत्याच काही शिव्या हासडून बघा; स्ट्रेस कमी होतो. ते शब्द, किंवा त्यांच्या अर्थाच्या फार खोलात शिरू नका.
शिव्या वाईट नसतात; त्या कशा, कोण, किती, कुठे, कधी देतो, यावर त्या वाईट किंवा चांगल्या ते ठरतं.
च्यायला, काय जबराट लेख आहे. मी सुध्दा ७ वी ते अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत , वाक्या वाक्या ला शिव्या द्यायचो. कसे काय माहीत नाही, पण नंतर हळूहळू कमी झाले. आजकाल 'फकत' आमच्या मॅनेजरला (ज्याला आम्ही लाडाने छगन म्हणतो) यथेच्छ शिव्या घालतो. तशा काही दिल्लीकरांच्या शिव्या सुध्दा दमदार वाटतात, पण येस त्याबाबतीत मराठीला कॉम्पिटिशन नाहीच
मराठी साहित्यातील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार हे पुस्तकही अभ्यासनीय ठरावे.
हे पुस्तक चाळलंय. गंमत म्हणून परिशिष्टांप्रमाणे पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार अधून-मधून वाचत असतो. पहिल्यांदा शीर्षक पाहून उडालो होतो आणि आता या पुस्तकाची पारायणं होणार असंही वाटलं होतं, पण पुस्तक चाळल्यावर लक्षात आलं, की हे गंभीरपणे व्यवस्थित अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक आहे.
अत्यंत प्रसंगनिष्ठ लेखन! =))
@शाळेच्या बाईंकडे सुद्धा 'बाई हा त्याला गांडू म्हणाला' अशा तक्रारी केलेल्या आठवतात>>>
@मला पांडु म्हणून चिडवायचे आणि मधलं बोट दाखवायचे>>> =))
@शिव्या या माणसाला निसर्गाच्या जवळ नेतात. >>>
===========================================
बाकि अख्या लेखाबद्दल शिवी.साष् टांग दंडवत!!! अफाट मंजे अफाट लिवलय!!!
लेखात किती तरी अश्लील शब्द आहेत पण लेख अश्लील वाटला नाही.
बोले तो ऐसा क्यूं ?
लिहीणा-याचा उद्देश रोखठोक आणि निर्मळ असला कि असं होतं. नाहीतर काहींचं सभ्य लिखाण पण अश्लील आणि पकाऊ वाटतं. असो.
>>>शिव्या ह्या सर्वव्यापक आहेत. त्यामुळे शिव्या जरी आज मी उगाच देत नसलो, तरी त्यांच्याबद्दल आधी नमूद केल्याप्रमाणे मला भयंकर आदरभाव, आपुलकी आणि जिव्हाळा आहे. शिव्यांचे माझ्यावर अगणित उपकार आहेत. त्यांनी माझे आत्तापर्यंतचे आयुष्य असे रमणीय केले आहे आणि यापुढेही करत राहतील त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. शेवटी शिव्यांना याच शुभेच्छा देईन की जशी त्यांच्या मानवी जीवनातील या महाकार्याची उपरती मला झाली, तशी ती एक दिवस सगळ्यांना व्हावी आणि मग कोणीही शिव्यांना शिव्या देऊ नये.
=)) =))
भन्नाट सारांश! चातुर्मास पुस्तकातली कथा आठवली.
अमुक तमुक व्रत केल्यानं जसं त्यांचं भलं झालं तसं सगळ्यांचं होवो स्टाईल.
बाकी दुर्लक्ष ही सगळ्यात मोठी शिवी आहे असं आमचे गुरुजी बिपिन कार्यकर्ते सांगतात. त्याची लिंक द्या रे प्लिज कुणी!
शिवीने भाषेला जोर येतो. एखादा माणूस चांगला नाही म्हणण्याऐवजी तो माणूस हरामखोर आहे असे म्हटले तर त्याची पातळी जास्त प्रकर्षाने लक्षात येते. पण शिवी हि सुक्या भेळेतील मिरची सारखी असावी. एखाद्या घासात लागली तर लज्जत वाढवते पण प्रत्येक घासात लागली तर तोंडाला आग लागते.
बाकी डॉक्टर झाल्यावर जाणीवपूर्वक भाषेतून शिव्या काढून टाकल्या. कारण न जाणो चुकीच्या ठिकाणी तोंडातून निघून गेली तर अनर्थ होऊ शकतो. आणि इतक्या वर्षात तसे त्यावाचून फारसे अडले नाही असेही वाटते.
आमच्या चंद्रपूर-नागपूर कडे का-बे, साल्या पासूनच वाक्याची सुरुवात होते . आईचा घो वैगेरे इकडे नाही . पण शिव्या भरपूर आहेत आणि नवीन शिव्या कल्पनाशक्ती लढवून तयार कराव्या लागतात . बाकी हा लेख मस्तच !!!
+१००
'वाक्याच्या सुरुवाती'वरून कॉलेजमधल्या एका मित्राची आठवण झाली. तो भेटला की हाय-बाय बोलणार नाही, 'आ भेन**' अशीच सुरुवात करेल. एकदा सहामाही परिक्षेचा निकाल लागला आणि मार्कशीट्स घेण्यासाठी 'पालकांना बरोबर घेऊन या' अशी कॉलेजने सक्ती केली. मी जिना चढत असताना हाच मित्र त्याच्या आईबरोबर जिना उतरत होता आणि मी 'क्या हुआ?' असं विचारल्यावर 'पास भेन**' असं मोठ्ठ्याने म्हणाला. मी गार झालो आणि त्याच्या आईची रिअॅक्शन न बघताच तिथून धूम ठोकली.
एका वाक्यात निदान ५ भे*** असायचे. आमच्या कॉलेजच्या मालकाच्या पोराला शाळेत पोरांनी तो "माझ्या बापाची शाळा" म्हणून सारखा माज करायचा म्हणून एकदा बेदम चोपल. ही हकिकत या मित्राने अशी सांहितली.
"अरे भे***, काय नाय भे***. तो ***** होता ना भे***, तो शाळेत असताना बापाची शाळा बापाची शाळा म्हणून जाम उडायचा भे***. पोरांनी ऐक ऐक ऐकला, आणि एक दिवस असा धुतला ना त्याला भे***, की तो चड्डीत मु*** भे***"
त्या प्रसंगापेक्षा मित्राच्या सांगण्याच तर्हेमुळे आम्ही हसून हसून ठार.
एक शंका आहे - शिंच्या म्हणजे नक्की 'कोणा'च्या? किंवा 'कशा'च्या?)
"शिंच्या" म्हणजे "शिंदळीच्या" या शिवीचं लघुरूप आहे. "शिंदळकी करणे" म्हणजे व्यभिचार करणे. त्यातून झालेली संतती म्हणजे "शिंदळीचा" म्हणजे "शिंचा".
.
माझं शिक्षण कटारिया प्रशाला नावाच्या एका महान शाळेत झालं. "शिव्या" या विषयाला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवणारे लोक शाळेत होते. माध्यम इंग्रजी, मराठी संस्थेने चालवलेली - त्यामुळे लोकांना शिव्यांमध्ये (किमान) द्वैभाषिक हुकूमत असे. एकशब्दी शिव्यांपासून "अच्चीत गच्ची..."ने सुरू होऊन साधारण तीन मिनिटे अखंड चालणार्या एकाच शिवीपर्यंत अनेक प्रकार होते. लघुरूपी शिव्याही असायच्या - उदा. बी.पी.एल. (याचा फुलफॉर्म मी अर्थातच इथे टंकू शकत नाही.) नववीत आमच्या वर्गात "बबन टाईम्स" नावाचे हस्तलिखित मासिक निघे (फॉर प्रायवेट सर्क्युलेशन ऑन्ली) - त्यात एक सदर फक्त नवशिव्यांना वाहिलेले असे.
आजही शिव्यांची एक लढाई आठवून जबरदस्त हसू कोसळतं. मधल्या सुट्टीत आम्ही क्रिकेट खेळत होतो. लानदे (हा बोबडा होता) मिडविकेटला फील्डिंग करत होता. बगावत (भागवत) नावाचा शिवी-तज्ज्ञाच्या बॉलिंगवर एक कॅच उंच उडाला आणि लानदेच्या दिशेने गेला. लानदेचं लक्ष कुठे होतं काय माहीत, त्याने कॅच (कटारियाच्या खास भाषेत) "गाळला" (किंवा "लानदे पोकला"). बगावत संतापाने हिरवा-निळा झाला आणि त्याने लानदेला भूतो न भविष्यति शिव्या द्यायला सुरुवात केली. (अशा वेळी खेळ अर्थातच थांबत असे, कारण शिव्यागाळी हा क्रिकेटचा अविभाज्य भाग होता.) एरवी दुसर्या बाजूनेही सामना रंगत असे, पण आमचा लानदे फारच मऊ माणूस. बगावतने त्याला अक्षरशः फायरिंग स्क्वॉड समोर उभं केलं होतं. आता लानदे काय उत्तर देणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली. लानदेचा चेहेरा शिवीगणिक कासावीस होत होता. आत काहीतरी साठून येतं आहे आणि आता बाहेर पडणार असं वाटायला लागलं. इतिहास में पहली बार लानदेकडून शिवी ऐकायला मिळणार की काय, असं वाटून सगळे लानदेपाशी गोळा झाले. लानदे लाल लाल. दमून बगावत थांबला. आता लानदेने पवित्रा घेतला. सगळ्यांनी श्वास रोखले, जिवाचे कान झाले. "ए बावलत..." लानदे बगावतला म्हणाला. सगळे प्रेक्षक हसून हसून लोळायला लागले!
जेव्हा मित्रांच्या आठवणी नॉस्टेल्जिक करतात तेव्हा हमखास वाक्यावाक्याला प्रेमळ शिव्या घालत बोलायचे दिवस आठवतात आणि तेच जास्त मिस करायला होते सध्याच्या या नोकरीधंद्याच्या जागी.. इथे कितीही चांगले गट्टी जमली एखाद्याशी तरी त्या मैत्रीत शिव्या नॉट अलाऊड असा अलिखित नियमच असतो.. मग कधीतरी जुन्या मित्रांचा कट्टा भरतो तेव्हा आतवर साचलेल्या सार्या शिव्या बाहेर पडतात तेव्हा कुठेतरी हलके हलके वाटते..
शिव्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत असे माझे मत आहे. पण देताना समोर किती "भारी" माणुस आहे ते पाहुन दिलेल्या बर्या.नाहीतर नसते संकट ओढवायचे. यासाठी प्रत्येक कॅटेगिरीमध्ये २-३ शिव्या तयार ठेवाव्यात..म्हणजे लुंगासुंगा असल्यास, जरा ताकदवान असल्यास किवा तगडा असल्यास वेगवेगळ्या
शिवाय मध्यमर्गीय सोसायटीतले भांडण असल्यास,रस्त्यावरचे ट्रॅफिकमधले,ट्रेनच्या १ल्या आणि २ र्या वर्गातले,बसमधले ,विमानात किंवा एअरपोर्ट्वर झाल्यास....बाकी पुस्तक कोणते म्हणालात ते??:)
बापूस, सांगा कुणाचा
बापूस, तुझ्या आईचा...(पॉज)
आई सांगा कुणाची
मेल्या तुझ्या अवशीचा ..घो
आई तुझ्या बापाची
येक गाणं शिवालयातलं. मच्छिंद्र कांबळींच्या नाटकातलं, अटलबिहारी वाजपेयी गाताहेत असं समजून वाचावं
कोकणात सिंधुदुर्गात मायझ* हि शिवी सर्रास वापरली जाते. कधी कधी तर तीर्थरूप आपल्या पाल्यास रागाने या शिवीने संबोधतात.
अत्रेंचा एक किस्सा - खरा कोटा देव जाणे.
अत्रे एकदा एका सभेला संबोधत असताना सारखे एका बाईंकडे बघत होते. हे जेव्हा अति झाले तेव्हा त्या बाई अत्र्यांना म्हणाल्या "काय हो अत्रे माघा पासून बघतेय तुम्ही सारखे माझ्याकडे बघताय. माझ्या भागात मला सर्व आइ म्हणून संबोधतात.
अत्रे म्हणाले मला माझ्या भागात आयझ*डा म्हणून संबोधतात.
शिव्यांचा विषय आहे म्हणून सांगितला. संपादक मंडळी आक्षेप घेणार नाहीत अशी अशा करतो.
बाकी या अत्र्यांचा सगळा माज पु भा भावे नामक एका नागपूरकराने यथास्थित उतरवला ही स्टोरी माहिती असेलच. उरलेला महाराष्ट्र त्यांना दबून असला तरी या एका प्रसंगात मात्र अत्र्यांची मात्रा वट्ट चालली नाही.
================================================
त्याचे असे झाले, एकदा अत्र्यांनी सावरकरांवर काही टीका केली. अत्रेस्टाईलने जरा लागट बोलले, तरी सावरकर असल्याने जरा जपूनच बोलले. सावरकरांना १९४१ च्या सुमारास एक शीख अंगरक्षक बरोबर दिला होता, तर त्याला उद्देशून म्हणाले की १९०८ साली मार्सेलिसच्या बंदरात उडी मारणार्या सिंहाला आता अंगरक्षक लागावा? इ.इ.
पु भा भाव्यांची सटकली. ते कट्टर सावरकरभक्त. नागपूरहून निघणार्या 'आदेश' नामक अतिशय चिंधी, खूप कमी सर्क्युलेशन असणार्या एका साप्ताहिकात अत्र्यांवरती बिलो द बेल्ट कमेंटी करणारे, अर्थातच अत्रेशैलीतले लेखन येऊ लागले. अत्रे इतके चिडले की त्यांनी 'आदेश' वर अबूनुकसानीचा खटला दाखल केला. आणि चक्क हरले देखील =))
हा समग्र किस्सा 'आदेश विरुद्ध अत्रे' नामक एका छोट्याशा पुस्तकात दिलेला आहे. खतरनाक किस्से आहेत. त्यातल्या लेखनशैलीचा एकच मासला देतो.
(सावरकर = अर्जुन आणि अत्रे = उत्तर असे अभिप्रेत आहे.)
"अरे काचघराच्या रहिवाशा, कुणावर दगडफेक करतोस? कुठे तो कुंतीपुत्र अर्जुन आणि कुठे तो विराटपुत्र उत्तर? रणभूमी हे एकाचे वांछित शय्यास्थान, तर शय्यास्थान ही दुसर्याची वांछित रणभूमी!"
ब्बाहौ …. कसल्या रसरशीत शिव्यांचा पाढा वाचलाय राव तुम्ही… अगदी मिसळीवरल्या डबल जाळ तर्रीची आठवन झाली ना …
शिवीमुळे भाषेला नसर्गिक जोर आणि वजन येते. आणि २ ते ४ वाक्याचे सार एक शिवीत हि मावते. रागात असताना एखादी कचकचित शिवी दिली की
जिवाला पण आरम मिळतो आणि समोरच्यालाही नेमके काय ते उमगते.
प्रतिक्रिया
खरय
मी खुपच कमी शिव्या दिल्या
+१
शिव्या आणि स्कारपियो
असे म्हणा.
@ कपिलमुनी आणि पेठकर काका,
माज आणि मस्तवालपणा....
बाणा सांभाळ रे. हल्ली दुचाकी
मला जर एका दिवसाचा हुकुमशहा
अगा बाब्बौ
तु त्याला उगाच तसचं सोडुन
पुण्यात आलेले दिसतात
जर्मन वर्मन धाग्यातला यशो आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadoफिश म्हणायचे ;)
+१
*** ** ,लै भारी लेख आहे राव.
शिवी म्हणजे...
ही केवळ पोच.
भें**...मस्तच
साहीत्य संमेलनाच्या
चुकून कधी सासं चा अध्यक्ष
च्यायला, काय जबराट लेख आहे.
लोकसाहित्य शोध आणि समीक्षा
मराठी साहित्यातील असभ्य म्हणी
अत्यंत प्रसंगनिष्ठ लेखन!
लेखात किती तरी अश्लील शब्द
प्रेसेन्तिन्ग- Osho
>>>शिव्या ह्या सर्वव्यापक
लिखाण आवडले
मस्त लिखाण
शिवीने भाषेला जोर येतो
सहमत.
काबे साल्या
कडे का-बे, साल्या पासूनच
असाच आमचा एक मित्र.
एक शंका आहे - शिंच्या म्हणजे
___/\___
हायला शिंच्याचा अर्थ असा आहे,
जबराट लेख. मस्त पञ्चेस घेतले
जबरा लेख आणि
जेव्हा मित्रांच्या आठवणी
शिव्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत
बापूस, सांगा कुणाचा
कोकणात सिंधुदुर्गात मायझ* हि
अवांतर
मस्त किस्सा सांगितला
अत्रे
ब्बाहौ …. कसल्या रसरशीत
एवरी आगावू एक्शन देअर इज शिवीने रिअकशन ….
कॉलेजातले दिवस आठवले. हल्ली
Pagination