Welcome to misalpav.com
लेखक: प्रमोद देर्देकर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आहेत ना... आमच्या कंपनीच्या मालकांचे आडनाव भुते च आहे... अविनाश भुते, नितिन भुते.. त्यांच्या घरात सगळीच भुते आहेत

एकदा दोन भुते गप्पा मारत असतात. पहिले भूतः काय रे या जगात माणसे असतील का? दुसरे भूतः छे रे काहीतरी अंधश्रध्दा :)

अगदी अश्याच प्रकारे ऐकलेला एक विनोदः अमावस्येच्या काळ्य्याकुट्ट रात्री गावकुसाबाहेरच्या पडक्या वाड्याच्या अंधार्‍या खोलीतल्या एका गंजक्या तुळईवर दोन भुते उलटी लटकत असतात. त्यातले एक भूत कमालीचे घाबरलेले आहे हे अगदी कमालीच्या घाबरलेल्या जिवंत माणसालाही कळत असते. त्यातले दुसरे भूत त्या घाबरलेल्या भूताला समजावत असते "घाबरु नकोस रे बाबा. हे सगळे मनाचे खेळ असतात. घाबरट भूतांनी पसरवलेल्या अफवा बाकी काही नाहे. हे "रजनीकांत" वगैरे असले काही प्रकार नसतात " :)

आमच्या शेजारच्या गावात एक ग्रुहस्थ होते. क्षणात चांगला, क्षणात वेडसर होणारा तो इसम. भर मध्यरात्री जंगलातून गाणी म्हणत जायचे. गावतले लोक म्हणायचे की त्यांना झपाटलय, पण कुठे, कसे हे माहीत नाही. तो माणून वय ५५-५७ ते ७५ अश्या प्रकारे फिरत होता. मागच्या वर्षी चौकशी केली तर कळले की ते आता बरे आहेत. कसे ते विचारल्यावर कळले की त्यांना कोणालातरी दाखवले होते, त्यांनी सांगितले, के तुमच्या घराजवळ एक पिंपळ आहे, त्याची या माणसाने काहीतरी खोडी काढली आहे. थोडी चौकशी करता कळले की यांनी त्या पिंपळाच्या पारावर एक दिवस रात्री मोठी आग घातली होती, आणि साधारण तेव्हपासूनच हे वेड सुरु झाले आहे. त्यांच्या मुलाने पिंपळाला नैवेद्य ठेवला, प्रार्थना केली, आणि हे पूर्ण बरे झाले.