माझे २ पैसे.
या विश्वाचा जो निर्माता
तुझा न माझा जीवनदाता
त्याचे या सार्यातील असणे
तसेच वाटे तुझे वाहणे
त्या देवाला कुणी पाहिले
मनात येता कैसे कळले
विश्वच त्याचे, त्याचे सारे
श्वासच त्याचे, शीतल वारे
त्या श्वासांसम शीतल परि तू
आनंदाची मंद झुळुकशी
कसे न कळले मला तुझे पण
श्वासांसोबत येणे जाणे
असा धागा एका दुस-या काव्यविषयक संकेतस्थळावर बघितला होता. एक काफिया घेऊन त्यावर शेर जोडत महागजल झाली होती.
हा काफिया बघा कसा वाटतो; त्यापुढे सुचल्यास आपले शेर जुळू द्यात.
स्वतःला असे मी जपावे कशाला
जगापासुनि मी लपावे कशाला
...
माझ्या मनात तुझे येणे -जाणे,
कठीणच आहे शब्दात पकडणे
आज जरा भांडी नीट विसळणे
रोज खपवुन घेणार नाही
भांड्यांना पावडर तशीच रहाणे
आता वेल्लाभटांचा काफिया
स्वतःला असे मी जपावे कशाला
जगापासुनि मी लपावे कशाला
कंड सुटता हवे लाजणे ते कशाला
मुठी घट्ट आवळीत बसावे कशाला
काय म्हणावे अशा वागण्याला
त्वरीत करावे सुरु खाजवायला
_/\_
दंडवत घ्या बुवा !!
अरे क्काय दोन ओळीतच खाज काढली आहे ...लय भारी .
असो @ तथास्तु ..
तुमचा आजचा धागा, काही प्रतिसाद , व सही बघुन आम्हाला मच्या एक जुन्या मित्राची आठवण येत रहाते..असो ..
@वेल्लाभट ..
स्वतःला असे मी जपावे कशाला
जगापासुनि मी लपावे कशाला
पात्र असो वा नसो, मैदानात, उतरावे कशाला
बोर्ड फुकाट म्हणुनी काय लगेच नाचावे कशाला
हा घ्या ...पुढे
स्टॅमिनाचा कस आजमावत पावसांत दोने रेनकोट घालुन टृकिंग ला जाणारा ..
वाश्याकेष डिवचरकर ;)
@सुहास जुन्या मित्रांची आठवण ठेवली आमची पण ठेवा .
सही -सही काय बदलत राहते . येथे सही विचारतात उद्या धनादेश पुस्तीका मागतील . ह घ्या .
(once upon a time in ... ) हे शिर्षक चोरलेला -तथास्तु
स्वतःला असे मी जपावे कशाला
जगापासुनि मी लपावे कशाला
======
भले किर्र अंधार वाटेवरी ह्या
तरी मार्ग सोडुनी जावे कशाला
असे रात्र थोडी आणि फार सोंगे
तरी खिन्न होउनी गावे कशाला
जरी भोवती गारठा भितीदायी
उद्याची असुदेत आशा मनाला
स्वतःला असे मी जपावे कशाला
जगापासुनि मी लपावे कशाला
.
असता स्मार्टफोन उशाला.
रात्रभर जागावे कशाला.
.
इन्फेक्शन कासवाच्या घशाला.
काळजी का असावी सशाला.
.
है का अजुन कोणी यमक हराम ?;-)
माझ्या मनात तुझे येणे -जाणे,
कठीणच आहे शब्दात पकडणे
नको वाटतो मज फेर आठवांचा
नको लोभ पुन्हा त्या ओष्ठ्द्वयांचा
नको रात्र सारी तू स्वप्नात माळु
स्वप्नभंगात फिरुनी दुभंगुन जाणे
नको खेळ पुन्हा त्या जुन्या बंधनांचा
नको स्पर्शभास शरीरा तयाचा
नको रे पुन्हा त्या विरहात जाळु
नको पहाटेला दवथेंबात न्हाणे
नको वाटतो वायु यमुना तिरीचा
नकोच कदंब बिना सावलीचा
नको सूर वाहू जळी बासूरीचा
नको घटाचे दुभंगुन जाणे
का घडवीशी पाषाण या राधिकेचा
विसरली हास्य मधुर, विसर पडे जगाचा
तरीही श्वास घेणे हा नियम या धडाचा
........
कुणीतरी मदत करा भाऊ/तायांनो.
उरे कैद शिल्पी ते स्मित जीवघेणे ॥
शेवटचे कडवे
का घडवीशी पाषाण या राधिकेचा
विसरली हास्य मधुर, विसर पडे जगाचा
तरीही श्वास घेणे हा नियम या धडाचा
उरे कैद शिल्पी ते स्मित जीवघेणे ॥
प्रतिक्रिया
उदाहरण?
ध्यानी, मनी, स्वप्नी तुच तु |
" कुणी मोजले तारे अनंत ,
तथास्तु!
माझे २ पैसे.
@मी तुम्हाला काव्याच्या दोन
आत्मुस
चला पंगतीला बसू या...
=))
हे बघा कसं वाटतं...
माझीच माती, माझीच नाती,
वा!
चालेल हो ताई . नवरसापैकी
कठीणनच आहे शब्दात पकडणे
ऐयो काय श्लेष बे तोऽ, भाळ छंद
आमच्या दोन वीटा
बुवा !!
@सुहास जुन्या मित्रांची आठवण
वेल्लाभटांच्या काफियाचा विस्तार
स्वतःला असे मी जपावे कशाला
वाह
आता वेल्लाभटांचा काफिया
स्वता:स शहाणे मानावे कश्याला
विचारी ?
माझ्या मनात तुझे येणे -जाणे,
वा मस्त!
उरे कैद शिल्पी ते स्मित
चारोळ्यांचे गोफ
अपर्णा तै __/\__