Welcome to misalpav.com
लेखक: शोधा म्हन्जे सापडेल | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुमचे मुद्दे आणि तुमचे जग, तुमचे प्रश्न आणि त्याबाबत समाजाच्या ठेके दारानी चालवलेले मंथन ह्यावर भाष्य करावे एवढी प्रगल्भता माझ्यात तरी नाही. पण आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतानाचा तो उमेदवारीचा काळ आठवतो मला २०-२२ तृतीय पंथी लोकांना घेऊन शिर्डीला जाणार का असे एकाने कुत्सितपणे विचारले होते आणि रागाच्याभरात मी हो म्हणालो होतो (वय २१ )आणि मी गाडी, परमिट ई सगळे केले आणि त्यांना नेऊन आणले. त्यांनी ज्या आदराने मला वागणूक दिली ती आज ही स्मरते. एक माणूस म्हणून एका माणसाशी जसे वागायला हवे तशी वागणूक मला सर्वांच्या बाबतीत अपेक्षित आहे. पण एक तक्रार हि आहे. समलिंगी पुरुष जेव्हा लोकलमध्ये स्पर्श खेळ करतात त्याने त्रास होतो दोन कारणांनी की जर त्याला अर्वाच्य शिव्या घालाव्यात तर इतर लोक धोपटतील त्याला जे मला पसंत नाही आणि त्याही पेक्षा आमचे सभ्य मन आम्हाला तसे करू देत नाही. आणि दुसरे कारण पुरुषांच्या डब्यात जेव्हा स्त्री येते तेव्हा आम्हीही तिच्याशी कुठलेही स्पर्श खेळ करत नाही. तुमचे सम लिंगी आकर्षण चूक की बरोबर,त्याचे समाजावर होणारे परिणाम ह्यावर भाष्य करण्याइतकी प्रगल्भता माझ्यात नाही पण तुम्ही जे लिहिले आहे त्यातली वेदना समजण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो.

ज्ञानव, मला तुमचा मुद्दा पूर्ण पटतो. लोकलमध्ये होणारे स्पर्श किळसच आणतात. आणि हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही त्याबद्दल पब्लिकमध्ये बोलत नाही. पण जसं, आंब्याच्या पेटीमध्ये एखादा आंबा किडका निघतो, तसंच हे सुद्धा आहे. काही थोड्या लोकांमुळे पूर्ण वर्गच दुषित नजरेतून बघितला जातो.

@ जितकं नैसर्गिक तुम्हाला मुलींविषयीच्या आकर्षणात वाटतं तेव्हडच नैसर्गिक मला मुलं बघताना वाटतं. एखाद्या पुरुषाबरोबर जीवन जगावं ही माझी शारिरीक कमी आणि मानसिक गरज जास्तं आहे. >>> अतिशय महत्वाचं!

@ मला माहित होतं की मी वेगळा आहे. कारण माझं वेगळेपण माझ्यावर सतत ठसवलं जात होतं. मला कधी विसरूनच दिलं नाही की मी इतर मुलांसारखा, पुरुषांसारखा नाही.>>> हे त्याहून जास्त महत्वाचं