Welcome to misalpav.com
लेखक: ज्ञानव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

चांगली माहिती देताय. इंग्रजीत बरेच लिखाण उपलब्ध आहे, पण फार तांत्रिक असते. मज सारख्या नवख्या लोकाना कळण्या सारखं नसतं, इथे उदाहरण देऊन चांगले सांगितले आहे. या वर्षी सुरुवातीला मी टाटा स्टील मध्ये सुरुवात केली. मार्च मध्ये जोरदार पडला, पण बेसिक कमोडीटी ला मरण नाही असे मन सांगत होते. आता दिवाळी नंतर नुकसान भरून पुढे चालला आहे. जून मध्ये त्याच शेअर साठी अजून खरेदी करून अवरेजिंग करावे असे वाटत होते, पण 'मोह नको' म्हणून गप्प बसलो. यावर पण कधीतरी लिहालच! असे विश्लेषण त्यावेळी करून बघितले असते तरी कळले असते.

पण जर टाटा स्टील मध्ये अडकले असाल तरीही हि पद्धत सरावाने वापरू शकतो आपण.

हे शिकून कधी चार पैकं किळालं तर पार्टीला आमालाबी बोलवा.

blue चिप companies कोणत्या आहेत आजच्या घडीला ? यादी सुचवावी… yes बँक and sbi कस्सा आहे गुंतवणुकीसाठी ?

मी केव्हाही एस बी आय उत्तमोत्तम आहे असेच म्हणीन. येस बँक ट्रेडिंगसाठी वापरून आलेल्या नफ्यात एस बी आय घेणे केव्हाही चांगले. ब्लू चिप्स काय असतात मला माहित नाही कारण मी कुठल्याही इतर शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली नाही अगदी इन्फी किंवा टी सी एस, ए सी सी वगैरे. कारण मी पब्लिक सेक्टर बँक्स आणि प्रायवेट सेक्टर बँक्सचे युनिट वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. माझी ती गरज आहे. मार्केट मध्ये हजारो कंपन्या आहेत काही चांगल्या काही वाईट पण माझ्याकडे तितके पैसे नाहीत. आणि एसबीआय पीएनबी, बँक ऑफ बरोडा आणि इंडिया ह्याचे शेअर्स घेणे इथ पर्यंतच मी मर्यादित आहे. ब्लू चिप्सची यादिला यादी म्हणून देऊ शकतो.

माझ्या मते ही अतिशय चुकीची पद्धत आहे. मुख्य म्हणजे बँक ऑफ इंडियाचा शेअर का घ्यायचा? HDFC बँक चा का नको? बँकिंग सेक्टरचा का, टेक्नॉलॉजी सेक्टर का नको? हे प्रश्न आधी स्वत:ला विचारले गेले पाहिजेत. नाहीतर हा केवळ सट्टा आहे, ज्याला काहीही बेसिस नाही. दुसरे म्हणजे यात market timing चा खूप प्रभाव दिसत आहे. Buy low, sell high हा मंत्र बरोबर आहे, पण मार्केटची न्यूनतम पातळी कोणालाही ओळखता येत नाही, पण इथे मात्र ट्रेंड बघून ट्रेडिंग करायचा मंत्र दिसत आहे. Fundamental analysis बद्दल नंतर लिहितो (जर कोणाला आवड असेल तर).

सर्वप्रथम जे माझे पूर्वग्रह आहेत ते सांगणे योग्य होईल. १. मुद्दल सुरक्षित ठेवणे, हे माझे मूळ ध्येय आहे. वॉरन बफेच्या शब्दात सांगायचे तर Always follow 2 rules: 1. Never lose money 2. Never forget rule 1. २. गुंतवणूक करताना मी कधीही कोणावरही विश्वास टाकत नाही. इतर काय म्हणतील ते मी ऐकतो, पण निर्णय मात्र स्वत:चाच घेतो. ३. माझा स्टॉक ब्रोकर्सवर विश्वास नाही. ४. आर्थिक सल्लागार वापरायची वेळ येते, तेव्हा मी प्रथम conflict of interest बघतो आणि fee-only सल्लागाराचा सल्ला घेतो. ( fee-only म्हणजे ज्याला कमिशन मिळत नाही, फक्त माझ्याकडून फी मिळते.) ५. एखादा स्टॉक कितीही सेक्सी वाटला तरीही जर कंपनी नफ्यात नसेल तर मी त्या कंपनीत शेअर्स घेत नाही. ६. स्टॉक घेतो तेव्हा मी ठराविक रक्कमच गुंतवतो. स्टॉक वाढला तर, अरेरे, जरा अजून टाकायला हवे होते असे वाटत नाही, पण स्टॉक पडला तर दुःखही होत नाही. ७. I like the game of investments and I play it to win. माझा स्टॉक ब्रोकर्सवर विश्वास का नाही? १. आपल्या पैशाची काळजी आपल्याशिवाय कोणीही घेत नाही. २. स्टॉक ब्रोकरचा दृष्टीकोन हा कमी पल्ल्याचा (short term view) असतो. ३. ब्रोकर्स बहुतेक करून टिप्स वरून सल्ला देतात, ज्या बहुतेक खोट्या असतात. जर ती बातमी खरी असेल तर तो तुम्हाला कशाला सांगायला येईल? स्वत:च पैसे टाकून अजून कमवेल ना? ४. या वरून पुढचा मुद्दा येतो की ब्रोकर्स किंवा आर्थिक सल्लागार यांनी त्यांचा स्वत:चा पैसा त्यात लावलेला नसतो, तर फुकट फौजदारी करायला त्यांचे काय जाते? They get paid irrespective of whether you make money or not. ५. ब्रोकर्सना काही शेअर विकायचे असतील म्हणून सुद्धा ते एखादी कंपनी चांगली आहे असे म्हणू शकतात. (Pump and dump) आपण स्वत:चे डोके वापरायला नको का? फंडामेंटल अनालिसिस चे महत्वाचे तत्व म्हणजे केवळ whim वर कोणताही शेअर घेऊ नये, पूर्ण माहिती विचारात घेउन, मनाची खात्री झाल्यावरच शेअर विकत घ्यावा. Fundamental analysis takes time, patience and determination. आता कुठली माहिती विचारात घ्यायची? १. इकॉनॉमीची परिस्थिती २. सेक्टर आणि त्यातील माहिती ३. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कंपनीची माहिती: management, कंपनीचा परफोर्मन्स, सेल्स आणी प्रोडक्ट्स, competitive advantage (moat) माहिती कुठून मिळवायची? Govt sites like SEBI or SEC, कंपनीची वेबसाइट (उदा. L&T ) - company annual report - income statement - balance sheet - cash flow statement - profit and loss statement आता इतकी माहिती कोण वाचणार? मला कुठे वेळ आहे ही झंझट करायला, असा विचार तुमच्या मनात येणं साहजिक आहे. Nobody said that making money was easy. If that were true, majority would be millionaires. It takes effort to make money. पण आपण ही प्रोसेस सोपी करू शकतो. ती कशी काय? - कुठल्या सेक्टरमध्ये पैसे गुंतवायचे ते ठरवा. - रिपोर्ट थेट गव्हर्मेंट वेबसाईटवरून किंवा कंपनीच्या वेबसाईटवरून वाचा, ब्रोकरच्या न्यूजलेटरमधून नाही. मुख्य म्हणजे कंपनी रिपोर्टमध्ये रिस्क फॅक्टरबद्दल वाचा. Risk also comes from not knowing what you are doing. - Study reports from companies WHO HAVE NO CONFLICT OF INTEREST उदा. पब्लीशिंग कंपनी Valueline. They don't sell any other services related to stock market, but again, you can't depend on them 100%. - रेशिओजचा अभ्यास करा आणि काही ठोकताळे वापरा. (Study ratios and develop your thumb rules). - स्टॉक स्क्रीनर वापरून तुमच्या आवडीचे स्टॉक शोधा. माझ्या क्रायटेरियानुसार अंदाजे २०० स्टॉक शॉर्टलिस्ट होतात. - नंतर ही स्टॉकची लिस्ट २०० वरून अंदाजे ३० पर्यंत कमी करा म्हणजे त्या ३० च स्टॉकचा अभ्यास करणे सोपे पडेल. (३० हा माझा ठोकताळा आहे, तुमचा अंदाज वेगळा असू शकेल). कुठले रेशियो (ratios) बघायचे?: (ही माहिती याहू किंवा गूगल किंवा रॉयटर सारख्या कंपनीकडून मिळू शकते.) P/E forward P/E PEG P/B P/S EPS growth Current Ratio Total Debt/assets Total Debt/equity ROE (Return on equity) ROA (Return on assets) ROI (Return of investment) Gross Profit margin % Net Profit margin % Operating margin % Sales growth % Net income growth % EPS growth % Also watch for (although they mean little to me personally): Institutional % held Insider buying and selling Dividend yield & stock buybacks If you want to combine market timing with fundamental analysis, then monitor - 52 week price range - 52 week high value and low value - Moving average (30 day, 60 day etc) The best time to buy a share is when there is blood on the street. Be greedy when others are fearful and be fearful when others are greedy. The key is not to overpay for a stock. The lower the price than its intrinsic value, the better is profit potential. खालील गोष्टी लक्षात ठेवा: - Just because a stock is fundamentally cheap doesn't mean it will soar in near future, in fact, it may become even cheaper. You cannot time the market. - Fundamental analysis cannot predict future. Financial statements are backward looking, meaning they tell you how a company did in the past, not necessarily how it will do in future and how consistently. - Fundamental analysis consider the financial statements somewhat at their face value. So it cannot protect you from fraud. उदा. सत्यम (बघा https://en.wikipedia.org/wiki/Accounting_scandals and https://en.wikipedia.org/wiki/Securities_fraud ) - If your portfolio size is small, you may be better of investing in market tracking index funds having ultra-low expense ratios. ता.क. हा कायदेशीर किंवा टॅक्स सल्ला समजू नये. मधेमधे बरेच इंग्रजी शब्द आले आहेत, त्याबद्दल क्षमस्व. प्रत्येकवेळी शब्दशः भाषांतर जमत नाही/योग्य वाटत नाही.

पण एका गोष्टीशी असहमत. कारण मी सब-ब्रोकर असलो तरी सल्लागार रादर मास्तर जास्त आहे. आता नियमपण येऊ द्यात ट्रेडिंगचे.

मी वाट पाहत आहे. बाकी तुम्ही जे म्हंटले आहे त्यात तथ्य नाही कारण पद्धत गेली अनेक वर्ष आम्ही वापरतो आहोत.
मुख्य म्हणजे बँक ऑफ इंडियाचा शेअर का घ्यायचा?
त्याचा खुलासा मुळ धाग्यात खाली दिलेला आहे.
मी बँक ऑफ इंडिया मध्ये बरेच ट्रेडिंग करतो म्हणून तो इथे उदाहरणार्थ दिला आहे. तुम्ही इतर शेअर्सही पाहावेत
बँकिंग सेक्टरचा का, टेक्नॉलॉजी सेक्टर का नको? हे प्रश्न आधी स्वत:ला विचारले गेले पाहिजेत.
१००% बरोबर पण त्याबाबत मी इतरत्र हेच म्हंटले आहे. मी बँकिंग सेक्टर करतो गेली अनेक वर्षे म्हणून तुम्हीही तेच करा असा माझा आग्रह प्रत्यक्ष माझ्या क्लायंटला सुद्धा मी करत नाही त्यामुळे तो प्रश्न उद्भवत नाही. कदाचित तुम्हाला माझ्या ह्या पद्धती मध्ये डे ट्रेडिंगचा भास झाला असावा म्हणून तुम्ही मार्केट टाइमिंगबद्दल म्हणत असाल तर क्षमस्व....कारण तीन महिन्यान्कारीताचे ट्रेडिंगसाठी मी हि पद्धत गेली अनेक वर्ष वापरत आहे. आलेल्या नफ्यातून बँकेचेच शेअर्स जमा करत आहे. मी बरेच जण पहिले जे तांत्रिक आणि फंडामेंटल स्टडिज माझ्यापेक्षा अतिशय उत्तम जाणतात पण मी सामान्य आहे मला ते किचकट वाटते तर मग मला शेअर्स हा विषय म्हणजे निव्वळ सट्टाच आहे का? तर नाही अनेक सोप्या पद्धती आहेत ज्या दुर्लक्षित आहेत किंवा तांत्रिक आणि फंडामेंटल स्टडिज ह्याच्या पलीकडे काही असूच शकत नाही इतके आपण त्याच्या आहारी गेलो आहोत. आणि
market timing
बद्दल म्हणाल
तर ते तांत्रिक आणि फंडामेंटल स्टडिज
करणारेच अधिक पाळतात. माझा फंडा जो मिळाला तो प्रसाद घेऊन पुन्हा लाईनीत उभे राहणे हा आहे.

are known for conservative approach. पण आपले ध्येय लक्ष्मीचे पाइक होण्यात आहे सरस्वतीचे नव्हे, त्यमुळे पद्धत चूक व बरोबर यात पडण्यापेक्षा प्रसाद मिळणे महत्त्वाचे...... fundamental analysis वर लेख वाचायला आवडेल.