Welcome to misalpav.com
लेखक: चौकटराजा | प्रसिद्ध:
मिपावर आपण सारे मुख्यत" दोन गोष्टीसाठी येतो .व्यक्त होण्यासाठी व व्यक्त झालेल्याना प्रतिसाद देण्यासाठी. प्रिट मिडीयाचे मालक, संपादक निरनिराळ्या ईझम्सचे रंग फासून वावरत असतात. सुदैवाने मिपा सारखे माध्यम असा कोणताही एकच रंग घेऊन वावरत नाही. मिपा हे व्यक्तीगत आयुष्यातली कसे भिनत जाते याचे प्रत्यंतर आम्हा काहीना येणार होते. १७ डिसेंबर २०१३ ची संध्याकाळ काही पुणेकरांसाठी एक अचानक जमलेला कट्टा या स्वरूपात अवतरली. अत्यंत अल्प काळात आपल्या दर्जेदार लेखनाने मिपाप्रिय ठरलेले श्री इस्पिक एक्का हे पुण्यात आले आहेत असे ब्याटम्यान याना कळले. एकमेकांच्या एरवी प्रत्यक्ष संपर्कात असलेल्या काही आयडी ना श्री ई. ए. याना भेटण्याची फार दिवसांची इच्छा होतीच. त्याला अत्यंत उदार मनाने 'इ ए' यानी प्रतिसाद द्यायचे ठरवले व बालगंधर्व रंगमंदिराच्या कॅफेट्रिया मधे प्रथम श्री वल्ली, चौरा , मालोजीराव , बॅटमॅन हे इस्पिक एक्काश्री ना भेटले. ते सर्वाना सुहास्यवदनाने भेटले व त्यानी आपल्या मुलाची ओळखही सर्वाना करून दिली. गरम गरम चाय व कॉफी यांचे घोट घेत आम्ही काही सुरवातीचे प्रश्न श्री इस्पिक एक्का याना विचारू लागलो .आपल्या मिस्कील स्वभावाने व माहितीप्रचुर उत्तरानी त्यानीच खुद्द या मैफिलीत रंग भरावयास सुरूवात केली. गेली काही वर्षे ते मध्यपूर्वेत एक मल्टी स्पेशालिटी मेडीकल युनिट मधे काम करताहेत. त्या निमित्ताने त्यानी द आफ्रिकेत काही देशाना भेट दिली आहे पण एरवी व्यक्ती म्हणून त्याना प्रवासाची जबर हौस आहे. त्यात काही वेळेस त्यानी सहकुटूंब ही प्रवास केलेले असून एकूण २४ देशाना आतापावेतो त्यानी भेटी दिल्यात असे समजले. मिपावर त्यांचा सध्या विएटनाम प्रवास गाजत आहे.साहजिकच दक्षिण पूर्व आशिया व हिंदू संस्कृति व राजवटी अशा विषयाकडे चर्चा वळली.तेवढ्यात बॅटमॅन आले . त्यानी व मालोजी रावानी मग एक्क्का यांचा ताबा घेतला. अंकोरवाट देवालयाची वास्तूशास्त्रीय माहिती चौ रा व वल्ली घेउ लागले तर ऐतिहासिक बाजू मालोजी, ब्याटोजी हे सरदार संभाळत राहिले. तेवढ्यात प्रशांत, अप्पा जोगळेकर, अत्रुप्त आत्मा, व फक्त ५० राव ही आले. मग गप्पाचा फड अधिक जमण्यासाठी परत एकदा चाय चा राउंड . आता चर्चा " नॉर्वे ची सफर" हा विषय घेउन आली. आपण ऑरोरा पहाण्यासाठीच हिवाळा निवडला होता एरवी मध्यरात्रीच्या सूर्र्याचा चमत्कार पहायला उन्हाळ्यात जावे लागते हे त्यानी सांगितले. मग मध्यपूर्वेतील राज्यव्यवस्था खरे तर " राजे" व्यवस्था, अर्थव्यवस्था, बंधने, इमिग्रेशन, युरोपियन युनियन , शेगेन व्हिसा व युरो कंट्री या तील फरक ई वर माहिती सगळ्याना मिळत गेली. दरम्यान श्री सागर म्हात्रे यानीही मोकळेपणाने मिपाकर असल्याप्रमाणेच जणू भाग घेण्यास सुरूवात केली. त्यांच्या प्रवासातील काही अप्रतिम फोटो पहावयास मिळाले. एव्हाना नउ वाजत आले होते. मग सगळे म्हणाले चला जेवायला निघू. . एकमेकाशी गप्पा मारत संभाजी उद्यानाजवळील " मयूर" भोजन गृहात गेलो. ताटात पांढराढोकळा, कचोरी,भाज्या,पापड , गुजराथी कढी,खिचडी( मुगडाळीची) गुलाबजामुन असे एकेक पदार्थ येऊन पडून लागले व मुखांमधे नाहीसे होऊ लागले. जेवणामधे गप्पांचा बहर कमी झाला होता. जेवणानंतर पन्नास राव व आत्मासाहेब लगेचच निघाले . बाकी मंडळी बालगंधर्व च्या गेटवर पुन्हा एका मैफिलीसाठी जमली. मग आपले स्वीस मधले काही अनुभव श्री इस्पिक एक्का यानी सांगितले.तेथील पर्यटन व्यवस्था किती सक्षम बनविली गेली आहे. त्याचा अनोखा प्रवास झाला. मग भारतीय लोकांची मनोवृती, राजकारण असे करत ओमानच्या राजाच्या केशकर्तकाच्या " थाटमाटाचा " किस्सा ( स्पेशल विमान धाडण्याचा) ऐकल्यावर व लालूप्रसादांचा कमिशनचा किस्सा ऐकल्यावर हसून हसून पुरेवाट झाली. आपण एरवी दिवस उत्तम गेल्यास " यू मेड माय डे " म्हणतो. तसे ती स्मरणीय संध्याकाळ संपविताना आमची सर्वांचीच भावना श्री इस्पिक एक्का यांचे प्रति अशीच होती. बालगंधर्व क्याफेटेरियात एका प्रसन्न क्षणी चौकटराजा, अत्रुप्त आत्मा, बॅटमॅन आणि मालोजीराव a अजून एक क्षण पकडताना ५० फक्त, चौकटराजा, बॅटमॅन, अत्रुप्त आत्मा, मालोजीराव, सागर म्हात्रे, उत्सवमूर्ती इस्पीकचा एक्का आणि प्रशांत. a मयुर हॉटेलच्या बाहेर भोजनानंद लुटल्यावर त्रुप्त पोटाने बाहेर पडताना प्रशांत, इस्पीकचा एक्का, ५० फक्त, चौकटराजा, सागर, बुवा, मालोजीराव, ब्याम्या, अप्पा जोगळेकर आणि वल्ली. a *सर्व फोटो इस्पीकचा एक्का यांजकडून.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

हा अचानक कट्टा वाटत नाहीये, गुपचुप कट्टा असावा असा संशय आहे. ;) चौरा म्हणजे काठी टेकणारे वृद्ध गृहस्थ असतील असे इतके दिवस समजत होते. सगळे फोटू व वृत्तांत आवडला. ५० रावांना म्हणावं लेखमालिका पूर्ण करून पुन्हा मोठी सुट्टी घ्या.

मिपाचे लाडके गारूडी ज्याक ड्यानियल सध्या पुण्यात आहेत असे खात्रीशीर सूत्रांकडून समजते. त्यानला भॅटून घ्या. परत गावायचे नाहीत लवकर.

आबासाहेब, खात्रीलायक सूत्र तर तुम्हीच आहात, शनिवार रैवार बघुन कट्टा करा बघु आयोजित. तुम्हीच व्हा स्वागताध्यक्ष. :) वाटल्यास आम्ही आभार्प्रदर्शन करु. ;)

सोलापूर कट्टा: संक्रांत. गड्डा यात्रा. कालावधी : १४ जानेवारी आसपास. बुकींग साठी संपर्क : वल्लीसाह्येब. सौजन्य : चविष्ट सोलापूरी जेवण आणि जत्रेत गोंधळ केल्यास निस्तरण्याची हमी. :) जास्तीचे आकर्षण : उस्मानाबाद ची धाराशिव लेणी, लांबतुरे संग्रहालय आदी आदी. आयोजक : मीच की.

हाहाहा. =)) जमल्यास कुडाळसंगम आणि पानगाव. आणि मुख्य आकर्षण नळदुर्ग राहिलंच की रे.

जे डी साहेब पुण्यात आहेत? अहो आम्ही त्याना इकडे कधी येताय म्हणून फार आर्जव करतोय आणि ते पुण्यात पोहोचले सुद्धा. हे पुणेकर महणजे लोकांचा कात्रज करण्यात एकदम पटाईत. जे डी साहब हाजिर हो(वजा साप) !!!

जेडी पुण्यात आहे - ¨ममाहेरपणाला¨ आलाय. सांगतो त्याला कॉन्टॅक्ट करायला. अभ्या - सध्या पुण्यात नाही, त्यामुळे स्वागताध्यक्ष होऊ शकत नाही. आलो पुण्यात की करूच कट्टा. तू पण सोलापुराहून यायचंस - या अटीवर.

झालेली आहे. फक्त वृत्तांत आणि इ.ए. यांना भेटण्याची संधी गेल्याने नाही तर कधी नव्हे ते पुण्यात असून "आतल्या गोटात" नसल्यामुळे कट्टा हुकल्याची.