विक्रांतच्या आयुष्याचा आढावा आणि तिला सेवामुक्त करण्यातली अपरिहार्यता.. घारेकाकांचा आणखी एक उत्तम लेख आणि डॉ. खरे यांच्या सुंदर प्रतिक्रिया. हा मिपावरच्या संग्राह्य लेखांपैकी एक झाला आहे!
मृत्यू हा प्रत्येकासाठी अटळ आहे. प्रेताला ते कितीही मोठ्याव्यक्तीचे का असेना आपण जाळून / दफन करून नष्ट करतो.
शेवटी कीर्ती उरते, शरीर नाही.
विक्रांत भंगारात विकल्या गेले तरी ही त्याने केलेली कामगिरी अमर राहील.
शोक करणे व्यर्थ आहे. स्मारक ही किती वर्ष जपून ठेवणार, ते नष्ट होईलच. शेवटी कालाय तस्मे नम:
घारे आणि खरे या दोहोंच्या लेखनातून नेहमीप्रमाणे बरीच नवीन माहिती कळली. त्याबद्दल दोघांना धन्यवाद! कधीकाळी नेव्हल डेच्या निमित्ताने विक्रांत आणि आयएनएस गंगा (आणि अजून एक आठवत नाही) जहाजांना भेटी दिल्या होत्या. विक्रांतचा हा प्रश्न वाचनात आला होता पण बाकी माहिती नव्हती.
जगातली ५०% मोडीत निघालेली जहाजे ही भंगार स्वरूपात गुजरातमध्ये येतात. अलंग शिपयार्ड मध्ये त्यांना मोडीत काढून रिसायक्लींग, हॅझार्डस वेस्ट वगैरे वेगळे करणे चालते...
या बाबतीत इंग्लंड, फ्रान्स, इटली आदि युरोपियन देश आणि विशेषतः अमेरिका आपल्या खूप पुढे आहे. कुठलीही जुनी वस्तू आकर्षक रीतीने मांडून ती पहायला येणा-या लोकांच्या खिशामधून पैसे काढून घेणे त्यांना चांगले जमते पण आपल्याला ते तितकेसे जमत नाही.
बरोबर आहे पण तरी देखील अमेरीकेसंदर्भात किंचीत असहमत. वॉशिंग्टन डिसी मधली स्मिथसोनियनची सगळी वस्तुसंग्रहालये ही जनतेसाठी मोफत आहेत. या सर्वच देशात (पक्षि: पाश्चात्यांमधे) इतिहासाचे दस्ताइवज अधिकृतपणे संग्रहीत करून ठेवायची पद्धतच नाही तर परंपरा आहे. दुर्दैवाने आपल्यातही ती जरी कधीकाळी असली तरी कुठेतरी वाटते की ब्रिटीशांच्या काळातील पारतंत्र्यात ती निघून गेली. जिथे वेगळी जागा न लागणारे किल्ले नीट ठेवले जात नाहीत तेथे विक्रांतची काय अवस्था... :(
संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू नौका या वर्षीच लाँच झाली आहे. तिचेही नाव विक्रांत असेच ठेवून ते नाव पुढे चालत राहण्याची व्यवस्था केली आहे.
१२ ऑगस्ट २०१३ ला तीचे अधिकृत उद्घाटन झाले. त्याचे काही फोटो जालावर शोधताना मिळाले...चिनी माध्यमातून! :) अर्थात फोटोलिंक कॉपी करता येत नाही त्यामुळे ते कुठे आहेत याची लिंक देत आहे.
त्या व्यतिरीक्त हा पाक डिफेन्स वेबसाईट वरील फोटो:
विक्रांतचा अपघात होऊन ति निकामी झाली नाहि. आपली ड्युटी पूर्ण करुन ति रीतसर रीटायर झाली. तिच्या रीटायरमेण्ट्ची कल्पना कमीतकमी पाच वर्ष आगोदर सर्वांना आली असणार. त्याचवेळी या रीटायर्ड लिजण्डला उत्तम आर्थीक फायद्याच्या गणीतात बसवुन तिचा वृद्धापकाळ सन्मानीत करण्याचे नियोजन सुरु करायला हवे होते. आपल्याकडे पाश्चात्यांचे अनुकरण करत थीम पार्क, वॉटरपार्क, कार रेसींग वगैरे सुरु झालच ना... आपल्याकडे विज्ञान संग्रहालय आहेत, टाटांसारखे संशोधनाला चालना देणारे उद्योगपती आहेत. थोडक्यात काय, तर आर्थीक फायद्याची गणीतं, गुंतवणुक, कल्पकता, मनुष्यबळ इ. सर्वकाहि आहे. पण या सर्व घटकांना योग्यवेळी एकत्र आणुन योजना आखणे व ति अमलात आणणे झालं नाहि... तसंही हे आपलं नेहमीचं रडगाणं आहे.
वाचून विक्रांतबद्दल आत्मियता वाटू लागली. याआधी काही घेणेदेणे पडले नव्हते या बातमीविषयी. काहीतरी प्रॅक्टीकल सोल्यूशन निघेल आणि विक्रांत भंगारात जाण्यापासून वाचेल अशी अपेक्षा.
'विक्रांतचे संग्रहालय बनविण्यासाठी सव्वाशेकोटी रुपयांची गरज आहे आणि तेवढे पैसे महाराष्ट्र सरकारकडे नाहीत. त्यामुळे विक्रांत भंगारात काढण्यावाचून पर्याय नाही' असे सरकारचे म्हणणे आहे. - इति एबिपी माझा.
राजीव शुक्लांना अंधेरीतील शंभर कोटीचा भूखंड निव्वळ ९९ हजारात ह्याच महाराष्ट्र सरकारने दिला आहे. शिवाय ह्या भूखंडाशेजारचा दूसरा ३ हजार मिटर्सचा भूखंड वार्षिक ६ हजार रुपये भाडे तत्त्वावर दिला आहे. - इति एबिपी माझा.
विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करावे या विचाराला बहुसंख्य लोकांचा पाठिंबा असावा असे दिसते. यासाठी लागणारा खर्च सव्वाशे कोटी आहे की पाचशे कोटी की अधिक हे तिथे नेमके काय काय करायचे यावर अवलंबून आहे. तसेच त्यासाठी लागणारी जागा कुठली घ्यायची यावरही आहे. सरकारच्या अंदाजपत्रांचे जे लक्षावधी करोडोंचे आकडे आपण वाचतो त्यामानाने हा खर्च फार जास्त वाटत नाही. पण नुसता खर्च केला आणि विक्रांतला भंगारात जाण्यापासून वाचवले तर त्याला फारसा अर्थ नाही. ते वस्तुसंग्रहालय प्रेक्षणीय झाले, ते पहावे असे लोकांना वाटले आणि काही काळ तरी ते पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली तर तो खर्च सत्कारणी लागेल आणि त्यातला काही भाग वसूल सुद्धा होईल.
मागे एकदा नेव्ही डेच्या दिवशी उन्हातान्हात तासनतास रांगेमध्ये उभे राहून मी एक युद्धनौका पाहिली होती. त्या वेळी आम्हाला फक्त डेकवरून पाच मिनिटे फिरवून परत पाठवले होते. इंजिनरूम, होल्ड्स, आर्मामेंट्स किंवा डेकवरल्या इतर खोल्यासुद्धा कुलुपात बंद ठेवल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक होते. पण यामुळे मला तरी काहीच पाहिल्यासारखे वाटले नाही. या कारणानेच मध्यंतरी विक्रांत या मोठ्या जहाजाला पहाण्याची संधी ठेवलेली असतांना सुद्धा ती घ्यावी असे आवर्जून वाटले नव्हते. तो अनुभव आठवून या दृष्टीने विचार केला तर जाणवले की जहाजाची रिकामी डेक अजीबात आकर्षक नसते. पैसे आणि वेळ खर्च करून ती पहायला लोक येणार नाहीत आणि आले तरी निराश होतील, आणखी कोणाला तिकडे जायची शिफारस करणार नाहीत.
परदेशातली काही म्यूजियम्स पाहितांना मला जाणवले की पर्यटकांना रिझवण्यासाठी तिकडे किती गोष्टी केल्या जातात. तिथे ठेवलेल्या वस्तूंची निवड, त्यांची मांडणी, प्रकाशयोजना, त्यांच्या सोबत लावलेले स्पष्ट वाचता येण्याजोगे आणि थोडक्यात माहिती देणारे सुबक फलक, याशिवाय जागोजागी ठेवलेले काँप्यूटर टर्मिनल्स, त्यावर अधिक मनोरंजक माहिती देणारे इंटरअॅक्टिव्ह आणि ऑडिओव्हिज्युअल प्रोग्रॅम्स, काही जागी काही वेळा होत असलेले लाइव्ह शोज, फिल्म शोज, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खास व्यवस्था, थोडा वेळ बसून विश्रांती घेण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या उत्कृष्ट सोयी, फोटोग्राफीला बंदी वगैरे न घालता देण्यात येणारे प्रोत्साहन या सगळ्यामुळे तिथून बाहेर पडावेसे वाटत नाही आणि शक्य असल्यास तिथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. बाहेर जाण्याच्या वाटेवर सॉव्हेनिर्सची दुकाने असतात आणि त्यात लहान लहान मॉडेल्सपासून ते चित्रमय रुमाल, पिशव्या, टोप्या, टीशर्ट्स आणि काहीकाही ठेवलेले असते. आठवण म्हणून त्यातले काही तरी विकत घेतले जाते आणि घरात ठेवले जाते.
विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करण्याची संधी खरोखरच कुणाला मिळाली आणि त्यात अशा काही गोष्टी केल्या तर ते प्रेक्षणीय होईल आणि ते करण्यात घातलेले पैसे आणि श्रम कारणी लागतील.
परदेशातली काही म्यूजियम्स पाहितांना मला जाणवले की पर्यटकांना रिझवण्यासाठी तिकडे किती गोष्टी केल्या जातात. तिथे ठेवलेल्या वस्तूंची निवड, त्यांची मांडणी, प्रकाशयोजना, त्यांच्या सोबत लावलेले स्पष्ट वाचता येण्याजोगे आणि थोडक्यात माहिती देणारे सुबक फलक, याशिवाय जागोजागी ठेवलेले काँप्यूटर टर्मिनल्स, त्यावर अधिक मनोरंजक माहिती देणारे इंटरअॅक्टिव्ह आणि ऑडिओव्हिज्युअल प्रोग्रॅम्स, काही जागी काही वेळा होत असलेले लाइव्ह शोज, फिल्म शोज, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खास व्यवस्था, थोडा वेळ बसून विश्रांती घेण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या उत्कृष्ट सोयी, फोटोग्राफीला बंदी वगैरे न घालता देण्यात येणारे प्रोत्साहन या सगळ्यामुळे तिथून बाहेर पडावेसे वाटत नाही आणि शक्य असल्यास तिथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. बाहेर जाण्याच्या वाटेवर सॉव्हेनिर्सची दुकाने असतात आणि त्यात लहान लहान मॉडेल्सपासून ते चित्रमय रुमाल, पिशव्या, टोप्या, टीशर्ट्स आणि काहीकाही ठेवलेले असते. आठवण म्हणून त्यातले काही तरी विकत घेतले जाते आणि घरात ठेवले जाते.
विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करण्याची संधी खरोखरच कुणाला मिळाली आणि त्यात अशा काही गोष्टी केल्या तर ते प्रेक्षणीय होईल आणि ते करण्यात घातलेले पैसे आणि श्रम कारणी लागतील.
दादरला हेरिटेज दर्जा देण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यावर भर द्या - इती राज ठाकरे.
यात स्वार्थ आणि परमार्थ असावा असे वाटते. विक्रांत वाचू शकली तर जनतेकडून क्रेडीटही मिळेल आणि दादरला हेरीटेज दर्जा मिळाला नाही अथवा लांबला तर तेव्हढ्यात तसा मिळाल्यावर न चालणारी डेव्हलपमेंट देखील करायला वेळ मिळेल. ;)
ओह्ह. भारीच की. अॅव्हेंजर प्लस जुनी पल्सर इन कॅफे रेसर स्टाइल. नाईस कॉम्बो.
एक शंकाय. प्लास्टीकमध्ये कसे वर्जिन प्लास्टिक दर्जेदार समजले जाते तसे मेटलबाबतीत नसते का? स्क्रॅप मेल्टींग करुन आलेले मिळालेले मेटल हे दर्जाबाबतीत कसे? मेटलर्जीवाले सांगतील का काही?
भावना की व्यहवार या कात्रीत सापडल्यावर कल्पकतेने मार्ग काढायला हवा.
पर्यटन स्थळ म्हणून लोक येतील पण त्यासाठीचे ५०-१०० रुपयाचे तिकीट इतकाच फक्त उत्पन्नाचा मार्ग असण्याचे कारण नाही.
इतरही उपयोग शोधता येवू शकतील..(उदा: सिनेमाचे शुटिंग , हॉटेल ई)
एका राज्यासाठी ४५० कोटी हा तसा फार मोठा आकडा नाही, पण कल्पकता हवी, भ्रष्टाचार नको.
मी विमानवाहू नौका आत जावून बघितली आहे. अभियांत्रिकी चा एक जबरदस्त अविष्कार म्हणून जपून ठेवलीच पाहिजे पण लहान मुलांना सहज गत्या बघता यावी अश्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. रिटायर्ड नेवी लोकांना त्यावर ठेवावे म्हणजे खर्या युद्धांत नौका काही चालते, इत्यादी first hand माहिती मिळेल.
मी सान दियोगो मध्ये USS Midway पहिली होती आणि सांगून मला सुद्धा पटले नसते पण अनुभव अद्वितीय होता. कप्तानाचे केबिन पासून, Rabbit Hole, Slingshot, १९६० मधील टचस्क्रीन आणि १९५० मधला mouse, GPS नसताना सुद्धा व्यवस्थित दिशादर्शन करण्यासाठी असलेला महाप्रचंड ३२KB मेमोरी वाला Univac इत्यादी पहिले. विएत्नाम युद्धांत भाग घेतलेल्या वैमानिकाकडून विमान स्लिङ्ग्शोट द्वारे कसे हवेंत फेकले जाते, ते सर्व करण्यसाठी ९ लोक १० सेकंदात कसे काम करतात ह्याचे प्रात्यक्षिक पहिले. ९०+ वर्षांच्या एका व ww-२ सैनिकाकडून त्याचे मित्र युद्ध भूमीतील त्याचे फोटो इत्यादी पहिले. ह्या अतिशय handsome माणसाने गणितातील चांगले भवितव्य सोडून युद्धांत भाग घेतला होता. ह्याचे सर्व मित्र युद्धांत मारले गेले, पत्नी कसल्या तरी आजाराने हा युद्धांत असताना वारली इत्यादी सर्व माहिती त्याने दिली. हा माणूस म्हणजे चालता फिरता (wheelchair) संग्रहालय होता.
खर्या Plane Simulators मधून विमान भरारी घेतली. Air Craft carrier समुद्रात असताना समज एखादा माणूस चुकून पाण्यात पडला तर काय होते असा प्रश्न मी एका खालाश्याला विचारला. अश्या परिस्थतीत सुद्धा एक ठराविक प्रोसेस पाळली जाते, म्हणजे कप्तान पासून सध्या खलाश्यापर्यंत कुणी कुणी काय करायचे हे अगदी ठरून गेलेले असते.
कुणी तरी फुकट तिकीट दिली होती म्हणून आम्ही ह्या नौकेला भेट दिली आणि तासाभरात परत येवू म्हणताना अख्खा दिवस घालवला.
विक्रांत चे सुद्धा असे काही तरी करता येईल तर चांगले होईल भंगारात काय शिवाजी महराजांची तलवार सुद्धा काढता येईल पण कुणी लहान मुलाने पाहावे आणि आमच्या भूतकाळात शिरून शूराप्रती आदर, त्यागाप्रती कृतज्ञता आणि भविष्यासाठी प्रेरणा घ्यावी अश्या वस्तू शेकडो वर्षातून एकदाच निर्माण होतात.
अभियांत्रिकी चा एक जबरदस्त अविष्कार म्हणून जपून ठेवलीच पाहिजे पण लहान मुलांना सहज गत्या बघता यावी अश्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. रिटायर्ड नेवी लोकांना त्यावर ठेवावे म्हणजे खर्या युद्धांत नौका काही चालते, इत्यादी first hand माहिती मिळेल.
हे आता का लिहिताय? तुम्हाला खरेच माहीती नसते का उगी मनात आले ते लिहित राहता?
विक्रांत तोडली गेलीय. त्याच्या मेटलचे उपयोग करुन प्रॉडक्टस सुध्दा बाजारात आलेत. ह्या धाग्यातच दोन प्रतिसाद वर त्याचा आहे उल्लेख.
प्रतिक्रिया
रोचक व रोमांचक आठवणीतील विक्रांत...
छान लेख
एकदम बरोबर बोललात ज्योती ताई
मृत्यू हा प्रत्येकासाठी अटळ
छान लेख आणि प्रतिसाद
विक्रांत विषयी वाचून खरच खूप
आयएनएस विक्रांत २०१३
पश्चात बुद्धीचा प्रकार.
+ १
फेस बुक वर मोहिम "सेव्ह
छान लेख आणि प्रतिसाद
दैवदुर्विलास.
वस्तुसंग्रहालयाची प्रेक्षणीयता
+१, हेच म्हणतो आहे
परदेशातली काही म्यूजियम्स पाहितांना मला जाणवले की पर्यटकांना रिझवण्यासाठी तिकडे किती गोष्टी केल्या जातात. तिथे ठेवलेल्या वस्तूंची निवड, त्यांची मांडणी, प्रकाशयोजना, त्यांच्या सोबत लावलेले स्पष्ट वाचता येण्याजोगे आणि थोडक्यात माहिती देणारे सुबक फलक, याशिवाय जागोजागी ठेवलेले काँप्यूटर टर्मिनल्स, त्यावर अधिक मनोरंजक माहिती देणारे इंटरअॅक्टिव्ह आणि ऑडिओव्हिज्युअल प्रोग्रॅम्स, काही जागी काही वेळा होत असलेले लाइव्ह शोज, फिल्म शोज, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खास व्यवस्था, थोडा वेळ बसून विश्रांती घेण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या उत्कृष्ट सोयी, फोटोग्राफीला बंदी वगैरे न घालता देण्यात येणारे प्रोत्साहन या सगळ्यामुळे तिथून बाहेर पडावेसे वाटत नाही आणि शक्य असल्यास तिथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. बाहेर जाण्याच्या वाटेवर सॉव्हेनिर्सची दुकाने असतात आणि त्यात लहान लहान मॉडेल्सपासून ते चित्रमय रुमाल, पिशव्या, टोप्या, टीशर्ट्स आणि काहीकाही ठेवलेले असते. आठवण म्हणून त्यातले काही तरी विकत घेतले जाते आणि घरात ठेवले जाते. विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करण्याची संधी खरोखरच कुणाला मिळाली आणि त्यात अशा काही गोष्टी केल्या तर ते प्रेक्षणीय होईल आणि ते करण्यात घातलेले पैसे आणि श्रम कारणी लागतील.राज ठाकरे...
सहमत!! बरेच काही दिसते आहे
विक्रांत नावातली जादू
माहितीपूर्ण लेख आणि
विक्रांत परत येत आहे.
बजाज ने पेश किया आईएनएस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasamओह्ह. भारीच की. अॅव्हेंजर
मेटल रियुजेबल आहे. दर्जामध्ये
अरे जोकरभाई, खतरनाक फिचर्स
एकदम सहमत. बोले तो झकास.
भावना की व्यहवार या कात्रीत
कशा कशाचे स्मारक बनवायचे?
मी विमानवाहू नौका आत जावून
अभियांत्रिकी चा एक जबरदस्त
...
मेनकेची कन्चुकि
जमलच तर
..
Pagination