आपण कधीही पिकासो गायतोंडे या सारख्या मॉडर्न आर्टीस्ट बद्दल लिहीत नाहीत असे का ? आपण जर ते उलगडुन दाखविले तर आमच्या सारख्यांना चित्रकले त शुन्य असणारयांना कीती मोठा आनंद मिळेल आणि ते समजुन घेण्यात मदत होईल असे वाटते म्हणुन असे विचारले.
की शास्त्रीय संगीतात असतात तशी घराणे निष्ठा वगैरे चित्रकलेतही असते का ? की आपला तात्विक वगैरे विरोध आहे ?
गैरसमज नसावा केवळ ती चित्रकला समजुन घेण्यात आपल्या सारख्या जाणकारांचे मार्गदर्शन मिळाले तर आनंद झाला असता इतकेच म्हणायचे आहे.
सध्या तरी या लेखा ने अफाट नेत्रसुख आपण दिले ले आहे त्यासाठी अनेक आभार. कृपया असाच आनंद देत रहा ही नम्र विनंती,
मी काहीसा जुन्यात रमणारा रसिक आहे. जुने चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत, प्राचीन कला, महाभारतादि पुराणे, प्राचीन नगरे, किल्ले, इमारती इ. मला जास्त भावते. नव्याचे वावडे आहे असे नाही, पण जुने जास्त जवळचे वाटते. तात्विक विरोध वगैरे काही नाही. मी स्वतः अमूर्त वगैरे चित्रेही आवडीने रंगवतो. तरी आवड एकंदरित जुन्याचीच जास्त आहे. अलिकडे सर्वच गोष्टींचे फार बाजारीकरण झालेले आहे, असे वाटते, त्यामुळे त्यातून सकस असे निवडणे गरजेचे आहे, आणि कठिणही आहे.
सुरेख चित्रे आणी त्यांच परिचय !
१४ व्या चित्रातली प्रकाशयोजना आणी १६ व्य चित्रातल्या संगमरवराचा ईफेक्ट एकदम खास..
जुन्य काळातल्या भारतीय चित्रांमधली रेखीव कारागिरि भावते पण त्रिमितीमधे काढलेली चित्रे जास्त प्रभावशाली वाटतात.
अवांतर : पहिल्या चित्रातल्या चांद्बीबी आणी मदाम च्या कालखंडात सुमारे १०० वर्षे अंतर असूनहि हि समकालीन कशी?
http://gallica.bnf.fr/ark:/12148/btv1b85931054/f1.zoom.r=india या लिंकवर जो नकाशा आहे तो कुठल्या काळातील आहे हे आपण सांगू शकाल का ? आपल्याला फ्रेंच भाषा येत असेल असे गृहीत धरले आहे......
@जयंत कुलकर्णी:
सदर नकाशा इ.स. १६०६ मधील आहे, असे खालील दुव्यावरून दिसते:
http://gallica.bnf.fr/Search?ArianeWireIndex=index&p=1&lang=FR&q=india+orientalis&x=-928&y=-73
अप्रतिम.
भारतीय आणि पाश्चात्त्य कलेतील तुलनात्मक आढावा आवडला.
भारतीय चित्रकलेतील माईलस्टोन असलेल्या अजिंठा आणि उत्तर अजिंठा (वेरूळ, कान्हेरी) शैलीतील चित्रांचा विचार का केला नाही किंवा अशा प्रकारची चित्रे भित्तीचित्रे अथवा प्रस्तरचित्रे ह्या प्रकारात मोडत असल्याने ह्यांचा सर्वस्वी वेगळा विचार करावा लागतो?
अजिंठा शैलीतील चित्रांवर एखादा लेख अवश्य लिहावा अशी आग्रहाची विनंती.
बाकी चित्र क्र. ८ मधील रावणाचे १० वे गर्दभ मुख काही शिल्पांमध्ये सुद्धा दर्शवलेले दिसते.
वेरूळ (लेणी क्र. २१- रामेश्वर, ८-९ वे शतक) रावणानुग्रह शिवमूर्ती
टोक गाव, प्रवरासंगम (१७-१८ वे शतक) राम - रावण युद्ध
रामायणात असा उल्लेख नाही. रावणाची दाही तोंडे सारखीच होती, मात्र रावणाचा रथ गाढवे ओढीत.
तसेच सुंदरकांडात त्रिजटेला पडलेल्या स्वप्नात रावण गाढवावर बसून दक्षिणेकडे जात असल्याचा तसेच तो पुढे खाली डोके आणि वर पाय अशा अवस्थेत गाढवावरून खाली पडल्याचा उल्लेख आला आहे.
पिबंस्तैलं हसन् नृत्यन् भ्रान्तचित्ताकुलेन्द्रियः ।
गर्दभेन ययौ शीघ्रं दक्षिणां दिशमास्थितः ||
पुनरेव मया दृष्टो रावणो राक्षसेश्वरः ।
पतितोऽवाक्शिरा भूमौ गर्दभाद् भयमोहितः ॥
गाढव अशुभ, अपवित्र मानले जाई. साहजिकच रावणाचे एक मस्तक गर्दभरूपी दाखवत असावेत.
रावण 'दशस्कंधी' (ब्राह्मण?) होता, स्कंध म्हणजे खांदा, त्यामुळे पुढे त्याला दहा तोंडे होती, अशी समजूत पसरली, वगैरे वाचल्याचे आठवते.
'दशस्कंधी' म्हणजे नेमके काय, यासाठी विक्कीवेदाचा वा गूगलोपनिषदाचा शास्त्राधार सापडला नाही. कुणाला ठाऊक आहे का?
भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रकलेतील भेद हा विषय असल्याने असा फरक ज्या चित्रातून प्रमुख्याने दाखवता येईल, अशी चित्रे घेतली आहेत. अजिंठा चित्रकलेबद्दल लिहायला खास अभ्यास करावा लागेल.
(या कलेवर तात्कालीन अन्य संस्कृतीतील चित्रकलेचा काही प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे का? असे काही उल्लेख शिलालेखात वगैरे आहेत का?)
या कलेवर तात्कालीन अन्य संस्कृतीतील चित्रकलेचा काही प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे का? असे काही उल्लेख शिलालेखात वगैरे आहेत का
तसा कुठलाही उल्लेख अजूनतरी माझ्या वाचनात आलेला नाही.
पण ही अशा प्रकारची भित्तींवरील चित्रकला सुमारे २२०० वर्षांपूर्वी (साधारणपणे सातवाहनकालात) अस्तित्वात होती हे खास. पण तिचे स्वरूप साधारण छतावरील चौकटींची नक्षी अशाच स्वरूपात होते. व्यक्तिचित्रे इतक्या प्राचीन काळात अस्तित्वात आलेली नव्हती. त्यांच्या उगम अजिंठ्याच्या महायान कालखंडातच आढळून येतो. (पाचवे ते नववे शतक).
लेख, त्यातली उदाहरणं - विशेषतः तौलनिक आणि दोन्ही चित्रपद्धतींच्या मिलाफातून आलेली अतिशय आवडली. ओरहान पामुकच्या 'माय नेम इज रेड' या पुस्तकात मध्यपूर्वेतली पारंपरिक मिनिएचर शैली आणि इटालियन रेनेसाँ यांच्यातल्या संघर्षाचे चित्रण आठवले.
हे पुस्तक नेमकं हाताशी नाही, तेव्हा आठवतं तसं सांगतो. चूभूदेघे.
'माय नेम इज रेड' मध्ये निरनिराळी सूत्रं आहेत. तत्त्वचर्चेपासून ते अगदी खुनाच्या रहस्यापर्यंत. त्यातलीच एक मुख्य घटना म्हणजे तत्कालीन (१५-१६ वे शतक) सुलतानाची थोरवी सांगणारा चित्रमय ग्रंथ सिद्ध करणं. ते करत असताना पारंपरिक पद्धतीबरोबरच (द्विमितीतली, इस्लामी प्रथेप्रमाणे मानवी चेहरे न रेखाटलेली) नव्याने ज्ञात झालेल्या युरोपियन शैलीचाही (त्रिमिती/घनतेचे परिप्रेक्ष्य आणि पोर्ट्रेचर) कलाकारांना मोह पडतो आणि त्यातून निर्माण होणारे बेबनाव इ. एका अर्थी तुर्कस्थानच्या पाचवीलाच पूजलेल्या पूर्व-पश्चिम संघर्षाचं हे एक रूप झालं. या ओघातच मग मिनिएचर शैलीसाठी लागणारं साहित्य, ते तयार करण्याच्या पद्धतींचं वर्णन, कलाकारांच्या दृष्टीवर होणारा अपरिहार्य परिणाम याही बाबी या कादंबरीत येऊन जातात.
पाश्चात्य चित्रे ३-डी इफ्फेक्ट असल्यासारखी जिवंत भासताहेत.
चित्रे अशी वाटावीत म्हणून पाश्चात्त्य कलावंतांनी दीर्घकाळ प्रयत्न, संशोधन केले, शास्त्रीय सिद्धांत शोधून त्या अभ्यासाची जोड दिली... पुढे नवकलेच्या आगमनाने ते सर्व मातीला मिळाले, कलेविषयी नवनवीन कल्पना, पद्धती रूढ झाल्या. कलेचे क्षितिज आणखी विस्तारले, या सर्व घडामोडीत पौर्वात्त्य कलेचे अनुकरण करणे हा महत्वाचा भाग होता.
या सर्व घडामोडीत पौर्वात्त्य कलेचे अनुकरण करणे हा महत्वाचा भाग होता.
उदाहरणार्थ खालील चित्रे (मातीस व पिकासो या थोर चित्रकारांची). यात प्रकट रेखांकन, सपाट रंगलेपन, "एका विविक्षित क्षणी, एका विविक्षित बिंदुतून दिसणारे दृष्य" या कल्पनेला दिलेला फाटा, पर्स्पेक्टिव्ह-छायाप्रकाश-घनता-शरीरशास्त्र-स्नायुंचे चित्रण -- या सर्व गोष्टींचा अभाव, ही (पौर्वात्त्य कलेची) सर्व वैशिष्ट्ये दिसून येतात.
.
असे लेख पाहिल्यावर आपण चित्रगुप्त बाबांच्या गुहेत आल्यासारखे वाटते. काय निरखून पहावे काय नाही असे होते. मला
व्यक्तिशः सर्रॅरिआलिस्टिक, रिआलिस्टीक, इंडीयन मिनेचर सर्व प्रकारची चित्रे आवडतात. ती ती चित्र पहाताना त्या त्या
शैलीच्या मर्यादा व बलस्थाने मनांत पक्की केली ही मग आनंदच आनंद. चंदीगड येथील म्युझियम मधे ही बरीच उत्तम चित्रे पहावयास मिळाली. हा लेख म्हणजे चिगगुप्त बाबाका प्रसाद आहे ! अलिकडील शैलीचा विचार केला तर आता पुण्यास स्थायिक झालेल्या रवी परांजपे यांची शैलीही वाखाणण्यासारखी आहे असे माझे आपले स्वत:चे मत बुवा !
तुलनात्मक लेख आवडला .
अपेक्षा वाढल्या आहेत !
१)आता जर्मनात दुसऱ्या महायुध्दातली चोरीला गेलेली मूळ चित्रे सापडली त्याची जरा माहिती देणारा धागा लिहिणार का ?
२)राजस्थान (कोटा ,बुंदी ,शेखावती), केरळ ,तमिळनाडुतील म्युरल्सवर(माहितीवजा ) सवडीने लिहिणार का ?
काका, तुम्ही Willem Schellinks चे चित्र दिले आहे, ते नंतर बनवलेली रिप्लिका आहे. मूळ चित्र हे आहे
https://collections.vam.ac.uk/item/O69124/parade-of-the-sons-of-oil-painting-by-willem-schellinks/?carousel-image=2006AU3252
प्रतिक्रिया
सुरेख!!!
सुंदर चित्रे...
फारच सुंदर !!!
अप्रतिम लेख ! अफाट नेत्रसुख !
जुने आणि नवे.
+१
सुरेख चित्रे आणी त्यांच परिचय !
चित्रे समकलीन आहेत
७, १६ आणि १८ लय आवडली. विवेचन
अतिशय उत्तम लेख.....
http://gallica.bnf.fr/ark:
नकाशा १६०६ सालचा
अप्रतिम.
रोचक
रामायणात असा उल्लेख नाही.
रावण 'दशस्कंधी' होता ?
दशस्कंधी असा उल्लेख वाचल्याचे
मी
माहितीबद्दल धन्यवाद वल्ली!
अजिंठा
या कलेवर तात्कालीन अन्य
बहोत खूब चित्रगुप्त सेठ!
आई गं!
सुंदर
अप्रतिम!
माय नेम इज रेड विषयी
हे पुस्तक नेमकं हाताशी नाही,
लाजवाब चित्रे आणि लेख. बादवे,
३-डी इफ्फेक्ट आणि जिवंत
पौर्वात्त्य कलेचे अनुकरण
सुंदर चित्रे आणि तेवढेच सुंदर
चित्रगुप्त बाबाची गुहा ..
शैलीच्या मर्यादा व बलस्थाने
अप्रतिम सुंदर!
सहमत.
तुलनात्मक लेख आवडला .
काका, तुम्ही Willem
पुराणकाथांवरील चित्रे या लेखाच्या संदर्भात