Welcome to misalpav.com
लेखक: वडापाव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्त जमला आहे लेख. झक्कासच. शाळेच्या खुप आठवणी जाग्या झाल्या. आमच्या राजे मॅडम "च्यायला" असे काही झोकात म्हणायच्या आहे की ती शिवी आहे असे कधी वाटलेच नाही. शिकवायच्या देखील सुंदर. त्यांच्या आख्ख्या कारकीर्दीत गणित शिकवण्यासाठी त्यांना माझ्याएवढा माठ विद्यार्थी सापडला नसावा. ११-१२ वी तले नगरकर सर सुद्धा असेच लक्षात राहिलेत. शिकवायचे चांगलेच. पण मूळ लक्षात राहिले ते त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे. वर्गातल्या अटेंडन्स बद्दल ते नेहमी म्हणायचे "बसलात तर उत्तम, नाही बसलात तर अतिउत्तम" :). सुदैवाने मराठीच्या शिक्षिका नेहमी चांगल्याच होत्या. घोरपडे बाई, अवचट बाई, काळे बाई. चौथीत असताना एक मारकुटे दामले बाई होत्या. सगळ्यांना मारायच्या. "माझी शेवटची दोने वर्षे राहिली आहेत. त्यामुळे मी मुलांना मारणारच" असा काहीसा अजिबात युक्तिवाद होता त्यांचा. एकदा वर्गातला एक मुलगा एका विषयात नापास झाला तर इतर सगळ्यांना त्यांनी त्या मुलावर हसायला सांगितले. प्रचंड राग आला मला त्यांचा.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत काळ बदलला आहे हेच खरे, असे म्हणावेसे वाटते.
आपल्याला घडवण्यात आज कोणीही कितीही नाकारलं तरी त्यांचा मोठा वाटा असतोच... त्या सर्व शिक्षकांना माझा प्रणाम!!
ह्या ओळीच्या वरच्या ७५ ते ८० ओळींचा भार, ही ओळ पेलू शकत नाहीए असं जाणवलं

ओके ओके !! सरांच्या / मॅडमस च्या आठवणी भरपूर आहे ..मुळात कॉमर्स करताना लेक्चर्स कोण अटेन्ड करत ?? उत्तर असेल ' गरजच नाही " क्लास लावायचा अकाऊन्ट चा आणि बाकी सगळी रट्टेबाजी ..मी अकरावी पासुन नेस ला होतो .....५ वर्षे क्लास लावला नाही, त्याला कारण होत दंडवते सर !! विषय शिकवायचा हातखंडा असा होता की अकाउटसी सारखा किचकट विषय सोप्पा वाटायचा .. त्यांच एकही लेक्चर बुडविले नाही ...मीच काय कोणीच नाही बुडविले ....कुठला देव पावला होता काय माहीत मला ? फायनल ला कॉलेजमध्ये टॉपर होतो ...पुढे चालुन एफ.टी. च्या एन्टरन्स क्लियर करे पर्यंत ही वॉज विथ अस ......नगर रोड ला अपघातात गेले ...माझ्यासकट अर्ध नेस वाडिया होत अंत्य सस्काराला ...माणुस जगला उणीपुरी ४२ वर्षे ...पण लाईक अ किंग !! .... खुप मोठ्या प्रॉपर्टीचे मालक होते ...सध्या औ.बाद जी एम.आय. डि.सी. आहे , त्त्यातली ६० % जागा ह्यांची होती ...एकुलता एक मुलगा ..आयुष्यभर बसुन खाल्ल असते........खुप रिच माणुस ...पण पेशा म्हणुन शिक्षकी स्विकारलेली.....त्यांच्याकडे जावा होती ...मॉडिफाय केलेली ...त्या काळी हा माणुस बाईकवर दर आठवड्याला पुणे ते औ.बाद पर्यंत बईकवर जायचा.. ...कपड्यांपासुन ते शुज पर्यंत सगळ रिच असायचे ....त्यांनी कधी प्रायव्हेट क्लास सुरु केला नाही ...त्यांच ते वाक्य शेवटपर्यंत आठवणीत रहाणार ( अर्थात ते वाक्य आहे लिंकनच !, पण त्याचा अर्थ नीट त्यांनी सांगीतला होता. ).. If something goes wrong Have abilty to take action, and take responsibility to take action !!!

तु विद्यामंदीरकर आहेस? मागे काही पोस्ट वाचुन तु दहिसरचा आहेस हे कळले होते. पण विद्यामंदीर सेमी इंग्लिश वाचुन आश्चर्याचा(सुखद) धक्का बसलाय. कोणती बॅच?

वनमाळी बाई मुलांना संबोधून "बादशा" (बादशहा नाही)आणि मुलींना "भवाने किंवा महाराणी" म्हणायच्या वाघ सर गप्पा मारणाऱ्या किंवा मस्ती करणार्यांना "गर्दी करतोस? गर्दी करतोस?" असे ओरडून म्हणायचे आणि मला कळायचे नाही की सगळे व्यवस्थित सुट्टे सुट्टे बसले आहेत आणि गर्दी करतोस काय? पण एक जोशी सर होते हे फक्त जुन्या १९८३ पूर्वीच्या विद्यार्थ्यांना आठवत असतील ते काय शिकवत आठवत नाही कारण ऑफ पिरियडला ते आम्हाला गोष्ट सांगायला येत असत पण त्यांनी विनोद आणि कारुण्याचा तोल सांभाळत मुलांना हसवत थोडे डोळे ओले करत सांगितलेल्या बर्याच गोष्टी आजही आठवत असतात. मंत्रमुग्ध म्हणजे काय ते त्यावेळी काळत नसे पण आता त्या भावनेचा अर्थ कळतो. शाळेच्या मुख्याध्यापिका गोळे बाई "नमस्ते" इतक्या सुरात म्हणायच्या की सकाळ सुरेल व्हायची. उपमुख्याध्यापिका तावडे बाई माझ्या आईच्या क्लासमेट त्यामुळे माझ्याकडे विशेष लक्ष. आई आणि त्या बाजारात भाजी घेताना भेटल्या हे मला दुसर्यादिवशी कळायचे कारण माझा एकट्याचाच सर्व विषयांचा क्लास सर्वांसमोर व्हायचा आणि.... (पण देशमुख आणि तावडेबाई ह्यांच्यामुळे मला इंग्रजीची गोडी लागली आणि आज मुलांना इंग्रजीचे व्याकरण समजावताना खूप आठवण येते त्यांची ) माझी बहिण (अनिता ठाकूर) हिने अभ्यासात,वक्तृत्वात, शुद्ध लेखनात भरपूर बक्षिसे घेऊन तेव्हा शाळेचे नाव मोठे केले (अकरावी MATRICK ) तसेच दादा (प्रभाकर पेठकर) ह्याने नाटक, स्नेहसंमेलने ह्या मध्ये भरपूर बक्षिसे (तीही पहिल्या क्रमांकाची)मिळवली त्या मुले साहजिकच त्यांच्या काळातल्या शिक्षकांना मीही काही करीन असे वाटले होते पण मी शाळेत खूपच दडपणात (इथे एक स्वतंत्र धागा उघडेल तेव्हा का दडपण ते जाऊ देत), लाजून, कुणाशी न बोलता, शाळा ते घर इतकाच मर्यादित राहिलो. पण मला गोळेबाई, तावडेबाई, देशमुखबाई,(कोरिया नवीन होते तेव्हा हस्तकला शिकवत असत आणि एक्स्ट्रा क्लास मध्ये गणित (एक्स्ट्रा क्लासेस मोफत घेतले जात),मालपाणी सर विज्ञान (कडक माणूस)शिंदे सर पी टी (प्रचंड भीती वाटायची पण तितकेच प्रेमळ)हे सर्वजण आठवतात. शिक्षक ह्या शब्दाला जगणाऱ्या पिढीचा अस्त आणि व्यवहारी शिक्षकांच्या पिढीचा उदय(?)जवळून पाहणाऱ्या पिढीचा मी एक प्रतिनिधी आहे. ण चा न झाला आणि "आमचा णाणा म्हणजे दिसायला अगदी ब्राम्हनच" असे म्हणणारे शिक्षक पहिले की वाटते खरच तुम्हाला घडवणाऱ्यात आता शिक्षकांचा सहभाग आहे? बाकी शालेय जीवनातले शिक्षक वगळता जीवनात येणारे आणि आलेले जे काही शिकवतात त्याने स्वतःला घडवण्याचा प्रयत्न अजून सुरु आहेच.....

सद्ध्याचे विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे मला नववीला वर्गशिक्षक होते [ नूमवि..पुणे]. मी आणि माझ्या शेजारी धन्या गोडबोले बसायचा. आमच्या नशिबी एक जुनाट बाकडे आले होते. बसायची फळी तुटलेली.. त्याची कुसळं नको तिथे बोचायची. लिहायच्यी फळेसुद्धा आधीच्या वर्षीच्या मुलांनी कोरीवकाम करून वाट लावलेली. त्यामुळे अभ्यंकरांच्या कृपेने आम्हाला णवीन बाकडे मिळाले. शाळेचा शिपाई नवीन बाकडे घेऊन येताना दिसला. मी आणि धन्या... आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही लगेच नेहेमीचा गणपतीतला नृत्यप्रकार चालू केला.म ते नेमके शंकररावांनी बघितले आणि आम्हाला दोघांना भूतो ना भविष्यती बडवले. पाठीत गुद्दा घालायचे.. मग आम्ही वाकलो की गुढगा हाणायचे... आजही शंकर अभ्यंकर दिसले की डोक्यात जातात...विद्यावाचस्पती असतील तर घरचे...