मला स्वतःला दहन विधी अत्यंत भेसूर वाटतो ... लाल गुलाल, बुक्का, कणकेचे गोळे म्हणजे गेलेल्याच्या नातेवाईकांना दुख्खावर मीठ चोळल्या सारखे वाटते...
ख्रिश्चन दफन त्यामानाने जरा सोबर आणि गांभीर्ययुक्त वाटते...
अवांतर : पूर्वी 'मूठमाती' हा शब्द आपल्याकडे होता तो माणसांना लागू होता का?
"एखाद्या गोष्टीला मुठमाती देणे" हा वाक्प्रचार आपल्याकडे मुस्लीमांच्या दफनविधी वरुन आलेला आहे.त्यांच्याकडे अंत्यविधीला जमलेला प्रत्येकजण एक एक मुठ माती मृताच्याविषयी 'श्रद्धांजली' म्हणुन वाहत जातो, अशी पद्धत आहे...
( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. Smile )
अरेरे! ह्या उथळ विचारांनी विषयाचे गांभिर्य हरवले आहे.
देहदान, अवयवदान ही काळाची गरज आहे. आपल्या पश्र्चात ७ जणांना नवजीवन प्राप्त करुन देण्याची संधी नाकारून आपला निष्प्राण आणि एक व्यक्ती म्हणून कोणालाही कसलाही उपयोग नसलेला देह जाळून-पुरुन टाकणे मनाला पटत नाही. मी स्वतः, अवयवदान करण्याचा निर्धार केला आहे.
हिन्दू धर्मात छोट्या बालकांचा मृतदेह पुरण्याची प्रथा आहे.
अहो, ते गंमत म्हणून लिहिले आहे. शिवाय देहदान, अवयवदान प्रत्येकाला शक्य नाही. सगळे अवयव निरोगी असणे, जवळ त्याची सोय असणं आणि आपण मेल्यावर नातेवाइकांनी त्याबद्दल त्वरीत हालचाल करणं हे सगळं जमल्याशिवाय देहदान , अवयवदान शक्य नाही.
दहनाची कल्पना मलाही पसंत नाही पण मोठ्या लाकडी पेटीत ठेवून पुरण्याचे चोचलेही आवडत नाही.
मुळात जगताना केले तेवढे नखरे पुरेत असे वाटते. हत्ती जसे खोलवर जंगलात जाऊन एकांतात देह ठेवतात तसे करावे असा माझा विचार आहे. माझा देह पोसण्यासाठी अनेक जीवांचा बळी गेला आहे त्याची भरपाई उघड्यावर माझा देह प्राणी-कीटकांना खायला घालून करता येईल असे वाटते.
पारशी समाजात शहरातल्याच स्मशानभूमीतल्या कोरड्या विहीरीत नेऊन प्रेत टाकतात. तशी माझी कल्पना नाही.
जिथे मानवी वास्तव्य फारसे नसेल अशा जंगलात जाऊन मरावे थोडे प्राण्यांनी खावे व थोड्या शरीराचे कुजून खत व्हावे असे मला वाटते आणि तशी सोय आहे की नाही त्याने काहीही फरक पडत नाही. शहरात सगळं आयुष्य काढल्यावर मरायला तरी जंगलात जाता यावं एवढीच अपेक्षा; पण त्याआधीच अचानक फटकन मेलो तर घरचे काय करतील ते खरं
असो.
अशी किती जंगले उरली आहेत? आणि ती उरणार आहेत?
यातही पुन्हा आपले आजारी शरीर प्राण्यांनी खाऊन त्यांना काही इजा व्हायला नको. आजारी गुरांना दिलेल्या डायक्लोफाम औषधामुळे त्या गुरांचे शरीर खाल्ल्याने गिधाडे मरत आहेत. तसे काही व्हायला नको.
दहन काय नि दफन काय मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे २ मार्ग एवढ्याच नजरेने पहा..
आणि तुम्हाला रुचलेल्या वाटेने जा.. कायदा अडवायला येत नाही ..
बाकी राहिले फायदे तोटे.. एकात ईंधन लागते. दुसर्यात जागा अडुन रहाते.. लोकसंख्यावाढीमुळे इंधन संपणे जेवढे काळजीचे तेवढेच जागा संपणेही..
बाकी अवयवदान देहदान म्हटले तरी वापरलेला अवयव सोडुन कींवा विच्छेदन झाल्यावर विल्हेवाट ही लावावी लागतेच.
बाकी अवयवदान देहदान म्हटले तरी वापरलेला अवयव सोडुन कींवा विच्छेदन झाल्यावर विल्हेवाट ही लावावी लागतेच.
अगदी सहमत.
शिवाय तरुणपणी हिरिरीने अवयवदानाचा फॉर्म भरला तरी म्हातारपणा येईपर्य्ण्त त्यातील किती अवयव निरोगी रहातील हा विचार नको का करायला? की नुस्तं फॉर्म भरलं म्हणजे झालं ? ७०-८० पब्लिक हे कोणते ना कोणते अवयव बाद होऊनच मरत असतं . तरुण वयात अपघातामुळे कोमा वगैरे होऊन शरीर मरणार, पण इतर अवयव निरोगी आहेत, अशा एखाद्या केसमध्येच ते सात अवयवांचे दान वगैरे शक्य असते. प्रत्येकाला ही संधी मिळत नाही.
दहन श्रेष्ठ की दफन श्रेष्ठ हा मुद्दा इथे अपेक्षित नाहीच आहे. हिंदु धर्मात दफनाचा पर्याय मुक्तपणे उपलब्ध व्हावा , हा चर्चेचा मुख्य उद्देश आहे.
हिंदू धर्मात सगळे करायला परवानगी आहे... हिंदू धर्म काहीच म्हणत नाही. प्रश्न सेक्यूलर देशातील कायद्याचा आहे. मला वाटते भारतात स्मशानभुमी हा प्रकार धर्मानुसार आहे. म्हणजे भले दफनच करत असतील तरी मुस्लीम स्मशानभुमीत ख्रिस्ती लोकांना दफन करता येत नाही. इतकेच काय तिथल्या इमामांनी मला वाटते मुस्लीम सत्यशोधक समाज स्थापल्यामुळे हमीद का हुसेन दलवाईंना का अजून कुणाला आत्ता आठवत नाही, पण त्यांच्या मुस्लीम विरोधक विचारसरणीमुळे दफनाला जागा देणार नाही म्हणून सांगितले होते. ते तसे सांगू शकतात कारण कब्रस्तानावर मुस्लीम धर्मगुरूंचे म्हणणे चालत असावे.
वास्तवीक सेक्यूलर विचारवंतांनी स्मशानभुमी सेक्यूलर असावी म्हणजे धर्माधारीत नसावी अशी मागणी करायला हवी. एकाच स्मशानभुमीत दहन आणि दफनाची व्यवस्था जी अमेरीकेत अनेक ठिकाणी आहे. कदाचीत तथाकथीत सेक्यूलर विचारवंताना त्यात त्यांच्या विचारांचेच दहन अथवा दफन झाले तर काय अशी भिती वाटत असावी. ;) असो जोक अपार्ट...हा मुद्दा कायद्याचा आहे, आणि एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणत समोरच्याला धर्माच्या चष्म्यातूनच चुकीच्या कारणासाठी बघत निर्णय घेण्याच्या वृत्तीचा आहे.
हिंदू धर्मात सगळे करायला परवानगी आहे..
मी हा प्रश्न एका साधकाना विचारला होता. ते बोलले--- लहान मूल व संत याना देहाबद्दल असाक्ती नसते. म्हणून त्यांचे प्रेत पुरतात . इतरांची प्रेते जाळावीत म्हणजे आत्मा घुटमळत नाही ( म्हणे.) म्हणून अशी सोय आहे.
इतरांची प्रेते जाळावीत म्हणजे आत्मा घुटमळत नाही ( म्हणे.)
गंमत अशी की नेमके याच कारणासाठी ख्रिश्चनांमध्ये जाळत नाहित. ख्रिश्चन धर्मानुसार देव (आणि केवळ देवच) एखाद्या शरीरात परत जीव ओतायचे नाही की ते ठरवु शकतो. त्यामुळे शरीर जाळणे हे इश्वराच्या इच्छेविरुद्ध असेल (म्हणे.) (कारण मग देव ते शरीर परत पुनर्जिवित करु शकणार नाही) (म्हणे.)
इस्लाम मध्ये तर काय पुरावे हे अल्लाहनेच सांगितले आहे. त्यामागे काही कारण दिलेले नाही कारण अल्लाहला मर्त्य मानवांना नसते ज्ञान देण्याच्या भानगडीत पडायची गरजच नाही. त्यामुळे पुरायचे म्हणजे पुरायचे. का वगैरे विचारायचे नाहिच नाहितरी. एकदा अल्लाहने पुरायच म्हणुन सांगितल्यावर जाळणे वगैरे आपोआप निषिद्ध होते (म्हणे.) कारण ती पद्धती सांगितलेलीच नाही.
इतरांची प्रेते जाळावीत म्हणजे आत्मा घुटमळत नाही ( म्हणे.) म्हणून अशी सोय आहे.
हिंदू धर्मात साधक म्हणजे काय याची एकच व्याख्या होऊ शकत नाही. त्यामुळे उत्तरे देखील वेगळी मिळू शकतात. हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे (प्रथा-परंपरा-पंथ नाही) कुठलीही गोष्ट ही पंचमहाभूतांनी - "पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश"यांनी बनलेली असते. त्यात मानवी शरीर देखील आले. जेंव्हा निराकार प्राण जातो तेंव्हा तो परत निराकार आकाशाचा भाग होतो, जळणार्या मृतदेहातून, अग्नीत अग्नीचा भाग जातो, राहीलेल्या राखेतून पृथ्वी-आप आण वायू यांच्यात त्यांचे त्यांचे घटक परत निघून जातात.
ख्रिश्चनांमध्ये (भारतातील माहीत नाही पण असावे) पुरत असताना "Earth to earth, ashes to ashes, dust to dust" असे म्हणायची पद्धत आहे ती काही अंशी अशाच पद्धतीने पण त्यांच्या तत्वज्ञानाला/श्रद्धेला धरून आहे. त्यात "ashes to ashes" हा भाग केवळ बायबल मधे कुठून तरी आला म्हणून आहे.
ज्यू लोकांमधे मला वाटते पांढर्या चादरीत गुंडाळून (म्हणजे शवपेटी़का न वापरता) पुरतात. कारण देह मातीचा असतो आणि मातीत परत जाउंदेत ही श्रद्धा.
लहान मूल (साधार १२ वर्षाखालील) आणि संत (अथवा तसे स्वतःस समजणारे बुवा-बाबा) यांच्या बाबतीत दफन करण्याची पद्धत का आली माहीत नाही, कदाचीत भावनात्मक कारणाने पण आली असेल. ती देखील कायम वापरली जाते अशातला भाग नाही...
मरणोत्तर पार्थिव देह पर्यावरणाला शक्य तितकी कमी तोशीस देऊन नष्ट करावा असे वैयक्तिक मत आहे. विद्युद्दाहिनी वैग्रे भानगडी सोलार वरती किंवा एकूणच रिन्यूएबल एनर्जीवर चालवल्या तर उत्तम होईल. दफन करण्यात वाईट काहीच नाही पण जागा लै अडते. भारताची लोकसंख्या पाहता दफन सुरू केले तर रेसिडेन्शिअल फ्लॅटसारखे स्मशानातल्या स्पॉटच्या झैराती येतील- त्यात परत १ बीएचके, पेंटहौस, पिर्यामिड, इ.इ. नकोच ते. लिंगायत वैग्रे लोक संख्येने थोडे आहेत म्हणून चालते. पारशांची पद्धत तशी पाहता ठीक, पण मुंबै अन कराचीमध्ये शहराची लोकसंख्या वाढू लागताच आरोग्याचा प्रश्नही भेडसावू लागला.
बाकी देहदान योग्य पर्याय आहे. एक तर देहदान नैतर कमी खर्चिक दहन हेच पर्याय मला व्यक्तिशः ठीक वाटतात.
भारतात हिंदूंमध्ये दफनविधी नाहीच असे असे नाही म्हणता येणार,
राजस्थान,महाराष्ट्रात काही क्षत्रिय घराणी दफनविधी करतात. ओरिसा ,कर्नाटक येथेही काही हिंदू लोक दफनविधी करतात. पण ओव्हरऑल हिंदूंमध्ये हा टक्का १-२% असावा.
भारतात इतके प्रचंड वैविध्य आहे की सर्व प्रकार चालतात खरे.अशी "हिंदू थडगी" मात्र मी इथे पहिल्यांदाच पाहतो आहे. लिंगायत सोडून अन्य समाजांतील दफनाबद्दल माहिती नव्हती. एक अंत्ययात्रा पाहिली ती अजून आठवते आहे. मिरजेला शाळा संपवून परत घरी चाललो होतो. मार्केटमध्ये पाहतो तर लोकांचा एक जमाव, त्यामध्ये हातगाडीवर एक खुर्ची ठेवून त्या खुर्चीवर एक माणूस बसला होता. दृश्य अंमळ विचित्र वाटले म्हणून अजून जवळ जाऊन पाहिले तर तो खुर्चीवरचा माणूस मेलेला होता. पहिल्यांदा टरकली पण नंतर कळाले की लिंगायत समाजात हा प्रकार असतो म्हणून.
वरील थडग्यांचे प्रकार पाहता ख्रिश्चन प्रभाव जाणवतो आहे खरा.
दिल्ल्लीला जाताना ग्बालियर ते मोरेना या दरम्यान बाहेर नजर टाकली तर काही वास्तू अशा दिसतात. एका स्थानिकाला
विचारता त्य्याने ही दफने असल्याचे सांगितले होते.
देहदान हा पर्याय सोपा नाही.
मेडिकल कोलेजात १०० पोरे असतील , तर सहा लोकांमध्ये १ मढे लागते. म्हणजे १०० पोराना फार्फार तर २० मढी लागतात. ही मढी एका मोठ्या टँकमध्ये फॉर्मलिनच्या द्रावणात लोणचं घातल्यागत ठेवलेली असतात . भारतातल्या सगळ्या ८० कोटी लोकान्ना योग्य होईल असा हा पर्याय नक्कीच नाही.
अवयवदानचेही तसेच आहे. माणसाचे मढे ७० किलोचे असले तर दान देण्यायोगे अवयव खच्चुन १५ किलोचे निघतील. ते काढून घेऊन उरलेले ५५ किलोचे मढे नातेवाइकानाच साभार परत करतात. ते पुन्हा जाळावे किंवा पुरावेच लागते.
ए एफ एम सी मध्ये शवविच्छेदन करीत असताना आमचे प्राध्यापक डॉ. वि रा म्हैसुरकर( हे ग्रे ऐनाटोमीच्या पुस्तकाच्या लेखक वर्गातील एक होते) यांनी आम्हाला शवाबद्दल आदर बाळगावा अशी शिकवण दिली आहे. त्यांच्याच शब्दात हा मनुष्य मृत्युनंतर सुद्धा तुम्हाला शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. तेंव्हा कमीत कमी त्याच्या बद्दल अनादर दाखवू नका. कितीतरी लोक जिवंत असताना सुद्धा लोकांच्या उपयोगी पडत नाहीत.
शवविच्छेदन हे वैद्यकीय शिक्षणाचे अतिशय अहम असे अंग आहे. त्यासाठी पुरेसे मृतदेह मिळत नाहीत हि आजही वस्तुस्थिती आहे. जर त्याबद्दल गैरसमज दूर केले तर पुढच्या पिढीत उत्तम डॉक्टर होण्यास मदतच मिळेल. कितीजारी त्रिमितीतील पुस्तके आणि प्रतिरूपे(मॉडेल) असली तरी प्रत्यक्ष मृतदेहावर काम करून मिळालेले शिक्षण हे फार वरच्या दर्ज्याचे असते.
तेंव्हा "आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही " हे वाक्य मनाला पटले नाही.तसेच मृत माणसाच्या शरीराला "मढे" म्हटलेले पण पटत नाही.पार्थिव हा शब्द जास्त योग्य आहे असे मला वाटते.
मी स्वतः माझा देह जे जे रुग्णालयाला देण्याचे शपथ पत्र सही केलेले आहे. "आप मेलं आणि जग बुडालं".
मी एका शवविच्छेदनातून शिकलो ते ऋण काहीअंशी तरी परत व्हावे.
मृत शरीराला पार्थिव म्हणायचे असेल , तर तुम्ही जरुर म्हणा.
मढे या शब्दाचा डिक्शनरी अर्थ मृतदेह इतकाच आहे. मला संस्कृत मराठीपेक्षा सामान्य मराठी आवडते. म्हणून मी असे शब्द वापरतो. मढे शब्द मी वापरला याचा अर्थ मला त्याबद्दल अनास्था आहे, असा अर्थ काढायचा कुणालाही अधिकार नाही.
कितीतरी लोक जिवंत असताना सुद्धा लोकांच्या उपयोगी पडत नाहीत.
याची जाणीव आहे, म्हणूनच माझे मढे जमिनीत मिसळून सूक्ष्मजीवांनी त्यांचे कार्य करावे, ही माझी इच्छा आहे. बाबा आमटेंच्याही मृतदेहाचे त्यांच्या इच्छेनुसार दफन केलेले आहे. महात्मा फुले यांचीही त्यांच्या पार्थिवाचे दफन करावे, ही इच्छा होती. ( त्यांचे काय झाले ते माहीत नाही. ) . तलाश सिनेमातही तो येडा आमीरखान झाडाखालून करिनाची लाश काढून पुन्हा जाळून टाकतो, तेंव्हा मी त्याला मनोमन खूप शिव्या घातल्या होत्या. इतकं छान नदीकाठी फुलांच्या झाडाखाली मला पुरणार असतील तर मी आनंदानं धर्म बदलीन.
( या प्यारेग्राफात मढे, मृतदेह , पार्थिव, लाश हे सारे शब्द एकाच अर्थाने वापरलेले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. )
अर्थ एकच असतो पण एखाद्या वेश्येच्या मुलाला अनौरस संतती आणि हरामजादा म्हणणे यात जेवढा फरक आहे तेवढाच आहे.
पेरिले ते उगवते, बोलण्यासारिखे उत्तर येते
मग कर्कश बोलावे काय निमित्य
असो आपले विचार आपल्यापाशी.
शवाबद्दल आदर बाळगावा अशी शिकवण दिली आहे. त्यांच्याच शब्दात हा मनुष्य मृत्युनंतर सुद्धा तुम्हाला शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. तेंव्हा कमीत कमी त्याच्या बद्दल अनादर दाखवू नका. कितीतरी लोक जिवंत असताना सुद्धा लोकांच्या उपयोगी पडत नाहीत.
शवविच्छेदन हे वैद्यकीय शिक्षणाचे अतिशय अहम असे अंग आहे. त्यासाठी पुरेसे मृतदेह मिळत नाहीत हि आजही वस्तुस्थिती आहे. जर त्याबद्दल गैरसमज दूर केले तर पुढच्या पिढीत उत्तम डॉक्टर होण्यास मदतच मिळेल. कितीजारी त्रिमितीतील पुस्तके आणि प्रतिरूपे(मॉडेल) असली तरी प्रत्यक्ष मृतदेहावर काम करून मिळालेले शिक्षण हे फार वरच्या दर्ज्याचे असते.
तेंव्हा "आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही " हे वाक्य मनाला पटले नाही.तसेच मृत माणसाच्या शरीराला "मढे" म्हटलेले पण पटत नाही.पार्थिव हा शब्द जास्त योग्य आहे असे मला वाटते.
शवाबद्दल आदर बाळगावा
शवाबद्दल आदर बाळगणे हे कुठ्ल्याही सुसंस्कॄत व्यक्तीत आणि समाजात दिसते.
मरणान्तानी वैराणी निवृत्तम नः प्रयोजनम।
क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव।।
मला वाटते बिभिषणास आणि लंकेच्या जनतेस उद्देशून): (शत्रूस) मरण आले आता त्याच बरोबर शत्रूत्व (वैर) देखील संपले. आता तो (रावण) माझा देखील आहे जसा तो तुमचा.
ओसामाला मारल्यावर त्याची समाधी होऊ नये म्हणून "बरीअल अॅट सी" केले गेले पण मुल्लाकडून विधिवत. तेच कसाबचे केले गेले आणि तेच अफजल गुरूचे देखील...
१. ( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. Smile )
हे वाक्य देहदान अथवा अवयवदान या सारख्या फार उपयोगी आणि स्त्युत्य गोष्टींबद्दल सर्वसाधारण लोकांत गैरसमज आणि वैचारीक गोंधळ निर्माण करणारे आहे. केवळ "गम्मत (?!)" म्हणूनही असे करणे एका वैद्यकीय व्यावसाईकाकडून तरी अपेक्षित नव्हते.
याबतीत "प्रभाकर पेठकर" यांच्या प्रतिसादाशी १००% सहमत
२. दहन-दफन या विकल्पांबद्दल "बाळ सप्रे" यांनी किमान शब्दात चपखल प्रतिसाद दिला आहे.
त्यांत अजून थोडी भर अशी की माणूस म्हटला म्हणजे त्याच्या इछा-भावना आल्याच... मग त्या मेलेल्या माणसाच्या असो अथवा त्याच्या जिवंत नातलगांच्या. सभ्य समाजात माणसाच्या प्रेताला केवळ एक बिघडलेली, बंद पडलेली अथवा टाकावू गोष्ट समजली जात नाही, ते याकरताच. युद्धात मारलेल्या शत्रूचे प्रेतही सन्मानाने वागवले जाते तेही यासाठीच. तेव्हा भावनांना "योग्य तेवढे" (आणि केवळ तेवढेच) महत्व देऊन जशी इच्छा असेल तशी आणि जसे जमेल तशी प्रेताची विल्हेवाट लावण्याचे स्वातंत्र्य भारतिय घटनेने सर्व नागरिकांना दिलेले आहे. त्या कृतिचा काही बेकायदेशीर, व्यक्तीविघातक अथवा समाजविघातक परिणाम झाला तर सद्याचा कायदा त्या बाबतीत कारवाई करायला सक्षम आहे. यात धर्म मध्ये आणून वाद घालणे म्हणजे वितंडवादच होईल.
३. लाकडे जाळणे आणि दफनाने जमीन व्यापणे अथवा दूषित करणे यापेक्षा विद्युतदाहिनी हा एक चांगला पर्याय हल्ली शहरांत उपलब्ध असतो.
दहन केल्यानंतर त्या देहाची झालेली "राख" नातेवाईकांना तत्काळ पहायला मिळते, आणि तुम्ही ज्या व्यक्तीसाठी इतका शोक करत आहात, त्या देहाचे आताचे अस्तित्व केवळ "माती" एव्हढेच आहे, या भावनेने माणूस दु:खातून लवकर सावरतो असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.
पटलं. खालचा माहितगार ह्यांचा प्रतिसाद देखील आवडला.
बाकी अवयव/ देहदानांमध्ये वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये सुद्धा योग्य तर्हेनं वापर केला जात नाही असं ऐकिवात आहे. वैद्यकिय महाविद्यालयं जनरली ट्रस्ट किंवा सरकारी इस्पितळांशी संलग्न असतात नि त्यांचा कारभार बर्यापैकी भोंगळ असतो.
मध्ये स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. मुंडेनी मृत भ्रूणांची विल्हेवाट लावायला कुत्री पाळली होती असं ऐकलं आहे. तसाच प्रकार अवयवांचाही होतो (भटके कुत्रे व्हिसेरा खाणं इ.इ.) असं बातम्यांमध्ये बघितलंय.
दहनानं व्यवस्थित 'माती' होते. दफन केल्यावर त्याच जागी दुसर्या मृतदेहाचं दफन होतं का? भावनिक गुंता होत असल्यानं विरोध होत असेल का?
बाकी पारशी लोकांसारखं नैसर्गिक विल्हेवाट लावणं ह्या प्रकारासाठी शहरां मध्ये हल्ली गिधाडं अथवा मांसाहारी शिल्लक नाहीत असंही ऐकलं आहे.
दफन केल्यावर त्याच जागी दुसर्या मृतदेहाचं दफन होतं का?
होय. जर त्यावर कायमस्वरुपी शिभ्वंत शिळा वगैरे नसेल, तर पुन्हा तिथेच उकरुन १०-२० वर्षानी नवी मढी पुरता येतात . मध्यंतरी मोहम्मद रफी, मधुबाला यांच्या कबरी नष्ट केल्या गेल्या अशी काहीतरी बातमी वाचली आहे.
इतिहास पुर्व काळातील उत्खनात दफनविधीच होत असे असे पुरातत्व पुराव्यांवरून दिसून येते पण नंतर केव्हातरी दहन संस्कारांची सुरवात झाली.भारताच्या काही भागात गंगेत सोडून दिले जात असे.तर मंगोलीयात म्हणे उंच डोंगरांवर मोकळेच सोडले जाते आणि पक्षी हे मृत मानवाचे मांस खातात. हे पक्षी बाकी कुठे कुठे स्थलांतरीत होऊन मेल्यानंतर इतर प्राण्यांच्या अन्न साखळीत जाऊन माणसांकडे साथीचे आजार परत आणू शकत असणे कसे नाकारणार ?
१) दहन केल्या नंतर बरेच संसर्गजन्य आजाराचे जिवाणू विषाणूंचे मातीत पुन्हा मिसळले जाणे कमी होत असावे. दफन प्रकारात जिवाणू विषाणूंचे काही वर्ष/दशक/शतकांनतर दुसर्या प्राण्यांच्या अन्न्साखळीत जाऊन मानवापाशी पुन्हा परतू शकतात
२) दफन प्रकारातही दफनपेट्या आणि जागेची किमंत या बाबी बर्याच महागड्या ठरून दफनविधी लग्नखर्चापेक्षाही महागडे होतात असे ऐकून आहे.
तुम्ही जी चर्चा घडवुन आणत आहात त्यातील कोणता प्रकार तुम्ही अबलंबणार आहात. कारण हिंदु धर्म पध्दतीत दहन व दफन दोन्ही गोष्टी केल्या जातात.मेल्यानंतर काय करावे हे ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो.तुम्ही तुमच्या म्रुत्युप्रत्रात तसा उल्लेख करा म्हणजे झाले.
(संपादित)
विल्हेवाट नीट लावली जात नाही . आमच्याइथे देहदान केलेल्या व्यक्तीचे देह गच्चीवर आणी पाण्याच्या ड्रमात सडायला ठेवले . बातमी फुटल्यावर अभ्यासासाठी असे केल्याच्या दावा केला . एक ही अवयव काढला नाय
देहदान केलेला देह मेडिकल कॉलेजात अनेक पद्धतीनी वापरतात. फॉर्म्लिन ट्यांकात घालून ठेऊन डीसेक्शनसाठी वापरणे, त्यातील मांस लवकर नष्ट करुन त्याचा केवळ बोनसेट करणे, सरफेस मार्किंग शिकण्यासाठी देह वाळवून वापरणे , एखादा अवयव चांगल्या तज्ञाकडून डिसेक्शन करुन तो पार्ट परिक्षेला ठेवण्यासाठी वापरणे, म्युझियमम्ध्ये ठेवण्यासाठी स्पेसिमेन तयार करणे इ इ .
डिसेक्शनसाठी संघाच्या 'आरम' अवस्थेत वारलेले देह अधिक उपयोगी पडतात. देह पाचपन्नास ठिकाणी सांध्यात वाकून मेलेला असेल तर नव्या मुलाना डिसेक्शन करणे अवघड जाते. शिवाय आतील अवयवांची रिलेटिव्ह पोझिशन समजून घेणेही अवघड बनते.
प्रतिक्रिया
मान्य आहे
मुठमाती देणे
अवयवदान करा.
.
दहनाची कल्पना मलाही पसंत नाही
हो..तशी सोय आहे
पारशी समाजात शहरातल्याच
अशी किती जंगले उरली आहेत? आणि
किती हा निराशावाद!
दहन काय नि दफन काय मृतदेहाची
.
कायदा
.
इतरांची प्रेते जाळावीत म्हणजे
सुपर
वेगळे
मरणोत्तर पार्थिव देह
सहमत आहे.
+१
भारतात इतके प्रचंड वैविध्य
दिल्लीला जाताना ....
रोचक!
तुळजाभवानी चे पारंपारिक
हे अजूनच रोचक. कुठे कशा प्रथा
खानदेशात
खानदेश सोडून अन्यत्र
नाही तशी कुठलीही प्रथा नाही .
.
शवाबद्दल आदर बाळगावा
लायकीवर प्रवेश मिळालेल्या
.
इतकं छान नदीकाठी फुलांच्या
अनौरस संतती आणि हरामजादा
स्वःताचे मढे पुरण्यासाठी धर्म बदलण्याची गरज काय?
सहमत...सहमत...सहमत..
सहमत
ठीक
१. ( आणि तसेही, मेडिकल
( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. Smile )हे वाक्य देहदान अथवा अवयवदान या सारख्या फार उपयोगी आणि स्त्युत्य गोष्टींबद्दल सर्वसाधारण लोकांत गैरसमज आणि वैचारीक गोंधळ निर्माण करणारे आहे. केवळ "गम्मत (?!)" म्हणूनही असे करणे एका वैद्यकीय व्यावसाईकाकडून तरी अपेक्षित नव्हते. याबतीत "प्रभाकर पेठकर" यांच्या प्रतिसादाशी १००% सहमत २. दहन-दफन या विकल्पांबद्दल "बाळ सप्रे" यांनी किमान शब्दात चपखल प्रतिसाद दिला आहे. त्यांत अजून थोडी भर अशी की माणूस म्हटला म्हणजे त्याच्या इछा-भावना आल्याच... मग त्या मेलेल्या माणसाच्या असो अथवा त्याच्या जिवंत नातलगांच्या. सभ्य समाजात माणसाच्या प्रेताला केवळ एक बिघडलेली, बंद पडलेली अथवा टाकावू गोष्ट समजली जात नाही, ते याकरताच. युद्धात मारलेल्या शत्रूचे प्रेतही सन्मानाने वागवले जाते तेही यासाठीच. तेव्हा भावनांना "योग्य तेवढे" (आणि केवळ तेवढेच) महत्व देऊन जशी इच्छा असेल तशी आणि जसे जमेल तशी प्रेताची विल्हेवाट लावण्याचे स्वातंत्र्य भारतिय घटनेने सर्व नागरिकांना दिलेले आहे. त्या कृतिचा काही बेकायदेशीर, व्यक्तीविघातक अथवा समाजविघातक परिणाम झाला तर सद्याचा कायदा त्या बाबतीत कारवाई करायला सक्षम आहे. यात धर्म मध्ये आणून वाद घालणे म्हणजे वितंडवादच होईल. ३. लाकडे जाळणे आणि दफनाने जमीन व्यापणे अथवा दूषित करणे यापेक्षा विद्युतदाहिनी हा एक चांगला पर्याय हल्ली शहरांत उपलब्ध असतो.बाय द वे
सॅड बट ट्रू...विशेषतः
+१
.
.
अंत्यसंस्कार
धन्य _/\_
आणि परत जिवंत झाल्यावर
समर्थन दहनाचेही
लेखकला व्यक्तिगत कोणता प्रकार योग्य वाटतो?
वैद्यकीय महाविद्यालया
.
Pagination