Welcome to misalpav.com
लेखक: खटासि खट | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

असू द्या कि. तुरुंगात घाला, कसा बाहेर येतोय कृष्णासारखा. दीवारे रोक नही सकती, ताले टूट जाते है, दरवाजे खुल जाते है.. तो भईया, चमत्कारी पुरुष नही कहोगे ?

हे असं कौतूक करणारर्‍या व पाच वर्षांत करोडपती होणार्‍या दादा, आण्णा, साहेबांचे कौतूक करणार्‍या आणि नंतर परत तावातावाने चर्चा करून "सिस्टिम"ला दोष देणार्‍या लोकांनी फक्त आरशात बघितले तरी त्यांना भारतिय लोकशाहीचा "खरा" दोष ताबडतोप दिसेल !

लालूंनी भ्रष्टाचार केला असेल तर न्याय व्यवस्था त्यांचा योग्य न्याय करेलच. पण लालूंचे एका गोष्टी साठी नेहमीच कौतुक वाटत राहील ती म्हणजे अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत. बाबरी मस्जिद पतनानंतर अक्ख्या देशभर दंगे पेटले होते अपवाद बिहारचा.

अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत. रथयात्रा काढणे ही अडवानींची मजबुरी होती. अन ती थाबविणे लालूंची. लोकांचा बुद्धीभेद करण्याची ही चाल असते भारतातील राजकारण्याची !

ती घटना अश्वमेध का राजसूय पैकी कुठल्या तरी यज्ञाची आठवण करून देते ब्वॉ आपल्याला. वाजपेयींनी यज्ञ आरंभला, मग समारंभपूर्वक घोडा सोडला, त्यावर भाजपचे चाणक्य म्हणाले घोडा मोकळा सोडून चालणार नाही, चोरीला गेला किंवा भरकटला तर ? मग त्याला दो-या बांधायची कल्पना पुढे आली. दुसरे कौटील्य म्हणाले कि ब्वॉ याने तर काहीच फरक पडला नाही. मग जोखड बांधलं. तेव्हां विष्णुगुप्त शास्त्री म्हणाले कि जोखडासहीत घोडा चोरीला जाऊ शकतो. तेव्हां वाजपेयी म्हणाले ठीक आहे एक विश्वासू माणूस घोड्यासोबत पाठवतो. त्यांनी पॉझ घेत अडवाणींकडे पाहीलं, अडवाणींच्या काळजात धस्स झालं. आधीच लक्ष्मणाच्या नशिबात असलेला सेकंड हिरोचा रोल करून वैतागले होते, त्याच वैतागात ते म्हणाले " आता या वयात घोड्यावर बसवू नका". यावर घोड्यावर बसून बेंड आलेले आणखी एक मुखंड सहमतीने मान डोलावते झाले. स्वानुभवाने अडचण ओळखून "बसायची" योग्य व्यवस्था व्हावी असा खल सुरू झाला. त्यातूनच मग घोडा, घोड्याला दो-या, दो-यांना जोखड आणि जोखडास रथ जोडण्याची आयड्या पुढे आली. मग आता रथ जोडायचाच आहे तर घोडा कशाला ? स्वयंचलित रथ नको का ? नाहीतर आपला पक्ष बुरसटलेल्या टेक्नॉलॉजीचा आहे अशी टीका होईल ही शंका भाजपच्या वेदव्यासांनी व्यक्त केली. एकंदर रागरंग पाहून वाजपेयी आणि भाजपेईंनी स्वयंचलीत वाहनाचाच रथ बनवण्याच्या आयड्याची कल्पना पुढे केली आणि अशा रितीने बिनघोड्याचा वारू उधळला.