स्मृतीस अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली !
एक उत्तम कविता दिल्याबद्दल साजिद ह्यांना धन्यवाद....
थोडे अॅडिशन.
गदिमा हे एक उत्तम अभिनेते पण होते.त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांची नावे देत आहे.
१. पहिला पाळणा
२. लोकशाहीर रामजोशी
३. बनवासी
४. अदालत (हिंदी)
५. पुढचं पाऊल
६. लाखाची गोष्ट
७. पेडगावचे शहाणे
८. जीत किसकी (हिंदी)
९. अंमलदार
१०. जगाच्या पाठीवर
आणि
११. वऱ्हाडी आणि वाजंत्री
वा साजिदसाहेब! तीन अण्णांचे लय उपकार - माडगूळकर, चितळकर आणि जोशी.
मला आवडणारी एक कविता देतो आहे
जोगिया
कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली
झूंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिलें पाठी
हळूवार नखलीशी पुन: मुलायम पान
निरखीसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते?- गौर नितळ तव कंठी -
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.
साधता विड्याचा घाट उमटली तान,
वर लवंग ठसता होसी कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने,
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"
त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंग वेडी गाथा
"मी देह विकुनीया मागून घेते मोल,
जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल',
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा.
शोधीत एकदा घटकेचा वि़श्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान...तो निघून गेला खाली
अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'
नीतिचा उघडिला खुला जिथें व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हांसून म्हणाल्यें, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या...' निघून गेला वेडा!
राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात,
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला?
तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत,
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे."
गदिमा माझेही अतिशय आवडते कवी व गीतकार तसेच अभिनेतेही. त्यांचे वाटेवरल्या सावल्या हे आत्मचरित्र खूपच छान आहे. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा आदी अष्टसिद्धींसारखी "गदिमा" ही एक मराठी सारस्वताला लाभलेली सिद्धी आहे ह्यात शंकाच नाही.
त्यांचे माझे थोडे नातेही आहे ते म्हणजे माझे आजोबा त्यांचे शिक्षक होते (कुंडल येथे) आणि गदिमांच्या नातीची थोडी ट्रिटमेंट मी केली आहे. तेव्हा त्यांच्या मुलीने मला गदिमा डॉट कॉम ही सीडी भेट दिली होती.
गदिमा, ओ पी नय्यर, मोहमद रफी, साहिर लुधीयानवी, दिलीपकुमार, दिलीप प्रभावळकर व कुमार गंधर्व याना मी आपले मन वाहिले आहे. ही शब्द, स्वर, आवाज. अभिनय यातील सारी महारत्ने आहेत.
ये जाग पाखराना आला भरून माठ
गवतात झोपलेली भिजली दवांत वाट
या ओळी आठवल्या की गदिमा ना सरस्वती कशी प्रसन्न होती ते उलगडते.
गदीमांना जाऊन आता ३५ च्या वर वर्षे झाली. त्यांची अनेक गाणी ती त्याही आधीच्या दशकांमधली...तरी देखील अजूनही आवडतात. अवीट गोडी म्हणजे काय ते त्यावरून समजते..
वर लेखात टाकलेली कविता ही खूपच छान आहे आणि ती सुरवातीपासून वाचण्यासारखी आहे. रामायण, चैत्रबन, वैशाखी मधील चित्रपटगीते, जोगीया मधील कव्य आणि पुरीया मधील त्यांच्या शेवटच्या काळातील काव्य हे सर्वच वाचण्यासारखे आहे. गीत गोविंदला मात्र तशी लोकप्रियता मिळू शकली नाही. त्यांचा अभिनय, पटकथा लेखन आदी देखील अविस्मरणीय होते... लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर वगैरे मधे अभिनय-पटकथा लेखन आण काव्य सगळेच त्यांचे होते. वर्हाडीवाजंत्री त्यांनी वठवलेला मधला कन्नड मराठी माणूस एकदम मस्त आहे!
त्यांची अनेक गाणी, कविता खूप आवडतात... येथे एक वेगळ्याच विषयावरची त्यांची पूजास्थान कविता खाली चिकटवत आहे. (दुवा: gadima.com)
प्रतिक्रिया
गदिमा यांच्या
गदिमां बद्दल काय बोलावे?
+ १०००
वा साजिदसाहेब! तीन अण्णांचे
सुंदर कविता!
+१
सहज सोप्या रचना
नववी सिद्धी !
अभिवादन
अचूक शब्द योजनेचा जादूगर
गदीमांना जाऊन आता ३५ च्या वर