Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कंप्लिट आडवी!! साष्टांग! कल्प्ना सुद्धा केली नव्हती की सापांच्या लेखात हे असला काही विळखा (टर्न हो) असेल म्हणुन. झक्कास. ( या धाग्यावर आता मिपाकरांच्या उड्याच उड्या! मंडे बना दिया पब्लिकका।) बा द वे एक पॉइंट आहे मॉडेल मेकअप ने चमकते आहे अन धामण विदाउट एनी प्रोफेशनल हेल्प. आजीं आवडल्या. उंदरांची 'ताकद' समजली. अन धामण तर कायमच आवड्ते.

वर अपर्णाताईंनी म्हणल्याप्रमाणे...मंडे बना दिया :-)

आम्हाला दिसताय नां मग झाले तर, बाकी कोणाचा गणेशा होवो कि पिवुशा ( ते आपलं पियुशा)!

अरे मित्रा, मला पण फोटु दिसत नाहीयेत. ब्राऊजर पण बदलुन पाहिला तरी नाही :( उत्सुकता शिगेला पोचली आहे. पटकन त्या फोटोचं काहीतरी करा.नाहीतर प्रतिसादात परत अपलोड करा.

मस्त लेखन आणि फोटो. हीच पद्धत (गुगल) वापरून पुढचे (आणि जमलं तर मागचे) फोटो टाकले तर माझ्यासह अनेक मिपाकराना ते पाहता येतील.

सर्व काहि आवडलं. काहि बाळबोध प्रश्नः अशा सापांबरोबर काढलेल्या फोटोंना जास्त मागणी असते का? असे फोटो काढताना पुर्ण वस्त्रे का घालत नाहित? मधु-मिलिंदनी नीदान बुटांची अ‍ॅड करण्याकरीता त्या अजगराला गळ्यात घेतलं होत. वरील फोटोत कोणत्या प्रॉडक्टची अ‍ॅड होती?

मला मागणीबद्दल माहित नाही. वरच्या फोटो शूट मध्ये पूर्ण वस्त्रे घालून फोटो काढले होते. तुम्ही कुठले फोटो पहिले मला माहित नाही. हे फक्त फोटो शूट होते, जाहिरात नव्हती, पुढे फोटो कशाला वापरले गेले हे मला माहित नाही. पण मॉडेल ने कुठले पण प्रोडक्ट हातात धरले नव्हते.

केवळ भारी लिहितोस तू. उदाहरणं तरी कसली कसली उच्च देतोस रे तू.... मस्त, अप्रतिम, झकास इ.इ. सर्व काही :)

आपल्या ताज महालाला आमची वीट -- धामण हि थंड रक्ताचा प्राणी असल्याने तिला आठवड्यात एकदाच शिकार करणे पुरेसे होते. त्यामुळे ती आठवड्यात एक उंदीर या दराने वर्षात पन्नास ते साठ उंदीर खाते. या विरुद्ध घुबड हे गरम रक्ताचा प्राणी (पक्षी) असल्याने त्याला बराच अन्नाचा पुरवठा लागतो आणि पिल्ले असण्याच्या काळात अजूनच जास्त( ग वि ची लेखमाला पहा). त्यामुळे सरासरी दिवसाला तीन या दराने घुबड वर्षात एक हजार पर्यंत उंदीर खाते. असे असूनही धामण हा शेतकऱ्याचा मित्र कसा? एकतर एका शेतात पंधरा ते वीस पर्यंत धामणी असू शकतात. शिवाय धामण हि बिळाच्या आतपर्यंत जाऊन ( मैल मे छिपे हुए किटाणू को धो डालता सारखे) उंदीर मारू शकते. त्यामुळे जे उंदीर घुबडाना दाद देत नाहीत(घुबड आल्याचे त्यांना कळून ते पटकन बिळात शिरतात)असे हुशार उंदीरसुद्धा धामणीला चकवू शकत नाहीत. झाडे नसलेल्या शेतात घुबडे जगत/ वाढत नाहीत/ पैदास करीत नाहीत अशा ठिकाणी सुद्धा धामणच उंदरांची संख्या नियंत्रित ठेवते. मागणी तसा पुरवठा या न्यायाने शेतात उंदीर वाढले तितक्या धामणी वाढतात आणि उंदरांची संख्या नियंत्रित ठेवतात. यात मानवाने जर धामणी बिळात धूर करून हुसकावून मारल्या तर शेतात उंदीर बेसुमार वाढतात आणि अन्नाची अपरिमित नासाडी करतात. हे घुबडाचे आख्यान ग वि यांची लेखमाला असल्यामुळे लोकांच्या स्मरणात राहील या हेतूने लिहित आहे. बाकी फोटोतल्या "दोघीही" आकर्षक (आणि मादक) आहेत

___/\___ कृशिसानविवि! भन्नाटच. बाकी एम ३ लव्कर निघाला काय? ;)

जाक्या साठी पुण्यामधे एक जाहिर सत्कार ठेवत आहे. भल्याभल्यांनी आजन्म मौनव्रत घ्यावं अशी चालली आहे ही मालिका! केवळ सापांबद्दल आहे म्हणून नव्हे तर लेखनशैली, अनुभव, व्यासंग, संयम, परिपक्वता.... _/\_ _/\_ _/\_ आजीला साष्टांग दंडवत!

पण फोटो दिसले नाहीत ... धामण न दिसल्याचे दु:ख आहे मॉडेल न दिसल्याचे महादु:ख आहे :( बाकी खरच पाळता येईल का हो धामण ? असं काहीतरी एक्जॉटीक पेट ( पाळीव प्राणी ह्या अर्थाने ) ठेवायचे आहे !!

नन्तर दिसले तेव्हा खरेच कळले,असो नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती,पुभाप्र

"मला ही फ्रेडा पिंटो वाटते आहे. कुणी सांगेल का कोण आहे ती?" कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं! लेखक सापाबद्दल लिहितो आणि लोकं दुसरीकडेच बघतात! काय मेलं हे वागणं तरी! ;)

यातली धामण नेमकी कुठली ? आणि मित्रा... कुठल्याही 'जहरील्या' परिस्थितीत स्वत: 'कूल' राहण्याचं तुझं कसब भल्याभल्या योग्यांना तोंडात बोट घालायला लावेल हो...

जेडी, लेख नेहमीप्रमाणे सुंदर लेखात तुम्ही धामण शांत राहण्यासाठी मदत केली. पण म्हणजे नक्की काय केले?

नेहमीप्रमाणे मस्त लिखाण! फोटोतली सुंदरी ठीकठाक. आधेलं झक्कास!