Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:
जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे? लोक धर्मांतर का करत असावेत? माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?. धर्माबद्दल काही बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्या धर्मातील चुका दाखवतो. काहीना आपला धर्म हा प्राचीन वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही. एरवी सामान्य असणारा माणूस धर्माच्या नावाने दंगली करायलाही मागे पुढे पाहत नाही आपला धर्म खतरे मे असे त्याला वाटू लागते नि तो दुसर्या धर्मियावर तुटून पडतो परधर्मीय बद्दल द्वेष हा त्याला स्वधर्माचा अभिमान वाटतो. धर्मावर असे अनिर्बंध प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा?धार्मिक दंगलीत तळहातावर शीर घेवून लढणारे धार्मिक लोक पाहिले तर त्यांच्या धर्मप्रेमाचे आश्चर्यच वाटते पण इतके होवूनही एक प्रश्न पडतो कि धर्मावर निरतिशय प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा ? धर्मांतरे का होतात ???आपल्या भारतातही अनेक धर्मांतरे झालेली आहेत त्याचे काय कारण असावे?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

नक्की कशावर चर्चा सुरु आहे? मी आपलं वेगवेगळ्या देवाधर्माचे काहितरी वाचायला मिळेल या आशेवर धागा उघडतेय तर प्रत्येकवेळेस वेगळंच काहितरी पेटतंय! :)

तशी ही चर्चा देवाधर्मावरच चालू आहे. आजकाल राजकिय नेतेच देव (त्यांचे चेले त्यांच्या पाया पडताना, त्यांना दुधाने आंघोळ घालताना किंवा त्यांच्यावर ते बुडून जातिल इतपत खर्‍या सुमनांचा आणि शाब्दीक स्तुतिसुमनांचा वर्षाव करताना बघितले नाहीत का? !) आणि हे देव म्हणतील तोच त्यांच्या चेल्यांचा धर्म. देवळातल्या देवाची आरती केली किंवा त्याला प्रसाद चढवला तर हाती काही लागायची शाश्वती नाही... त्यापेक्षा आताचे हे देव हक्काने मागून घेतात आणि तुमचं कामही करतात. सांगा आजकाल कोण जास्त पावर्फूल्ल ? :)

तशी ही चर्चा देवाधर्मावरच चालू आहे. आजकाल राजकिय नेतेच देव (त्यांचे चेले त्यांच्या पाया पडताना, त्यांना दुधाने आंघोळ घालताना किंवा त्यांच्यावर ते बुडून जातिल इतपत खर्‍या सुमनांचा आणि शाब्दीक स्तुतिसुमनांचा वर्षाव करताना बघितले नाहीत का? !) आणि हे देव म्हणतील तोच त्यांच्या चेल्यांचा धर्म.
हा हा हा, प्रचंड सहमत!!

भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही आणि हिंदुत्ववादी तर आजिबातच नाही. खरा हिंदुत्ववादी पक्ष काँग्रेस आहे ,मुस्लिमांना गाफिल ठेवून काँग्रेसने खरी सत्ता आजपर्यंत हिंदुच्याच ताब्यात ठेवली आहे.राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही ,तसे..
म्हणजे तुमच्याच म्हणण्यानुसार काँग्रेस आणि भाजप दोन्हीही धर्मनिरपेक्ष पक्ष नाहीत. आणि तुम्ही तर म्हणताय, की
आपले मत धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी पक्षालाच द्या
याआधी काही धाग्यांवर तुमचे काँग्रेसच्या बाजुचे प्रतिसाद वाचल्येत. त्यांच्याच खाली तुमची हीच स्वाक्षरी तेव्हाही होती. प्रतिसाद आणि स्वाक्षरीत एवढा विरोधाभास का??

>>> भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही आणि हिंदुत्ववादी तर आजिबातच नाही. धर्मनिरपेक्ष नाही आणि हिंदुत्ववादी पण नाही. तुमचा काहीतरी केमिकल लोचा झालेला दिसतोय. हिंदुत्ववादी नाही म्हणजेच धर्मनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष नाही म्हणजेच हिंदुत्ववादी अशी सोपी व्याख्या आहे. >>> खरा हिंदुत्ववादी पक्ष काँग्रेस आहे हा साक्षात्कार कधी झाला म्हणे? काहीतरी जोरदार केमिकल लोचा दिसतोय. गेट वेल सून (म्हणजे चांगली सून शोधू नका आणि लवकर बरे व्हा). >>> ,मुस्लिमांना गाफिल ठेवून काँग्रेसने खरी सत्ता आजपर्यंत हिंदुच्याच ताब्यात ठेवली आहे. हिंदूंच्या म्हणजे कोणाच्या ताब्यात ठेवली आहे? सत्ता काँग्रेसने स्वपक्षाच्या ताब्यात ठेवली आहे आणि काँग्रेस हिंदूंचा नसून निधर्मांधांचा पक्ष आहे. >>> राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही , सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. >>> तसे.. आजपर्यत एकही काँग्रेसी पीएम मुस्लिम नव्हता... याचा आणि हिंदुत्ववादी असण्याचा काय संबंध? >>> जिथपर्यंत भारतातले पक्ष विचारकरुन थांबतात, तिथुन पुढे काँग्रेस विचार करायला सुरवात करते... म्हणजे इतर पक्षांची भ्रष्टाचाराची उडी काही लाखांवर किंवा कोटीत जाऊन थांबते. काँग्रेसची उडी १७६००० कोटी (२ जी तरंगलहरी घोटाळा, ७०००० कोटी (राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा), १८६००० कोटी (कोळसा खाण घोटाळा) अशी खूप पुढे जाऊन पडते. >>> आताही आप'ला Expose होताना आपण पहालच.खरी चाणक्यनिती काँग्रेसकडेच आहे. जरा वाट बघा. केजरीवाल काँग्रेसचे कसे वस्त्रहरण करतील ते पहा आणि खरा चाणक्य कोण आहे ते कळेलच. >>> आपले मत धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी पक्षालाच द्या तुमच्या म्हणण्यानुसार काँग्रेस हिंदुत्ववादी आहे, म्हणजेच काँग्रेस प्रतिगामी आहे व धर्मनिरपेक्ष नाही. तुमच्या म्हणण्यानुसार भाजप हिंदुत्ववादी नाही, म्हणजेच भाजप पुरोगामी व धर्मनिरपेक्ष आहे. आपले मत "धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी" पक्षालाच द्या अशी तुमची कळकळीची इच्छा आहे. म्हणजेच "भाजपला" मत द्या असे तुम्हाला आडून सुचवायचे आहे. मग तसे स्पष्ट सांगा ना. उगाच ताकाला जाऊन भांडे कशाला लपविता?

>>>>आजपर्यत एकही काँग्रेसी पीएम मुस्लिम नव्हता... अब्दुल रेहमान अंतुले - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२

>>>>राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही. सुशिलकुमार शिंदे - महाराष्ट्र मुख्यमंत्री - १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४

@नाव तर अतृप्त दिसतया.म्हणून विचारल.>>> ती अतृप्ती इहलौकिक गोष्टींबद्दल आहे. धार्मिक गोष्टींबद्दलची नाही. :) तसेही आंम्ही कोणताच प्रस्थापित धर्म वापरत नाही. ती गरजच संपलिये. :)

तस असेल तर जावू द्या... गुरुजी तुम्हीच सांगा हो धर्मातर का करतात? (आणि ह्या धाग्यावर तो मोदिभी नको नि पवार भी नको मोदी राहल्या गुजरातेत पवार राहल्या बारामतीत.)

@गुरुजी तुम्हीच सांगा हो धर्मातर का करतात? >>> १)स्वतःच्या धर्मातल्या लोकांकडून होणारा छळ/पीडा/अपमान/पिळवणूक इ...इ.. २)दुसर्‍या धर्माबद्दल अंधळ आकर्षण/मिळणारी हरेक स्वरुपातली प्रलोभन ३)आपल्या दुबळ्या समाजावर अत्याचार पूर्वक धर्म लादला जाणे. ४)आणी शेवट(दुसर्‍या धर्मातल्या) वैयक्तिक कुतुहला पासून ते उपासनामार्ग अवडल्यामुळे. ..................................................................................................

आणि यानं 'त्यांचा' आत्मा तृप्त होईल असं वाटतं तुम्हाला बुवा? धन्य आहे तुमचा आशावाद. बेस्ट लक. :) बादवे तुम्ही कापुस कोंड्याची गोष्ट ऐकली आहे का?

@आणि यानं 'त्यांचा' आत्मा तृप्त होईल असं वाटतं तुम्हाला बुवा? >>> नाहीच होणार . मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. :) @धन्य आहे तुमचा आशावाद. बेस्ट लक. Smile>>> हा "माझा" आशावाद वग्रे काहिही नाही. फक्त कारण मिमांसा आहे. धन्यवाद. @बादवे तुम्ही कापुस कोंड्याची गोष्ट ऐकली आहे का>>> ती मला चांगलीच ठाऊक आहे. कदाचित धागाकर्त्यास उपयोगी पडेल. :)

बादवे तुम्ही कापुस कोंड्याची गोष्ट ऐकली आहे का?
रजनीकांतला ती गोष्ट अथपासून इतिपर्यंत ठाऊक आहे. ती गोष्ट सांगून त्याने अलका कुबलला चांगले तासभर हसविले होते.

>>> गुरुजी तुम्हीच सांगा हो धर्मातर का करतात? ज्या उच्च नीतिमूल्यांसाठी व तात्विक भूमिकेतून पवारसाहेबांनी १९८६ साली पक्षांतर केले त्याच कारणातून धर्मांतर होते. ज्या देशहिताच्या कारणांमुळे पवारसाहेब समाजवादी काँग्रेसला विटून काँग्रेसमध्ये परत गेले त्याच कारणांमुळे लोक एखाद्या धर्माला विटून दुसर्‍या धर्मात जातात.

क्रूपया मार्गदर्सन करावे. -*_*- वर लिवलाय, किमान तितक्या प्रतिसादापुरता माझा आयडी आयझ्याक न्यूटन किंवा अल बेरूनी किंवा भंते अमुकतमुक असा आहे असे समजा :) मिपावर लै सूज्ञ लोक आहेत, पैकी सक्रिय मॅक्स २५-३० आहेत. सचिन वगैरे चार दोन आयडींना कंपू करून झोडपणे सध्या फारच जोरात आहे. मला तरी लोचा हा दिसतो आहे, की या आयडीज चिमट्या फार योग्य जागी काढतात. त्यामुळे उत्तर देणे म्यांडेटरी होऊन जाते.. नसेल करायची चर्चा धागा विषयाबद्दल तर फाट्यावर मारा ना? कुणी जबरदस्ती केली आहे का? मास्तुरेंना प्रश्न विचारलेला दिसला, त्याचे उत्तर कुठेय? असो. चालू द्या. ता.क. गणपाभौ रेस्प्या का टाकत नाहीत आजकाल?

आजवर अनुल्लेखानंच मारत आलोय असल्या काकुंना. पण काये ना गोपाळराव, कधी कधी सहन शक्ती संपते. जरी प्रतिसाद या धाग्यात असला तरी तो केवळ या धाग्याकर्त्या पुरता मर्यादित नाही. हल्ली लोकं उठतात ऑनलाईन पेपरातली एखादी बातमी उचलतात आणि त्याची लिंक टाकून ४-५ ओळी खरडुन लोकांची मतं मागत बसतात. याचा वीट आला होता. या उपहासात्मक्(विडंबन) प्रतिसादातुन त्या कोंडलेल्या वाफेला वाट करुन दिली इतकेच.

अरे बापरे इतका थोर मानुस गणपा शेठ आमचा अनुल्लेख करणार. काय बरे करावे आता. गणपा शेठ उपहासात्मक विडंबन चान होते कोणाकडून लिहून घेतलेत?

मिपावर लै सूज्ञ लोक आहेत, पैकी सक्रिय मॅक्स २५-३० आहेत. सचिन वगैरे चार दोन आयडींना कंपू करून झोडपणे सध्या फारच जोरात आहे. मला तरी लोचा हा दिसतो आहे, की या आयडीज चिमट्या फार योग्य जागी काढतात. त्यामुळे उत्तर देणे म्यांडेटरी होऊन जाते..
पब्लिक धुलाई चालू असली की आपणही हात साफ करून घेण्याचा मोह आवरत नाही हो

वडापाव- हा प्रतिसाद व्यक्तिगत तुम्हाला उद्देशून नाही. पण घरात बायको विचारत नाही, ऑफिसात साहेब शिव्या घालतो, मित्र उसने देत नाहीत- थोडक्यात ज्यांच्या आयुष्याचं केळं झालेले आहे अशी पिचपिची लोकंच पब्लिक धुलाईमध्ये हात धुवून घेण्याचा "शूरपणा" दाखवत असतात, असं आजपर्यंतचं निरीक्षण आहे. असो.

तुम्हाला तुमची सहचरणी विचारते, हापिसात बाॅस मानानं वागवतो, मित्रांच्या ऊधारी - उसनवारीतुन मजेत चाललंय, थोडक्यात जीवनाचा हापुस झालाय ते हि असो व्यायामानं शरिरही चांगलच कमावलय, शुरही आहात...मजेत चाललंय कि तुमचं ...मग येवढ का चिडताय? मजेत घ्या

पण कुणी टोळ्या करुन एकट्या-दुकट्याला त्रास द्यावा आणि आपण त्यात मजा घ्यावी असं वाटत नाही, म्हणून ही कॉमेंट बाकी काही. त्यात पुन्हा कुंपणच शेत खायला लागलं की मग उद्विग्नता वाढते. सचीन यांच्या लेखांतील मतांशी मी सहमत असेनच असं नाही, पण एखाद्याला असं टार्गेट करुन त्याची रेवडी उडवणं मनाला पटत नाही इतकंच म्हणणं.

माझे एक धर्मांतर झाले आहे. इथे 'एका धर्मांतराची कथा' धाग्यात त्याचे वर्णन आहे. अजून तरी तो धागा पहिल्याच पानावर आहे. मला बुलेट पाइंटमधे प्रश्न विचाराल तर मी ऑब्जेक्टीव उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन.

मुळात माणसाला जो जन्मजात धर्म मिळालेला असतो, तोदेखील त्याच्यावर सक्तीनेच लादलेला नसतो का? हिंदु आईबापांनी जन्म दिला म्हणून हिंदु ..... मग धर्मातील काही गोष्टी चांगल्या असतातच, त्यामुळे तो धर्म आपला वाटू लागतो. माणसाला १०-२० वर्षापर्यंत धर्मच नसावा. त्यानंतर त्याने आनंदाने स्वतःला हवा तो धर्म निवडावा. असे आम्हाला वाटते.

@त्यानंतर त्याने आनंदाने स्वतःला हवा तो धर्म निवडावा. असे आम्हाला वाटते.>>> अगदी सहमत. आणी थोडी भर- @त्यानंतर त्याने आनंदाने स्वतःला हवा तो धर्म निवडावा--- आणी कुठल्याच प्रकारे धर्माची गरज नसेल,तर स्वखुषीनी निधर्मी रहावं. :)

आपण जसं कधि वडापाव, कधि भेळ, कधि मिसळ असं आलटुन पालटुन जिभेचे चोचले पुरवतो तसं सणवार किंवा इतर सोयी बघुन दिवसा/महिन्यागणिक धर्म बदलावा... आणि उपास करायचा असेल त्या दिवशी निधर्मी राहावं :)

वरील धोरण अमान्य... जिथे धर्मच नको... तिथे हे धोरण (आमच्या सारख्यांच्या) काय कामाचं? :) ते ज्यांना कुठेच सिरियस व्हायचं नसेल त्यांच्यासाठी योग्य आहे. :)