अमिताभकरता किशोरकुमारने गायलेली गाणी लोकप्रिय असली तरी यथातथाच आहेत हे पटते. तुम्ही दिलेली उदाहरणे आहेतच शिवाय मिली, फरार, जमीर असे काही तुरळक अपवाद.
राजेश खन्नाची यादी मोठी आहे. सफर, अमर प्रेम, नमक हराम, मेहबूब की मेहंदी, दो रास्ते, दाग, आप की कसम, अजनबी, मेहबूबा, कटी पतंग आणि असे अनेक.
जितेंद्र आणि संजीव कुमार ह्यांनाही काही चांगली गाणी मिळाली. जितेंद्र : किनारा, परिचय, खुशबू, जैसे को तैसा. नंतर हिंमतवाला टाईप धांगडधिंगा सुरु झाल्यावर हे पर्व संपले.
संजीव कुमार : मन मंदीर, सीता और गीता, आंधी, अनामिका.
शशी कपूरः प्यार का मौसम, शर्मिली, दीवार, आ गले लग जा, फकीरा, काला पत्थर.
वरील काही सिनेमातील प्रत्येकी एकच गाणे गाजले पण तरी अविस्मरणीय.
पण आपले ते...
"ख्वॉब हो तुम या" (http://www.youtube.com/watch?v=3rKiTkTQZZs)
हे अप्रतिम गीत राहिलेच की.
आणि शिवाय ते..."अरे यार मेरी तुम भी हो गज़ब"...(http://www.youtube.com/watch?v=M9oQZQvCQqE) हे पण मस्तच..मला त्यातले मध्येच येणारे "हूं हुं" जास्त आवडते...
आजाद भारत २५ साल का हो गया ,आजादिसे जुडे हुये सपने जब बिखरने लगे , तब जन्म लिय विजयने ... आणी आमिताबने हिंदी सिनेमाचा परदा व्यापुन घेतला, शेवटी शेवटी हिप्पि हेयर स्टाइल करुन सुध्दा काकाचे स्टारडम काहि टीकले नाहि , रंगिबेरंगि मायापुरित छापुन येनारय्या विनोद खन्ना,विनोद मेहरा ,या हिप्पि हेयर स्टाईल मंडळीच्या घोळ्क्यात राजेश खन्नाला ओळ्ख्नने कठिन होऊण बसले.... असाच ढळतानाचा हेमा मालिनि सोबतचा सिनेमा '' कुदरत'' . जाता जाता किशोरदाने काकाला एका अविस्मरनिय गान्याचि सौगात दिलि '' हमे तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते, तुम्हारे बीना....हि पुढचि ओळ तर कातिल गायलि आहे .तुम्हें कोई और देखे, तो जलता हैं दिल ,बड़ी मुश्किलों से फिर, संभलता हैं दिल 'पहिल्यादां प्रेमात पडतात ते लोक जि गाणी सारखि सारखि एकतात त्या यादितले हे एक अढळ गित ' आगदि ९०-९८च्या काळा पर्यतं.
''मेरे दिलमें आज क्या है.. तु कहे तो मे बता दु'' या गान्यातिल शेवटचे कडवे गाताना ''तेरे गेसुओं मे छुपकर,मैं जहाँ के ग़म भुला दूँ'' आवाज आल्हादपने खालि आणायचि जादु करुन दाखवलि आहे ,लता बाई हि जादु नेहमि करुन दाखवतात ( या प्रकाराला काय म्हनतात माहित नाहि , पाण आम्च्या सारख्या सामान्य कानसेनांन साठि हि जादुच आहे बा..)
''यह जमि गा रहि हे ,आस्मा गा राहा हे '' गानारे अमित कुमारा , फारसे एकु का आले नाहि ? कुनितरि लिहा हो..
तुमच्या लेखानी एक वेगळा विचार दिला. मला वाटतं....किशोरचा उदय होईपर्यंत सिनेसंगीतात काव्याचा दर्जा घसरायला ऑलरेडी सुरुवात झाली होती. गाण्यांमधला भरणा वाढून नवनवीन वाद्यांच्या वापराकडे पंचम, एलपी सारख्या संगीतकारांचा कल जास्त होता. त्यामुळे नाविन्य तर आलं...पण अर्थपूर्ण शब्दरचना हद्दपार होत चालली.
रफीला "गोल्डन एरा"मध्ये जितकी वैविध्यपूर्ण आणि लक्षात रहाणारी गाणी मिळाली तितकी किशोरला नाही. किशोरचं एखादं भजन आठवायला गेलं तर पटकन आठवणारही नाही....पण रफीची सॅड गाणी...पार्टी साँग्ज किशोरैतकीच आठवतात. अर्थात त्यातूनही किशोर लक्षात राहतो आणि हुरहुर लावतो यातच त्याचं यश!
लेख आवडला!
जे.पी.
पल पल पल दिलके पास तुम रहती हो.............. एकदम वेगळेच गाणे आहे.
गाता रहे मेरा दिल.मधला पहाडी चा मूड किशोर कुमार ने मस्त पकडला आहे.
किंवा मेरे महेबूब कयामत होगी मधला राग किशोर कुमारने जसा पकडलाय तसा कोणी पकडू शकेल असे वाटत नाही.
इतर गाण्यातील काव्य मूल्य बाबत तर तुमच्याशी सहमत
मुकेश व राज कपूर हे समीकरण होते पुढे राजकपूर चा नगारा त्याच्या तुमानीला जुमेनसा झाला व मुकेश साहेबांची गोची झाली पुढे रफी व किशोर ह्यांच्या स्पर्धेत काळानुसार किशोर ने आपले अष्टपैलुत्व पणाला लावले म्हणून त्याने जेव्हा राजेश साठी प्रणय गीत गायली तर अमिताभ साठी उडत्या चालीची मग मधेच संजय साठी क्या यही प्यार हे तर ऋषी साठी ओ हन्सिनी आजही आठवतात.मधेच तो दिल क्या करे गौण जायचा
आता त्याची आंधी सिनेमातील गाणी आजही रात्री ऐकले तर जागेपणी आपण स्वप्न पाहायला लागतो.
अगदी अमिताभ साठी त्याने ओ साठी रे गायले ते ऐकले तर आजही अंगावर काटा येतो.
शेवटी क्लासिक क्लासिक मध्ये नक्की काय
माझ्या आजोबांच्या काळात लोकप्रिय सेह्गेल ची क्लासिक गाणी आजच्या पिढीला रडगाणी वाटतील ,
काळासोबत जगणारा व आहे त्या ट्रेंड मध्ये स्वतःचे वेगळेपण जपणारा किशोर
आजही तरुणपिढी रफी पेक्ष्या त्यांची गाणी जास्त ऐकते,
लेखकाला क्लासिक ह्या संकल्पनेविषयी वेगळ्या अपेक्षा असाव्यात तसे असेल तर लेखात मन्ना डे चा उल्लेख हवा होता. त्यांना एकदा अण्णांनी तुम्ही आमच्या शास्त्रीय संगीतात या असे त्यांच्या जाहीर निमंत्रण दिले होते.
प्रतिक्रिया
किशोर कुमार
छान. अजून लिहा एकेका
काही भर
मस्त लेख....
आजाद भारत २५ साल का हो गया
तुमच्या लेखानी एक वेगळा विचार
लेख आवडला. किशोरदा चे गाणे
पल पल पल दिलके पास तुम रहती
मुकेश व राज कपूर हे समीकरण
किती छान लिहलय.