Welcome to misalpav.com
लेखक: मारवा | प्रसिद्ध:
भारताचे कायदे विचीत्र आहेत इथे समानतेच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात परंतु प्रत्यक्षात कायदाच समान हक्क देत नाही. या संबधीची एक सर्वात खटकणारी बाब म्हणजे हिंदु पुरुष असेल व त्याची एका पेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची आकांक्षा/ क्षमता असेल आणि संबंधित स्त्रीयांची ही आनंदाने या विवाहाला संमती/तयारी असेल तरी एका हिंदु पुरुषाला भारताचा कायदा द्विभार्या प्रतिबंधन घालुन हा हक्क नाकारतो. आणि त्याच वेळी इतर धर्मीयांस ही परवानगी देतो. यात कसली आलीय समानता? असा प्रतिबंध नेमका कोणत्या भुमिकेतुन हिंदु प्रुरुषांवर लादण्यात आलेला आहे याची माहीती नाही. म्हणजे हिंदु पुरुषांना ही एकपत्नीव्रता ची जाचक अट का कायद्यात घातली यामागे हिंदुंची कोणती परंपरा गृहीत धरण्यात आलेली होती याची मला माहीती नाही( जाणुन घेण्याची आकांक्षा आहे) कारण अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बहुपत्नीत्व हे हिंदु परंपरेचे एक महत्वाचे लक्षण आहे. एका एकपत्नीव्रती महापुरुषाच्या विरोधात शंभर बहुपत्नीव्रती महापुरुषांची उदाहरणे देता येतील,मग हा कायदा बनवितांना कोणती मुळ परंपरा गृहीत धरण्यात आली होती माहीत नाही.या कायद्याने हिंदु पुरुषांच्या एकापेक्षा अधिक विवाह करण्याच्या आणि संबधित विवाहास संमती असणारया स्त्रीयांच्या ही असा विवाह करण्याच्या मुलभुत मानवी हक्कांवर गदा येते यात शंका नाही.याने अनेक हिंदु पुरुष आणि स्त्रीया विवाहाच्या सहजीवनाच्या नैसर्गिक आनंदाला पारखे होतात. आता असे विवाह करण्याची आकांक्षा असलेल्या हिंदु पुरुषांना कायद्यात तरतुद नसल्याने मग निष्कारण चुकीचे मार्ग अवलंबाबे लागतात. कायद्याच्या भीतीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक प्रेमभावने वर बंधन घालावे लागते.अन्यथा निष्कारण मग धर्मांतराचा मार्ग अवलंबवावा लागतो. आजकाल तर केवळ विवाहसाठी जर कोणी धर्मांतर करीत असेल तर त्यालाही परवानगी असणार नाही असा काहीतरी कायदा अस्तित्वात आल्याची माहीती आहे.( कायद्याच ज्ञान नसल्याने कृपया जाणकार अधिक माहीती देतील अशी अपेक्षा आहे). म्हणजे हिंदु पुरुषांना आजपर्यंत जो एक मार्ग होता धर्मांतर करुन असा विवाह कायदेशीर करण्याचा( ज्यात धर्मांतराची अत्यंत चुकीची सक्ती होती तरीही तो त्याग प्रेमासाठी सहन करुन कीमान असा विवाह करण्याची संधी होती) आता ती ही काढुन टाकण्यात आलेली आहे. मग बहुपत्नीकांक्षी हिंदु पुरुषाने आता करावे तरी काय? हा जाचक कायदा बदलायलाच हवा व इतर धर्मीयांप्रमाणेच हिंदु पुरुषांनाही एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची परवानगी देउन सर्वाना समान हक्काची घटनेच्या तत्वाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहीजे. याचा सर्वात मोठा फ़ायदा म्हणजे मग संबधित दुसरया स्त्री ला व तिच्या संततीला ही मग व्यवस्थित कायद्याचे पुर्ण संरक्षण मिळते व समाजात मानाने वावरण्याची संधी मिळते. म्हणजे वरील बंधनामुळे चोरटे संबंध ठेवण्याकडे जो कल वाढतो व त्यामुळे कायदेशीर हक्कांसंबधित ज्या समस्या निर्माण होतात त्याही टाळता येउ शकतात.उदारणार्थ मग श्री. तिवारीं च्या पुत्राला जो संघर्ष करावा लागला तिवारींना स्वत: कायद्याच्या बंधनामुळे संबध लपविण्याची कसरत करावी लागली ते सर्व टाळता आले असते. (डावीकडे रजथी जी उजवीकडे दयालु जी मध्ये करुणानिधी ) 222 असे एका पुरुषाचे एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी होणारे अनेक विवाह अत्यंत यशस्वी झाल्याची अनेक सुंदर उदाहरणे उपलब्ध आहेत. तामिळनाडु चे डीएमके पक्षाचे राजकारणी श्री करुणानिधी यांनी दोन स्त्रीयांशी विवाह केलेला आहे. त्यांच्या एका पत्नीचे नाव आहे दयालु( कीती समर्पक !) व दुसरीचे नाव आहे रजथी या दोन्ही वेगवेगळ्या घरांत राहतात व करुणानिधी परस्पर सामंजस्याने दोघींशी अल्टरनेट वेळा पाळुन दाम्पत्यजीवनाचा गाडा गेली अनेक वर्षे यशस्वीपणे हाकत आहेत यांना दोन्ही स्त्रीयापासुन अनेक मुले झालेली आहेत व सर्व भावंडे गुण्यागोविंदाने एकमेकांशी प्रेमाने मिळुन मिसळुन राहतात अजुन काय हवे?. संबंधित लिंक्स http://www.outlookindia.com/article.aspx?240630 http://en.wikipedia.org/wiki/Karunanidhi_family 1 दुसरे एक सुंदर उदाहरण म्हणजे दक्षीणेतील महान कुचीपुडी नर्तक श्री. राजा रेड्डी यांनी तर दोन सख्ख्या बहीणी राधा आणि कौशल्या यांच्याशी विवाह केलेला आहे. आणि तिनही जण मिळुन अत्यंत तालबद्ध, लयबद्ध असा दाम्पत्य जीवनाचा पदन्यास आजवर सांभाळत आहेत. यांच्या द्वीतीय विवाहाची गोष्ट अत्यंत रोमॅंटीक आहे. यांचा प्रथम विवाह राधे शी झाला कौशल्या राधे ची लहान बहीण त्यांच्या बरोबर च राहत होती तीही नृत्यांगना च आहे. तर एकदा सिंगापुरला राजा जींचा कार्यक्रम होता तेथे त्यांनी राजांना परफ़ॉर्म करतांना बघितले आणि बस कौशल्या त्यांच्या सौंदर्याने मोहीतच झाल्या आणि त्यांच्या प्रेमातच पडल्या, त्या नंतर बॅकस्टेज ला गेल्या आणि त्यांनी राजांना स्वताहुन विवाहाची मागणीच घातली. तेव्हा ती फ़ारच लहान होती दोघांत वयाचे मोठे अंतर होते. राजांनी सुरुवातील एक साधे आकर्षण असेल म्हणुन सोडुन दिले परंतु कौशल्या मात्र ठाम होती मग तीची ही आकांक्षा जेव्हा तिने राधे ला आपल्या मोठ्या बहीणीला सांगितली तेव्हा राधा ही तयार झाल्या मात्र एका सुंदर कलात्मक अटीवर ती म्हणजे मी राजांना तुझ्या बरोबर शेअर करायला तयार आहे मात्र स्टेजवर जेव्हा राजा परफ़ॉर्म करतील तेव्हा त्यांची संगिनी मी आणि केवळ मीच असेल. तु त्यांच्या बरोबर स्टेज वर कधीही एकत्र परफ़ॉर्म करायच नाहीस. आज राजां ही आपल्या सुंदर दाम्पत्य जीवनाचा गाडा अत्यंत यशस्वीपणे हाकत आहेत. आणि कौशल्यां नी ही आपले मोठ्या बहीणीला दिलेले वचन पुरेपुर पाळले. अजुन काय हवे ? संबधित लिंक्स http://blogs.hindustantimes.com/just-people/2009/04/14/about-raja-reddy-his-dance-and-two-wives/ http://www.tribuneindia.com/1998/98dec27/sunday/view.htm आणि म्हणुन च माझे असे म्हणणे आहे की असा जाचक कायदा जो हिंदुं पुरुषांना द्विभार्या प्रतिबंध करतो तो रद्द केला पाहीजे व अशा निरागस प्रेमी जिवांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला पाहीजे यातच खरया अर्थाने घटनेची समानतेच्या मुल्यांची अंमलबजावणी होईल असे माझे एक हिंदु पुरुष म्हणुन मत आहे. आणि मी म्हणतो त्यात अतिशयोक्ती काहीच नाही आपल्याच महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपर्यंत विदर्भ प्रातांत (महाराष्ट्राच्या इतर प्रांतात बंदी आल्यानंतर ही काही वर्षे तरी) हिंदु पुरुषाला द्विभार्या विवाह करण्यास कायद्याच्या कुठल्या तरी स्पेशल कलमानुसार बंदी नव्हती. दैनिक दिव्य मराठी त काही दिवसांपुर्वी आलेल्या पंडीत भिमसेन जोशींच्या वारसांत होत असलेल्या संपत्ती वरील कलहा संदर्भात ही बातमी होती( वारसांचे सुर बिघडले असे काहीतरी शीर्षक होते) त्या बातमीत हा उल्लेख मी वाचला. त्यात पंडीत भिमसेन जींच्या प्रथम पत्नी सुनंदाजी हयात असतांना पंडीतजींनी द्वितीय विवाह वत्सलाबाईंशी करण्यासाठी तेव्हाच्या विदर्भ प्रांतातील या कायद्यातील तरतुदीचा वापर केला होता तो दुसरा विवाह विदर्भात कायद्याने मान्य होता म्हणुन म्हणुन हा विवाह पंडीतजींनी विदर्भ या प्रांतात जाउन केला आणि त्याला कायदेशीर मान्यता घेतली.या तततुदीमुळे पंडीतजींवर धर्मांतराची वेळ आली नाही. पंडीतजींनी ही कायद्याचा कुशलतेने उपयोग करुन घेतला व स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले ते गानपंडीतच नव्हे तर कायदे पंडीत ही होते असे या घटनेवरुन दिसुन येते. तर भारत रत्न पंडीत भिमसेन जोशींचे ही उदाहरण आपल्याकडे आहे. यांनी ही दोन स्त्रीयांशी विवाह करुन दाम्पत्यजीवनाचा गाडा यशस्वीपणे हाकुन दाखविला, दोघींची जबाबदारी समर्थपणे पेलुन दाखविली आणखी काय हवे ? संबधित लिंक्स http://www.dnaindia.com/mumbai/report-living-in-the-shadow-of-bhimsen-joshis-brilliance-1500413 http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-11-11/bangalore/43928547_1_father-panditji-pandit-bhimsen-joshi आणखी कीती उदाहरणे हवीत ? तर हा जुलुमी कायदा तत्काळ रद्द केला पाहीजे व हिंदु पुरुषांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी दिली गेली पाहीजे या माझ्या मताची पुनुरावृत्ती मी करतो. याने दुसरा विवाह करण्यासाठी धर्मांतर करण्याचा मार्ग अवलंबवावा लागणार नाही( वरील उल्लेखाप्रमाणे तो ही मार्ग आता शिल्लक आहे की नाही शंकाच आहे परत एकदा जाणकारांच्या तोंडाकडे बघत आहे त्यांनी मार्गदर्शन करावे ) अथवा चोरटेपणाने असे संबंध ठेवण्याची पाळी ही येणार नाही. व संबधित स्त्री व संतति ला ही कायदेशीर मान्यता मिळुन समाजात सन्मानाने वावरता येईल. अर्थात वरील सर्व विवेचनात संबधित स्त्रीयां ची परवानगी संमती आहे असे गृहीत धरलेले आहे. यातील एकाही संबधित व्यक्त्तीची या विवाहाला मान्यता नसेल तर अर्थातच मग मात्र त्याला परवानगी नसावीच मी सर्वांची संमती ज्यात असते अशा आणि केवळ अशा विवाहांपुरतच या संबधातच ही मागणी करीत आहे. म्हणुन ही अत्यंत न्याय्य आणि मुलभुत हक्काची मागणी मी एक हिंदु पुरुष या नात्याने करीत आहे.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आमच्या मते >>> मुळातच लग्न संस्था ही एक अत्यंत्य निर्बुध्द प्रकार आहे ... सहजीवनासाठी कायद्याचे वा धर्माचे बंध्अन कशाला ? तस्मात , द्विभार्या वगैरे नाही तर ओपन रीलेशनशीप , लिव्ह इन ह्यांना आमचे समर्थन आहे ! अवांतर :ओशोचा मॅरेज अ‍ॅन्ड चिल्ड्रेन असा एक अत्यंत सुंदर प्रवचन व्हिडीयो युट्युब वर होता , आता दिसत नाहीये :(

असा एकाच बाजूचा प्रतिबंध का काढावा ? या समानतेच्या काळात स्त्रीलाही अनेक पतींचा हक्क का असू नये? कायद्याप्रमाणे सज्ञान असलेल्या स्त्री अथवा पुरुषाने परस्पर संमतीने लग्नाशिवाय कितीही संबंद्ध ठेवले तरी ते कायद्याने दंडनीय नाही किंवा त्याच्या परिणामांची काही कायदेशीर जबाबदारीही नाही. पण तोच व्यवहार कायदेशीरपणे करून त्याच्या परिणामांची (मुले, निधनोत्तर संपत्तीतला वाटा, इ) कायदेशीर जबाबदारी घ्यायला कायद्याची परवानगी नाही ! कायदा गाढव असतो असे म्हणतात ते काही उगाच नाही ! काही (केवळ) निरिक्षणे... भारतात बहुपत्नीत्व आणि बहुपतीत्व पुराणकाळापासून आहे. त्याला पहिला विरोध आणि एकपत्नीव्रताचा महिमा (माझ्या माहितीप्रमाणे, नसल्यास जाणकारांनी दुरुस्ती करावी) वसाहतवादाच्या काळात ख्रिश्चन धर्माच्या प्रभावाखाली आणि बहुदा "तुमचा धर्म किती मागासलेला आहे आणि आमचा धर्म किती पुढारलेला आहे" हे अधोरेखीत करण्यासाठी आणि स्थानिकांना कमी लेखण्यासाठी वापरला गेला. त्याकाळच्या भारतिय समाजसुधारकांनीही तो विचार उचलून धरला हे सर्व बरोबर होते किंवा नाही हा मुद्दा मी येथे मांडत नाही... पण खरी मेख पुढे आहे... वसाहतकाळात आपले विचार / धर्मनियम गुलाम राष्ट्रांवर लादणार्‍या देशांच्या नागरिकांनी आजच्या घडीला एकपत्नित्वच काय पण एकूण लग्न्संस्थेचीही लक्तरे बनविली आहेत... तेथे सहजीवन (लिव्हींग टुगेदर) आणि सिव्हिल मॅरेज यांनाच केवळ चर्चमध्ये पाद्र्याच्या उपस्थितीत झालेल्या लग्नाएवढेच कायदेशीर महत्व आहे इतकेच नव्हे तर लग्नाच्या कोणत्याही जबाबदारीशिवाय (मूव्हिंग इन) एकत्र राहणे ही काही जगावेगळी गोष्ट राहिली नाही. या एका गोष्टिच्या बळावर काही देशांमध्ये स्थायिक व्हिसासाठी अर्जही करता येतो... आणि त्याचा गैरफायदा घेऊन व्हिसा मिळवलाही जातो ही काहि फार गुपित नाही. भारतीय पुराणात असलेल्या (म्हणून बुरसटलेल्या) आणि पण आता पाश्चिमात्यमार्गांनी आलेल्या (म्हणून पुरोगामी) अश्या या गांधर्वविवाहाचे आता भारतातले पुनरागमनाचे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे लक्षण म्हणून कायदेशीर स्वागत होत आहे !

ह्म्म्म... सोचना पडेगा ! ;) जाता जाता :- च्यामारी... इथे एक सँपल सांभाळताना भारी पडतं, त्यात जर दुसरीचा जुगाड केलात...तर तुमचे मॅनेजमेंट स्किल्स हुच्च कोटीचे आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही असे वाटते. ;) बाकी फिरंगी लोक मात्र याही बाबतीत पुढेच बघा ! अहो तो हल्क हॉगन { हो तोच तो डब्लूडब्लूई वाला...}त्याने म्हणे ५००० { पाच हजार }चा आकाडा पार केला अशी ऊसगावात वार्ता हाय म्हणे... खरे खोटे तोच जाणे.

हल्क होगन याही बाबतीत हल्क आहे तर!!! मान गये हॅहॅहॅ... ओसामा बीन लादेन याच्या देखील ५ बायड्या होत्या... {हा ऑफिशल काउंट आहे,अन ऑफिशिअल तोच जाणे.}१८ वर्षीच त्याचा पहिला निकाह लागला. जाता जाता :- हे अमेरिकन कोणती कोणती माहिती तुमच्या देशातुन गोळा करुन गेलेत कोणास ठावुक, पण अगदी पर्सनल माहिती देखील त्यांच्याकडुन टिपायची राहिली नाही.सौदीचा राजा अब्दुल्ला हा वयाच्या ९२व्या वर्षा पर्यंत Viagra चे भरपुर सेवन करायचा ही खाजगी माहिती सुद्धा त्यांना मिळालीच. संदर्भ :- Viewing cable 08RIYADH1077, UPDATED PERSONAL INFO ON SAUDI KING आता आपल्या देशाची आणि कुणा-कुणाची कशी माहिती त्यांच्याकडे जमा झाली असेल याचा फक्त विचार करुन पहा.

हा हा हा अगदी! अन सौदीचं आम्रिकेशिवाय पान तरी हल्तं का म्हणा. ही म्हायती असणारच.

हल्क च्या ५००० पत्न्या आहेत का आजवर ५००० झाल्या आहेत? दुसर्‍याची शक्यता जास्त वाटते. बादवे पिअरी वूडमॅन त्याच्या आसपास असावा.

पाय चेपुन देणारा बबलु असेल तर अनेक बबलीज सुद्धा तयार आहेत हो ! तस काय परवडणार नाय तुम्हाला !

मनिम्याऊ च्या मताशी सहमत … पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच एकापेक्षा अनेक लग्न करण्याची परवानगी कायद्याने दिली तर जास्त बरं होईल

भारतातही हिंदु पुरूषास एकाहून अधिक जोडीदारांसोबत रहायची परवानगी आहे. फक्त दोन्ही व्यक्तींशी विवाहाचा करार करायची संमती नाही. कारण विवाह हा धार्मिक संस्कार वगैरे नसून एक कायदेशीर करार आहे.

पुरुषाने दुसरे तिसरे चौथे वगैरे लग्ने करण्याला त्याच्या आधीच्या पत्नींची संमती असल्यास त्याने आणखी लग्ने करायला कायद्याने संमती द्यावी असे लेखकाने लिहिलेले आहे. या अटीमुळे निदान ९९ टक्के (द्विभार्याविवाहोत्सुक) पुरुष त्यातून कटाप होतील. "मला घरकामात मदत करायला दुसरी बायको घेऊन ये असे मी माझ्या नवर्‍याला कधीचे सांगते आहे" असे ज्यांनी (विनोदाने) लिहिले आहे अशा भगिनीसुद्धा "पण त्या बायकोची निवड मी करेन" अशी अट घालून कोणालाच कधीच निवडणार नाहीत याची मला खात्री आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळात पहिल्या बायकोला मूल होत नाही म्हणून तिनेच हट्ट धरून आपल्या लहान बहिणीला सवत करून घेतल्याचे उदाहरण मी पाहिले आहे. लोभीपणाने किंवा हुंडा देणे टाळण्यासाठी एकाद्या गरीब बापाने आपल्या मुलीचे लग्न विवाहित पुरुषाबरोबर लावून दिल्याची उदाहरणेही आहेत. पण आजच्या युगात हे मुद्दे असू नयेत. इस्लामम्ध्ये पहिल्या लग्नालासुद्धा नवरा आणि नवरी या दोघांची संमती असणे आवश्यक असते आणि काझीच्या समोर दोघांनीही "कुबूल है" असे कबूल केल्यानंतरच तो विवाह होतो. हिंदू धर्मामध्ये वरमाला घालणे आणि ख्रिश्चन धर्मात "आय डू" म्हणणे वगैरे असते. पण या सर्वांनध्ये फसवणूक किंवा जबरदस्ती केली जाण्याची शक्यता असते आणि काही जागी तसे घडतेही. पुरुषाने दोन किंवा अधिक लग्ने करण्याचे काही फायदे लेखात दाखवले आहेत, पण लग्नानंतर त्या बायकांचे आपसात पटणे कठीणच नाही तर अशक्य आहे असे मला तरी वाटते. यामुळे समाजाला त्यापासून त्या फायद्यांच्या कित्येक पटीने जास्त तोटे होणार आहेत. या सर्वांचा विचार करूनच काही शहाण्या लोकांनी हिंदूंसाठी द्विभार्याप्रतिबंधक कायदा केला आहे. मुसलमानांना चार बायका करण्याची परवानगी दिलेली असली आणि "आमचे मात्र हम दो हमारे दो आणि त्यांचे हम पाच हमारे पचास" असा खोडसाळ प्रचारही होत असला तरी तसे प्रत्यक्ष होतांना दिसत नाही. माझे जेवढे मित्र आहेत (हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध वगैरे) त्यातल्या कोणालाही दोन बायकाही नाहीत आणि दोनपेक्षा जास्त मुले ही नाहीत.

आमचे मात्र हम दो हमारे दो आणि त्यांचे हम पाच हमारे पचास" असा खोडसाळ प्रचारही होत असला तरी तसे प्रत्यक्ष होतांना दिसत नाही.
नक्की ? शुअर ?? कॉन्फिडंट ??? लॉक किया जाय ????

"वरमाला" पेक्षा मला "हार" हा शब्द जास्त चपखल वाटतो. कारण मुहूर्त साधून वधूवरांना एकमेकांकडून "हार पत्करणे/स्विकारणे" म्हणजे काय याचा अर्थ जगण्याची सुरवात करावी लागते. ;)

जरुरत है, जरुरत है, या गाण्यातले प्रत्येक वर्णन म्हणजे एक पत्नी अशी कल्पना करावी. जसे, एक श्रीमतीकी,कलावतीकी, सेवा करे जो पतिकी वगैरे वगैरे! निव्वळ त्रिशतकी होण्यासाठी !

राजा रेड्डींचा त्यांच्या पत्नींसमवेतचा फोटो पाहील्यावर, राजांशी लग्न करण्यास दोघी भगिनी "एका पायावर" तयार झाल्या असाव्यात असे वाटले. :) बाकी द्विभार्याप्रतिबंधक कायदा येण्याआधीच्या पिढीतली अशी प्रसिद्ध मराठी उदाहरणे देखील आहेत. पण कुणाच्याही वैयक्तीक आयुष्यावर लिहीणे टाळू इच्छीतो. :) हा लेख / ही चर्चा जरी "समाज" विषयात असली तरी खर्‍या अर्थाने ती "विरंगुळा" मध्ये वर्गिकृत आहे असे समजत आहे. :)

प्रत्येक घरात "क" ची मालीका चालु होईल. मी कधि बघत नाहि पन अपङेट भेटत असतात की काही दीवसा अगोदरच त्यानी नविन लग्न केले आहे. घरीच मजा येईल. :)

हे बरय राव! मी आत्ताच हा धागा पाहून नवर्‍याला तसा आग्रह केला तर तो म्हणाला की तुझ्यासारख्या महामायेशी एकदा लग्न झाले आहे तेवढे पुरे! यापुढे या जल्मीच नव्हे तर पुढील जल्मीही तो लगीन करणार नाही.

तसंही येत्या काहि वर्षांत अनेक स्त्रि-पुरुषांचे अनेक स्त्रि-पुरुषांशी अनेक लग्नं/लग्नबाह्य संबंधं असं कमालिचं इंट्रेस्टींग कौटुंबीक/समाज स्ट्रक्चर तयार होणार आहे. फल ज्योतिषाने बीग बँग थेअरीचं हे भविष्य नाडिपट्टीवर कोरुन ठेवलय कधिचं.

मग घर पण कमीतकमी १५-२० खोल्यांचा राजवाडा असणार नाही का?
नुकताच राजस्थान सहलीनिमित्त जोधपूर येथील अतिभव्य राजवाडा पाहण्याचा योग आला.जसवंतसिंग नावाचे राजे(http://en.wikipedia.org/wiki/Jaswant_Singh ) तेथे होवून गेले.१८७३ ते १८९५ ह्या काळात. गाईडच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा तर त्यांना २० अधिकृत बायका व ३० अनधिकृत बायका.जेथे बाळंतपण व्हायचे ती वेगळी मोठी खोली गाईडने दाखवली.बर्‍याचवेळा एक बाळंतपण आटोपले की लगेच दुसर्‍या आठवड्यात आणखी एक्.शेवटी राजकुमार्/राजकन्यांची कुंडली मांडण्यासाठी एक पूर्णवेळ पंडितच तेथे असायचा.पडदा पद्धत तेव्हा होती.त्यामुळे पंडितजी खोलीबाहेर बसत. जन्म झाला की सुईणबाई लिंबू फेकून मारत्.लिंबू अंगावर पडले की पंडित ताबडतोब ग्रह तारे पाहून कुंड्ली मांडत. काही वर्षांनी जसवंत महाराज 'सुधारले' व त्यांनी प्रजेकडे ल़क्ष द्यायला सुरुवात केली.काही चांगली कामे केली.हयातीत त्यांना जनतेने त्यांना देवत्वही बहाल केले.त्यांच्या पश्चात जसवंत थडा(जसवंतचे थडगे)बांधण्यात आला. राजस्थानचा ताजमहल ओळखला जातो. jasawant

कारण अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बहुपत्नीत्व हे हिंदु परंपरेचे एक महत्वाचे लक्षण आहे.
म्हणजे, त्या काळी प्रत्येकाने मल्टिपल बायका करण्यासाठी दुप्पट मुली पैदा व्हायच्या असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

एक सहज विचारतेय, बाकीच्या देशांमध्ये बहुपत्नित्व नाही का? उदाहरणार्थ इथियोपियामध्ये किंवा मलेशियामध्ये किंवा पोर्तुगालमध्ये किंवा पेरुमध्ये कायकाय रीती आहेत? माझ्या मते हिंदूंचे काही वेगळं नाहीये. जगभरच सगळीकडे संधी मिळाली तर बर्‍याच (सगळ्या नाही!) पुरुषांना एकापेक्षा जास्त लग्न करायची इच्छा असेलच. अवांतरः कुठलीही शहाणी बाई मात्र दुसर्‍या लग्नाची इच्छा करणार नाही. एकाचवेळेस दोन दोन सासूसासरे कोण सांभाळणार??? ;)

अहो... सासरा पण एक ८-१० बायका करेलच ना?आपल्या तरूण बायकोला घेवून सासरा कशाला येतोय सुनेकडे? आणि आपल्या अशा ८/१० बायका सांभाळणार्‍या बापाला मुले पण भरपूर असतील. आम्ही आपले चांगले गेला बाजार अजून एक तरी बायको येईल म्हणून स्वप्न रंगवत होतो, तर तुमचे आपले भलतेच.(खरे तर दुसरे लग्न करायला हरकत नाही, पण २/२ सासूंना सहन करायची आजकालच्या पुरुषांची हिंमत नाही.) वरील प्रतिसाद, १००% विनोदी असल्याने, आणि तो फक्त "लीमाउजेट ताईंना" असल्याने,माबोकर आणि तत्सम मं.नी उगाच आपापला आणि माझा वेळ वाया घालवू नये.

तर भारत रत्न पंडीत भिमसेन जोशींचे ही उदाहरण आपल्याकडे आहे. यांनी ही दोन स्त्रीयांशी विवाह करुन दाम्पत्यजीवनाचा गाडा यशस्वीपणे हाकुन दाखविला, दोघींची जबाबदारी समर्थपणे पेलुन दाखविली.
नुकतेच राघवेंद्र जोशी यांचे, पंडीतजींच्या थोरल्या मुलाचे (पहिल्या पत्नीपासून झालेल्या) "गाणार्‍याचे पोर" हे आत्मचरीत्र वाचलं. या पुस्तकानूसार परिस्थिती तुम्ही म्हणताय त्याच्या अगदी उलट होती.

पुरुषांचे बहुपत्नीत्वा संबंधी कल अन स्त्रीयांचे प्रणयाराधनातले नखरे हे दोन्ही उत्क्रांती तुन आलेले स्वभाव विशेष आहेत इतकेच मी म्हणेन. पण मेंदु च्या जबरदस्त क्रियाशील सहभागामुळे "सामाजिक प्राणी" ह्या पुढे जावुन मनुष्य जमात फ्लरिश झाली , संस्कृती उदयाला आली. म्हणुन निसर्ग विचारात घेतलेस बहुपत्नीत्व हे नैसर्गीस दृष्ट्या प्रबळ असणारी इच्छा आहे अन मानवीय प्रगती पाहील्यास ती इच्छा चुक आहे