आपल्याला लागणार एक दिवसाचं अन्न स्वतः पिकवून तयार करायला लावला पहिजे शाळे मधून !
या मधून मुले अनुभवाने समृद्ध होतील ..आणि कष्टाची जाणीव होउन अन्नाची नासाडी करणे थांबेल
>>>>आपल्याकडेही शेतकरी आणि ग्राहक यांच्यात फार मोठी दरी आहे. फक्त कांद्याचे किंवा दूध- साखरेचे भाव थोडेसे वाढले की शेतकरीनामक कोण्या खलनायकाचं हे काम आहे असं शहरी ग्राहकांना ठामपणे वाटतं. यापलिकडे शेतकऱ्याचा आणि आपला काही संबंध आहे हे आपण मानायलाच तयार नसतो.
>>>>आपण जे खातो ते मॉलमधून येतं किंवा आपल्या घरी दूध येतं ते भैय्यामुळेच; असं बऱ्याच शहरी मुलांना आजही वाटतं.
>>>>जो शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतो त्याच्याबद्दल आपण कधीतरी विचार करतो का?
इथे आपण बर्याच गोष्टी (लेखाच्या सोयीसाठी) गृहीत धरल्या आहेत. असो.
फक्त शेतकरीच का? सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत. दलाल, वाहतुकदार, व्यापारी, किरकोळ दुकानदार, माझे वडील (जे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी राबराब राबायचे), माझी आई जी माझ्यासाठी स्वयंपाक करायची, स्टेनलेस स्टीलचे ताट्, वाट्या, तांब्या-भांडे बनवून माझ्या पर्यंत पोहोचविणारे, डायनिंग टेबल-खुर्च्या बनवून माझ्यापर्यंत पोहोचविणारे वरील प्रमाणेच अजून एका साखळीतील घटक, माझ्यासाठी कपडे बनविणारे आणि माझ्या पर्यंत पोहोचविणारे वरील प्रमाणेच अजून एका वेगळ्याच साखळीतील घटक, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, शाळा बांधणारे गवंडी, सुतार, रंगारी, शाळेची घंटा बनविणारे कारागिर, महाविद्यालयातील अशीच एक साखळी, वह्या पुस्तकांसाठी कागद बनवायला झाडे तोडून कारखान्यांना पुरविणारे, कागदाच्या रिम्सचे वाहतुकदार, छापखाने, अभ्यासक्रम ठरविणारे, पुन्हा किरकोळ विक्रेते वगैरे वगैरे अनेक अनेक जण आहेत ज्यांचे मी आभार मानू इच्छितो. हे सर्व नसते तर काय झालं असतं ह्या विचारांनी पोटात गोळा येतो. जेवढा विचार करावा तेवढे माझ्या अस्तित्वाला आकार देणारे लाखो लोक आठवायला लागले. वेड लागायची वेळ आली. बापरे! एका जगण्यात मी किती जणांचे उपकार डोक्यावर घेऊन फिरतो आहे. कधी ह्यांचे उपकार मानण्याचा, त्यांचा Thanks म्हणण्याचा विचारही नाही केला. मी अत्यंत कृतघ्न माणूस आहे ह्या विचाराने भयंकर वैफल्य आले आहे. आपण आपल्या ह्या लेखाद्वारे ह्या सर्वांची जाणीव करून दिली. ही कृतघ्नता वृत्तीत बाळगून मृत्यूला सामोरे जाण्यापेक्षा ह्या सर्वांप्रती मी आता कृतज्ञता व्यक्त करून मनांत कुठलाही सल न बाळगता मृत्यूला सामोरा जाईन. आपला आभारी आहे.
थोडे दिवस थांबा प्रभाकर जी ! आपल्याला दोंन्हि वेळ्चे खाद्य मॉल मधुन मिळेल आसि व्यवस्था केलि गेलेलि आहे !
आपल्या कडे पैसा आहे तर पैसा फेको तमाशा देखो ............
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा दयाघन परमेश्वराचे आभार मानावेत , त्यातच सारे आले कारण आपण सारे त्याचेच अंश आहोत !
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म
उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !
दुसरे असे की , आपल्याकडे आप्न आभार मानत नाही , ॠण मानतो .
१. मातृ -पितृ ॠण
२. गुरु ऋण
३. देव ऋण आणि
४. समाज ॠण
ते ऋण मानले आणि तसे वर्तन केले म्हणजे आभार मानण्यासारखेच आहे. त्यासाठी वेगळा दिवस करण्याचे प्रयोजन असावे असे वाटत नाही.
यानिमित्ताने एक जुनी गोष्ट आठवली : माझे पुण्यातील शिक्षण निगडीतील एका सिंधी डॉक्टर दाम्पत्याच्या (आर्थिक ) सहकार्याने सोपे झाले होते. नोकरी लागल्यावर त्यांना भेटून गिप्फ्ट दिली, आभार मानले , तेव्हा डोक्टर महशय म्हणाले , ही गिफ्ट परत घेऊन जा , मला परत फेड हवीच आहे , तू अन्य विद्यार्थ्यांना केलेली मदत मला पाहायची आहे , तीच माझी परत फेड !
समाजाकडून आलेले परत समाजाला देणे ही उतराई होण्याचे पद्धत ! त्यात शेतकरीच काय सारेच आले.
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभुचे |
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे |
कृषीवल कृषीकर्मी राबती दिन रात |
श्रमिक श्रम करोनी वस्तु त्या निर्मितात |
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल |
उदर भरण आहे चित्त होण्या विशाल |
हा श्लोक ही बर्यापैकी प्रचलित आहे.
प्रतिक्रिया
THANK YOU .
गूड वन
कृतघ्न मी...
हाहाहा...
थोडे
ह्म्म
समाजाकडून आलेले परत समाजाला
@विटेकर...
लेखाची कल्पना आवडली
हे घ्या शेतकर्यांचे आभार ..
हा श्लोक आमच्या
विटेकर