प्रतिसाद टंकण्याबद्दल काही म्हणणं नाही पण जाणीवपूर्वक पहिल्या पानावर नि पहिल्या पाचसात प्रतिसादात नाव दिसावं ही धडपड कायमच असते काय?
आजचा सुविचार (शब्दरचना: सूड) : न्हाई न्हाई म्हनायचं नि पायलीभर हानायचं!
एकदम सहमत.
सुधीर मोघ्यांची या निमित्ताने एक कविता आठवली... लक्षात नव्हती पण थोडीशी जालावर मिळाली.
'खरं म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो..
एका दुर्लभ क्षणी.. एक चेहरा आपल्याला भेटतो..
अक्कल गहाण पडते.. भेजा कामातून जातो.. टक्क उघडय़ा डोळय़ांनी आपण चक्क लग्न करतो..
त्या चेहऱ्याचं असली रूप मग आपल्याला कळतं..
बायको नावाचं वेगळंच प्रकरण आपल्यापुढे येतं..
हा दारुण मनोभंग अगदी झालाच पाहिजे का?..
सगळय़ा मुलींचं लग्नानंतर हे असंच होतं का?'
आनंद मोडक यांनी त्यांना (मोघ्यांना) दुसरी बाजू विचारली तेंव्हा त्यांनी त्याला खालील उत्तर दिले:
'सगळे पुरुष एकजात ढोंगी कांगावखोर
बायको म्हणजे त्यांना वाटते नाचणारी लांडोर
लग्नाआधी ज्याच्यासाठी तिच्यावर जीव टाकतात
त्याच गोष्टी लग्नानंतर त्यांचा जीव खातात
प्रेयसी कशी स्मार्ट, चंट आणि बिनधास्त हवी
लग्नानंतर मात्र तिची काकूबाई व्हावी
प्रत्येक पुरुषी भेजात हा सावळा गोंधळ का?
सगळय़ा मुलांचं लग्नानंतर हे अस्संच होतं का?'
या विषयाला अनुसरून आठवलेले गाणे
घाल घाल दारु दोस्ता माझ्या या ग्लासात
बीडी काडी चखण्याची कर बरसात
टाईट आहे जावई सांग सासर्यांच्या कानात
त्यांच्या कडे पाहुनीया मन खंतावत
विसरलास का रे लगनाला वर्स झाल
पहिल्या सारख आता लेका काही नाही उरल
फिरुन फिरुन शॉपिंग करुन पाय दुखतात
तरी सुध्दा काही वस्तु घ्यायच्या रहातात
अमेरिकेतली मेव्हणी, चिवट आहे फार
तिचा फोन आला की रे, होतो मी बेजार
दोस्त सारे माझ्या नावे फोडतात खडे
लग्ना नंतर माजलो मी म्हणतात वेडे
सुपात आहेत साले, लवकर पडतील जात्यात
सुखी संसाराची भोळे स्वप्न पाहतात
विंबल्डन सुरु झाले जीव व्याकुळला
लग्ना नंतर रिमोटही तिच्या हाती गेला
घाल घाल दारु दोस्ता माझ्या या ग्लासात
बीडी काडी चखण्याची कर बरसात
फक्त बायकोमुळे हिरावल्या गेलेल्या स्वातंत्र्याबाबत असलेल्या सूचीत दारु नि सिग्रेट यांचाच उल्लेख सातत्याने होतो हे खटकते. कदाचित बहुसंख्येने यापलिकडचे स्वातंत्र्य जसे वैचारिक, सामाजिक स्वरूपाचे - असते याचा विचारच केला नसावा. खरंतर खंत व्यक्त करायचीच झाली तर त्याबद्दलची अधिक तीव्र हवी असे मला प्रामाणिकपणे वाटते. निदान लेखक गुर्जी असल्याने ती अपेक्षा अधिक होती.
-(मद्यप्रेमी, सिग्रेटद्वेष्टा) रमताराम
ररांशी सहमत आहे.
इंग्रज कसे आधि व्यापारा साठी आले आणि मग राज्यकर्ते झाले.
तशी लग्नानंतर वाटाघाटींची सुरुवात दारु सिग्रेट ने होते आणि मग पुरुष नकळत सारे राज्य गमावुन बसतो.
त्यामुळे दारु आणि सिग्रेटचा सिंबॉलीक वापर पुरुषवर्गाकडुन होत असावा.
दारु आणि सिग्रेटचा सिंबॉलीक वापर पुरुषवर्गाकडुन होत असावा.
यग्झ्याक्टली. दारू आणि सिग्रेट ही निव्वळ प्रतीकं आहेत - डोक्याला नसलेल्या कटकटीची. 'हर फिक्र को धुए मे उडाता चला गया' या गाण्यातून तेच सुचवलेलं आहे. डोक्यावर कुठचंही ओझं नसलेला आर्मीमधला कप्तान बिनधास्तपणे उंडारतो, तसं उंडारणं हे पुरुषांच्या मनात दडलेलं स्वप्न असतं.
खरंतर खंत व्यक्त करायचीच झाली तर त्याबद्दलची अधिक तीव्र हवी असे मला प्रामाणिकपणे वाटते.
हे झालं नाही कारण पडलेली कलात्मक बंधनं. मूळ लेखाच्या ढाच्याप्रमाणे विडंबन होणं ही कलात्मक गरज होती. सिग्रेट, दारू ही खरी तर प्रतीकंच आहेत. पण या कलाकृतीतून व्यापक संदेश येत नाही असं म्हणत आहात तेव्हा तो कलाकृतीचा दोष म्हणावा की वाचकाचा हे कळत नाही. कारण मानवी मानसजीवनाच्या एका महत्त्वाच्या पैलूवर भाष्य आहे. फ्रॉइडने म्हटलं की प्रत्येक पुरुषाचा आपल्या वडिलांवर राग असतो. मात्र त्याची कारणमीमांसा चुकली. या लेखात त्याचं 'बापावरचा राग संसाराबद्दल चुकीचं चित्र निर्माण केल्याबद्दल असतो' हे पर्यायी कारण दिलेलं आहे.
हिरावल्या गेलेल्या स्वातंत्र्याबाबत असलेल्या सूचीत दारु नि सिग्रेट यांचाच उल्लेख सातत्याने होतो हे खटकते
दारू जाळते. सिग्रेट जळते. जाळलेल्या आणि जळालेल्या स्वातन्त्र्याचे प्रतीक म्हणून या दोन गोष्टी वापरल्या जातात.
संपादित.
मस्तं विडंबन. ठुसठुसती जखम भळाभळा वाहू लागली.
मिपावर 'स्वतंत्र पुरुष विभाग' (म्हणजे पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग, स्वतंत्र पुरुषांसाठी एक विभाग नाही, नाहीतर तो रिकामाच राहायचा), नाही ह्याचे प्रचंड दु:ख होते आहे.
(म्हणजे पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग, स्वतंत्र पुरुषांसाठी एक विभाग नाही, नाहीतर तो रिकामाच राहायचा)
हे टाकलेत म्हणून बरे, कारण स्वतंत्र पुरुष नावाचा प्रकार तात्विकदृष्ट्या सिद्ध करता येतो पण प्रत्यक्षात असंत नाही. ज्या अविवाहीत पुरुषाना आपण स्वतंत्र आहोत असे वाटते त्याना मी सांगू इच्छितो की तो भ्रमच आहे.
प्रतिक्रिया
अप्रतिम..
थोडीफार सहमत
मधला मजकूर गेला ...
आणखी एक पुरवणी
प्रतिसाद टंकण्याबद्दल काही
लई दिसांनी आईकली/वाचली ही म्हन !!
गुरुजी तुम्ही सुद्धा या
****
मुलाला संसाराचा त्रास व्हावा
अरे वा वा!
+१
=)=)
मस्त
एकेकदा मी स्वत: ला विचारतो ,
आता वाटतय हायलाइट केलेल
(No subject)
प्रणाम स्वीकारावा गुर्जी.
खर आहे....खरी व्यथा मांडलीत भाऊ
बरं लिहलय! मजा आली
शेवट तोचतोच पणा मधे अडकलाय.
पण पुरुषस्वातंत्र्याच्या
पण मुळात पुरुषस्वातंत्र्य अशी
या विषयाला अनुसरून आठवलेले
+ १....
+२....
पाय कुठे आहेत पैजार बुवा!!
पाय कुठे आहेत पैजार बुवा!!
घाल घाल दारु दोस्ता माझ्या या
दंडवतच!!
भारी !
*****
झकास..!!
दंडवत!
आगागागागा!
ठ्ठो!!!! =))
छान
हा सीरियस प्रतिसाद आहे ?
कुणी
सहमत!
मनातलं बोललात.
ररांशी सहमत आहे.
हाहाहाहा
दारु आणि सिग्रेटचा सिंबॉलीक
खरंतर खंत व्यक्त करायचीच झाली
हिरावल्या गेलेल्या
_____/\______
शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहेइथच जिंकलस मित्रामस्त विडंबन
मस्तं.
(म्हणजे पुरुषांसाठी स्वतंत्र
नक्की का?
Pagination