Welcome to misalpav.com
लेखक: मारवा | प्रसिद्ध:
भारताचे कायदे विचीत्र आहेत इथे समानतेच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात परंतु प्रत्यक्षात कायदाच समान हक्क देत नाही. या संबधीची एक सर्वात खटकणारी बाब म्हणजे हिंदु पुरुष असेल व त्याची एका पेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची आकांक्षा/ क्षमता असेल आणि संबंधित स्त्रीयांची ही आनंदाने या विवाहाला संमती/तयारी असेल तरी एका हिंदु पुरुषाला भारताचा कायदा द्विभार्या प्रतिबंधन घालुन हा हक्क नाकारतो. आणि त्याच वेळी इतर धर्मीयांस ही परवानगी देतो. यात कसली आलीय समानता? असा प्रतिबंध नेमका कोणत्या भुमिकेतुन हिंदु प्रुरुषांवर लादण्यात आलेला आहे याची माहीती नाही. म्हणजे हिंदु पुरुषांना ही एकपत्नीव्रता ची जाचक अट का कायद्यात घातली यामागे हिंदुंची कोणती परंपरा गृहीत धरण्यात आलेली होती याची मला माहीती नाही( जाणुन घेण्याची आकांक्षा आहे) कारण अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बहुपत्नीत्व हे हिंदु परंपरेचे एक महत्वाचे लक्षण आहे. एका एकपत्नीव्रती महापुरुषाच्या विरोधात शंभर बहुपत्नीव्रती महापुरुषांची उदाहरणे देता येतील,मग हा कायदा बनवितांना कोणती मुळ परंपरा गृहीत धरण्यात आली होती माहीत नाही.या कायद्याने हिंदु पुरुषांच्या एकापेक्षा अधिक विवाह करण्याच्या आणि संबधित विवाहास संमती असणारया स्त्रीयांच्या ही असा विवाह करण्याच्या मुलभुत मानवी हक्कांवर गदा येते यात शंका नाही.याने अनेक हिंदु पुरुष आणि स्त्रीया विवाहाच्या सहजीवनाच्या नैसर्गिक आनंदाला पारखे होतात. आता असे विवाह करण्याची आकांक्षा असलेल्या हिंदु पुरुषांना कायद्यात तरतुद नसल्याने मग निष्कारण चुकीचे मार्ग अवलंबाबे लागतात. कायद्याच्या भीतीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक प्रेमभावने वर बंधन घालावे लागते.अन्यथा निष्कारण मग धर्मांतराचा मार्ग अवलंबवावा लागतो. आजकाल तर केवळ विवाहसाठी जर कोणी धर्मांतर करीत असेल तर त्यालाही परवानगी असणार नाही असा काहीतरी कायदा अस्तित्वात आल्याची माहीती आहे.( कायद्याच ज्ञान नसल्याने कृपया जाणकार अधिक माहीती देतील अशी अपेक्षा आहे). म्हणजे हिंदु पुरुषांना आजपर्यंत जो एक मार्ग होता धर्मांतर करुन असा विवाह कायदेशीर करण्याचा( ज्यात धर्मांतराची अत्यंत चुकीची सक्ती होती तरीही तो त्याग प्रेमासाठी सहन करुन कीमान असा विवाह करण्याची संधी होती) आता ती ही काढुन टाकण्यात आलेली आहे. मग बहुपत्नीकांक्षी हिंदु पुरुषाने आता करावे तरी काय? हा जाचक कायदा बदलायलाच हवा व इतर धर्मीयांप्रमाणेच हिंदु पुरुषांनाही एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची परवानगी देउन सर्वाना समान हक्काची घटनेच्या तत्वाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहीजे. याचा सर्वात मोठा फ़ायदा म्हणजे मग संबधित दुसरया स्त्री ला व तिच्या संततीला ही मग व्यवस्थित कायद्याचे पुर्ण संरक्षण मिळते व समाजात मानाने वावरण्याची संधी मिळते. म्हणजे वरील बंधनामुळे चोरटे संबंध ठेवण्याकडे जो कल वाढतो व त्यामुळे कायदेशीर हक्कांसंबधित ज्या समस्या निर्माण होतात त्याही टाळता येउ शकतात.उदारणार्थ मग श्री. तिवारीं च्या पुत्राला जो संघर्ष करावा लागला तिवारींना स्वत: कायद्याच्या बंधनामुळे संबध लपविण्याची कसरत करावी लागली ते सर्व टाळता आले असते. (डावीकडे रजथी जी उजवीकडे दयालु जी मध्ये करुणानिधी ) 222 असे एका पुरुषाचे एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी होणारे अनेक विवाह अत्यंत यशस्वी झाल्याची अनेक सुंदर उदाहरणे उपलब्ध आहेत. तामिळनाडु चे डीएमके पक्षाचे राजकारणी श्री करुणानिधी यांनी दोन स्त्रीयांशी विवाह केलेला आहे. त्यांच्या एका पत्नीचे नाव आहे दयालु( कीती समर्पक !) व दुसरीचे नाव आहे रजथी या दोन्ही वेगवेगळ्या घरांत राहतात व करुणानिधी परस्पर सामंजस्याने दोघींशी अल्टरनेट वेळा पाळुन दाम्पत्यजीवनाचा गाडा गेली अनेक वर्षे यशस्वीपणे हाकत आहेत यांना दोन्ही स्त्रीयापासुन अनेक मुले झालेली आहेत व सर्व भावंडे गुण्यागोविंदाने एकमेकांशी प्रेमाने मिळुन मिसळुन राहतात अजुन काय हवे?. संबंधित लिंक्स http://www.outlookindia.com/article.aspx?240630 http://en.wikipedia.org/wiki/Karunanidhi_family 1 दुसरे एक सुंदर उदाहरण म्हणजे दक्षीणेतील महान कुचीपुडी नर्तक श्री. राजा रेड्डी यांनी तर दोन सख्ख्या बहीणी राधा आणि कौशल्या यांच्याशी विवाह केलेला आहे. आणि तिनही जण मिळुन अत्यंत तालबद्ध, लयबद्ध असा दाम्पत्य जीवनाचा पदन्यास आजवर सांभाळत आहेत. यांच्या द्वीतीय विवाहाची गोष्ट अत्यंत रोमॅंटीक आहे. यांचा प्रथम विवाह राधे शी झाला कौशल्या राधे ची लहान बहीण त्यांच्या बरोबर च राहत होती तीही नृत्यांगना च आहे. तर एकदा सिंगापुरला राजा जींचा कार्यक्रम होता तेथे त्यांनी राजांना परफ़ॉर्म करतांना बघितले आणि बस कौशल्या त्यांच्या सौंदर्याने मोहीतच झाल्या आणि त्यांच्या प्रेमातच पडल्या, त्या नंतर बॅकस्टेज ला गेल्या आणि त्यांनी राजांना स्वताहुन विवाहाची मागणीच घातली. तेव्हा ती फ़ारच लहान होती दोघांत वयाचे मोठे अंतर होते. राजांनी सुरुवातील एक साधे आकर्षण असेल म्हणुन सोडुन दिले परंतु कौशल्या मात्र ठाम होती मग तीची ही आकांक्षा जेव्हा तिने राधे ला आपल्या मोठ्या बहीणीला सांगितली तेव्हा राधा ही तयार झाल्या मात्र एका सुंदर कलात्मक अटीवर ती म्हणजे मी राजांना तुझ्या बरोबर शेअर करायला तयार आहे मात्र स्टेजवर जेव्हा राजा परफ़ॉर्म करतील तेव्हा त्यांची संगिनी मी आणि केवळ मीच असेल. तु त्यांच्या बरोबर स्टेज वर कधीही एकत्र परफ़ॉर्म करायच नाहीस. आज राजां ही आपल्या सुंदर दाम्पत्य जीवनाचा गाडा अत्यंत यशस्वीपणे हाकत आहेत. आणि कौशल्यां नी ही आपले मोठ्या बहीणीला दिलेले वचन पुरेपुर पाळले. अजुन काय हवे ? संबधित लिंक्स http://blogs.hindustantimes.com/just-people/2009/04/14/about-raja-reddy-his-dance-and-two-wives/ http://www.tribuneindia.com/1998/98dec27/sunday/view.htm आणि म्हणुन च माझे असे म्हणणे आहे की असा जाचक कायदा जो हिंदुं पुरुषांना द्विभार्या प्रतिबंध करतो तो रद्द केला पाहीजे व अशा निरागस प्रेमी जिवांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला पाहीजे यातच खरया अर्थाने घटनेची समानतेच्या मुल्यांची अंमलबजावणी होईल असे माझे एक हिंदु पुरुष म्हणुन मत आहे. आणि मी म्हणतो त्यात अतिशयोक्ती काहीच नाही आपल्याच महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपर्यंत विदर्भ प्रातांत (महाराष्ट्राच्या इतर प्रांतात बंदी आल्यानंतर ही काही वर्षे तरी) हिंदु पुरुषाला द्विभार्या विवाह करण्यास कायद्याच्या कुठल्या तरी स्पेशल कलमानुसार बंदी नव्हती. दैनिक दिव्य मराठी त काही दिवसांपुर्वी आलेल्या पंडीत भिमसेन जोशींच्या वारसांत होत असलेल्या संपत्ती वरील कलहा संदर्भात ही बातमी होती( वारसांचे सुर बिघडले असे काहीतरी शीर्षक होते) त्या बातमीत हा उल्लेख मी वाचला. त्यात पंडीत भिमसेन जींच्या प्रथम पत्नी सुनंदाजी हयात असतांना पंडीतजींनी द्वितीय विवाह वत्सलाबाईंशी करण्यासाठी तेव्हाच्या विदर्भ प्रांतातील या कायद्यातील तरतुदीचा वापर केला होता तो दुसरा विवाह विदर्भात कायद्याने मान्य होता म्हणुन म्हणुन हा विवाह पंडीतजींनी विदर्भ या प्रांतात जाउन केला आणि त्याला कायदेशीर मान्यता घेतली.या तततुदीमुळे पंडीतजींवर धर्मांतराची वेळ आली नाही. पंडीतजींनी ही कायद्याचा कुशलतेने उपयोग करुन घेतला व स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले ते गानपंडीतच नव्हे तर कायदे पंडीत ही होते असे या घटनेवरुन दिसुन येते. तर भारत रत्न पंडीत भिमसेन जोशींचे ही उदाहरण आपल्याकडे आहे. यांनी ही दोन स्त्रीयांशी विवाह करुन दाम्पत्यजीवनाचा गाडा यशस्वीपणे हाकुन दाखविला, दोघींची जबाबदारी समर्थपणे पेलुन दाखविली आणखी काय हवे ? संबधित लिंक्स http://www.dnaindia.com/mumbai/report-living-in-the-shadow-of-bhimsen-joshis-brilliance-1500413 http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-11-11/bangalore/43928547_1_father-panditji-pandit-bhimsen-joshi आणखी कीती उदाहरणे हवीत ? तर हा जुलुमी कायदा तत्काळ रद्द केला पाहीजे व हिंदु पुरुषांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी दिली गेली पाहीजे या माझ्या मताची पुनुरावृत्ती मी करतो. याने दुसरा विवाह करण्यासाठी धर्मांतर करण्याचा मार्ग अवलंबवावा लागणार नाही( वरील उल्लेखाप्रमाणे तो ही मार्ग आता शिल्लक आहे की नाही शंकाच आहे परत एकदा जाणकारांच्या तोंडाकडे बघत आहे त्यांनी मार्गदर्शन करावे ) अथवा चोरटेपणाने असे संबंध ठेवण्याची पाळी ही येणार नाही. व संबधित स्त्री व संतति ला ही कायदेशीर मान्यता मिळुन समाजात सन्मानाने वावरता येईल. अर्थात वरील सर्व विवेचनात संबधित स्त्रीयां ची परवानगी संमती आहे असे गृहीत धरलेले आहे. यातील एकाही संबधित व्यक्त्तीची या विवाहाला मान्यता नसेल तर अर्थातच मग मात्र त्याला परवानगी नसावीच मी सर्वांची संमती ज्यात असते अशा आणि केवळ अशा विवाहांपुरतच या संबधातच ही मागणी करीत आहे. म्हणुन ही अत्यंत न्याय्य आणि मुलभुत हक्काची मागणी मी एक हिंदु पुरुष या नात्याने करीत आहे.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मियाबिबीची हर्कत नसेल तर काजीची देखील हर्कत नकोच. पण असा कायदा करूनही किती विवाह होतील अशा प्रकारचे? सी द इकॉनॉमिक्स अँड सबसिक्वेंट फ्यामिली डायनॅमिक्स. शिवाय याच धर्तीवर एका स्त्रीला अनेक पुरुषांशी लग्न करायचा हक्कदेखील असावा अशी मागणीही पुढे येईलच.

एका स्त्री ला अनेक पुरुषांशी विवाह करायचा हक्क तर हवाच त्यात काहीही गैर नाही. पांचालीचे उदाहरण आहेच.शिवाय ब्रोकपा नावाची एक कम्युनिटी जी सर्वात प्युअर आर्यन मानली जाते. हा एक छोटा गट मुळ आर्यांपासुन हजारो वर्ष अगोदर काही कारणाने संपर्कातुन तुटलेला होता व वेगळे जीवन हा समुदाय जगत राहील. हा अ‍ॅन्थ्रोपॉलिजीस्टांच्या अनुसार शुद्धतम आर्य वंश मानला जातो. यां टोळीच्या चालीरीतींचा अभ्यास करण्यासाठी जगभरातुन संशोधक येथे येत असतात्.यांच्यामध्ये आर्यांच्या मुळ प्रथांचे चालीरीतीं आढळुन येतात. ( इतर जमातींशी वर्षानुवर्षे संपर्क न आल्याने मुळ परंपरा अबाधित चालु आहेत) यासाठी यांच्या अभ्यासातुन आर्यांचे पर्यायाने हिंदुंचे मुळ रीवाज चालीरीतींचा अर्थपुर्ण वेध घेता येतो. तर या जमातीत बहुपत्नीत्व आणि बहुपतित्व दोन्ही आढळुन येतात. अधिक नेमक बोलायच तर द्रौपदीज अधिक आढळुन येतात. तर एका स्त्रीला ही अर्थातच अनेक विवाहांची परवानगी हवीच. पण यासाठी लेख/धागा त्या त्या स्त्रीयांनी च काढला पाहीजे ज्यांना या मागणीचे महत्व वाटते. एक पुरुष या नात्याने मी माझी बाजु मांडली. अशा मागणीला ही अर्थातच माझा पुर्ण पाठिंबा असेलच. पण त्यावरील धागा मीच काढावा ही अपेक्षा चुकीची आहे. ज्याने त्याने आपली बाजु मांडावी. मी कोणाकोणाची मांडु अगोदरच माझ्यावर असा आरोप होतोय की मला याच विषयांत रस आहे का म्हणुन.

शिवाय याच धर्तीवर एका स्त्रीला अनेक पुरुषांशी लग्न करायचा हक्कदेखील असावा अशी मागणीही पुढे येईलच.
अशी मागणी आल्यास त्यात काय गैर आहे? मलाही असेच वाटते की जर पुरुषांना असा हक्क असावा तर स्त्रियांना का नको? - (एकपत्नीव्रता) सोकाजी

मुळात कायदा एका स्त्रीला अनेक पुरुषांशी लग्न करण्यापासुन रोखतो का? कधी ह्या कायद्याविषयी ऐकलं नाहीये.. जाणकार माहिती देतीलच.. (एकपतीव्रता) पिरा

रोचक धागा!!!!! नवर्‍याला देते वाचायला...... मी तर त्याला कधीपासून सांगतेय, अजून एक बायको आण लग्न करुन, माझ्या हाताखाली. मला एकटीला घर आवरणं आणि बाहेरची सगळी कामं सांभाळ्णं फार कठीण जातं..... ऐकतच नाही माझं! उलट रडका चेहरा करतो!!! आता कायदाच झाला तर फार बरं होईल. वाट बघतेय.... एकदा का मिपावर हा धागा अ‍ॅप्रूव्ह झाला की देशात कायदा व्हायला कितीसा वेळ? ;)

तुमच्यासारखा इस्त्रियांचा कैवारी कोणीच नाही बघा. मी पण मिपावर अप्रुव्ह झालं की नवर्याला सांगणार आहे,एखादी शोधुन ठेवायला. राजा रेड्डींच्या श्टोरीनी तर मला प्रेरणा मिळाली आहे. मी बाहेर नवर्याबरोबर नाचायला,मिरवायला जाणार आणि घरी गरम गरम ताट तयार ठेवुन दुसरीवाली वाट बघणार. घरचं बघा,बाहेरच बघा...किती दिवस मी एकटी करत बसणार सर्व. हा कायदा झालाच पायजे.

माऊताई आणि अजया १००% सहमत, खरेच होऊ दे हा कायदा पास. मी तर गेले ५ वर्ष सांगुन सांगुन थकले बाई, हा कायदा आला तर फायदाच होईल.

लोकं आजकाल बायकोला गाडी समजतात... हल्ली परवडत नाही असे म्हणणे म्हणजे स्त्रीचे वस्तुकरण करण्यासारखे आहे. याचा मी निषेध करतो...

आहो तुमचा गैरसमज झाला आहे. बायको परवडेना असे नव्हे. तर एकीशी लग्न केल्यावर संसारावर होणारा खर्च परवडेना असा अर्थ घ्यावा. (इतरांनी तसाच घेतला आहे, तुम्हाला म्हणून स्पष्टीकरण देतोय ;) )

तुम्हाला अशाच विषयांचे फार आकर्शण आहे का हो? लेस्बियन जोडीचे लग्न, लेस्बियनांसंबंधीचा काथ्याकूट आणि आता हे द्विभार्या संबंधीचा धागा.

तुम्हाला अशाच विषयांचे फार आकर्शण आहे का हो? लेस्बियन जोडीचे लग्न, लेस्बियनांसंबंधीचा काथ्याकूट आणि आता हे द्विभार्या संबंधीचा धागा.

तुम्हाला ती म्हण माहिती आहे का? 'कोणाला कशाचे अन....' ;) - (सर्व 'विषया'सक्त) सोकाजी

हेतू काय असणार? पण प्रस्तुत धागाकर्त्याचे विशय स्त्री पुरुश, स्त्री स्त्री अशाच संबंधांकडे घुटमळताना दिसतात नेहमीच म्हणून. तुम्हाला का पुळका आला म्हणे इतका?

जजमेंटल टीका दिसली, ती अस्थानी वाटल्याने विरोध दिसला की लगेच प्रेफरन्शिअल वागणे दिसते असे वाटल्यास नाइलाज आहे. असो.

या कायद्यामुळे भारतातले ८० टक्के संसार टिकून आहेत . हा कायदा रद्द झाला तर अनैतिकता माजेल.. जर एखादीने दुसरा पती करायचे ठरवले तर' नवरोबा तुमी आणखि एक बायको आणा आणि मी दुसरा पती करुन अर्धा आठवडा तिकडे रहायला जाते 'असे प्रकार रोज कानावर पडतील . एकदंर द्विभार्या ,द्विभ्रतार कायदे रद्द केले तर विवाहसंस्था म्हणजे 'वाईफ/हजबंड स्वॅपीँग क्लब 'होईल ...

वरील कायदे झाले तर एकत्र कुटुंब पद्धतीत एका घरात किती माणसे असतील? एका पुरुषाच्या दोन बायका, त्या दोन बायकांचे दोन-दोन नवरे, त्या दुसर्‍या नवर्‍यांच्या पुन्हा दोन-दोन बायका त्या दोन्ही बायकांचे पुन्हा.......बापरे हे प्रकरण तर पसरतच चाललय. त्या ह्या प्रत्येक बाईची प्रत्येक नवर्‍यापासून दोन-दोन मुले म्हणजे कमीत कमी ३०-४० मुले. त्यांचे प्रत्येकी (किमान) १५ लंगोट, १५ झबली-टोपडी, ३०-४० दुधाच्या बाटल्या, ३०-४० औषधाच्या बाटल्या, प्रत्येक बाटलीला ३-३ बुचं, सहाण, रक्तचंदन, साधं चंदन, रुईची पानं, घुट्या, चाटणं, ग्राईप वॉटरच्या बाटल्या, डोंगरे बालामृत अबबबबबबबब! आणि ही सगळी कार्टी रात्री बेरात्री ठ्यां करून रडून आख्खं घर (वन बेडरुमचा फ्लॅट) डोक्यावर घेणार, ते ऐकून शेजारच्या फ्लॅट ची पोट्टी-सोट्टी जागी होणार, सुरात सुर मिसळणार करता करता आख्ख्या इमारतीतील चार-पाचशे पोरं रात्रीबेरात्री भोकाड पसरणार...नको....नको....नको....विचार मनांत येतील आणि पुन्हा एकदा एक नवरा आणि त्याला एकच बायको त्यांना २ मुलं हिच पद्धत रुढ होणार............... तर मग आत्ता काय वाईट आहे???????

अहो येवढी माणसं असणार तर त्यात कमावणारी माणसंही तेवढ्याच संख्येनं नाही का वाढणार? व्यवसाय काढला तर नोकर ठेवायलाच नको... सगळे घरचेच कामाला. म्हणजे सगळं उत्पन्न घरातच, सिए पण घरातलाच, वकील पण घरातलाच... खर्च शुन्य ! मग घर पण कमीतकमी १५-२० खोल्यांचा राजवाडा असणार नाही का? परत शेजार्‍याची काय टाप आवाज काढेल २५-३० जवानांची फौज पाहून, म्हणजे जास्त सुरक्षितता ! अजून एक मोठ्ठा राजकीय फायदा म्हणजे गठ्ठा मतांमुळे राजकारणीही खिशात ठेवता येतील... किंबहुना स्वतःच राजकारणी बनता येईल नै का? :)

परत शेजार्‍याची काय टाप आवाज काढेल २५-३० जवानांची फौज पाहून, म्हणजे जास्त सुरक्षितता
हा हा हा.. येकच नम्बर... पण मग शेजार्‍यांची त्याहून मोठ्ठी फौज नसणार कशावरून ? ;)

अहो पुपे, तो मुविंचा वरचा दुवा बघा... फौज उभी करायची तर काय अशीतशी करायची काय? एकदम सम्राटाची फौज उभी करायची. काय बिशाद शेजार्‍याची... तो आपला मांडलिक झाला पाहिजे, काय? सुन त्सु म्हणून गेलाय: "लढाईविना मिळवलेला विजय हाच सर्वश्रेष्ठ विजय !"

अहो पेठकर काका. फारच पुढचा विचार करताय तुम्ही. हा विचार करा की स्वतन्त्र फ्लॅट घ्यायचा खर्च वाचला. दुसर्‍या कोणाच्या फ्लॅट मध्ये आपसूकच जागा मिळेल. असो. हा कायदा आला तर वारसा हक्क कायद्याचे काय होइल. ( माझा मुलगा आणि तुझा मुलगा मिळून आपल्या मुलाला मारताहेत.... )

अहो पेठकर काका. फारच पुढचा विचार करताय तुम्ही. हा विचार करा की स्वतन्त्र फ्लॅट घ्यायचा खर्च वाचला. दुसर्‍या कोणाच्या फ्लॅट मध्ये आपसूकच जागा मिळेल. असो. हा कायदा आला तर वारसा हक्क कायद्याचे काय होइल. ( माझा मुलगा आणि तुझा मुलगा मिळून आपल्या मुलाला मारताहेत.... )