यांची आपण ओळ्ख करून दिलेली बहुतांश गाणी संपूर्ण ओठावर आहेत, अगदी मराठी सुध्दा. पण यापुढे महेंद्र कपूर हे नावही तितकेच आदर अन प्रेमाने स्मृतित जतन करेन.
मला वाटत कि कुठल्या एका अभिनेत्याचा "फिट्ट" आवाज नसणे हाच महेंद्र कपूर यांच "बलस्थान" होते पण मायनगरीत (तेव्हाही) कंपुगिरी होतीच त्यामुळे हा गुणी हिरा जणु काही विसरलाच गेला (दुय्यम फळीत टाकला गेला)
त्यामुळे या आवाजाला उपजतच काही मर्यादा आहेतसं वाटत राहतं
योग्य आहे.
पूर्वी खरं तर आवाज नायकाला स्यूट न होणं हे एक महत्त्वाचं लिमीटेशन होतं.
गाणी मिळणं हे नायक हिट होण्यावर अवलंबून आहे पण गाणं हिट होणं वेगळी गोष्ट आहे.
चित्रपटांचा अभ्यास शून्य असला तरी मी गाण्यांचा तुफान व्यासंग केलायं. गाणं संस्मरणीय होण्यासाठी शायरी, चाल आणि गायकांचे आवाज हे मिश्रण जुळावं लागतं.
तुम्ही उल्लेखलेल्यांपैकी जवळजवळ प्रत्येक गाणं संग्रहणीय आणि पुनःपुन्हा ऐकण्यासारखं आहे, अनेक आठवणी जाग्या केल्यात, धन्यवाद! (Curious: हा ब्लॉग तुमचाच का? असाच खजिना आहे म्हणून विचारलं...)
लेख आवडला. महेंद्र कपुरची खूप गाणी आवडतात. तुम अगर साथ देने का, चलो एकबार, अशी कितीतरी गाणी आणि लेखनाचा व्ह्युही आवडला. आभार. असेच उत्तमोत्तम लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
आवडला.. हे लक्षात आलं की बरीच ओळखीची उत्तम गाणी गायली आहेत महेंद्र कपूर यांनी पण ते ऐकताना जाणवत नाही.
काही गाण्यांवर त्यांची छाप आहे आणि माहितही आहेत - हमराजची सगळी गाणी - तुम अगर साथ देने का वादा करो,
नीले गगन के तले किंवा अथ श्री महाभारत कथा, मनोज कुमारची देशभक्तीपर गीतं..
(रच्याकने मुकेशने गायलेलं - कोई जब तुम्हारा हृदय तोड दे हे कदाचित मनोज कुमारवर चित्रित सर्वोत्तम सॅड साँग असावं)
पण चलो इकबार फिरसे सारखं अप्रतिम रत्नही त्यांनी दिलं आहे हे माहित नव्हतं..
बर्याच आवडीच्या जुन्या गाण्यांची खूप वर्षांनी आठवण आली.. अनेक धन्यवाद!!
लेख चांगला आहे, पण महेंद्र कपूरची काही अप्रतिम गाणी निसटून गेली आहेत.
'तेरे प्यार का आसरा चाहता हूं' चा उल्लेख ओझरता आला आहे, मला वाटते हे ह्या गायकाचे एक सुंदर, विलक्षण गाणे होते. तसेच चोप्राच्या 'धर्मपुत्र'मधील 'आज की रात नहीं,शिकवे शिकायत के लिये' शिवाय मी तरी महेंद्र कपूरचा विचारच करू शकत नाही. आणि ह्याच चित्रपटातील 'तुम्हारी आँखे' ही धूंद गीतही त्याने सुंदर गायिले होते. ही त्याच्या करीयरच्या सुरूवातीची तिन्ही गीते एन. दतांनी दिलेली होती.
आणि नंतर असेच उल्लेख राहिलेले गीत, चित्रगुप्तचे लताबरोबरील 'आ जा रे, मेरे प्यार के राही'.. ह्यातील काही जागा कपूरने सुंदर घेतल्या आहेत. तसेच रविचे 'आप आयीं, तो ख़याले दिले नाशाद आया' हे अप्रतिम गीत!
रफी, मुकेश, तलत ह्यांच्या शैली, त्यांच्या आवाजाच्या पोती अगदी विभिन्न होत्या. त्यामुळे, मुकेश व तलत ह्यांचे नीश तयार झाले. रफीच्या आवाजाची रेंज, तसेच विभीन्न प्रकारच्यी गाणी लीलया गाण्ञाच्या त्याची हातोटी अप्रतिम होती, त्यामुळे तो, गुरू दत्त व दिलीपकुमार ह्याजपासून थेट जॉनी वॉकर, व मेहमूद ह्यांची गाणी तितक्याच सहजतेने गात होता. महेंद्र कपूरच्या आवाजाचा व गाण्याच्या स्टाईलचा बाज रफीसारखा असल्याने तो अर्थात रफीसमोर राहू शकला नाही. 'बी. आर. चोप्रांनी त्याला साथ दिली' म्हणण्यापेक्षा चोप्रांनी त्याला आपल्या संस्थानात सामावून घेतला, असे म्हणणे उचित ठरावे. ह्यामागे अनेक कारणे असू शकतील-- कमर्शियल कारण प्रकर्षाने माझ्यातरी (कदाचित उगाच!) मनात येत रहाते. ह्या चोप्रांनी प्रमुख संगीतकारांना बाजूस ठेवून, एन. दत्ता, आणि नंतर तर चक्क रवी ह्यांनाच हाताशी धरले, ह्यात त्यांची बिझीनेस रिस्क होती, व ती बर्यापैकी यशस्वी झाली.
तेव्हा 'प्रतिरफी' असल्याने महेंद्र कपूर रफीपुढे झाकोळून गेला. चोप्रांसारखी गायक गायिकांच्याही बाबतीतील रिस्क इतर निर्माते घेण्यास तयार नसावेत बहुधा. पुढेपुढे तर, त्याच्या व आमच्या दुर्दैवाने त्याची अनेकानेक बोअर गाणी रवी व आपणच दर्शवल्याप्रमाणे, कल्याणजी- आनंदजींनी गाऊन घेतली.
महेंद्र कपूरचे उत्कृष्ट गीत, वसंत प्रभूंचे 'अबोल झालीस का, साजणे?' हे होय.
बाय द वे, 'हे चिंचेचे झाड' मधील हिंदी उच्चार [चिंचेचे']आजच्या पिढीला खटकेनासे झालेत काय?
कोणत्याहि गायकाची 'कोणाचातरी आवाज' अशी ओळख असायलाच हवी असे मला वाटत नाही. कोणाकोणाचे आवाज म्हणून का ओळखलं जावं? महेंद्र कपूर हे कोणाचा आवाज म्हणून ओळखले गेले नाहीत ही तर त्यांची जमेची बाजू! रफी, मुकेश, किशोरकुमार ह्यांचे आवाज अद्वितीय असुनही संबधित नायकाचे नाव त्यांच्या आवाजाशी जोडले गेले. ह्यामुळे त्या त्या गायकाला थोडा उणेपणा आला. असे व्हायला नको होते.
रफी, मुकेश, किशोरकुमार ह्यांचे आवाज अद्वितीय असुनही संबधित नायकाचे नाव त्यांच्या आवाजाशी जोडले गेले. ह्यामुळे त्या त्या गायकाला थोडा उणेपणा आला. असे व्हायला नको होते.
प्रतिक्रिया
मस्त गाणी आहेत.
वाहवा!
आभार :)
सेम हियर! - (आनंदी) सोकजी
उत्तम लेख
लेख आवडला.....
+१
धन्यवाद :)
अप्रतिम लेख !
“बीते हुए लमहों की कसक साथ तो होगी”हे गाणं नेहमीच काळजाला भिडतं !+११११
लेख आवडला.. तुमच्या विचारांशी
आवडला लेख .
लेख आवडला ..........
लेख आवडला.
लेख आवडला. मला कायम लक्षात
अतिशय सुंदर लेख. खूप आवडला..
स्वागत आहे...
धन्यवाद
जयवंत कुलकर्णी
जाळुन टाकणार्या थंडगार अ
का कुणास ठाऊक पण महेंद्र कपूर
अप्रतिम लेखन.
महेंद्रकपूरची काही गाणी श्रवणीय आहेत पण
व्वा
लेख आवडला
अप्रतिम लेख!
धन्यवाद हा ब्लॉग माझा नाही.
धन्यवाद!!!
अरे वा! मस्त लेख. आमच्या
अरे वा.
सुंदर लेख..
लेख आवडला
काही राहून गेलेले
मराठीतील राहून गेलेले
जय संतोषी मां चे एक गाणे देखील
कोणत्याहि गायकाची 'कोणाचातरी
'कोणाकोणचा आवाज'
आपण म्हणता ते खरं आहे.