Welcome to misalpav.com
लेखक: बुडबुडा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नाव सुचवायचे म्हणता तर हा धागालेखकाने हेही धागे डोळ्याखालून घालावेत असे सुचवतो: http://www.misalpav.com/node/24707 http://www.misalpav.com/node/24801

थोडं जास्त लिहीत जा, प्रतिक्रिया, लेख, खरडी काहीही. कलंदर आणि कलन्दर यांच्यातला फरक जाणवायला लागेल. बाकी लेखाच्या मतितार्थाशी सहमत.

मोबाईलमुळे आणि मुख्यत: बेजबाबदार प्रेक्षकांमुळे नाटके/ गाण्यांच्या कार्यक्रमाना रसभंग होतोच. मागे दिवाळीच्या आसपास शिवाजी मंदिरला नाटकाला गेलो होतो आणि पब्लिक पूर्ण वेळ खॉक खॉक करत खोकत होतं, एकही मिनिट असं नाही की कुणी खोकलं नाही... सगळाच विचका नाटकाचा :( अगदी तान्ह्या पोरांना घेऊन येणार्‍या रसिकांबद्दलतर विचारायलाच नको. 'मी सवाईला गेलो होतो' हे मिरवण्यालाच येतात बरेचजणं.. अवांतर - २००४ मध्ये अण्णांनी भैरवी आळवली होती, त्यानंतर काही योग जमला नाही अजूनपावेतो!:( - उपास

मिपावर स्वागत. सवाईबद्दल, कोणी कोणी हजेरी लावली, कोणाचे गायन/ वादन कसे झाले? डिटेल्समधे लिहिणार? जायला जमले नाहीये पण वाचायला आवडेल.

वर बरीच चर्चा गाण्या खाण्या वर झाली आहे आणि विशेषत: कार्यक्रम चालू असताना खाणे यावर लिहिले गेले आहे. त्यात नवीन भर अशी की कार्यक्रम चालू असताना रागांच्या नावाने बनवलेली खास अत्तरेही आता वास घेण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. आत्ता पर्यंत रागांच्या नावाच्या नऊ अत्तरांची निर्मिती झाली आहे. वाचा --- http://www.loksatta.com/pune-news/perfumes-based-on-music-ragas-294943/

पोट भरण आणि ते रिकाम करण हे नैसर्गिकच आहे त्याबद्दल काहीच वाद नाही पण त्याचा गाजावाजा किती आणि कुठे करावा याचे मात्र भान राखले पाहिज आधी हा मकीचा लेख आहे असे वाटल्यामुळे, वरील वाक्याचा भलताच अर्थ घेतला. (म्हणजे बटाट्याची भाजी जास्त खाल्ल्यामुळे जो गाजावाजा होतो तो!)