=)) मज्जा आली ,
बाय द वे .... आम्हि कि नै शक्यतो कांदेपोहे न करता शिरा करायचो , भय्यानक साखर घालुन
तोंडात घालवनार नै इतका गोड =))
पोरं गुपचुप खायची , न आइबाप तोंडं वाकडी करायचे =))
सॉल्लिड होते ते दिवस यार ... मी जाम मिस करते ... कधी कधी तर दर संडे ला पोरं
बघायचा पोग्राम असायचा ... घरी बघायचा न मग मॉल मध्ये आणखी बघाय जायचं =))
आत्ताहि बघते म्हणा , पण ती मजा नै :-/
भरुन वगैरे आल हो चिन्मय!
दिसण्यावरुन जे मुली नाकारतात ना त्यांना माझा एकच सवाल," ती लेडी डायना एखाद्या स्वप्नापेक्षा सुंदर होती. मग का नाही तिचा संसार सुखाचा झाला?" अर्थात येथे तिचा काही दोष नाही पण लावायचाच म्हंटला क्रायटेरिया तर दिसण्यावरुन ती जगातली अतिशय सुखी बाई हवी होती.
"बास का ओ, दिसण्यावरून तर मुलीही नाकारतात मुलांना."
"इंग्लिश फ्लुएंट" आले नाही तरी पण...हॉटेलात भेटल्यावर मुलाने बील ५०-५० केल्यावर पण
च्यायला काहीही मनाचे श्लोक असतात पोरींचे
तरीही नुसत्या दिसण्यावरुन जोडीदार नाकरणार्यांना...अस म्हणु या. >>
हा हा हा
तुला आश्चर्य वाटेल या गोष्टीच ....तिच माझ्यावर प्रेम होत ( हं विचार ! चिचार !! माझ कितव होत), हे तिने कबुल ही केले होत आणि लग्नाला नकार का द्याव माहीत आहे का ? माझी उंची जास्त आहे म्हणुन =)) मी चक्कर उएवुन पडलो होत हे एकुन
Stuart: Are you crazy? That helmet’s signed by Robert Downey Jr.
Leonard: So?
Stuart: Okay, if you’re going to question the importance of an actor’s signature on a plastic helmet from a movie based on a comic book, then all of our lives have no meaning!
अशीच एक भेटलेली मुलगी खूप काही सांगून गेली.... तिचेच शब्द ऐकवायचे तर "मला घरकामाचा किंवा नोकरी चा काही प्रोब्लेम नाहीये... सगळ आवडीने करेन... फक्त एकच अपेक्षा आहे .... रात्री सगळ आवरून मी जेव्हा झोपायला येईन बेडरूम मध्ये, तेव्हा माझ्या नवऱ्याने इतकंच म्हणावं कि 'किती दमलीस गं तू, सगळ्याचं सगळ करून खूप दमायला होत असेल ना गं ?? '
इतक जरी तो म्हणाला तरी मी आयुष्यभर काही न मागता राहीन ...."
इतकं सरळ आणि साधं मागणं ?? यात तर काहीच गैर दिसेना ….
याच मुलीला का नाही पसंत केलंत मग ? का ती दिसायला फारशी चांगली न्हवती ? ;)
चेष्टाहो हलके घ्या.
माझ्या मित्रासाठी स्थळं सांगून येत होती त्यांच्या अपेक्षा (??) ऐकून डोक्याचे स्क्रू फिरायची वेळ आली होती त्याला.
उदाहरणार्थः
मुलगा अमेरिकेत`च' पाहिजे (फारंच साधी अपेक्षा)
मॅनेजर किंवा त्यावरील डेसिग्नेशन हवं (स्वतः बँकेत क्लर्क)
किमान १ लाख रुपये महिना `टेक होम' पाहिजे (राग युक्त हशा - `ल्लायकी आहे का रे...' (तो मला विचारी))
वडील बिजनेसमन हवेत (लाँग टर्म विचार आहे या मुलीचा)
`पॅकेज' चांगलं हवं म्हणजे १५ किंवा त्यापुढेच. पर्क म्हणून गाडी असावी. (हे मागणारी स्वतः एक `पार्सल' होती हा भाग वेगळा)
यावर खरं तर एक दिवस सविस्तर लिहायचंय. बघू.
पण तुमच्या लेखांतील शेवटच्या विचाराशी काही अंशी सहमत. `गुण' कितीही जुळले तरी नंतर `गुण' दिसायला लागल्याची उदाहरणं अनेक आहेत. तेंव्हा हा `गुणा'कार जपून करायला हवा.
या निमित्तानी गेल्या सहा वर्षात आमच्या "झालेल्या" मुलाखतींचा ढोबळ ग्राह्यांश--
प्रत्यक्ष संवाद रुपात...
ते-(हे जे ते असतात..ते तिचे वडील काका मामा इत्यादिंपैकी बोलायची धमक असलेले,असे निवडून अणलेले असतात.).........
प्राथमिक प्रश्न झाल्यानंतर..
ते- गेली किति वर्ष हे काम करताय आपण?
आंम्ही- १६ वर्ष..
ते- अस्सं... घर तुमचं एकट्याचच आहे का?
आंम्ही- हो! फक्त पुढची ११वर्ष एका बँकेचा सहभाग आहे त्यात!
ते- हॅ..हॅ..हॅ.. रोखठोक हं अगदी..चालायचच.. काळाची गरज आहे ती!
ही आर्थिक चाचपणी झाल्यावर तिचे प्रत्यक्ष किंवा या "बोलवित्या" कडून आधीच तयार ठेवलेले अप्रत्यक्ष/आडून येणारे प्रश्न सुरु होतात.
त्यातला शालेय शिक्षण किती? हा व्यावसाईकाच्या आयुष्यातला निरर्र्थक प्रश्न विचारला जातो...
आंम्ही- "दहावी ना'पास" असे उत्तर दिले की.. १२वी अथवा बि.कॉम. असतं तर बरं..असं तक्रारवजा उत्तर येतं..आपल्या मनात त्यावेळी (कश्शा...ला....??????) असा जोरदार अवाज येत असतो. नंतर ह्या धंद्याशिवाय "दुसरं" काही "करत" नाही का? हा एक प्रश्न असतो... हा प्रश्न-भटजी...फोटोग्राफर..अचारी...फास्ट्फूड व्यावसाईक..छोटे दुकानदार..न्हावी...टेलर...अश्या सर्व छोट्या व्यावसाईकांना येतोच! कारण मूळ व्यवसाय सामाजिक प्रतिष्ठेच्या समजांनुसार बेटिव्यवहारासाठी "टुकार" कॅटॅगरीत मोडत असल्यामुळे..त्यावर हे "दुसरं" कलम "हवं" असतं... म्हणजे आमच्या सारखा भटजी असेल,तर चांगल्या उत्पन्नाचा मूळ स्रोत लपवून-"चांगला विमा एजंट आहे,आणी(राहिल्या वेळात) भिक्षुकी सुद्धा करतो" हे सांगायला हवं असतं.
असो...!
सहजिवनासाठी हवे असलेले- "अनुरूपता आणी प्रीती" हे प्रथम पहायचे दोन घटक सोडून जो होतो... तो विवाहच काय? खराखुरा शरीर-संग'ही नव्हे... या मतावर (वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण पहाता) आंम्ही ठाम आहोत! :)
खुसखुशीतपणा आवडला.. आणि प्रामाणिकपणे मांडलेले विचारही पटले..
दिसणे अगदीच विजोड जोडी दिसू नये इतपतच असावे, पण ते तितपत असावे हे देखील खरे.
बाकी गुण-स्वभाव कळायला आणि जुळायला लवमॅरेज बेस्ट, ते देखील आधी मैत्री आणि नंतर त्याचे प्रेमात रुपांतर होणे आणखी बेस्ट. अन्यथा डायरेक्ट प्रेमात पडतानाही दिसण्याचे आकर्षणच जास्त काम करून जाते. आंतरजालावर सोशलसाईटवर मैत्री मग भेटून ती मैत्री वाढणे अन अलगद प्रेमात रुपांतर हे मला जास्त आयडियल वाटते. माझे असेच झालेय आणि विश्वास ठेवा यासाठी खूप नशिबवान समजतो स्वताला.
माझ्या ओळखीत एक मुलगी अशीच सोशल साईटवरून गप्पा होऊन एकाच्या प्रेमात पडली. दोघेही बेंगलोरमधे रहातात असं कळलं, मग गाठीभेटी झाल्या. मुलीने त्याच्याशी लग्न करणार म्हणून हट्ट धरला. तिचे वडील आमच्या बँकेत मोठ्या पदावर होते. या मुलाचा त्याना संशय आला, पण त्यांच्या विरोधाला न ऐकता ते लग्न झालं. लग्नात मुलाच्या बाजूचे कोणी आले नाहीत. कोणाचा तरी मृत्यू झाला असं कारण सांगितलं गेलं.
३-४ महिने संसार झाला. नवरा अधून मधून बिझिनेसच्या निमित्ताने कुठे कुठे जातो असं सांगायचा. ती मुलगी डेंटिस्ट्री शिकत होती. प्रेग्नंटही झाली. आणि अचानक एक दिवस ती चेक अपला गेली असताना नवरा तिचे सगळे दागिने, घरातले पैसे घेऊन गायब झाला. आल्बममधे स्वतःचा एकही फोटो ठेवला नव्हता. पोलीस चौकशी सगळं झालं. मुलीचे काका कर्नाटकातील राजकारणात बडी आसामी. पण काही उपयोग झाला नाही. त्या नवर्याने जो पत्ता, कंपनी वगैरे सांगितलं होतं, तिथे या वर्णानाचा कोणी माणूस कधीही नव्हता असं निष्पन्न झालं.
नंतर तिच्या वडिलांनी तिला बराच आधार दिला. आज ती डेंटिस्ट झाली आहे. एक छान मुलगा आहे. पण तिच्या आयुष्यात हा धक्का बसला त्यामुळे आता कधीही लग्न करणार नाही म्हणते. :(
२०/२१ वर्षाच्या मुलीला जगाचा कितीसा अनुभव असणार आहे? आणि ३/४ महिने घर चालवण्याइतके पैसे तो कुठूनतरी आणत होता. लवकरच घरच्यांना भेटायला गावाला जाऊया असेही सांगत होता.
फसणारे खरे तर कुठेही फसतात, अरेंज मॅरेज असो वा मॅरेज साईटवरना जमलेले असो, बाकी काळजी घ्यायची म्हटल्यास सोशलसाईटसवर आपले प्रोफाईल लॉक करून कोणत्याही अनोळखी इसमास एंटरटेन न करणार्या मुली देखील असतातच की, याउलट स्वताच अनोळखी मुलांनी आपल्या फोटोला लाईक केले तर लगेच हुरळून त्याच्याशी मैत्री करणार्याही असतात, माझा मुद्दा फक्त नाते कसे टप्प्याटप्प्याने उलगडत जाणे चांगले हा होता. आंतरजालावर झालेल्या मैत्रीनंतर तर एकमेकांना न भेटता त्या प्रोफाईलवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे लग्नाचा निर्णय घेणे अपेक्षित नसतेच.. :)
सोशल साईट मुळे घडलेला एक शॉट आठवला…फ्रॉपर नामक एका डेटिंग साईटवरून एका पोरीची ब्लाइंड डेट मिळाली होती…सुरळीत पारही पडली.
नंतर जवळपास १ वर्षांनी त्याच मुलीची पत्रिका आली होती घरी, पत्रिका जुळली नाही म्हणून कांदे-पोहे टळले…समोरासमोर आलो असतो तर कैतरी भारी सीन झाला असता नक्की :))
पैल्याच डेटला एनआयबीएन च्या सुफिज ला 'बसलो' होतो…आणि नंतर तीने त्याच ग्रुप मध्ये असलेल्या २-३ मित्रांना डेट केलं …एकंदर पोरगी वाढीव होती.
काही झेपले नाही. मुलीबद्दल नकारात्मक सूर वाटला. डेट ला गेली म्हणून, "बसली" होती म्हणून की नंतर २-३ मित्रांना डेट केले म्हणून? कारण यातील २ गोष्टी तुम्ही पण केल्या होत्या आणि संधी मिळाली असती तर तिसरी पण केली असती (किंवा केली असेलही). शिवाय ते वाढीव प्रकरण नाही कळले.
जनरली स्वभावापेक्षाही सवयी कळणे महत्वाचे म्हणजे घरभर पसारा करणारा किंवा करणारी अशी सवय असलेले जर एकत्र आले तर होणारी भांडणे का होतात? सवय वाईट म्हणून कि १०००००००००००.....एन टाइम्स सांगूनही सवय ना बदलण्याच्या स्वभावामुळे .....
लोच्या आहे राव....लग्न म्हणजे आतल्या बाजूला उघडणारी झडप आहे आणि आम्ही "झडप घालून" लग्न केले ना आता बसलोय....जाऊ द्यात झाले.
मला एक भेटली होती स्त्री पुरुष समानतावाली.
मला पहिल्या भेटीतच तिने सांगितले की ती जीन्स घालते, ट्रेक्स करते वगैरे..
मला त्यात काही प्रोब्लेम नव्हता.
मला जोपर्यंत ट्रेकला यायचा आग्रह करत नाही तोपर्यंत मी सुखी राह्यलो असतो...
मग नेहेमीचे दोन प्रष्ण केले तिने..
सिगारेट पिता का..
आणि पिता का ?
मी दोन्ही प्रष्णाला " हो" असे सांगितले.
त्यावर ती वैतागले असावी.
तिने पुढे विचारले की " का पिता ?"
मी प्रामाणिकपणे सांगितले की " सिगारेट पितो ती व्यसन म्हणून... दारू आवड म्हणून "
मग मी तिला विचारले.. " तुम्ही पिता का सिगारेट आणि दारू? "
तर भडकली.
मग सांगायला लागले की ताई जसं तू मला बघतेयस तसं मीही तुला बघतोय...
गेली शेवटी एकदाची.
प्रतिक्रिया
पुढे ??
लिखाण आवडलं
जमलेत कांदेपोहे .
मज्जा आली ,
ऒ एका वाक्याला एक स्मायली
पूजाबॉट की पवारबॉट =))
हायला...
उत्तम अन एकदम ब्यालन्स्ड लेख.
दरम्यान माझे दोनाचे चार हात झाले आहेत
छान लिहिलंय
एकातच संपलं?
ह्म्म्म !!
धन्यवाद
छान लिहिलंय!
भरुन वगैरे आल हो चिन्मय!
बास का ओ, दिसण्यावरून तर
"बास का ओ, दिसण्यावरून तर
हम्म्म! बदल करायला हवा.
तरीही नुसत्या दिसण्यावरुन
उची जास्त आहे?
Stuart: Are you crazy? That
:)
एका लग्नाची ४थी गोष्ट..
सुपर्ब! पुढे?
@कारण आधी बघितलेला फोटो आणि
कटु अनुभव
@. (हे मागणारी स्वतः एक
हे मागणारी स्वतः एक `पार्सल'
लेख फार आवडला
या निमित्तानी गेल्या सहा
असो...!
सहजिवनासाठी हवे असलेले- "अनुरूपता आणी प्रीती" हे प्रथम पहायचे दोन घटक सोडून जो होतो... तो विवाहच काय? खराखुरा शरीर-संग'ही नव्हे... या मतावर (वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण पहाता) आंम्ही ठाम आहोत! :)अनुरूपता आणी प्रीती" हे प्रथम पहायचे दोन घटक सोडून जो होतो...
बघा कशी गंमत आहे. आंम्ही
>>>आंम्ही सांगतो,ते कसं चटकन
@सर नि गुर्जी मधला फरक. >>>
अगदि सहमत गुर्जि
+११११
वा वा छान छान
हा प्रश्न-भटजी...फोटोग्राफर.
छान लेख
तुमचं नशीब चांगलं
पुरुषाला जस्टिफाय करत नाही पण
मुलीचं वय काय!!
फसणारे खरे तर कुठेही फसतात,
सोशल साईट मुळे घडलेला एक शॉट
काही झेपले नाही. मुलीबद्दल
पुरुष विभाग काढावा हि
तो मान्य होत नाही तो पर्यंत
स्वभाव की सवय....
मला एक भेटली होती स्त्री
एकदम ताई? हा!हा!हा!
Pagination