Welcome to misalpav.com
लेखक: वाह्यात कार्ट | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य आणी दिव्य... ;) ते असो... मी पण धूम शिनूमापाई येडा झाल्तो आनी मंग येलिमिनेटर घेतलीवती. त्याणंतर लै जबरी किस्सा घडलावता !
झैरात...झैरात...झैरात
=)) तर किस्सा असा,आमी आमच्या धोतारछाप-भटजी वेषात सांजच्या टायंबाला येका कार्यालयात शिमांतपुजणाला चाल्लो व्हतो.आनी त्यो आपला डेक्कनचा झेडब्रीज नव्ह का...,,, त्येच्यावरून माज्या नीलंसुंदरीयेलमीन्येटर(ब्याट्या-शब्द बग रे!!! ;) ) संगं चाल्लोवतो. तेव्हढ्यात येक पल्सरवरचा मानूस(विंडीयन येक्सप्रेसचा येक रिपोर्टर-अनिरुद्ध राईच) माला हाका मारून थांबवाया लागला. म्या थांबलू .. म्हन्लं,"का वो रस्त्यात थांबिवता?" मंग त्यानी आमाला बरुबर ह्येरल्येलं असल्यामुळं "गुर्जी कवा भेटू मंग?" असं इचारलं..णंतर त्यो भेटला. त्येच्या फोटू ग्राफरनी आम्चा आमच्या लाडक्या बाय'को सकट फोटू काडला. आनी २५ का २६ च्या फेपरात(पुणे हेराल्ड..टाइम्स ऑफ इंडीया२५/२६..१०/२००४) आमच्या फोटू सकट आम्ची,म्हंज्जे आम्च्या धंद्याची त्याणी कव्हरश्टोरी छापली. लै भारी लिवलवतं बेन्यानं =)) तवाचा यक शिनूमा "द डी कंपणी" च्या धर्तीवर त्याणं आम्हा गुर्जींची "द जी कंपणी" असा मथळा दीऊन धमाल उडवून दिल्ती. http://www.sherv.net/cm/emo/happy/too-happy-smiley-emoticon.gif मंग काय त्याच्या णंतरचे दोण..तीण दिवस आमचा शारुकखान झाल्ता. http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif रस्त्यावं/शिग्नलला लोक आमाला "लै भारी बर्र का प्येपरातला फोटू आनी श्टूरी" अश्या कॉमेंटी द्यायचे! लै मज्जा वाटायची तवा. येकतर तवा येलिमिनेटर मंजी किंमत बी लाखात व्हती... आनी त्या बजाज वाल्यांनी अव्हेंजर ह्ये तिचं देशी मॉड्येल बी बाजार'ला आन्लं णव्हतं . त्यामुळं रस्त्यावर दिसायला,तशी बी ती लाखात येक! त्यातनं येखाद्या भटजीनी ती "घ्यावी" ह्येपन लाखात येकच! आनी त्येच्याहून फुडं तिचा भटजीसकट प्येप्रात फोटू..मंजी त काय..आम्च्या णशिबात ह्ये कित्तेक लाख...आणी आम्च्या धंद्यातली बाकिची भटं जळूण खाक. =)) त्येच्यामायला त्याणंतर आठवडाभर आमी णिस्ते आस्मानात तरंगत हुतो! http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif लय बोल्लो.. अता बास आमच्या आत्मस्तुतीचा तास...
आनी तुमी बगा ह्यो फोटू खासमखास...आम्ची मुलाखत घ्येवुण केल्येल्या शब्दांकना-सह
https://lh3.googleusercontent.com/-fxzfC-onmaw/UqCXjeU9hxI/AAAAAAAACc4/y5l6hRisjEY/w520-h499-no/IMG_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AB_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25A6.jpg

गुरजी म्या येलिमिनेटर वर मांडी घालून बसायचा इशय तरी काढला होता का? ;-) पण भारी दिसताव एकदम. आंक्षी आर्नोल्ड्शास्त्री . :-D

गुरजी म्या येलिमिनेटर वर मांडी घालून बसायचा इशय तरी काढला होता का? ;-) पण भारी दिसताव एकदम. आंक्षी आर्नोल्ड्शास्त्री . :-D

आई शप्पत!!! बुवा यू रॉक्स इंडीड!!!! फोटो लैच रापचिक आलाय :) यावर एक जबराट फ्लेक्सपण होऊ शकेल ;) सौथ पिच्चरचे हीरो म्हणूनही शोभाल या पोजमध्ये. कोण आहे फटूग्राफर खरंच, नाद खुळा काढलाय फटू.

हाहा. अगदी अगदी. बाकी बुवांनी पण तो फोटू फ्रेम करून मर्मबंधातली ठेव असल्यागत जपून ठेवलेला दिसतोय.

अरे नाव यमी म्हणून हरितात्यामधल्या यमीपर्यंत नेले रे कल्पनासूत्र. बाकी कै नै. अन या यमीच्या गोरेपणाबद्दल बोलायचं तर शॉकाब्सर नळकांडी बघ पुढची ;)

काय एकेकाच्या प्रतिभांना बहर आलाय! आहाहा! योग्य जागी पण वापरत जा हो. ;) बाकी मदनबाण ने इतरांसारखं मी माझा मी माझा असं न करता फक्त बायडीचा फटु टाकला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

अर्ररर राजकुमार बघ मग. Smile पंकजपुत्राने हीच स्स्वीकारलीय पूर्ण चित्रपटात. हिरण्यचक्शु मागे बसल्यास कनिष्ठ चक्रास आसनस्पर्श होइलसे वाटते. Biggrin
हा उलघडा नुसता सिन्हा य एका शब्दाने झाला

असं म्हनू ने! साला सगळ्याला तुज्या येवडी शार्प पावर असती तर काय बोलाय्चं हुतं मं? आनि वरच्या जळण्याबद्दल तिजी भनं पडलं कड्यावनं! म्या कुडं जळ्ळो बे अभ्या कडू??? कवतुक केलो क व तु क. ;)

झालं, ठुसठुसलं ह्यांचं अध्यात्माचं गळू!! 'मी माझा मी माझा' म्हणे.

लेख आवडला. मग प्रतिक्रिया वाचल्या आणि लेख काय होता हेच विसरले मिनिटभर!

पण माझ्या प्रतिसादाच्यावेळी बहुतेक उषा नव्हती तेथे,असो आता आलीच आहे तर अनिरुद्ध पामराची काय खैर नाय (आता लपुन बसावे लागेलना,नाय्तर घरी माझी काय खैर नाय बगा अता माझ्या मिपाकर मित्राना मद्तीस धावावे लागेल)

ह ह पु वा =)) बाकी शिर्षक वाचून बाई आणि बाईक यांत पुरुषाला नेमकं जास्त कोण आवडतं (किंवा आवडायला हवं असं म्हणू आपण) या संभ्रमात; पुढील कारणांमुळे : (ह. घ्या) १. बाईकला आपण कितीही वेळा किक मारू शकतो. ती बिचारी काही बोलत नाही. २. नेहमी आपणच बाईकवर बसतो. बाईक आपल्या डोक्यावर कधीच बसत नाही. ३. बाईकचा कान जितका पिळाल, तेवढा ती बिनतक्रार वेग वाढवते. ४. नियमित आंघोळ, खाण्या-पिण्याचे लाड आणि गरजेनुसार तेलाची मालीश सोडून बाईक सहसा कोणत्याही मागण्या करत बसत नाही. ५. मूड खराब झाला की बाईकबरोबर एक शांत फेरफटका मारून यायचं. मस्त वाटतं. ६. बाईक पसेसिव्ह नसते. आपण इतर कुणाच्या बाईकवरून राऊंड मारायला गेलो तर आपली स्वतःची बाईक उगाच बसल्या बसल्या जळत नाही. इत्यादी इत्यादी इत्यादी...

सुरेख .. प्रतिसाद वाचून मजा आला... ए़कूण मायबोलीचे भवितव्य उज्ज्वल आहे. एवेढे बोल्लोन मी माझे ४ शब्द संपवितो.