Welcome to misalpav.com
लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अरेच्चा! सर्वात महान वाक्प्रचार कोणी सांगितलेच नाहीत अजून, १. अभ्यास वाढवा! २. मोठे व्हा! - (मिपाकर) सोकाजी

सोक्या !! अरे ते " भरपुर कॉम्प्लॅन प्या , मोठ्ठे व्हा " असे आहे. ( नको आठवण काढुस रे प्लीज :( )

अगदी हेच टंकायला आलो होतो :) (माझ्या अंदाजे, ते 'बशीवला' होते, बसवला नव्हे)

या विषयावरील जुने धागे बादवे आजकाल माझा पण बरेचदा (फोटु दिसत नाहे फेम) गणेशा होतो ;-).

तुझी बुकं न्हेऊन घाल बारा गडगड्यांच्या हिरीत! हिते काय लिंग्विस्टिक्सचा अभ्यास कराय येतो का?

मुद्दा कोण काढलाय ते बघा की, आपल्या टीममधल्या बॉलरचा नोबॉल पण इग्नोर करणार तर औघड आहे बॉ. बुके कुणाची तेही बघा जरा =))

तिने बिचारीने सरळ सांगितलं. यल्ल यम्म एवढी कठीण अक्षरं कशाला बोल्तोस तू? तुला तरी यल्ल काढता येतो का पाटीवर?

सर्वप्रथम: बुके आमची नाहीत त्यामुळे व्हिरीत बुके तिची घाला =)) नोबॉल तर पडलाय पण मान्य करवेना =)) बाकी पाटीपेणसल द्या, यल्ल यम्म काय क्ष्ळ त्र्प्फ ज्ग्द्ड पर्यंत सर्व अक्शरे काधुन दाखवतो.

पाटीपेणसल द्या मज आणुनी त्यावर गिर्वीन अश्शी अक्षरे मास्तर म्हणती कोंबड्या-पाय बरे आणिक जुळवीन भलती गणिते बघुनी पब्लिक बेशुद्ध पडते पाटीपेणसल द्या मज आणुनी

पाटीवरती काढीन चित्रे पाहुनी रेघा भितात पितरे भूगोलातील ओहोटी भरती लिहिता पोरे हसून मरती पाटीपेणसल द्या मज आणुनी

आपुल्या सहीत हायपरलिंका , दुसर्‍यांच्या प्रोत्साहनार्थ टाकु पिंका मराठी बांधवांच्या कौतुका , केलेचि पाहीजे !!!
क्या बात है! गिल्टी अ‍ॅज चार्जड!