Welcome to misalpav.com
लेखक: विकास | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मध्य प्रदेश: भाजप-११, कॉंग्रेस-८ राजस्थान: भाजप-२, कॉंग्रेस-३ छत्तिसगड: भाजप-६, कॉंग्रेस-५ दिल्ली: आआपा: १ अजून पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी चालू आहे आणि मशीनमधील मतांची मोजणी सगळीकडे सुरू झालेली नाही.

शीला दिक्षित पुढे आहेत. याचा अर्थ केजरीवाल मागे आहेत का त्या दोन ठिकाणाहून उभ्या राहील्या आहेत? तसेच पोस्टातून आलेली मते हा प्रकार कायम असतो का? आधी कधी ऐकल्याचे आठवत नाही...

शीला दिक्षित नवी दिल्लीमधून पुढे आहेत. केजरीवाल आणि भाजपचे विजेंद्र गुप्ता मागे आहेत. पोस्टाने पाठवलेली मते नेहमी असतात. लष्करात नोकरी करणार्‍या मतदारांसाठी पोस्टाने मते पाठवता येतात. इतर कोणी अशी मते पोस्टाने पाठवू शकतो की नाही माहित नाही. अर्थातच अशी मते फार नसतात.आणि ही मते मतपत्रिकेच्या स्वरूपात असल्याने ती मते मोजायला वेळ लागतो.

पोस्टाने पाठवलेली मते नेहमी असतात. लष्करात नोकरी करणार्‍या मतदारांसाठी पोस्टाने मते पाठवता येतात. इतर कोणी अशी मते पोस्टाने पाठवू शकतो की नाही माहित नाही. अर्थातच अशी मते फार नसतात.
सध्या परिस्थिती थोडी वेगळी आहे. आता निर्वाचन प्रक्रियेत सहभाग असलेल्या सगळ्या लोकांना म्हणजे Presiding Officers, Polling officers (Polling Party), Drivers, Handymen अश्या सगळ्यांनापण पोस्टल बॅलट द्यावं लागतं.. अटीतटीच्या लढतीत ही मतं आता फार महत्त्वाची ठरु शकतात.. आमच्याइथे एक निकाल पोस्टल बॅलेटच्या मोजणीनंतर पलटला होता..

मध्य प्रदेश: भाजप-२१, कॉंग्रेस-१० राजस्थान: भाजप-३१, कॉंग्रेस-७ छत्तिसगड: भाजप-९, कॉंग्रेस-९ दिल्ली: भाजप:१०, कॉंग्रेस:५ आआप: ५, बसप आणि इतर: ५ छत्तिसगड आणि दिल्ली इंटरेस्टींग वाटत आहेत. छत्तिसगडमध्ये राज्याच्या दक्षिण भागात भाजप मागच्या वेळेपेक्षा पिछाडीवर आहे.भाजपसाठी ही वाईट बातमी आहे.

शीला दिक्षित पुढे आहेत ते... म.टा. / टाईम्स नाऊ मधे आलेल्या फोटो प्रमाणे त्यांच्या घरी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्या जिंकून याव्यात म्हणून होम-हवन चालू आहे. Sheela Dikshit Home बरं झालं त्या महाराष्ट्रात नाहीत नाहीतर अंधश्रद्धा निर्मूलन वटहुकूमाखाली उगाच कारवाई झाली असती! ;)

छत्तिसगडमध्ये २००३ आणि २००८ मध्येही अशीच चुरस होती.या राज्यातील निकाल केरळप्रमाणे थोड्या फरकाने ठरविले जातात.दोन्ही वेळा कधी भाजप पुढे होता तर कधी कॉंग्रेस. शेवटी भाजपने दोन्ही वेळा विजय मिळवला. यावेळी बघू काय होते ते.

दिल्ली - एनडीटिव्ही ९:१८ एएमः आम आदमी १७ आणी भाजपा २० ने पुढे आहेत तर काँग्रेस ८ ने (गेल्या वेळपेक्षा २३ ने मागे) छत्तीसगढ मधे काँग्रेस पुढे आहे काँग्रेस १६ भाजपा १५ (गेल्या वेळ पेक्षा ४ ने मागे)

मध्य प्रदेश: भाजप-५८, कॉंग्रेस-२१, इतर:३ राजस्थान: भाजप-७२, कॉंग्रेस-२१, इतर:५ छत्तिसगड: भाजप-१६, कॉंग्रेस-१८, इतर:१ दिल्ली: भाजप:२२, कॉंग्रेस:८ आआप: १८, बसप आणि इतर: ३ मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला landslide विजय मिळणार असे दिसते. कालच फेसबुकवर माझे स्टेटस होते: In 1998, no exit/opinion poll gave more than 120 seats to Congress and fewer than 70 seats to BJP in Rajasthan. What was the result? Congress won 153 and BJP won 33!! Similarly no exit/opinion poll gave more than 120 seats to Congress and fewer than 170 seats to BJP in MP (including Chhattisgarh back then). What was the result? Congress won 172 and BJP won 118!!. Exit/opinion polls had failed to judge the level of anger against Vajpayee government at the center, which was grappling with onion crisis and continuous threats by Jayalalitha's AIADMK. In the state assembly elections of December 2013, IMO exit/opinion polls seem to have failed to gauge the level of anger against Manmohan Singh's UPA government at the center. I would not be surprised if BJP actually wins 160 seats in MP and 140 seats in Rajasthan. Let's wait till tomorrow to see if this actually comes true or not. तेव्हा I am feeling vindicated :)

आत्ता केजरीवाल म्हणत आहेत की कोणालाच पाठिंबा देणार नाही पण मला वाटतं की आताचा कल पाहता (२१-१८-८)काँग्रेस ३ नंबरला राहील आणि शेवट कोणत्याच पक्षाच्या बाजूने स्पष्ट निकाल नसल्यामुळे केजरीवालंना सरकार बनवायला बाहेरून मदत करील.

तात्विकदृष्ट्या जर केजरीवाल कुणाला पाठींबा देत नसतील तर त्यांनी कुणाचा पाठींबा घेऊ देखील नये. पण जर अशी वेळ आली तर अजून एक व्हेरीएबल असेलः ते स्वतः हरणार आहेत असे दिसते त्यामुळे त्यांचे स्वतःचे वजन किती राहू शकेल हे पहावे लागेल.

छत्तिसगडमध्ये काँग्रेस आता बर्‍यापैकी पुढे आहे. काँग्रेसला २८ आणि भाजपला १७.

असे आत्ता एनडीटिव्हीवर म्हणले जात आहे. जर छत्तिसगढ मधे भाजपा हरले आणि दिल्लीत त्रिशंकू आले तर काँग्रेसचे नेते म्हणू लागले आहेत की मोदी फॅक्टर नाही म्हणून. मोदी फॅक्टर आहे का नाही माहीत नाही, पण राहूल फॅक्टर जबरीच दिसत आहे. ;)

अगदी. :) बाकी नवी दिल्लीचे सध्याचे स्टॅटस काय? शीलाबेन पुढे आहेत का केजरीवाल अण्णा?

तसे नक्कीच वाटत आहे. अर्थात महेंद्र कर्मा आणि इतर नेते असते तर काँग्रेसने किती जागा जिंकल्या असत्या हे सांगता येणे शक्य नाही पण राज्याच्या दक्षिण भागात काही प्रमाणात काँग्रेसला नक्कीच फायदा झाला असावा असे वाटते.

मी एन.डी.टी.व्ही बघत आहे. गेल्या अनेक निवडणुकांचा अनुभव आहे की एन.डी.टी.व्ही वर सगळ्यात लेटेस्ट आकडे असतात.

अभिषेक मनू सिंघवी म्हणतातः नरेंद्र मोदींचा काहीच परिणाम दिसत नाही. अगदी हीच गोष्ट कोणाकडून तरी ऐकायची वाट मी बघत होतो. आता ते मिपावर कोण म्हणतो तेच बघायचे. :)

मध्य प्रदेश: भाजप-८१, कॉंग्रेस-३२, इतर:४ राजस्थान: भाजप-९६, कॉंग्रेस-२७, इतर:९ छत्तिसगड: कॉंग्रेस-३३, भाजप:२५ दिल्ली: भाजप:२८, आआप: २०, कॉंग्रेस:१२, बसप आणि इतर: २

छत्तिसगडमध्ये आता काँग्रेस ३४ आणि भाजप ३१. तेव्हा छत्तिसगडमध्ये जोरदार चुरस चालू आहे.हे बघता अगदी २००३ ची आठवण येत आहे.

मध्य प्रदेश: भाजप-९९, कॉंग्रेस-४५, इतर:६ राजस्थान: भाजप-११९, कॉंग्रेस-२९, इतर:१८ छत्तिसगड: कॉंग्रेस-३७, भाजप:३३ दिल्ली: भाजप:३३, आआप: २४, कॉंग्रेस:९, बसप आणि इतर: २

हो छत्तिसगडमध्ये शेवटचा निकाल येईपर्यंत कोणतेही अनुमान काढणे घाईचे ठरेल. अजून एक-दोन वेळा राज्यातील कल वरखाली झाले तरी त्यात आश्चर्य वाटायला नको. दिल्लीमध्ये ६८ पैकी ३४ ठिकाणी भाजप पुढे.

मध्य प्रदेश: भाजप-१२५, कॉंग्रेस-५६, इतर:१० राजस्थान: भाजप-१३१, कॉंग्रेस-२६, इतर:२० छत्तिसगड: कॉंग्रेस-३९, भाजप:३४ दिल्ली: भाजप:३२, आआप: २४, कॉंग्रेस:१२, इतर: १

दिल्लीमध्ये भाजपा ३१ आम २४ आणि काँग्रेस १४ अपक्ष ३(सकाळचे १०:१९) जर असेच सगळे फायनल निकाल आले तर भाजपाला राज्य करण्यासाठी ३ अपक्षांचा पाठींबा लागेल आणि काँग्रेस/आम ची अलिप्तता.. इंटरेस्टींग!

सौ बातो की एक बात. कांग्रेस चा धुव्वा उडाला आहे. देशाच्या या भागात कांग्रेस विरोधी लाट आहे हे स्पष्ट आहे. पण मोदी लाट आहे का याबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत . मध्य प्रदेश मधल्या विजयाचे श्रेय शिवराज सिंग चौहान याना जाइल . त्यांनी सरकार खूप चांगल्या प्रकारे चालवले. दिल्ली आणि छत्तीसगड मध्ये मोदी factor फारसा चालला नाही हे तर स्पष्टच आहे . राजस्थान मध्ये मात्र मोदी factor चालला असे मानायला भरपूर वाव आहे. या विजयाने भाजप हुरळून जाणार असेल तर ती मोठी चूक ठरेल . २००३ मध्ये भाजप ने विधानसभा निवडणुकात असाच clean स्वीप केला होता मात्र लोकसभा निवडणुकीत त्याना पराभव स्वीकारावा लागला . यावेळेस्चे भाजप नेतृत्व अति आत्मविश्वास मोड मध्ये जाण्याची चूक करणार नाही हि अपेक्षा . बाकी दोन मोठ्या पक्षाना उरावर घेऊन दिल्ली मध्ये घवघवीत यश मिळवणारे अरविंद केजरीवाल आणि सुशासन देऊन आक्रस्ताळा प्रचार न करता सलग ३ री टर्म मिळवणारे शिवराज सिंग चौहान हे पप्पू आणि फेकू पेक्षा या निवडणुकांचे मोठे नायक . बाकी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही भ्रष्ट पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे रास्त मत असणार्या अनेक लोकांच्या मनात आप च्या यशाने आशा पालवल्या आहेत .

मी तर म्हणेल कि मोदी फॅक्टर कुठेच चालला नाहि... तसा तो चालायचं काहि कारणच नाहि. हि चारही राज्ये त्यांच्या स्वभावानुसारच वागलीत. राजस्थान आलटुन पालटुन सत्ता फिरवत असतो. म.प्र. मधे आरएसेसचा प्रभाव बर्‍यापैकी आहे व चौहान साहेबांनी कामही चांगलं केलं म्हणतात. मग मतदार आपला कौल का बदलतील... छ.गडची केमेस्ट्री फार वेगळी आहे व त्यात गुजराथी मोदी फॅक्टरचा तसाही काहि रोल नाहि... आणि दिल्लीत यंदा काँग्रेसची पिछेहाट अटळ होती... मोदींनी एक धक्का जास्तीचा दिला बस. या निवडणुकांवर मोदी इफेक्ट काय होता यापेक्षा मोदींवर या निवडणुकीचा काय परिणाम होणार हे महत्वाचं आहे. तसच राहुल गांधींचं देखील... ज्या परिस्थितीत सोनीया गांधींनी काँग्रेसचा ताबा घेतला तशीच कमकुवत काँग्रेस राहुलची वाट बघतेय का कोण जाणे. नॉट गुड फॉर राहुल. काँग्रेस हालाखीच्या परिस्थितीत असताना गांधी फॅमिलीने तारणहार पाठवणं हा फॉर्म्युला कामाचा आहे...पण त्या घराण्याचे दोन मेंबर्स सर्वोच्च पदी असताना जर काँग्रेस हरली तर युवा गांधी नेतृत्वाकरता ते शुभ नाहि.

>>>मी तर म्हणेन कि मोदी फॅक्टर कुठेच चालला नाही... तसा तो चालायचं काहि कारणच नाही. खरंच आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीवेळी चित्र फार वेगळं असणार नाही असं वाटतं. पूर्ण प्रभाव असलेली राज्ये : दिल्ली , राजस्थान , मध्यप्रदेश , पंजाब (शि अ द बरोबर) , गुजरात , उत्तराखंड , हिमाचल प्रदेश , छत्तीसगड, गोवा (६५% जागा) अंशतः : महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्र , बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, हरयाणा, ओरिसा (२०-२५% जागा) एवढ्या राज्यांच्या जोरावर भाजपा वैयक्तिक सरकार बनवू शकतो? नाही. तसं झालं तर पुन्हा एन डी ए कडबोळे: तेलगू देसम, जयललिता, शिवसेना, अजितसिंग, सु स्वामी, नवीन पटनाईक इ.इ. त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये सहमती होऊन मोदी पंतप्रधान बनणं हे चेपुवरच्या स्टेटस अपडेटएवढं सोपं नक्कीच नाही.

सहमत. मोदी फॅक्टरपेक्षाहि लोकांच्या मनात काँग्रेसविषयीचा संताप आणि त्याहीपेक्षा पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली तर काय हाल करेल याची भीती याचा परीणाम नक्कीच ह्या निकालावर झाला आहे.

भाजप च्या यशात मोदी फॅक्टर कमी असावा. पण मोदींसारखा वक्ता पक्षाकडे असणे फार गरजेचे आहे. चिदम्बरम, सिब्ब्ल, दिग्विजय ई कडे ते कौशल्य तर नाहीच पण पक्षाला अडचणीत आणण्याचे कसब मात्र आहे. मनमोहन सिंग व सोनिया यानी तर या कलेचे पाठ घ्यावेत अशी स्थिति आहे. लोकांशी प्रेमाने संवाद साधणारा नेता ऐहिक पातळीवर काहीसा अपयशी असला तरी चालतो. मोदींवर दंगलीचा काळा डाग त्यासाठीच सामान्य माणूस विसरायला लागला आहे. आता मोदीनी आपल्या देशाचे नक्की काय चुकतेय याचा उल्ल्लेख वारंवार लोकांसमोर करून त्यावरील उपाय सुचविले तरच त्यांचा फॅक्टर चालेल नुसती इतर पक्षांवर टीका करण्याच्या भारतीय जनतेला उबग आलेला आहे .

मध्य प्रदेश: भाजप-१४५, कॉंग्रेस-५९, इतर:१४ राजस्थान: भाजप-१३३, कॉंग्रेस-३२, इतर:१९ छत्तिसगड: भाजप:४४, कॉंग्रेस: ४४ दिल्ली: भाजप:३४, आआप: २४, कॉंग्रेस:९, इतर: ३ छत्तिसगडमध्ये खूपच चुरस चालू आहे.नक्की काय होणार हे सांगता येणार नाही.मागच्या वेळी अपडेट लिहिल्यापासून दोन वेळा कल पुढे-मागे झाले.

भाजपा.... काँग्रेस ................. इतर दिल्ली ३५..... ७ ..... २५ (आआपा).... ३ == ७०/७० मप्र १५१ .... ६२ .... == २२९/२३० राज १३८ .... ३२ .... == १८९/१९९ छत्तीसगड ४५ .... ४५ .... == ९०/९०

मध्य प्रदेश: भाजप-१५०, कॉंग्रेस-६२, इतर:१७ राजस्थान: भाजप-१३७, कॉंग्रेस-३१, इतर:२२ छत्तिसगड: भाजप:४५, कॉंग्रेस: ४५ दिल्ली: भाजप:३५, आआप: २५, कॉंग्रेस:७, इतर: ३ छत्तिसगडमध्ये फोटोफिनीश होणार बहुतेक.

छत्तीसगड मध्ये ४५-४५ अशी स्थिती असेल आणि आमदारांची फोडाफोडी झाली नाही तर राज्यपाल कोणाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देऊ शकतील? दोन्ही पक्ष समान आणि एकही अपक्ष अथवा इतर नाही. मजेशीर स्थिती आहे ब्वॉ.