Welcome to misalpav.com
लेखक: ज्ञानव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

दि : १/११/१९६७ वेळ: : ९.४५ सायंकाळी स्थळ : mumbai
ही कसली वेळ आहे हो? नै, म्हणजे मला त्यातलं कै कळतं अशातला भाग नै, पण माहितगार सांगू शकतील.

एखाद्या माणसाची मरण्याची वेळ आणि ठिकाण सांगितलं, अगदी पत्रिका दिली, फक्त नाव लपवलं तर ज्योतिषी लोक मृत्यूचे कारण आणि वय सांगू शकतील का?

मलाही त्यातले फारसे काही कळते असे नाही. पण कुतूहल म्हणूनच हा धागा विणण्याचा प्रयत्न केला आहे. ज्योतिषी सांगतीलच काही बाही.

पैसा ताई पत्रिका ही जन्मवेळचा नकाशा असल्याने वय सांगता येईल पण मृत्यूचे कारण सांगता येणे अवघड आहे. . आम्ही याविषयी प्रयोग केले आहेत. एका गृहस्थाच्या मुलाने तरुणवयात अमेरिकेत आत्महत्या केली. आम्ही त्याची प्रथितयश ज्योतिषाने बनविलेली कुंडली एका ठाण्याच्या ज्योतिषाला त्याच्या मागणीवरुन पाठविली. त्यासोबत जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख ही पाठविली. आम्ही सगळी माहिती खरी दिली व फक्त मृत्यू हा कसा व १९८० ते १९९० या काळात कुठल्या वर्षी झाला असेल एवढेच विचारले. त्याला ज्योतिषाने तयार केलेली कुंडली पाठविली. ती कुंडलीसुद्धा चुकीची निघाली. त्याने ती स्वत: तपासून नवीन बनविली व त्यावरुन एक वर्ष दिले ते मृत्यू वर्षाच्या जवळपाससुद्धा नव्हते. सदर आवाहन हे धनुर्धारी मे २००० चा अंक या ज्योतिषांच्या व्यासपीठावरच मांडले गेले होते. ( उधृत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद)

वाटलंच होतं. तुम्ही प्रत्यक्षात पुरावा दाखवल्यामुळे अगदी "हा सूर्य आणि हा जयद्रथ" समोर आहे. धागाकर्त्याने तुमचे इथले लेख वाचले तरी त्यांना बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळून जातील! धन्यवाद!

म्रुत्यु ची वेळ आणी कारण त्रोटक पणे सांगता येते . पण ठाम पणे कुणी सांगत नाही . एखाद्या व्यक्तीला त्याची अंतीम वेळ आणी कारण सांगणे ज्योतीषशास्त्रात बसत नाही असे वाचलय .

ज्ञानव; गंमत म्हणुन सुद्धा या फंदात पडू नका. अज्ञातात आनंद माना. अशा प्रश्नांमुळे स्वतःचे व कुटुंबाचे मनस्वास्थ बिघडलेली केस आम्ही अनुभवली आहे

सल्ल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण इथे विश्वास / अविश्वास हा मुद्दा नसून जे कुणी ह्या विषयातले तज्ञ आहेत त्यांनी सांगावे कि जन्म कुंडली पाहून जसे मृत्यूचे भाकीत करता येते तसे मृत्यू कुंडली मांडून पुनर्जन्माबद्दल कुणी सांगू शकते का ? ज्योतिष हे थोतांड आहे कि नाही ह्या हि फंदात मला पडायचे नाही कारण कुणाचे मत परिवर्तन करण्याइतकी कुवत माझ्यात नाही. पण जे कुणी ह्या विषयातले जाणकार आहेत त्यांनी माझ्या वरील मुद्द्यांबाबत विवेचन करावे एवढेच मला वाटते. ज्यांना ज्योतिष थोतांड आहे असे वाटते आणि थोतांड नाही असे वाटते त्यांच्याशी माझे काहीच वाद विवाद नाहीत. ज्याला त्याला मत स्वातंत्र्य नक्कीच आहे. पण गंभीरपणे मुद्दा लक्षात घेऊन वरील मुख्य धाग्याबाबतीत कुणीतरी आपली मते मांडावीत.

नेमके काय विचारायचे आहे, आणि ते जाणून घेण्यामागे हेतु काय आहे? हे समजले तर एक चांगले ज्योतिषी आहेत, त्यांना विचारून बघता येईल. ....पुनर्जम असतो, असे इथे गृहित धरलेले आहे, तसे समजा नसलेच, तर?

गर्भित हेतू असे काही नाही. जसे जन्म कुंडली वरून मृत्यू काढतात तसे मृत्यू कुंडली वरून पुनर्जन्म केव्हा होईल? इतके साधे....हेतू असा काही नाही केवळ उत्सुकता शमवणे. पुनर्जन्म असतो असे एकदा का गृहीतच धरले आहे तर तसे नसलेच तर ह्याबाबत कसा विचार करणार...जे वर मांडलाय त्यावर तुमचे ज्योतिषी काय सांगतात ते लिहा जमल्यास इतकेच म्हणू शकतो.

पण ज्योतिष्विद्या हे सांगु शकतात का? कारण त्याविषयी तरी ज्योतिष विद्येला मर्यादा आहेत असे ऐकुन आहे.

माझ्या वाचनानुसार्,ज्योतिष विद्येला मर्यादा आहेत्,पण उच्च अध्यात्मिक पातळी असलेल्या व्यक्तिना याविषयीची कल्पना असते,त्यामुळे त्याना पशुपक्षी यान्च्या भाषेचे ज्ञान असते,त्यामुळे फक्त पोपट्च काय ईतर प्राण्यावरुन सुद्धा भविष्य सान्गता येते असे ऐकुन आहे.

कारण पोपट बोलत नाही तो फक्त कार्ड उचलून देतो ज्यावर मनुक्षाला समजेल आशा भाषेत उत्तर लिहलेले असते.

बोलत नाहीत? मी स्वता बोलणारे पोपट बघीतले आहेत्,जे शिकवलेली वाक्य बोलतात.

अगोदरच 'नाही' असे उत्तर दिले आहे.(आणि ज्यान्ची अध्यात्मिक पातळी उन्च असते ते माझ्यामते रस्त्यावर पोपट घेवुन लोकांचे भविष्य सान्गत बसत नाहीत.)

छान !! आता काही नवीन धागे येवु द्यात १ ) लोणी एक पावाला लावणे २ ) कळफलक एक बडविणे ३ ) नाष्टा एक करणे ४ ) बॅन्डविड्थ फुकाची वापरणे ५ ) नाडी एक आवळणे . . . . सो ऑन !! ब्रंम्हवंदीय मित्रावर्यांना जास्तीची कामे न लावणारा समटाईम्स अनिसवाला वाश्या

५ ) नाडी एक आवळणे
आवळणे ?? छ्या: भलतीच निराशा केली राव तुम्ही .... जरा कल्पनाशक्तीला आवळा ... वचने किं दरिद्रता ? बोलताना कशाला कल्पनादारिद्र दाखवायचे ;)

माझ्या अभ्यासानुसार ,
दि : १/११/१९६७ वेळ: : ९.४५ सायंकाळी स्थळ : mumbai
सदर व्यक्ती ऑलरेडी डेड आहे .... किंव्वा जिवंत असेल तर लवकरच मृत्यु योग आहे ...ॐ फट् स्वाहा: :D

श्री प्रकाशजी , आपल्या सारखा एखादा अभ्यासू ज्योतिषी जो ठाण्यात राहतो (आपल्या ओळखीचा) अचूक होरा असलेला नाव व पत्ता देता का? आपण कुठे राहता ठाण्यात का ?हात दाखवून अवलक्षण करीन म्हणतोय…

मृत्यू केव्हा झाला आणि कसा झाला हे ढोबळ्मानने सांगता येइल…ग्रह स्तिथी काही वेळा निश्चित्पणे सांगू शकते ….उदा. अपघाती(आग, पाण्यात बुडून वगेरे), शांतपणे…कुंडली पाहणे हे डेटा अनालिसिस सारखे आहे ….फ़ार वर्षांनी आणि अनुभवांनी नीट सांगता येते….धोण्डोपन्त (मुंबई) किंवा श्रीराम भट(पुणे) यांना विचारा.

असा अनुभव नाही ,परन्तु प्रष्णकुन्डली मांडुन हरवलेल्या गोष्टीचा शोध घेता येतो असे ऐकुन आहे.

Planet's Position at Birth Time Planet Sign Degree Lord Nakshatra Pad Lord S. Lord Position Asc Gemini 11 30 42 Mer Ardra 2 Rah Sat Sun Libra 15 09 12 Ven Swati 3 Rah Ket Deb Mon Libra 07 06 10 Ven Swati 1 Rah Rah Com Mar Sagittarius 13 41 16 Jup P.Asadha 1 Ven Ven Mer(R) Libra 15 04 07 Ven Swati 3 Rah Ket Com Jup Leo 08 37 17 Sun Magha 3 Ket Jup Ven Leo 28 47 30 Sun U.Phalguni 1 Sun Mar Sat(R) Pisces 13 27 20 Jup U.Bhadrapada 4 Sat Rah Rah(R) Aries 04 32 51 Mar Ashwini 2 Ket Mon Ket(R) Libra 04 32 51 Ven Chitra 4 Mar Ven Ura Virgo 04 02 31 Mer U.Phalguni 3 Sun Sat Nep Scorpio 00 06 36 Mar Vishakha 4 Jup Mon Plu Leo 28 40 01 Sun U.Phalguni 1 Sun Mar

ज्ञानव , १)मृत्युचे कारण पोटाचे आजार अथवा उंचावरून पडणे . २)कुंडली मोक्ष दाखवत नाही . ३)जातकाची स्वत:चीच इच्छा बाकी आहे काही परोपकार करण्याची .

वरील माहिती वरून मृत्यूची दिनांक, वेळ, स्थळ, प्रकार (नैसर्गिक, अपघात, आत्महत्या वगैरे )कुणी सांगू शकेल का? मी ह्यात जास्त इंटरेस्टेड आहे. तसेच पुनर्जन्माचे आणि मृत्यू कुंडलीचे काही नाते आहे का ? म्हणजे जर जन्म कुंडली पाहून मृत्यू सांगतात तर मृत्यू कुंडली पाहून पुनर्जन्म (केव्हा, कुठे )असे काही सांगता येते का? जर येते तर कसे ? काय तर्क आहेत त्यामागे ?

वरील माहिती वरून मृत्यूची दिनांक, वेळ, स्थळ, प्रकार (नैसर्गिक, अपघात, आत्महत्या वगैरे )कुणी सांगू शकेल का? मी ह्यात जास्त इंटरेस्टेड आहे. तसेच पुनर्जन्माचे आणि मृत्यू कुंडलीचे काही नाते आहे का ? म्हणजे जर जन्म कुंडली पाहून मृत्यू सांगतात तर मृत्यू कुंडली पाहून पुनर्जन्म (केव्हा, कुठे )असे काही सांगता येते का? जर येते तर कसे ? काय तर्क आहेत त्यामागे ?

हा प्रकार मी प्रथमच ऐकत आहे. जन्मकुंडलि माहीत आहे. त्यावरून पुन्हा पुनर्जन्म कुंडली मांडने सारखे कोम्प्लिकेषन फक्त नाडी ग्रन्थच सोडवतात. ओक साहेबांना बोलवा

पुनर्जनमाचे भाकिताबद्दल काय आधार आहे त्याची कल्पना नाही . शिवाय याचा पडताळा कसा घेणार ? खरोखरच याचाच अमूक ठिकाणी जन्म झाला हे कसे ठरणार ?

मागील जन्मीचे संचित सांगणारे मी पहिले आहेत त्यामुळे पुनर्जन्म ते मानतात प्रश्न असा आहे कि मृत्यूची वेळ कळल्यावर पुनर्जन्म किती वर्षाने होईल हे कुणी सांगू शकते का? मुळ धाग्यात दिलेल्या जन्म वेळेनुसार मृत्यू कधी कुठे कसा होईल हे तुम्ही सांगू शकता का ? असे मी म्हंटले आहे. परंतु दुर्दैवाने कुणीही मूळ प्रश्न काय हेच पाहत नाही आहे.

मृत्यू झाला असायची शक्यता दाट आहे. तुला राशीची साडेसाती चालू आहे. अपघाताची शक्यता सर्वात जास्त. फेब. १३ ते सप्टे. १३ च्या मध्ये अपघात झाला का ? आणि गुडघ्याला मार लागला असायची शक्यता आहे. बायको मीन राशीची आहे का? लग्न, शिक्षण आणी मुले यात अडथळे होते का? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास कुंडली बरोबर आहे हे सिद्ध होईल आणि नीट सांगता येईल.

@ पुतालाचैतान्या जी १) बायको किंवा नवरा मीन नाही. २) अपघात झालेला नाही. ३)लग्न शिक्षण मुले सामान्य काहीही प्रोब्लेम नाही @सर्वांसाठी कृपया धागा नीट वाचवा हि विनंती आहे.

तुमचे लोकेशन दहिसर , मुंबई असे गृहित धरुन आणि धाग्याची जन्मवेळ 28/11/2013 - 10:12 धरुन कुंडली मांडली असता हा धागा बरेचसे लोक फाट्यावर मारतील व आपल्या धाग्यात विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळणार नाही असे स्पष्ट दिसत आहे :D

जन्म पत्रिकेवरून अचूक मृत्यू तारीख आणि कारण कोणी सांगितल्याचे माझ्या आयुष्यात मी पाहिलेले नाही. खुद्द ज्याचा मृत्यू होतो त्याला मृत्यूपूर्वी कांही काळ तशी भावना (आपला मृत्यू समिप आल्याची) निर्माण होण्याची शक्यताही असू शकते आणि तशा कथा ही ऐकलेल्या आहेत. कांही अंशी अशा गोष्टीचा जवळून अनुभवही घेतला आहे. पण म्हणतात नं, ' आप मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.' त्यामुळे मला स्वतःला तसा अनुभव आला (आणि हातात वेळ असेल ...) तर मी नक्कीच मिपावर तसा तपशिल डकवून नंतरच प्राण सोडेन. मला वाटतं माझ्या कुटुंबियांप्रती असणारी माझी सर्व कर्तव्य पार पडल्यावर मी केंव्हाही मरायला तयार असेन. मृत्यूची वेळ कशाला जाणून घ्यायची. कांही कारणाने मृत्यू समिप आहे अशी परिस्थिती निर्माण झाली (जसे, कॅन्सर, एडस वगैरे) तर कुटुंबियांप्रती आपली कर्तव्यपूर्तीसाठी हाती असणारा वेळ जाणणे एव्हढेच त्याला महत्व आहे. अन्यथा, मृत्यू कधी आहे हे शोधून काढण्याच्या भानगडीत पडू नये. माझ्या एका मित्राच्या आजाराचे कॅन्सर असे निदान झाले. त्याचा पहिला प्रश्न डॉक्टरांना होता, 'डॉक्टर, माझ्या हाती किती वेळ आहे?, पाच वर्षे?' डॉक्टर म्हणाले,' नक्कीच जास्त वेळ आहे, काळजी करू नका.' त्यावर 'किती काळ हाती आहे हे का जाणून घ्यायचे आहे (जसे, कुटुंबाची काळजी. एकुलता एक मुलगा लहान होता) हे डॉक्टरांना सांगून पुन्हा विचारणा केली असता विचार करून डॉक्टर म्हणाले, 'कॅन्सरच्या वाढण्याचा आत्तापर्यंतचा अल्प वेग पाहता, अजून १५ वर्षे आहेत असे मी म्हणू शकतो. पण मी ब्रह्मदेव नाही. कमी जास्तही असू शकेल.' असो. त्या नंतर त्या मित्राने आयुष्यात प्लॅन केलेल्या गोष्टी तातडीने पूर्ण करायला घेतल्या. मस्कत सोडून कॅनडात स्थायिक झाला. मुलाचे शिक्षण पूर्ण होवून मुलाला कॅनडात नोकरी लागली. त्याचे (जरा लवकरच) लग्न लावून दिले, नातवालाही खेळवले. शेवटी जेंव्हा ६ महिने राहिले. तेंव्हा त्याने स्वतःच्या दहनविधीची वगैरे सोय कॅनडातील एका संस्थेत करुन, सर्व मित्रांना, परिचितांना 'शेवटचा' ईमेल पाठवून कळत/नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी मागून, शेवटचा श्वास घेतला. पुनर्जन्माबद्दल म्हणता येईल की 'आप मरे तो दुनिया डुब गयी।' तेंव्हा चिंता कशाकरिता? समजा, पुनर्जन्म आहे, अमूक एक दिवशी आहे हे समजले तरी त्या व्यक्तीला मागचा जन्म आठवणार आहे का? मग त्या व्यक्तीच्या पुनर्जन्माबद्दलचे आपले एकतर्फी द्यान काय कामाचे? उत्तरे मिळाली तरी त्याच्या सत्यतेची हमी कोण देणार (त्या ज्योतिषाव्यतिरिक्त)? ह्या माहितीचा माझ्या आजच्या आयुष्यात (वर लिहीलेला मर्यादित उपयोग सोडून) उपयोग काय? केवळ कुतुहलापोटी त्यावर विचार-चर्चा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा आहे त्याच आयुष्याचे सोने करण्यासाठी काय करता येईल ह्यावर विचार आणि कृती करण्यासाठी वेळेचा वापर करणे जास्त सयुक्तिक होईल असे वाटते.

वा क्या बात है! अगदी उत्तम प्रतिसाद! एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुमच्या मित्राचे व्यक्तिमत्व सश्रद्धतेकडे झुकणारे होते कि अश्रद्धते कडे? साधारण पणे कल कळतो. ...अतिरेकी अश्रद्ध अश्रद्ध......०........>>सश्रद्ध>>अतिरेकी सश्रद्ध>>...