व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.
माझ्या जवळपास मात्र १७ वर्षापासुन ते ८५ वर्षापर्यंतची जोडपी एकत्र काही अपरिहार्य, काही जमतय का बघु असे म्हणुन, काही दोघांनाही कोणि इतर मिळाले नाहित म्हणुन, काही दोघांचीही गरज म्हणुन असे (लीव्ह-इन)राहात आहेत. काहि आनंदाने तर काही ना आनंद ना दुःख अश्या विचारात.
या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे.
लिव इन मधे राहून हे सर्व करता येणार नाही हे कशाच्या आधारावर ठरवलंय ? (त्यासाठी विवाहाची गरज काय ?)
त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे. >>
याला काही आधार ? लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?
म्हणजे चर्चेला दिशा राहील. वेगवेगवेगळे मुद्दे किंवा मुद्यांची पुनरावृत्ती टाळता येईल.
लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?
मूल हवं असेल तर रितसर लग्नाचा समाजमान्य पर्याय आहे. मग लिव-इन कशाला?
मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?
तुम्ही असफल विवाह आणि लिव-इन यांची सरमिसळ करतायं. असफल विवाहाची वेगळी कारणमिमांसा आहे. तुम्ही फक्त लिव-इन वर्सेस (सफल किंवा वेल अॅक्सेप्टेड) विवाह अश्या दृष्टीकोनातून तुमचे विचार लिहा.
तुमचं लिव इन बद्दल काय मत आहे ते लिहा ना, ते बरं पडेल. चर्चेसाठी तुम्हीच उत्सुक होता म्हणजे माहीतगार तुम्हीच. आम्ही मौजमजा, टाईमपास या कॅटेगरीत मोडणारे..
व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही. >>
हे पण काय झेपलं नाय बाबा. लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?
अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? त्यांचे वय किती होते?
त्या मरेपर्यंत लिवईनमध्ये होत्या.
आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते.
काकूचे वय ४८-५० असेल. काकांचे वय ५०-५५.
काकांना स्वतःची मुले आहेत काकूंना मुलबाळ नाही.
दोघंही अगदी प्रतिष्ठितपणे आपापल्या समाजात वावरतात (दोघे वेगवेगळ्या जातींचे आहेत)
तोंडावर तरी त्यांना नाव ठेवायची कुणाची हिंमत नाही.
तुम्हाला मुद्दे समजत नाहीत असं दिसतंय. तुम्ही एका ठिकाणी लिव इन २५ ते ४० वर्षे एकत्र राहणे असं म्हणता. सर्वात पहिल्यांदा हे स्टेटमेण्ट कसं काय केलं हे जाणून घेणं हे आमचं कर्तव्य आहे.
दुसरं म्हणजे विवाह बंधनात स्त्री पुरूष "समाधानी" असते तर वर सांगितलेलं झालं असतं का ? विवाह झाला म्हणजे स्त्री-पुरूष समाधानी होतात, सुखी होतात, त्यांची टक्केवारी किती याबद्दल तुमच्याकडे काही विदा आहे काय ?
मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का? केवळ लग्न या संस्थेने त्यांना बांधून ठेवलंय म्हणून ते स्वतःशी आणि बायकोशी प्रतारणा करत जगतात का? मग लिव इन मधला प्रामाणिकपणा काय वाईट?
केवळ भावनिक गुंतवणूक नाकारणे या कारणासाठी लिव इन वर टीका करत असाल, तर भावनिक नातं अजिबात नसूनही आयुष्यभर केवळ 'लग्न झालंय' म्हणून एकत्र राहणार्यांच्या परिस्थितीबद्दल काय म्हणणं आहे?
एखाद्या गोष्टीबद्दल कुठलीही माहीती नसताना स्टेटमेण्ट्स करणं, चर्चा करणं, लोकांना चर्चेला भाग पाडणं याला काय म्हणावं ? किमान आपण जे स्टेटमेण्ट्स करतो त्याबद्दल सफाई पेश करता येत नसेल तर तसं कबूल करण्याचा प्रांजळपणा तरी दिसावा. उगाचच चर्चेला तोंड फोडून पांडीत्य सांडत सुटायचं आणि अंगाशी आलं कि तुम्हीच सांगा अशी १८० अंशातून उसळी घ्यायची असल्या चर्चेला आपला तर रामराम.
आमचं येड्याचं ध्यान कितीतरी बरं, काय म्हणता मंडळी ?
स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील? ?>>>
तारुण्य ओसरल्यावर लिव इन रिलेशन संपतं असा तुमचा मुद्दा असेल तर गूगलदेवाला शरण जावे. तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही. तुमच्या मते विवाहात अडकून बायकोचं तारुण्य ओसरलं म्हणून बाहेर लफडी करणं हे समर्थनीय आहे का ?
कि विवाह करणारे असं काही करत नाहीत असं म्हणायचंय ?
पहिली गोष्ट, लिव-इनमधे राहाणार की विवाह करणार हा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि तो सध्याच्या अविवाहितांच्या दृष्टीनं विचाराधिन आहे. त्यांना या चर्चेचा काही उपयोग होईल अशी आशा आहे. विवाहितांच्या लिव-इनच्या कल्पना आणि इतरांचे दाखले निरुपयोगी आहेत. तस्मात :
अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? आणि आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते.
याला अर्थ नाही. विषयाला धरुन फक्त तुमचे मुद्दे मांडा.
मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का?
विचार करणं आणि कृत्य यात कमालीची तफावत आहे. शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.
तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही
हा विचार लिव-इन संदर्भात आहे. त्याचा साधा आणि सरळ अर्थ असा की नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल.
थोडक्यात जे विवाहाच्या बाजूनं आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि जे लिव-इनमधे राहू इच्छितात किंवा आहेत त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले तर चर्चा विधायक होईल.
लिव-इनवर चर्चा करण्यासाठी एकतर तुम्हाला तो पर्याय उपलब्ध हवा किंवा तुम्ही तो निवडलेला हवा आणि लिव-इनच्या विरुद्ध मत मांडायच असेल तर तुम्हाला विवाहाचा अनुभव हवा अन्यथा चर्चेला अर्थ नाही.
लिव ईनचा तीन वर्षे आणि लग्नाचा साडेआठ वर्षांचा अनुभव आहे.
म्हणजे मी चर्चा करण्यास पात्रं आहे.
;)
दोन्हींचे आपापले फायदे तोटे असले तरी तुम्ही म्हणता तसे सध्याच्या समाजात लग्नं करून र्हाण्याचे फायदे जास्त आहेत हे नक्कीच.
शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.
हे कश्याच्या आधारावर लिहिताय? ज्यांची भावनिक गुंतवणुक असुन लीवीन मध्ये राहात आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणाल? लग्नात आकर्षण नसते हे कश्यावरून? कांदेपोह्याच्या कार्यक्रमात अर्धा तास वै. बोलायला एकटे सोडतात. त्या अर्ध्या तासात ते दोघे कश्यावरून एकमेकांच्या कमिटमेंटच्या कल्पनांविषयी बोलतात? माझ्या माहितीत बरेच जण "आधी अफेअर होते का?" अश्या टाईपचे प्रश्न विचारतात. (स्वानुभव नाही).
नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल.
"लिवीन चा पाया फक्त शारीरीक आकर्षण आहे" अशी तुमची काहीतरी गैरसमजुत झालेली दिसते. तसंच पुन्हा लिवीन म्हणजे एकाच वेळी अनेकांशी संबंध हा अजुन एक गैरसमज.
ता.क. मी लिव्ह-इनचे अजिबात समर्थन करत नाही. पण म्हणुन सरसकटीकरण (जनरलाईझेशन) करणार नाही.
कुनाचा कुनाला पायपोस नाय, कोन कुनाला काय बोल्तय ते कळंना...
जे ह्या बाजूचे हैत, त्यांनी ह्या बाजूचे फायदे सांगा..(दुसर्या बाजुच्या तोट्यांविषयी न बोलता..)
जे त्या बाजूचे हैत, त्यांनी त्या बाजूचे फायदे सांगा..(दुसर्या बाजुच्या तोट्यांविषयी न बोलता..)
जे तटस्थ हैत, त्यांनी शंका इचारा...
असं व्हय. बरं.
--------------------------------------------------------------
कल लुंगी पेहनकु आया, आज पँट पेहनकु.. फटे पुराने जुते भी बदलकू आते तो हम नही पैचानते
@ साती, अँजेलिना जोलीची लिंक इथं देता आली असती. नंतर कधीतरी अनेक वर्षे लिव इन मधे राहीलेले आणि शेवटी शेवटी लग्न केलेले, न केलेले असे काही सेलेब्रिटीज यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. सेलेब्रिटीजच का इतरांमधेही आहे कि हा ट्रेण्ड. भारतातही आहे.
मध्यंतरी संध्या गोखले या बाईचं लिव इन बद्दलचं एक आर्टिकल वाचनात आलेलं.
http://wonderwoman.intoday.in/story1/do-they-need-to-say-i-do/1/86035.html
संदर्भ म्हणून फक्त. ;)
दोन्हींचे आपापले फायदे तोटे असले तरी तुम्ही म्हणता तसे सध्याच्या समाजात लग्नं करून राहाण्याचे फायदे जास्त आहेत हे नक्कीच.
तिथे चर्चा संपन्न होते. इतर दाखल्यांची आवश्यकताच नाही. मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचायं. कारण अँजेलिना जोली किंवा संध्या गोखलेबद्दल इथे फक्त काल्पनिक चर्चा होईल आणि त्याचा कुणाला काही उपयोग नाही.
>>>सध्याच्या समाजात लग्नं करून राहाण्याचे फायदे जास्त आहेत
(विथ ड्यु रिस्पेक्ट टु साती मॅडम)
त्यांनी व्यवहार्य मार्ग स्वीकारला आहे असं नाही वाटत तुम्हाला, सर????
लिव्ह इन रिलेशन हि फक्त उच्च मध्यम वर्गात किंवा उच्च वर्गात सफल होण्यःची शक्यता आहे. जेथे स्त्री हि आपल्या पायावर उभी आहे. इतर सर्व वर्गात स्त्री ला ते शक्य नाही. कारण विवाह संस्थेत पुरुष हा आपण एकत्र राहणार याची ग्वाही/ बांधिलकी(commitment) देत असतो. त्यामुळे जनाची (आणि मनाची) तशी तयारी करून असतो. याउलट लिव्ह इन मध्ये TTMM (तुझी तू माझा मी)असल्याने मुळातच हि बांधिलकी नाही. शिवाय या नात्याला कायद्याचे पूर्ण संरक्षण नाही. लिव्ह इन पार्टनर पुरुष दिवंगत झाला तर त्याला मिळणारी विमा किंवा इतर सर्व रक्कम हि त्या स्त्रीला मिळणारच नाही. मग मध्य वयात जर हातात उत्पन्नाचे स्त्रोत नसेल तर ती स्त्री कोणाच्या तोंडाकडे पाहील? त्यातून जर मुल असेल तर अजूनच बिकट परिस्थिती. शिवाय समाजमान्यता नसल्याने सासू सासरेच काय पण स्वतःचे आईवडील सुद्धा आधार देतील याची खात्री काय?
अगदी खालच्या वर्गात जर्री स्त्री हि मुख्य मिळवती घटक असेल तरीही ती जर "नुसतीच" राहत असेल( आधुनिक भाषेत लिव्ह इन) तर आजूबाजूचे लोक तिच्यावर डोळा ठेवून असतात. याच कारणासाठी दारुडा असेल तरी बायका "नवर्याबरोबर राहतात".
तस्मात अजूनतरी स्त्रीसाठी लिव्ह इन पेक्षा विवाहसंस्था हि जास्त सुरक्षित आहे. येणारा काळ जर या नात्याला कायदेशीर आणि फायदेशीर मान्यता देईल तर गोष्ट वेगळी अन्यथा लिव्ह इन रिलेशन हि पुरुषाला फायदेशीर आहे.
हा फार गहन विषय आहे आणि एवढे सगळे टंकायचा कंटाळा आला आहे(तुम्हाला वाचायचाही आला असेलच) म्हणून इथेच थांबवितो.
तर आजूबाजूचे लोक तिच्यावर डोळा ठेवून असतात. याच कारणासाठी दारुडा असेल तरी बायका "नवर्याबरोबर राहतात".
यात त्या स्त्री ची फरफटच आहे असं नाही वाटत ? तिची कुठलीही चूक नसताना "पवित्र" राहता यावं म्हणून "दारुडा" "बाहेरखाली" "बसून खाणारा" कसाही असला तरी कुंकवाचा धनी असलाच पाहीजे. पातिव्रत्य, योनीशुचिता या सर्व कल्पना पुरुषाच्या. तिचं पालन करण्यासाठी तिने खितपत पडायचं. पण नव-याने दारुडा असू नये यासाठी हा समाज काही करणार नाही, तिच्यावर लोक डोळा ठेवतात म्हणून तिला त्याच्याबरोबर नांदण्यासाठी भाग पाडणार.
सांजसंध्या ताई,
दुर्दैवाने ते सत्य आहे. स्त्रीची पुरुषसत्ताक पद्धतीत फरफट होतेच. आजही जोवर कायद्याचे संरक्षण सर्वसामान्य माणसा(स्त्री) पर्यंत पोहोचत नाही तोवर स्त्रीला कुंकवाचा धनी हा लागणारच. कारण आजही निम्न वर्गातील स्त्री जर एकटी( मुलांबरोबर) राहत असेल तर रात्रीबेरात्री तिचा दरवाजा ठोकणारे हलकट असतातच. त्यामुळे असा रोजचा ससेमिरा लागण्यापेक्षा दारुड्या का होईना पण एक "पुरुष" घरात असावा लागतो. गरिबी हि अशी वाईट गोष्ट आहे कि विधवा किंवा नवर्याला सोडून आलेल्या स्त्रीला आई बाप सुद्धा आपल्या घरात थारा देत नाहीत. यासाठी आर्थिक किंवा सामाजिक उन्नती होत नाही तोवर स्त्रीची खरी बंधमुक्ती होणार नाही
प्रतिक्रिया
आणंदी आणंद गडे...
ग ग म्हटलं कि प्रातःस्मरणीय
सहमत आहे. खरेच चांगला
चर्चा सुरु केलीये म्हणून प्रतिसाद!
माझ्या जवळपास मात्र १७ वर्षापासुन ते ८५ वर्षापर्यंतची जोडपी
या कालावधीत सुयोग्य
संगोपन आणि मूल हा लिव-इनचा फोकसच नाही
त्या भावनिक जवळीकेपासून
एकदा अपत्य जन्म झाला की पती
तुमच्या मते आदर्श लिव-इनचं वर्णन करु शकाल का?
तुमचं लिव इन बद्दल काय मत आहे
आदर्शची काही गरज नाही. तुम्ही
व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार
लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ?
अमृता प्रीतम?
तुम्हाला मुद्दे समजत नाहीत
तुमची सिग्नतुरे आवडली हो.
बिनधास्त वापरा.
मलापण त्यांची सिग्नतुरे आवडली
टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं
एखाद्या गोष्टीबद्दल कुठलीही
पिशी अबोली
स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर
तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन"
अचूक टोला.
>>असं कसं? विवाहसंस्था
लिव-इन आणि विवाह!
असं कसं?
हे उदाहरण गैरलागू आहे
म्हणजे प्रत्येक
म्हणजे प्रत्येक
अनुभव!
लग्नं करून र्हाण्याचे फायदे जास्त आहेत हे नक्कीच.
सरसकटीकरण नको
चला चर्चा करून कुणीतरी का
च्यायला...
असं व्हय. बरं.
पैलवानदादा
पण
@ साती, अँजेलिना जोलीची लिंक
जी व्यक्ती स्वतः तीन वर्ष लिव-इनमधे राहिल्यावर
>>>सध्याच्या समाजात लग्नं
खरंय!
मॅडम!
ठीके मॅडम. (हा शं-भरावा! )
मानलं राव! काय दाँडगा अणुभव है,,,!
लिव्ह इन रिलेशन हि फक्त उच्च
@ सुबोधजी
तर आजूबाजूचे लोक तिच्यावर
@ सांजसंध्या
Pagination