लेख आवडला. वर्तमानपत्रातील इतर त्रासदायक बातम्यांपेक्षा या अशा घटना वाचून बरे वाटते.
सार्याच गोष्टींची परतफेड करता येत नाही, पण जाण ठेवणे जमल्यास कर्तव्य आपसूक निभावले जाते.
अगदी सहमत. यावरून एक जुनी घटना आठवली. माझी आई ज्या महाविद्यालयात शिकवते तिथल्या एका शिपायाच्या घराचे वादळामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आईने पुढाकार घेतला, स्वतः पहिली रक्कम मदत म्हणून दिली. हे बघून इतर सर्व शिक्षकांनी देखील मदत केली आणि या पैशांमधून त्याचे नुकसान बऱ्याच प्रमाणात्भरुन निघाले. याशिवाय इतर काही वेळेला सुद्धा आईने त्याला काही न काही मदत केली होती. या घटनेनंतर अनेक वर्षानी माझ्या लग्नाच्या वेळी त्याने इतर शिक्षकांकरवी आईसाठी तिच्या पसंतीची ५०० रुपयांची साडी आणली. आणि लग्नाच्या ४ दिवस आधी घरी येउन आहेर म्हणून साडी, मला पैसे आणि बबन टॉवेल टोपी असे सगळे दिले. त्याच्यासाठी ५०० रु ही बरीच मोठी रक्कम होती. आणि आई त्याच्याकडून असे काही घेणार नाही हे त्याला माहित होते. किंमत किंवा वस्तूचे महत्व नव्हते पण या सगळ्यातून त्याचे प्रेम आणि केलेल्या मदतीची जाणीव हे हेलावून टाकणारे होते. हा प्रसंग अजूनही डोळ्यात पाणी आणतो. आणि प्रत्येक वेळी जगात चांगुलपणा आहे याची जाणीव करून देतात. आजही कुणाला मदत करताना पहिले त्या शिपायाची आठवण येते आणि तो नकळत स्फूर्ती देऊन जातो.
तुमचे लेखन नेहमीच छान असते .. लालित्यपूर्ण असते .. पण राग मानू नका, यावेळी जरा पाणी टाकून वाढवल्यासारखे वाटते. आरास छान आहे .. तुम्ही नेहमीच सुंदर फुलवता पण कथाबीज सकस नाही.. यापेक्षा अधिक उत्तम प्रसंग हवा होता , जिथे सामान्य माणूस अधिक मो़कळा होतो ,जसे की इस्पितळ ! सहज जाता जाता , पत्ता विचारणारा इतक्या मोकळेपणाने बोलेलच असे वाटत नाही.
माझे एक निरिक्षण आहे , समदु:खी भेटला की माणूस आधिक मोकळेपणाने बोलतो...
अर्थात हा प्रसंग खरा घडला असेल तर ..विशेष च म्हणायला हवे.
बा़की उत्तम !
खरंय आपलं. कथाबीज साधेसंच होते. लिहावेसे वाटले तसे लिहून काढले. घडले त्याच संध्याकाळी. अन्यथा दुसर्या दिवशी पार डोक्यातून निघून गेले असते.
मात्र पाणी नाही टाकलेय हे हि तितकेच खरे, अन्यथा ते असे झाले असते की आपल्याला प्रसंग साधासा वाटला नसता.
बाकी "सहज जाता जाता , पत्ता विचारणारा इतक्या मोकळेपणाने बोलेलच असे वाटत नाही." म्हणत असाल तर तेच भावले म्हणून लिहावेसे वाटले :)
बाकी, प्रतिसादाचा राग कसला, एखादा लेख कोणाला आवडला नाही तर साहजिकच थोडेफार वाईट वाटतेच, पण त्यामागचे कारण समजणे तेवढेच चांगले.
आजकाल अनेकदा फसवणूकीचेही प्रकार होतात. स्टेशन, बस स्टॉप इ. ठिकाणी काहीतरी विषय घेऊन बोलणे सुरु होते, मग थोड्या वेळाने मदतीसाठी पैसे मागितले जातात, अर्थात तुमचा वेश, दिसण्यावरुन रकमेचा अंदाज घेऊन पैसे मागतात. कारण काहीही हॉस्पिटलला जायला रिक्शासाठी पैसे, पाकिट मारले इ.
माझ्याबाबतीत हा प्रकार दहिसर स्टेशनला झाला होता. मी कॉलेजला जात होतो, तेव्हा एक माणूस भगवती हॉस्पीटलचा पत्ता विचारत होता. मग बोलता बोलता त्याने सांगितले की तो चुकुन दहिसरला उतरला. त्याच्या बायकोचे ऑपरेशन आहे, लवकर जायचे आहे. रिक्शाला पैसे देशील का? बहुतेक माझा गबाळा वेश पाहून त्याने कमी पैसे मागितले. माझ्याकडे तेव्हा ५० रु च होते. मी २० च दिले. पण तरीही तो मोबाईल रिचार्जसाठी पैसे मागत होता. मी ते ३० रु मला कॉलेजसाठी हवेत असे सांगुन कटवले. ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही (नेकी कर और दर्यामे डाल असा स्वभाव :))
पण २-३ दिवसांनी एका मित्राकडे असेच कोणीतरी एक्स्-रे रिपोर्ट घेण्यासाठी पैसे मागितले, त्याने ही २०० रु दिले. हे कळताच समजले की ही अशी एक "स्कीम" होती.
अर्थात सगळे लोक असे फसवणारे असतीलच असे नाही, पण आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारेही या जगात असतात हे लक्षात ठेवावे.
हाईट म्हणजे माझ्या एका कलिगच्या बाबतीत असा प्रकार खुद्द लंडनला घडला. कलीग इतर मित्रांबरोबर लंडन फिरत होता. मादाम तुसॉच्या जवळ एक गुजु जोडपे भेटले. ते ह्यांच्याशी बोलू लागले. परदेशात कोणी भारतीय भेटला की जरा जास्तच आपुलकी वाटते. त्यांनी सांगितले की "त्यांची मुलगी खेळताना पडली, फ्रॅक्चर झालेय, हॉस्पीटल मध्ये आहे. १००-१५० पौड खर्च झालाय. मदत कराल का? आम्ही लेस्टरला राहतो. घरी गेल्यावर पैसे पाठवतो" वगैरे
त्यांच्या ग्रुपमधून कोणी १०-२० पौड देऊन १०० पौडची मदत केली. सर्वांचे फोन नं ही दिले. त्यांना आज गायत त्या जोडप्याचा फोन नाही आला.
जर तुम्हाला जगातली फसवणूक दिसते, समजते तर याचा किमान अर्थ एवढा तरी नक्कीच होतो कि तुम्हाला देखील फसवणूक कशी करायची हे जमू शकते.
आता प्रश्न उरतो कि आपण प्रत्यक्षात वेळ आल्यावर ती कधी करतो का? तर याचेही उत्तर मग बरेचदा हो मिळून जाते, बस्स व्यक्तीनुसार आणि प्रसंगानुरुप प्रमाण प्रत्येकाचे कमीअधिक असते.
(इथे तुम्हाला'चा जनरलाईज अर्थ घ्या, आणि फसवणूक म्हणजे एखादा मोठा घोटाळा धरू नका)
असो. ही विधाने काही पटली नाहीत. फसवणूक दिसते म्हणजे करायला जमते हे तर फारच ओढून ताणून वाटते आहे अगदी गनरल अर्थ वगैरे घेऊनही. बाकीचंही काहीच पटलं नाही, पण ठीके. अपनी अपनी मतं.
प्रतिक्रिया
सुंदर !!
धन्यवाद
+१११
असे लेख मला मिपाची स्वीट डिश
सार्याच गोष्टींची परतफेड
खरंच, मदत होते अश्यांची, आपला
लाईक करण्यात आलेला आहे.
धन्यवाद, सारेच प्रतिसाद
लेख आवडला
छान अनुभव, आणि तो येण्याचे
:)
आवडेश....
तुमचे लेखन
खरंय आपलं. कथाबीज साधेसंच
आजकाल अनेकदा फसवणूकीचेही
हाईट म्हणजे माझ्या एका
फसवणारे लोक जगभर भेटतात
खरंय.. आणि आपणही कोणालातरी
>>आपणही कोणालातरी कधी ना कधी
जर तुम्हाला जगातली फसवणूक
असो. ही विधाने काही पटली
ओके
लेख आवडला
I likes..
धन्यवाद सर्व प्रतिसादस !