दिसते तेच खरे हे नाही खरे. ऐकू येते तेवढेच ध्ननित हेही नाही खरे. पण या सगळ्याचे अस्तित्व काही इतर सामग्रीच्या
साह्याने किती तरी प्रमाणात व्यक्ति निरपेक्ष करता येते. उदा.एखाद्या लॅबमधे सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे ( एरवी डोळा ज्याला
नाकारतो) असे अस्तित्व अनेकाना अनुभवायला देता येते. असे काही भूते , देव यांच्या बाबतीत उपकरण आहे काय? नसेल तर एखाद्याला आलेला अनुभव खरा असला तरी तो त्याला झालेला एक भ्रम आहे असेही म्हणता येते.
यू कॅन फूल वन फॉर एव्हर बट नॉट ऑल फॉर एव्हर !
'दिसते तेच खरे' म्हणताना 'शरीराच्या इंद्रियांना जोडून जी यंत्र व्यवस्था उपयोगात आणली जाते त्यातून जे सर्वांना दिसते वा अनुभवाला येते' असे लेखकाला अभिप्रेत असेल म्हणून संबोधले गेले असेल तर?
परीक्षणात लेखकांच्या विचारांचा रोख काय याची सामान्य माहिती करून देण्याचा उद्देश असतो. इतकेच ..गळतगे सरांचा समग्र ग्रंथ वाचून आपल्या शंकांचे समाधान होईल ...
ग्रंथ मुळातून वाचायला हवा. ही सारी सृष्टी भ्रमच आहे आणि अज्ञानाच्या पडद्याने त्याचे सत्य स्वरुप कळत नाही हे तर सार्याच संतांचे सांगणे आहे. किंबहुना वेद ही तेच सांगतात. सत्य स्वरुपाचे ओळख हाच मोक्ष आणि तीच मानवी जीवनाची इतिकर्त्व्यता होय.
मागल्या जन्मी केलेल्या 'कर्माला' (प्रयत्नांना) या जन्मात 'दैव' म्हणतात म्हणून प्रयत्न केल्याशिवाय 'दैव' कधीच सिद्ध होत नाही कर्म एकच, एका बाजूने त्याला 'प्रयत्न' म्हणतात, तर दुसऱ्याबाजूने 'दैव'! हे या ग्रंथात मार्मिकपणे सांगितले आहे. पुनर्जन्मसिंद्धांतामुळे प्रयत्न व दैववाद हा खोटा ठरतो.
मी यावर लगेच काही भाष्य करत नाही पण समर्थांचे सांगणे असे की , अगोदर प्रयत्न , दैव नंतर ! नेमक्या ओव्या आता आठवत नाहीत . त्याचबरोबर गीतेतील कर्मानुसार बुद्धी आणि बुद्धीनुसार कर्म या दोन संकल्पना नीट समजवून घ्यायला हव्यात !
बाकी अंधश्रद्धेबद्दल सर्वच संतानी प्रहार केले आहेत. समर्थांचा भ्रम निरुपण ( दशक १० समास ६ ) समास मूळातूनच वाचण्यासारखा आहे.
दुश्चिन्हें अथवा अपशकुन| मिथ्या वार्तेनें भंगे मन |वचके पदार्थ देखोन| या नांव भ्रम ||२०||
वृक्ष काष्ठ देखिलें| मनांत वाटें भूत आलें |कांहींच नस्तां हडबडिलें| या नांव भ्रम २१||
काच देखोन उदकांत पडे| कां सभा देखोन दर्पणीं पवाडे |द्वार चुकोन भलतीकडें जाणें या नांव भ्रम ||२२||
येक अस्तां येक वाटे| येक सांगतां येक निवटे |येक दिसतां येक उठे| या नांव भ्रम ||२३||
आतां जें जें देइजेतें| तें तें पुढें पाविजेतें |मेलें माणुस भोजना येतें| या नांव भ्रम ||२४||
ये जन्मींचें पुढिले जन्मीं| कांहीं येक पावेन मी |प्रीतीगुंतली मनुष्याचे नामीं| या नांव भ्रम ||२५||
मेलें मनुष्य स्वप्ना आलें| तेणें कांहीं मागितलें |मनीं अखंड बैसलें| यानांव भ्रम ||२६||
अगोदर प्रयत्न , दैव नंतर ! हे मान्य. कारण आमच्या मते Luck in nothing else but a resultant of all other factors not controlled by you. and action is a resultant of factors controlled essentially by you.
बाकी सारी सृष्टी भ्रम आहे या निष्कषाप्रति आता शास्त्रज्ञ देखील आले आहेत. वाचा 'विज्ञानातील क्रांत्या' लेखक डॉ.वसंत चिपळोणकर. एकाच भ्रमाचे उदाहरण देतो. अवकाश अनंत व सर्व बाजूनी अनंत असेल तर पूर्व पश्चिम वर खाली अशा दिशा
हा एक भ्रम आहे.व त्याचा पाया म्हणून स्वीकारलेले वस्तू शास्त्र ही.
माझे म्हणणे , प्रयत्नच दैवापेक्षा श्रेष्ठ आहेत.
जीवसृष्टी जाली उत्पत्ती संहार |प्रारब्ध व्यवहार ऐलिकडे ||८९||
ऐलिकडे कर्म मूळीचा तो प्रयत्न |श्रोती सावधान विवरावे ||९०||
विवरावे आधी प्रेत्न की प्रारब्ध्|शास्त्रांतरी भेद ऐसा आहे ||९१||
आहे निराकार निर्मळ निश्चळ |तेथून चंचळ प्रेत्न जाला ||९२||
प्रेत्न जाला आधी म्हणोनिया थोर |प्रारब्ध विचार ऐलिकडे ||९३||
- समर्थ रामदास , ओवीशतक १२ वे.
योगवासिष्ठाच्या पहिल्या खंडात वसिष्ठ ऋषी फ्रस्ट झालेल्या तरण्या रामाला असेच सांगतात. प्रारब्ध वैग्रे पिछले जनम का खेल है, या जन्मात ते कसेही असले तरी वाढणार नै की कमी होणार नै. सबब आपल्या प्रयत्नांनी या जन्मात आपण त्यावर मात करू शकतो.
हे वाचलं आणि जी ट्यूबलाईट पेटली म्हणता!! मजा आ गया. अंगभूत आळस कितीही झोपवत असला तरी एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद या शिकवणीत आहे. मान गये _/\_
आम्ही आमचे म्हणणे पुरेश्या स्प्ष्ट्पणे सांगितले आहे. प्रयत्न हेच अगोदर आणि प्रारब्ध / दैव / नशीब / प्राक्तन / संचित हे सग्ळ स्ग्ळ नंतर आणि स्प्ष्ट्च सांगायचे तर गौण ही ! वरती समर्थ काय म्हणतात हे सांगितले आहेच आता कुसुमाग्रज काय म्हणतात पहा:
ग्रहांचे साह्य शूराला , यशश्री पायची दासी ,,.. !
मागे एकदा म्हट्ल्याप्रमाणे .. बुद्धीनुसार कर्म आणि कर्मानुसार बुद्धी हे एकदा जमल्यास समजावून घ्या.
गळतगे सर प्रयत्न व दैव या दोन बाजू आहेत. असे म्हणतात. आपण प्रयत्न आधी, नंतर दैव अशी जोडणी करू शकता. पुर्व(जन्मातील) प्रयत्न - दैव - व सध्याच्या(जन्मातील)प्रयत्न यात सध्याच्या जन्मातील प्रयत्न जास्त प्रभावशाली असले पाहिजेत असा विचार आपला असल्याचे दिसते. मला मान्य आहे. मात्र आपण ग्रंथ वाचून पहायला काय हरकत आहे?
मित्रा, आपण गळतगे सरांच्या ग्रंथ परिचयावरून संपुर्ण ग्रंथ वाचून पहायला हवा म्हणून प्रतिसाद दिला होता. आपल्या वाचनानंतर आपल्या विचारांना पुरक सरांची विचारसरणी वाटली काय विचारावेसे वाटले म्हणून हा प्रतिसाद...
इतकी प्रचंड आहे की वरील विचारकांचे प्रतिसाद त्यांच्या जागी ठीक वाटले तरी गळतग्यांच्या लेखनाच्या विचार प्रवाहात पूर्वग्रह बाजूला ठेवून मनसोक्त विहार करून मग आपल्या आवडत्या मतांतील/ त्यांच्या विचारातील त्रुटी व असहमति जरूर मांडाव्यात ही विनंती.
त्या दहा एक अब्ज लोकांच्या नाड्या (तेच ते नाडीपट्ट्या..आकाश लेखनाच्या सत्यतेचा तो निर्णायक वैज्ञानिक पुरावा)कुठे ठेवल्या आहेत याचा काही खुलासा केला आहे काय या पुस्तकात? अन्यथा त्याला पाच रूपये किलो पेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची खात्री बाळगा.
खुलाश्याची अपेक्षा नाही. तो होत नसतो हा पूर्वानुभव
काय अनुभव आहे? डीटेलवारी सांगा की ओ जरा.
अन त्या तमिऴ लिपीचा इतका बाऊ करतात हे नाडीवाले, भेंडी काय एलियन लिपी आहे का आँ? तमिऴ कळणे जरा अवघड असले तरी लिपी कळणे एकदम चिंधी प्रकार आहे. रेग्युलर तमिऴ काय नि ग्रंथ तमिऴ काय एकदम सुतागत साध्या सरळ लिप्या आहेत. किमान त्यावर नाव खरेच लिहिले आहे की नाही एवढे चेक करणे लै सोपे आहे. तेवढी ट्रान्स्परन्सी असेल तर ठीक, पण पैसे काढायचा धंदा असल्याने नाडीवाले गप्प बसतात.
ओक काकांनी आधीच दिलेली असल्याचे त्यांचे पूर्व लेखन चाळता लक्षात आले.
मी तदन्य नाही, वकील नाही, तुमच्या इतका हुशार नाही नाडिप्रसाराचे कार्यही हाती नाही. म्हणून मी माज़ा अनुभव व्यक्त केला यापलिकडे मीआपणास काय लिहावे मला समजत नाही
ते लेखन चाळले आहे तरी त्यातून प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. असो, त्या नाडीला हात घालायची इच्छा नाही इथे तरी किमान.
मी तदन्य नाही, वकील नाही, तुमच्या इतका हुशार नाही नाडिप्रसाराचे कार्यही हाती नाही. म्हणून मी माज़ा अनुभव व्यक्त केला यापलिकडे मीआपणास काय लिहावे मला समजत नाही
अर्थातच. बाकी तुम्हीच काय, अन्य कोणीही माझ्याइतके हुशार नाही अन कधी होणारही नाही.
.
.
.
.
.
.
एक तर माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त हुशार असतील नैतर माझ्यापेक्षा मठ्ठ तरी असतील. पण नेमके माझ्याइतके हुशार आजवर कोणी झालेले नाही आणि कधी होणारही नाही ;)
आपण समोर केलेल्या नेमक्या प्रश्नांची उत्त्तरे त्यात सोदा रहन दिली आहे.
बाकी आपल्या बुध्दिमत्ते वरील आपण दिलेले विवेचन फार रोचक आहे. पण ते इतरांचे मत आहे का आपण स्वत:च स्वत:ला असे मानता ?
एक तर माझ्यापेक्षा जास्त हुशार असतील नैतर माझ्यापेक्षा मठ्ठ तरी असतील. पण नेमके माझ्याइतके हुशार आजवर कोणी झालेले नाही आणि कधी होणारही नाही
हे स्पष्टीकरण वाचले की सगळ्याचा उलगडा होईल. :) हे मत कोणी अमान्य करेल असे वाटत नाही. अन हे मत मलाच नव्हे, तुम्हालाही किंबहुना सगळ्यांना तितकेच लागू पडते.
मी मात्र मला तुमच्या इतपत हुशार मानत नाही त्यामुले शंका समाधान शक्य नाही. परंतु ओकांचे समग्र लिखाण वाचले तर सदरिल प्रश्न कर्ते आपण पहिलेच न्हवे यासोबतच आपल्या प्रश्नांची उत्त्तरेहि स्पष्ट होतील. तथापी आधीच उत्तरे दिलेल्या जुन्या प्रश्नांना वर आणून आपण त्यांच्या सारख्या निर्मळ व्यक्तिम्त्वास स्तावू नये ही आपल्याला हात जोडून विनंती आहे _/\_
संपूर्ण वाचले .. शेवट पर्यंत..
समूळ ग्रंथ पाहिल्यवीण | उगाच देई दूषण .. तो एक पढतमूर्ख हे आम्हाला माहीत आहे..
हिथ तुम्चा कोन फ्लेक्स बनवाय्लेय ? असं काय कर्तुयास मर्दा..
ते क्याप्शन लै भारी हाय आनि हिथ लै तालेवार मान्स हायत , तेंचा फ्लेक्स या क्यापशन चा बनयायला पाय्जेल..
आपुन नावान्ची यादी करायला घ्या....
तसेच इच्चुकांनी सम्परक करावा.
बॅटमन आणि अन्य मित्रांनो,
तमिळ भाषेच्या संबंधित आपले विचार वाचले. आपणांस तमिळमधून केलेले लेखन वाचायला व लिहायला येत असेल तर आपल्या सारख्या व्यक्तिची आम्हाला गरज आहे. आपल्या सहकार्याने मिपावरील सदस्यांना नाडी ग्रंथ ताडपत्रावरील लेखनावर प्रकाश टाकायला मदत मिळेल. 'आपल्या सारख्या फक्त आपणच' व्यक्तीने माझी विनंती झिडकारणार नाही अशी अपेक्षा करतो.
जर एखाद्या नाडीपट्टीचा पुरेसा स्पष्ट असा स्कॅन्ड फोटो मिळत असेल तर वाचायचा काही प्रयत्न करता येईल. मला माहिती असलेल्या तमिऴ जाणकारांना दाखवून खातरजमा करता येईल. यासाठी कुठलाही खर्च करायची अर्थातच इच्छा नाही.
तमिऴ कळणे जरा अवघड असले तरी लिपी कळणे एकदम चिंधी प्रकार आहे. रेग्युलर तमिऴ काय नि ग्रंथ तमिऴ काय एकदम सुतागत साध्या सरळ लिप्या आहेत. किमान त्यावर नाव खरेच लिहिले आहे की नाही एवढे चेक करणे लै सोपे आहे.
नाडी पट्टीतील नावाचा मजकूर शोधायच्या बाबत आपली प्रगती कुठवर आली आहे? मी काही मदत करू शकतो काय?
सध्याच्या तमिळ लिपीमध्ये ताडपत्रावरील लेखन एका वहीत लिहून मिळते.(ते तसे खरेच असते का? याचा ही शोध नंतर तुम्हाला घेता येईल.) तुम्हाला मान्य असेल तर वहीतील लिहिलेले वाचायला सोपे म्हणून सुरुवात करता येईल. तमिळ भाषेचे व काव्याच्या अंगाने अभ्यासक असाल तर फार उत्तम. कामचलाऊ तमिळ येत असेल तर तसे सांगा. इतरांकडून वाचायला देऊन शोधकार्य करणाऱ्यांचा उत्साह लगेच संपतो असा अनुभव येतो. ज्यांचा नाडी ग्रंथात काहीच तमिळमधे लेखन केलेले नसते. आपल्याकडून माहिती काढून तीच नाडी पट्टीतून येत आभास तयार केला जातो असा 'दावा' नाडी ग्रंथांचा अनुभव न घेता, तमिळ भाषेच्या लेखनाचा अभ्यास न करता केला जातो. तो बरोबर आहे याची खात्री करून दिली जाईल इतकेच... पण चिकाटीने हे काम करायला आपण हो म्हणून तयार आहात असे मानावे काय? तसे असेल तर पुढे विचार करता येईल. अन्यथा जमणार नाही असे सुरवातीला म्हणालात तरी मला वाईट वाटणार नाही. कारण असेच अनुभव आत्ता पर्यंत आलेत. तुमच्या सारखे तुम्हीच आहात म्हणून प्रस्ताव मांडला. आपण पुण्याचे असाल तर प्रत्यक्ष भेटता येईल. मान्य असल्याचे कळवावे ही विनंती.
तमिऴ लिपी वाचायला अडचण नाही. भाषेचे म्हणाल तर अंमळ कामचलाऊ ज्ञान आहे. काही अडले तर सांगणारे मित्र आहेत अन पुस्तकेही आहेत.
पण इथे एक मेख दिसते. मला नाडीपट्टीतला ओरिजिनल मजकूर पहायचा आहे. त्यातले लिहिलेले तमिळ काय मराठीत लिहिले तरी फायदा नाही. ती हस्तलिखित नाडीपट्टी समोर पाहिजे तर आणि तरच काही बोलता येईल. त्या हस्तलिखिताचा फोटो पाहिजे. तो फोटो घेऊन मग तुमचा जो काही तर्जुमा असेल तो त्याच्याशी ताडून पाहता आला पाहिजे.
मला जर पट्टी प्रत्यक्ष पाहता येत नसेल तर चर्चा फिजूल आहे.
आणि अर्थातच, मला माझे भविष्य पाहण्याची इच्छा नाही. सबब तुम्ही तुमच्या संग्रहातला एखादा फोटो पाठवला तरी चालेल. त्यासोबत तर्जुमा जोडून पाठवला तर अजून उत्तम.
मित्रा,
नाडीग्रंथ ताडपत्राचा फोटो सादर केला आहे. आता आपणाकडून काय प्रगती आहे कळवावे. आपणास मजकुर वाचायला जमला असेल नाही तर, किंवा अडले तर तमिळजाणकार मित्रांकडून व तमिळभाषेच्या पुस्तकावरून त्यातील तमिळ लेखनाचा अभ्यास करून त्यातील मजकूर आपण मिपावर सादर करणार आहात अशी अपेक्षा करत आहे.
तसे न झाल्यास प्राचार्य गळतगे यांचे म्हणणे - जे लोक ही (पुरावे तपासण्याची) आवश्यकता उघडपणे मान्य करतात पण प्रत्यक्षात ती तपासणी न करताच ... (विज्ञान आणि चमत्कार) - आपल्याला मान्य आहे असा निष्कर्ष मिपाकरांनी काढावा काय
थोडक्यात आपले तमिळ कामचलाऊ आहे म्हणजे हे काम तिऱ्हाईतांकरवी करणार असे दिसते. मी पट्टी चा फोटो दिला की तुम्ही कुवतीप्रमाणे तो त्या लोकांकडे देऊन वाचवून घेणार. त्या नंतर 'बस झाले शोध कार्य ' असे मला म्हणणार असे दिसते. कारण डॉ. जयंत नारळीकरांसारख्या मान्यवरानी त्यांच्या माहितीच्या तमिळ लोकांना पट्टीतून नाव वाचता आले नाही म्हणून पत्राने कळवून शोध कार्य संपवले. तसे तुमच्या तमिळाला वाचता आलेले नाही ही सबब तुम्ही पुढे करून नाडीग्रंथांना खोटे ठरवले असे तुम्ही करणारे नसावेत अशी अपेक्षा करतो. कारण हे काम हाती घेतले की एकामागे एक वाढत जाते असा अनुभव आहे. म्हणून एका वहीत लिहून मिळते.(ते तसे खरेच असते का? याचा ही शोध नंतर तुम्हाला घेता येईल.) तुम्हाला मान्य असेल तर वहीतील लिहिलेले वाचून सुरवात करता येईल. आपल्या कडून माहिती काढून तीच नाडी पट्टीतून येत आभास तयार केला जातो असा 'दावा' नाडी ग्रंथांचा अनुभव न घेता, तमिळ भाषेचा, लेखनाचा अभ्यास न करता केला जातो. तो बरोबर आहे की चूक याची खात्री करून दिली जाईल पर्यंत तुमच्या तमिळ मित्रांच्या चिकाटीने मागे लागून हे काम करायला आपण हो म्हणून तयार आहात असे मानावे काय? तसे असेल तर पुढे विचार करता येईल. अन्यथा जमणार नाही असे सुरवातीला म्हणालात तरी मला वाईट वाटणार नाही. हे सर्व शोधकार्य करायचे मान्य असल्याचे कळवावे . फोटो लगेच चढवता येईल . म्हणून पुन्हा ही विनंती.
प्रतिक्रिया
दिसते तेच खरे हे नाही खरे
दिसते तेच खरे
चांगला परिचय
मागल्या जन्मी केलेल्या 'कर्माला' (प्रयत्नांना) या जन्मात 'दैव' म्हणतात म्हणून प्रयत्न केल्याशिवाय 'दैव' कधीच सिद्ध होत नाही कर्म एकच, एका बाजूने त्याला 'प्रयत्न' म्हणतात, तर दुसऱ्याबाजूने 'दैव'! हे या ग्रंथात मार्मिकपणे सांगितले आहे. पुनर्जन्मसिंद्धांतामुळे प्रयत्न व दैववाद हा खोटा ठरतो.मी यावर लगेच काही भाष्य करत नाही पण समर्थांचे सांगणे असे की , अगोदर प्रयत्न , दैव नंतर ! नेमक्या ओव्या आता आठवत नाहीत . त्याचबरोबर गीतेतील कर्मानुसार बुद्धी आणि बुद्धीनुसार कर्म या दोन संकल्पना नीट समजवून घ्यायला हव्यात ! बाकी अंधश्रद्धेबद्दल सर्वच संतानी प्रहार केले आहेत. समर्थांचा भ्रम निरुपण ( दशक १० समास ६ ) समास मूळातूनच वाचण्यासारखा आहे. दुश्चिन्हें अथवा अपशकुन| मिथ्या वार्तेनें भंगे मन |वचके पदार्थ देखोन| या नांव भ्रम ||२०|| वृक्ष काष्ठ देखिलें| मनांत वाटें भूत आलें |कांहींच नस्तां हडबडिलें| या नांव भ्रम २१|| काच देखोन उदकांत पडे| कां सभा देखोन दर्पणीं पवाडे |द्वार चुकोन भलतीकडें जाणें या नांव भ्रम ||२२|| येक अस्तां येक वाटे| येक सांगतां येक निवटे |येक दिसतां येक उठे| या नांव भ्रम ||२३|| आतां जें जें देइजेतें| तें तें पुढें पाविजेतें |मेलें माणुस भोजना येतें| या नांव भ्रम ||२४|| ये जन्मींचें पुढिले जन्मीं| कांहीं येक पावेन मी |प्रीतीगुंतली मनुष्याचे नामीं| या नांव भ्रम ||२५|| मेलें मनुष्य स्वप्ना आलें| तेणें कांहीं मागितलें |मनीं अखंड बैसलें| यानांव भ्रम ||२६||मान्य !
वास्तू शास्त्र !
पूर्व पश्चिम वर खाली अशा दिशा या पृथ्वीसापेक्ष आहेत.
प्रयत्न आणि दैव
नाही ...
अग्गदी हेच्च्च्च्च म्हणायचे आहे.
प्रयत्न आणि दैव
ओक सर
प्रयत्न आणि दैव
अद्वयानंद गळतगे सरांचा विज्ञान आणि चमत्कार ग्रंथ....
विटेकरजी
बाकी नाडी पट्टीचा..
गोफ जन्मांतरीचे हे डॉ सुलभा
ग्रंथाची व्याप्ति
बर्याच दिवसांनी अवतरला आहात.
आपली फरमाईश बरोबर आहे.
हे राम! परत जिलब्यांचा रतीब सुरू होणार
काका नाडी ग्रंथ आश्चर्य कारक आहेत हे मला पटले आहे
काय अनुभव आहे? डीटेलवारी
या बेसिक प्रश्नांची उत्त्तरे
ओके.
त्यांचे लिखाण पुन्हा पुन्हा वाचा
त्यातले
नेमके तुमच्या इतकेच हुशार बरेच लोक आहेत पण
सुप्पर लाईक
अन्य कोणीही माझ्याइतके हुशार नाही अन कधी होणारही नाही.सुप्पर लाईक करण्यात आले आहे. यावर एक फ्लेक्स बनवावा काय ? होऊ दे खर्च !अहो खालचे स्पष्टीकरण तरी
वाचले हो ..
हाहाहा येस्सार!!! बनवू फलेक्स
तमिळ लिपीमध्ये अक्षरे वाचन चुटकीचा खेळ
ओक सर
तमिळ लिपी वाचन
ओक सर, वरचा प्रतिसाद कृपया
नाडी ग्रंथांच्या सत्यतेच्या तपासासाठीच...
हो तयार आहे. फक्त नक्की दावा
विचार कर रे बॅट्या
(No subject)
आपली प्रगती कुठवर आली आहे? मी काही मदत करू शकतो काय?
.............................
सध्याच्या तमिळ लिपीमध्ये लिहिलेले...
तमिऴ लिपी वाचायला अडचण नाही.
@मला जर पट्टी प्रत्यक्ष पाहता
तमिळ लेखनाचा मजकूर आपण मिपावर सादर करणार आहात
हे सर्व शोधकार्य करायला तयारी आहे?
हर्कत नाही. मागे लागायला तयार
वा वा छान छान
अरे वा
@ तो पालथा घातलेला घडाही नवीन
Pagination