तुम्ही इथे नविन दिसताय राव नाहीतर हाच धागा जर रामदास वगैरे किंवा इतर मि. पा. च्या जुन्या सदस्यांनी टाकला असता तर किमान ५० च्या वर दिप्पणी आल्या असता आता पर्यंत.
होय आहे मी नवीन@आंबट चिंच : धन्यवाद, जास्तीतजास्त प्रतिक्रिया मला अपेक्षित नाहीतच कारण मी इतर धाग्यांवर चाललेली "मन्थने"
वाचत आलोय. एका विषयावरील चार लोकांनी एकत्रपणे चर्चा, माहिती आदानप्रदान करावी एवढीच माफक इच्छा आहे.
@अव्यक्त धन्यवाद, लिखाण आणि मुद्देसूद लिखाण हा माझा प्रांत नाही.पण कोणते शब्द,मुद्दे,वाक्य अगम्य आहेत ते सांगा मी खुलासा करतो कारण नुसतेच अगम्य आणि मर्त्य मानव वगैरे शब्द समजण्याइतका मी चतुर नाही त्याबद्दल क्षमस्व.
@शैलेंद्र धन्यवाद, पद्धत नुसतीच चांगली नाही तर यशस्वी आहे. पण त्या करिता काही सोफ्टवेअर्सची गरज असते जसे अमी ब्रोकर (खूपच उत्कृष्ट जर तुमचे स्वतःचे फोर्म्युलेज बनवलेत तर.) कारण त्याच्या मदतीने क्लोजची पोझिशन झटकन समजते म्हणजे लो पेक्षा वर आहेका हाय पेक्षा खाली आहेका आणि मग त्याची वेरीएशंस काढता येतात.
आणि खालील प्रमाणे हाय लो बरोबरच ताळमेळ घातलेला आहे.
१)जर आदल्या दिवशीचा /आठवड्याचा/महिन्याचा क्लोज त्याच्या आदल्या दिवशीचा /आठवड्याचा / महिन्याच्या लो पेक्षा वर आला तर ट्रेंड बदलतो.
२)जर आदल्या दिवशीचा /आठवड्याचा/महिन्याचा क्लोज त्याच्या आदल्या दिवशीचा /आठवड्याचा / महिन्याच्या हाय पेक्षा खाली आला तर ट्रेंड बदलतो.
कवर झी एन्टरटेन : बाजार भाव २७६
नफा (२८१-२७७) : ५
ब्रोकरेज : .६०
---------------------------------
निव्वळ नफा (१.५%): ४ .४० /-
(वरील सर्व ट्रेड एन एस इ वर केले आहे. युनिट्स १ फक्त
फारच किचकट आहे. त्यामुळे एक तर ह्या विषयाची मुळातुनच आवड पाहिजे किंवा तर चिकाटी पाहिजे. शिवाय, हे 'लो', 'हाय' रोज, सतत कुठे पहावयाचे? त्यासाठी, आपल्या संगणकावर विशिष्ट software घ्यायला हवे का?
मुळात मराठीत व्यवस्थित चालणाऱ्या वेबसाईट ईन मीन पंचवीसच्या आत .
त्यात कोणी जरा नवीन लिहितोय तर लिहू द्या की .
प्रत्येक धागा विरंगुळा /जनातलं मनातलं कसा असेल .
आमच्या भटकंतीला पण काहिंना उगाच धोंडे ठेचकाळत तंगडतोड वाटते .दुर्लक्ष करणे .
लेखातल्या संकल्पना समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय.
असे वाटते की लेखात वापरलेल्या टर्मस ची व्याख्या तळटीपेत समजाउन दिल्या लेख वाचणे सोपे जाईल.
१. मागील आठवड्याचे लो आणि क्लोज
२.आदल्या आठवड्याच्या लो पेक्षा वर क्लोज आला
३. ५% शेअर्स आदल्या हाय पेक्षा वर सोडत राहा
१) मागील आठवड्याचे लो आणि क्लोज : प्रत्येक दिवसाला मार्केट सकाळी ९.१५ वाजता सुरु होते तेव्हा अगदी पहला सौदा (म्हणजे कुणीतरी विकलेले समभाग कुणीतरी विकत घेतो)ज्या किमतीला होतो ती किंमत म्हणजे ओपन मग ती जस जशी वर जाते तशी ती त्या दिवशी किती वर गेली तो हाय तसेच खाली गेली तो लो आणि दुपारी साडेतीन वाजता मार्केट बंद झाल्यावर पुन्हा दुपारी ३.४० ते ४.०० ह्या काळात एकाच किंमंत धरून सुरु असते ती किंमत म्हणजे क्लोज.
२) आता लो पेक्षा क्लोज वर म्हणजे : लो पेक्षा क्लोजची किंमत जास्त असा त्याचा अर्थ.
३)५% शेअर्स म्हणजे जर १०० शेअर्स असतील तर ५ शेअर्स आदल्या दिवशीच्या जो काही हाय असेल त्याच्या वर जर आजची किंमत गेली तर ते ५ शेअर्स विकून मोकळे व्हा.
(जसा दिवसाचा ओपन हाय लो क्लोज असतो तसाच आठवड्याचा आणि महिन्यांचा हि असतो.)
(हुश्श ! मला मुद्देसूद समजावता येत नाही त्यामुळे चुकले माकले समजून घ्या हि विनंती.)
प्रतिक्रिया
तुम्ही इथे नविन दिसताय राव
अगम्य...
पद्धत चांगली, पण तिचा
वरील तिघांनाही धन्यवाद
उदाहरणार्थ
कवर झी एन्टरटेन : बाजार भाव
फारच किचकट आहे. त्यामुळे एक
बी एस इ इंडिया डॉट कॉम
टेक्निकल एनालिसिस लेख माला
ओके
वाचनखूण साठविली आहे...
मुळात मराठीत व्यवस्थित
प्रयत्न करतोय
ओके