आवडला. जीएंच्या कथा समजून घेण्यातच माझी ताकद खर्च होते अन् मग मी ते पुस्तक बाजूला ठेवतो असे अनेकदा झालेय हेही खरे. कदाचित माझी तेवढी बुद्धी नसावी. पण जीएंच्या ज्या काही कथा मला कळल्या त्यातली ही अश्वत्थाम्याची कथा माझी फार आवडीची. उजाळा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! :)
राघव
जीएंचं अश्वत्थाम्याशी दु:खाच्या धाग्याने जोडणं फार सुंदर मांडलं आहे तुम्ही. लेख खुप आवडला.
काहि बाबतीत मला तर्कसंगती लागत नाहि (कदाचीत या गोष्टी तर्काने बघु देखील नये). अश्वत्थाम्याला शाप दिला श्रीकृष्णाने. श्रीकृष्ण म्हणजे निसर्गाच्या स्वभावात सर्वत्र समतोल राखण्याची जी अलिप्त आणि तटस्थ प्रेरणा आहे तिचं प्रतीक. त्याशिवाय कृष्णाकडे असा चिरंतर टिक्णारा शाप देण्याची शक्तीच नसती. मग प्रश्न असा उरतो कि अश्वत्थाम्याला हा अनंतकाळचा शाप का मिळाला? इक्वेशनच्या एका बाजुला अश्वत्थामा आपली भळभळती जखम घेऊन जगतोय, तर दुसर्या बाजुला या समीकरणाला कोण आणि काय कंपन्सेट करतय? ख्रीस्त आपल्या भक्तांचं दु:ख भोगायला म्हणुन क्रॉसवर लटकला आहे. आणि ते अनंत काळाचं वचन ख्रिस्ताने देऊन ठेवलं असेल. पण वरवर पाहता अश्वत्थामाचं कृत्य हे अनंत काळ परिणाम साधणारं नव्हतं. महायुद्धात एका राजवंशाचा नि:पात होणं काहि नवीन नाहि. एका ब्राह्मणाने, ब्रह्मास्त्राने हे कृत्य करावे यात काहि नाविन्य असावे काय ? आणि असं काय आहे कि ज्यामुळे अश्वत्थाम्याच्या अपराधाला कधिच क्षमा नाहि? कुठलिही गोष्ट कितीही चांगली किंवा वाईट असो, तिचा परिणाम हळुहळु कमि होत जातो व शेवटी सांगाडा निसर्गात डिकंपोज होतो. महाभारत काव्यात अगदी शेवटी येणारा एक प्रसंग, एक व्यक्ती, असं काय कृत्य करते कि ज्याचे रिपल इफेक्ट्स अनंतकाळ उमटत राहतील? जीएंना अश्वत्थाम्याच्या दु:खाची तीव्रता अधिक जाणवते कि त्यातली अक्षम्यता??
उत्तम लेख.
जीएं च्या कथा फारशा वाचल्या नाहीत, पण अश्वत्थामा ही व्यक्ति जाणुन बुजुन कथा स्वरुपात जिवंत ठेवली आहे असंच वाटतं राहतं. कसला एवढा पश्चाताप झालायं कि अखंड वेदनेच्या स्वरुपात जीए अश्वत्थामा विसरु देत नाहीत.
--मयुरा.
'' आणि असं काय आहे कि ज्यामुळे अश्वत्थाम्याच्या अपराधाला कधिच क्षमा नाहि? ''
उत्तरेच्या गर्भाचा नाश करण्याचा प्रयत्न हा अपराध अक्षम्य आहे
श्रीकृष्ण जर निसर्गाचे प्रतिक मानले तर गर्भनाश हे अनैसर्गिक कृत्य अक्षम्य ठरते कारण या मुळे निसर्गाच्या मुळावर घाव पडतो
आणि म्हणूनच त्याला कधिच क्षमा नाही
''पण वरवर पाहता अश्वत्थामाचं कृत्य हे अनंत काळ परिणाम साधणारं नव्हतं.''
गर्भ हे निसर्गाचे पुनरौत्पदानाचे प्रतिक मानले तर[ उत्तरेच्या ]गर्भाचा नाश करण्याचा प्रयत्न हे अनंत काळ परिणाम साधणारे कृत्य मानणे भाग पडते
कंसाला देखील अशीच शिक्षा व्हायला हवी. अमरत्वाचं वरदान मागणार्या प्रत्येकाला अशी शिक्षा व्हायला हवी. देवव्रताला इच्छा मरणाचं वरदान देणार्या त्याच्या बापाला देखील हाच न्याय लावायला हवा.
आवडला.
जी. एंच्या वैयक्तिक सुखदु:खांशी कुठेतरी त्यांच्या लेखनाची नाळ निगडीत असेल (नव्हे तशी ती होती, असे म्हणणे वावगे ठरू नये), तर त्यांचाही सम्यक उहापोह होणे इष्ट आहे, असे मला वाटते. पाश्चिमात्य कलाकारांच्या, लेखकांच्या जीवनाचा, त्यांच्या कलेच्या संदर्भात, जसा अभ्यास केला जातो, तसा आपल्याकडे केला जातो की नाही, ह्यासंबंधी मला काही विशेष माहिती नाही. जी. एंच्या विषयीतरी असा कुणी केलेला वाचनात आलेला नाही. तसा तो होणे जरूरी आहे.
मस्त लेख.
बाकी, जीएंचा असा अभ्यास कोणी केलेला माहिती नाही पण त्यांच्या कथांमध्ये येणारे परिसराचे वर्णन आणि धारवाडच्या आसपासचा परिसर यांची सांगड घालणारे एक पुस्तक अ.रा.यार्दी यांनी लिहिले आहे असे वाचनात आले. प्रत्यक्ष पुस्तक वाचले नाही, त्याबद्दल ऐकले मात्र आहे.
सुन्दर लेख. मला आठवतंय हिस्ट्री चेनल वर एका कार्यक्रमात पंजाब (पाकिस्तानचा) एका गुहेत मानव अवशेष सापडले.त्यांचा मृत्यू एकाच वेळी झाला असे विशेषज्ञांचे मत होते. गुहेत रेडीओ धर्मिता ही जास्त होती. कालखंड महाभारताचा जवळपासचा असावा असे ही एक मत होते. २०-२२ वर्ष आधी आचार्य श्री राम शर्मा यांचा महाभारताचा हिंदी अनुवाद वाचला होता. ब्रह्मास्त्राचा दुष्परिणाम उत्तराचा गर्भ वर नव्हे तर सर्व प्राणीमात्रांवर झाला होता. मानव आणि प्राण्यांमध्ये विकृत संतती जन्माला येऊ लागली. काही ठिकाणी भयंकर दुष्काळ पडला तर कुठे अतिवृष्टी झाली. हिरोशिमात अजूनही 'अणुअस्त्राचा परिणाम लोक भोगत आहे, आज ६५-७० वर्षानंतर ही विकृत संतती जन्माला येत आहे. ब्रह्मस्त्राचे भयंकर परिणाम सदा लोकांच्या लक्षात राहावे म्हणून कदाचित् व्यासांनी अश्वत्थाम्याला चिरंतर वेदनेचा श्राप दिला असावा.
आज भारतात कित्येक जागा अश्या आहेत जिथे अश्वत्थामा भटकतोय. अशीच एक जागा- बृन्दावनात पिसवा गावाजवळच्या जंगलात ही लोकांनी अश्वत्थामा भटकताना बघितला आहे. (माझा सहकारी याच गावातला आहे).
व्वाउ !
जिएंच्या कथा वाचल्यानंतर लक्षात आलं की असा लेखत पुन्हा होणे नाही .
अश्वत्थामाबद्दलचे त्यांचे लेखन अजून वाचनात नाही आले ते आता वाचणार .
तुम्ही छान लेख लिहून माहिती करून दिलीत .अजून लिहा .
दोन वर्षांपूर्वी स्टार माझावर जिएंच्या कथेतल्या संदर्भातल्या बेळगाव धारवाडमधिल जागा ,घरे राहूल कुलकर्णीनी दाखवली होती .
जीए त्यांच्या कथेतून कथाविचार अलगदपणे पणे सरकवतात आणि कथा गूढच ठेवतात .
अजूनही काळे मांजर बाजूने गेले की मला दचकायला होते .कुठल्या मठात गेलोतर ते आपल्याला संसारातून सुटकेचा मार्ग दाखवण्यासाठी कायमचा अडकवून ठेवण्याचा मार्ग दाखवतील अशी भिती वाटते .
प्रतिक्रिया
सुन्दर लेख
आभारी आहे
छान लेख!
धन्यवाद
एक धागा नेहमी तुटलेलाच वाटतो.
पश्चाताप्...कसला पश्चाताप?
'' आणि असं काय आहे कि
तसं असेल तर...
आपले सगळेच लेख सुंदर आणि
धन्यवाद
काय सुंदर लिहिलंय! वाचनखूण
सुंदर लेख
+१
सुरेख लेख
सुन्दर लेख. मला आठवतंय
व्वाउ !