Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:
जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे? लोक धर्मांतर का करत असावेत? माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?. धर्माबद्दल काही बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्या धर्मातील चुका दाखवतो. काहीना आपला धर्म हा प्राचीन वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही. एरवी सामान्य असणारा माणूस धर्माच्या नावाने दंगली करायलाही मागे पुढे पाहत नाही आपला धर्म खतरे मे असे त्याला वाटू लागते नि तो दुसर्या धर्मियावर तुटून पडतो परधर्मीय बद्दल द्वेष हा त्याला स्वधर्माचा अभिमान वाटतो. धर्मावर असे अनिर्बंध प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा?धार्मिक दंगलीत तळहातावर शीर घेवून लढणारे धार्मिक लोक पाहिले तर त्यांच्या धर्मप्रेमाचे आश्चर्यच वाटते पण इतके होवूनही एक प्रश्न पडतो कि धर्मावर निरतिशय प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा ? धर्मांतरे का होतात ???आपल्या भारतातही अनेक धर्मांतरे झालेली आहेत त्याचे काय कारण असावे?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

ख्रिस्मस ला केक खायला मिळतो म्हणून मला ख्रिचन धर्म आवडतो. ईद ला मस्त मित्राकडे जावून बिर्याणी चापतो तेव्हा मला इस्लाम प्यारा वाटतो. आणि बाकी आपले गणपती, दिवाळी आहेतच. थोडक्यात मस्त चविष्ट खाणे हा माझा धर्म.

धर्मपंडितानी वाळीत टाकलेल्या आमच्यासारख्या माणसाच्या विचारानाही सहमती मिळाली, हे वाचोन आमचा धर्मांतरीत आत्मा धन्य झाला.

ख्रिश्चन मूल, मुस्लिम मूल, हिंदू मूल असं काही नसतं हे तो म्हणतो. जन्माला आलल्या मुलाला कोणताही 'धर्म' नसतो. उदा. अफगाणीस्तानात मुस्लिम मातापित्यांच्या पोटी जन्माला येईल त्या बाळावर आपोआपच आईबापाच्या 'धर्माचे' 'संस्कार' 'केले जातात'. (तिन्ही ठिकाणी अवतरण देण्याचा उद्देश तेच वाक्य तिन्ही शब्दांवर जोर देऊन वाचून पहावे, हा आहे.) हीच बाब त्या मुलाच्या जागी भारतातल्या हिंदू मातापित्यांच्या पोटी जन्मलेल्या मुलाबद्दल, वा कुठे इंग्र्लंडमध्ये ख्रिश्चन मातापित्यांच्या मुलांबद्दल. हे सगळे 'धर्मसंस्कार' कोवळ्या वयात, धर्म म्हणजे काय, देव कशाला हवा? इत्यादी कसलेच विचार नसलेल्या, व ते करायची इच्छा, / गरजही नसलेल्या बाळावर थोपविले जातात, व त्याला आपोआप 'मुसलमानाचे पोर' किंवा 'हिंदूचे पोर' म्हणण्या ऐवजी (असे आपल्याकडे पूर्वी म्हणत, जे जास्त योग्य होते) मुसलमान पोर वा हिंदू पोर असे संबोधले जाते. स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल, व तशीच वागणूक बहुतेकांची असते, फक्त तोपर्यंत धार्मिक बाळकडू खोलवर भिनलेले असल्याने 'आमच्यात हे असेच करतात' (शिडीवर चढणार्‍या माकडांची गोष्टःसंदर्भ) या बेसिसवर 'धर्म' सोडायची वा बदलायची इच्छा/गरज वाटत नाही. रोजच्या जगण्यात अशा कृत्रीम धर्माची गरजच नसल्याने, रोटिबेटी व्यवहारात कुठेतरी त्याची गरज लागते, किंवा सांघिक उपासना सक्तीची असलेल्या धर्मांच्या आचरणातून, वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते. यातून चटके बसलेला विरळाच कुणी धर्मांतर करून दुसर्‍या धर्मात जातो, असे माझे निरिक्षण आहे. आमिष वगैरे दाखवून लोक देशांतरही करतात. उदा. अम्रिकेचे नागरिकत्व स्वीकारून भारतभूला टाटा करणे हे हिंदु धर्म सोडून औषधोपचार्/अन्नासाठी ख्रिश्चन होणार्‍या आदिवाश्यापेक्षा बेसिकली फार वेगळे आहे, असे मला तरी दिसत नाही. विचारपूर्वक जर केले जात असेल. तर ते धर्मांतर = धर्माला अंतर देऊन निधर्मी वागणूकीकडे वळणारेच मला तरी सर्वच धर्मांत दिसतात. जितकी शैक्षणिक वा सांस्कृतिक प्रगल्भता जास्त, तितके हे प्रमाण वाढलेले दिसते. आपण रोजच्या दिनचर्येत 'धर्म' किती व कसा पाळतो, तथाकथित 'धर्मा'पासून किती दूर असतो, हा विचार केला तरी आपले धर्मांतर किती व का झाले, हे लक्षात येईल. ** असो. आजकाल चर्चा विषयाला धरून न बोलता तिसरेच फाटे फोडत हाणामार्‍या, टपल्यांची देवाणघेवाण करण्याची स्टाईल असतानाही माझा हा ओल्ड फ्याशण्ड प्रतिसाद कडूचा गोड करून घ्यावा ही विनंती.

सुंदर प्रतिसाद! तर्कसुसंगत आणि महत्त्वाचे म्हणजे, समंजस आणि संयत! आता वन-अप-मन शिपच्या आणि टोळीयुद्धाच्या हेडॉनिस्टिक कर्कश्श गदारोळात हा समजूतदारपणाचा आवाज कितपत टिकतो ते बघूयात.

अगदी सहमत. थोडे अवांतर आणि भरही. अमेरिकेत स्थाईक झालेल्या भारतीयांच्या अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या पुढच्या पिढीतील मुलांची लग्ने पुष्कळदा स्थानिक अमेरिकनांशी होतात आणि ती स्वतः हिंदू राहिली तरी त्यांची मुले कित्येकदा क्रिस्टिअन धर्म स्वीकारतात. याचे कारण त्यांना एकलपणा (आय्सोलेशन) नकोसा वाटत असावा किंवा पीअर प्रेशर हे असावे. अर्थात स्वतःचे घेटोज़ करून रहाण्यापेक्षा असे मिसळून जाणे कदाचित बरे. ह्या मुलांच्या आवडीनिवडीही भारतीय राहिलेल्या नसतात. (आजकाल आम्हा भारतीयांच्या आवडीनिवाडीसुद्धा तशा शुद्ध भारतीय कुठे राहिल्या आहेत म्हणा!)

@स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल, व तशीच वागणूक बहुतेकांची असते, फक्त तोपर्यंत धार्मिक बाळकडू खोलवर भिनलेले असल्याने 'आमच्यात हे असेच करतात' (शिडीवर चढणार्‍या माकडांची गोष्टःसंदर्भ) या बेसिसवर 'धर्म' सोडायची वा बदलायची इच्छा/गरज वाटत नाही.>>> +++++१११११

ख्रिश्चन मूल, मुस्लिम मूल, हिंदू मूल असं काही नसतं हे तो म्हणतो. जन्माला आलल्या मुलाला कोणताही 'धर्म' नसतो. उदा. अफगाणीस्तानात मुस्लिम मातापित्यांच्या पोटी जन्माला येईल त्या बाळावर आपोआपच आईबापाच्या 'धर्माचे' 'संस्कार' 'केले जातात'. (तिन्ही ठिकाणी अवतरण देण्याचा उद्देश तेच वाक्य तिन्ही शब्दांवर जोर देऊन वाचून पहावे, हा आहे.) हीच बाब त्या मुलाच्या जागी भारतातल्या हिंदू मातापित्यांच्या पोटी जन्मलेल्या मुलाबद्दल, वा कुठे इंग्र्लंडमध्ये ख्रिश्चन मातापित्यांच्या मुलांबद्दल. हे सगळे 'धर्मसंस्कार' कोवळ्या वयात, धर्म म्हणजे काय, देव कशाला हवा? इत्यादी कसलेच विचार नसलेल्या, व ते करायची इच्छा, / गरजही नसलेल्या बाळावर थोपविले जातात, व त्याला आपोआप 'मुसलमानाचे पोर' किंवा 'हिंदूचे पोर' म्हणण्या ऐवजी (असे आपल्याकडे पूर्वी म्हणत, जे जास्त योग्य होते) मुसलमान पोर वा हिंदू पोर असे संबोधले जाते. स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल, व तशीच वागणूक बहुतेकांची असते, फक्त तोपर्यंत धार्मिक बाळकडू खोलवर भिनलेले असल्याने 'आमच्यात हे असेच करतात' (शिडीवर चढणार्‍या माकडांची गोष्टःसंदर्भ) या बेसिसवर 'धर्म' सोडायची वा बदलायची इच्छा/गरज वाटत नाही. रोजच्या जगण्यात अशा कृत्रीम धर्माची गरजच नसल्याने, रोटिबेटी व्यवहारात कुठेतरी त्याची गरज लागते, किंवा सांघिक उपासना सक्तीची असलेल्या धर्मांच्या आचरणातून, वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते ईथपर्यंत जोरदार सहमत यातून चटके बसलेला विरळाच कुणी धर्मांतर करून दुसर्‍या धर्मात जातो, असे माझे निरिक्षण आहे. आमिष वगैरे दाखवून लोक देशांतरही करतात. उदा. अम्रिकेचे नागरिकत्व स्वीकारून भारतभूला टाटा करणे हे हिंदु धर्म सोडून औषधोपचार्/अन्नासाठी ख्रिश्चन होणार्‍या आदिवाश्यापेक्षा बेसिकली फार वेगळे आहे, असे मला तरी दिसत नाही. विचारपूर्वक जर केले जात असेल. तर ते धर्मांतर = धर्माला अंतर देऊन निधर्मी वागणूकीकडे वळणारेच मला तरी सर्वच धर्मांत दिसतात. जितकी शैक्षणिक वा सांस्कृतिक प्रगल्भता जास्त, तितके हे प्रमाण वाढलेले दिसते. आपण रोजच्या दिनचर्येत 'धर्म' किती व कसा पाळतो, तथाकथित 'धर्मा'पासून किती दूर असतो, हा विचार केला तरी आपले धर्मांतर किती व का झाले, हे लक्षात येईल पन ईथेच बेसिक लोच्या आहे कारण आपला धर्म पाळणे म्हणजे नक्की काय हे शिक्षीत्/अशिक्षीत्,निवासी-अनिवासी,मूळ हिंदु/हिंदु धर्म त्यागून मुस्लीम किरिस्ती झालेले,गरिब्/श्रीमंत्,अडाणि/विचारवंत यांना नक्की माहीती नाहीये,आणि ते माहीती करून घ्यायची अजिबात ईच्छा ही दिसत नाहीये. अशा संभ्रमावस्थेत साहजिक्च "आसारामां"समान भोंदुंचे फावते. संभमावस्थेचे ऊदाहरण म्हणजे मूळ हिंदु अस्लेल्या पण मुस्लिम धर्म स्विकारलेल्या समाजाला आजही हिंदू सण्-वार करण्याची असोशी असतेच्. तीच बाब ईतरांमध्ये..यातील सगळ्यात मोठा खेद्जनक भाग म्हणजे जो स्वतःला हिंदू समजतो त्याला ही हिंदू "धर्म" आहे का "जीवन प्रणाली"(ज्या मध्ये वेग-वेगळे धर्म्-पंथ्,जाती आहेत्)याचा ऊलगडा नाही.माग आप्-आप्ल्या मगदूरानुसार मी-माझी जात जे पाळते ते नियम/कर्मकांड म्हण्जे धर्म अस्सा सोयीस्कर अर्थ काढला जातो. या समजास नेते/अभिनेते/अभिनय करणारे नेते सुद्धा/स्वघोषीत धर्म मार्तंड्/विकावू विचारवंत खत-पाणी घालून आप्-आप्ला स्वार्थ साधून घेतात.. आपली (सर्व समाजाची)अवस्था नेहमीच "कोणता झेंडा घेऊ हाती" अशीच असते

>>> उदा. अफगाणीस्तानात मुस्लिम मातापित्यांच्या पोटी जन्माला येईल त्या बाळावर आपोआपच आईबापाच्या 'धर्माचे' 'संस्कार' 'केले जातात'. (तिन्ही ठिकाणी अवतरण देण्याचा उद्देश तेच वाक्य तिन्ही शब्दांवर जोर देऊन वाचून पहावे, हा आहे.) हीच बाब त्या मुलाच्या जागी भारतातल्या हिंदू मातापित्यांच्या पोटी जन्मलेल्या मुलाबद्दल, वा कुठे इंग्र्लंडमध्ये ख्रिश्चन मातापित्यांच्या मुलांबद्दल. धर्माचे संस्कार केले जातात व होत जातात. मुस्लिमांमध्ये लहान वयातच सुंता केली जाते. शिख ४-५ वर्षांच्या मुलाला फेटा बांधायला सुरूवात करतात. ख्रिश्चन लहान वयातच बाप्तिस्मा देतात. हिंदूंमध्ये फक्त एक ४-५ टक्के असलेला अल्पसंख्य वर्ग मुंज वगैरे करतो. उर्वरीत ९४-९५ टक्के अधिकृत हिंदू होण्यासाठी असे कोणतेही औपचारिक संस्कार करत नाहीत. त्यामुळे तुमचे वरील विवेचन फक्त ४-५ टक्के हिंदूनाच लागू पडेल. >>> हे सगळे 'धर्मसंस्कार' कोवळ्या वयात, धर्म म्हणजे काय, देव कशाला हवा? इत्यादी कसलेच विचार नसलेल्या, व ते करायची इच्छा, / गरजही नसलेल्या बाळावर थोपविले जातात, व त्याला आपोआप 'मुसलमानाचे पोर' किंवा 'हिंदूचे पोर' म्हणण्या ऐवजी (असे आपल्याकडे पूर्वी म्हणत, जे जास्त योग्य होते) मुसलमान पोर वा हिंदू पोर असे संबोधले जाते. हिंदू वगळता इतर मुख्य धर्मात सरसकट सर्व मुलांवर हे संस्कार थोपविले जातात. हिंदूंमध्ये फक्त ४-५ टक्के कुटुंबात असे होते. हे संस्कार जसे केले जातात तसे होतही जातात. एकवेळ संस्कार करणे थांबविता येईल पण संस्कार होणे हे कसे थांबविता येणार? एखाद्या हिंदू कुटुंबाने ठरविले की आपला मुलगा/मुलगी सज्ञान झाल्यावर कोणता धर्म स्वीकारायचा हे ठरवतील. आपण कोणतेही हिंदू संस्कार त्यांच्यावर करून त्यांच्या मनात पक्षपात निर्माण करायचा नाही. पण घरात जेव्हा पूजा होईल, दिवाळी साजरी केली जाईल किंवा गणपती बसविला जाऊन १० दिवस पूजाअर्चा, आरती होईल तेव्हा हे संस्कार आपोआपच त्यांच्यावर होतील. त्यांचे मन पक्षपाती होऊ नये म्हणून त्यांना याच्यात सहभागी न करता हे उत्सव साजरे करता येतील किंवा ते सज्ञान होईपर्यंत घरात उत्सव, पूजाअर्चा टाळायची का जेणेकरून अज्ञान अवस्थेत त्यांच्यावर हिंदू संस्कार होणार नाहीत? असे करणे शक्य नाही. त्यामुळे कितीही टाळले तरी कुटुंबाच्या धर्माचे संस्कार मुलांच्या मनावर कळतनकळत होणारच. >>> स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल, व तशीच वागणूक बहुतेकांची असते, या निष्कर्षाला काही आधार्/पुरावा/आकडेवारी आहे का? तसेच धर्मनिहाय याची आकडेवारी आहे का? का तुमचा स्वतःचा अंदाज आहे? >>> फक्त तोपर्यंत धार्मिक बाळकडू खोलवर भिनलेले असल्याने 'आमच्यात हे असेच करतात' (शिडीवर चढणार्‍या माकडांची गोष्टःसंदर्भ) या बेसिसवर 'धर्म' सोडायची वा बदलायची इच्छा/गरज वाटत नाही. एखादी लाभाची, चांगली, नवीन गोष्ट मिळणार असेल तरच जुन्या गोष्टींचा त्याग केला जातो. तसेच धर्मबदलाच्या बाबतीतही आहे. >>> रोजच्या जगण्यात अशा कृत्रीम धर्माची गरजच नसल्याने, तुम्हाला अशी गरज नसली तरी इतरांना अशी गरज असू शकते आणि आहे. >>> रोटिबेटी व्यवहारात कुठेतरी त्याची गरज लागते, एखादे झाड उपटून दुसरीकडे लावताना झाड आधी होते तसेच वातावरण, माती इ. गोष्टी जितक्या जास्त प्रमाणात असतील तितकी ते झाड नवीन ठिकाणी रूजण्याची जास्त शक्यता असते. लग्न होऊन मुलगी नवीन घरी जाताना नवीन घर हे आईवडीलांच्या घराशी, संस्काराशी मिळतेजुळते असल्यास मुलगी तिथे रमण्याची शक्यता जास्त असते. पूर्णपणे नवीन वातावरण असलेल्या घरात ही शक्यता कमी असते. त्यामुळे समान धर्मात रोटीबेटी व्यवहार प्रचलित झाले असावेत. >>> किंवा सांघिक उपासना सक्तीची असलेल्या धर्मांच्या आचरणातून, वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते. तुम्ही फारच जनरालायझेशन केलेले आहे. >>> यातून चटके बसलेला विरळाच कुणी धर्मांतर करून दुसर्‍या धर्मात जातो, असे माझे निरिक्षण आहे. आमिष वगैरे दाखवून लोक देशांतरही करतात. उदा. अम्रिकेचे नागरिकत्व स्वीकारून भारतभूला टाटा करणे हे हिंदु धर्म सोडून औषधोपचार्/अन्नासाठी ख्रिश्चन होणार्‍या आदिवाश्यापेक्षा बेसिकली फार वेगळे आहे, असे मला तरी दिसत नाही. मला तसे वाटत नाही. पण तुमच्या मताबद्दल आदर आहे. >>> विचारपूर्वक जर केले जात असेल. तर ते धर्मांतर = धर्माला अंतर देऊन निधर्मी वागणूकीकडे वळणारेच मला तरी सर्वच धर्मांत दिसतात. जितकी शैक्षणिक वा सांस्कृतिक प्रगल्भता जास्त, तितके हे प्रमाण वाढलेले दिसते. असेल कदाचित >>> आपण रोजच्या दिनचर्येत 'धर्म' किती व कसा पाळतो, तथाकथित 'धर्मा'पासून किती दूर असतो, हा विचार केला तरी आपले धर्मांतर किती व का झाले, हे लक्षात येईल. कर्मकांडे कमी झाली म्हणजे धर्मांतर झाले असे नव्हे.

>> रोजच्या जगण्यात अशा कृत्रीम धर्माची गरजच नसल्याने, रोटिबेटी व्यवहारात कुठेतरी त्याची गरज लागते, किंवा सांघिक उपासना सक्तीची असलेल्या धर्मांच्या आचरणातून, वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते.>> हे ५ वेळा एडिट करून लिहिले आहे, मास्तुरे! हातभर प्रतिसाद आला त्याबद्दल धन्यवाद. ह्यानंतर तुम्हास इथे लिहीनच, असे नाही. तुमचा तो हातभर प्रतिसाद फक्त डोळ्याखालून घातलाय, नीट वाचला नाहिये. तरीही जाताजाता, हे: "वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते." बोल्ड करून पुनः लिहितो. "हेव्यादाव्यातून" "पेटविण्याचा" "तुमचा" अजेंडा आहे, इतकेच म्हणतो. :) बाकी, "संस्कार" "केले जातात" त्या बाळाला "करून घ्यायची" इच्छा नसते. इट्स अ चाईल्ड यू नो?

>>> हे ५ वेळा एडिट करून लिहिले आहे ५ वेळा एडीट करा नाहीतर ५० वेळा करा. काय फरक पडतो? >>> हातभर प्रतिसाद आला त्याबद्दल धन्यवाद. ह्यानंतर तुम्हास इथे लिहीनच, असे नाही. तुम्ही ४ हात लांब विवेचन केल्यावर निदान हातभर प्रतिसाद तरी येणारच. नै का? >>> तुमचा तो हातभर प्रतिसाद फक्त डोळ्याखालून घातलाय, नीट वाचला नाहिये. बर >>> तरीही जाताजाता,हे: "वा अशा धर्मांबद्दलच्या हेव्यादाव्यातून धर्माच्याच नावाखाली पेटवलेल्या तथाकथित 'भावनां'साठी त्याची गरज लागते." बोल्ड करून पुनः लिहितो. बोल्ड, इटालिक, अंडरलाईन असे काहीही करून लिहिले तरी काय फरक पडतो? >>> "हेव्यादाव्यातून" "पेटविण्याचा" "तुमचा" अजेंडा आहे, इतकेच म्हणतो. बापरे. माझ्या प्रतिसादातून तुम्हाला माझा अजेंडा पण कळला. हहपुवा. >>> बाकी,"संस्कार" "केले जातात". त्या बाळाला "करून घ्यायची" इच्छा नसते. इट्स अ चाईल्ड यू नो? बाळाला संस्कार नको असतील तर त्याने नाही म्हणावं. नाही का?

धर्माच्या अफूची गोळी खाणार्यांचा कोणताच अजेंडा नसतो, हिंदू धर्म व्यापक सर्वसमावेशक व्हावा यासाठी चार्वाकापासून अनेकांनी अनेक चांगले अजेंडे राबवले, असे चांगले अजेंडे लोकांसमोर आले कि अशा अजेंड्यांना गाढवी विरोध करायचा एवढाच या धर्मवेड्यांचा हेतू असतो. यांचे धर्मावर गाढवी प्रेम असे. (निधर्मी असलेला- ग्रेटनिधर्मी)

बाकीच्या बालीश टंकनाला उत्तर देऊन तुमच्या पातळीवर गटारी कुस्ती खेळता येईल. उदा. >>बोल्ड, इटालिक, अंडरलाईन असे काहीही करून लिहिले तरी काय फरक पडतो? उत्तर: त्यामुळे लिहिलेले जरा 'आत' शिरेल असे वाटते. पण तुमच्या पातळीवर उतरता येत नाही, मास्तुरे. सबब फाटा. फक्त, "बाळाला संस्कार नको असतील तर त्याने नाही म्हणावं. नाही का?" या वाक्याचं उत्तर देण्यासाठी हे लिहितो आहे. ते वर शीर्षकात दिले आहे, पहा. :) शब्दशः 'रेप' कदाचित चुकीचा दृष्टांत होईल, पण जे काय चाल्लंय ते समजतच नाही अशा वयात जर ते केलं, तर त्याला बलात्कार हाच शब्द योग्य होईल. उदा. बाळाला कपडे घातलेले नको असतात. चप्पल नको असते. काढून फेकतात. त्यावर कपडे घालून फिरण्याचे "संस्कार" आपणच "ज ब र द स्ती च" करतो. रच्याकने, ते इटॅलिक केलेले व न केलेले याबद्दल मुद्द्यास धरून बोलणे सोडून विदा कसला मागताय :))

>>> बाकीच्या बालीश टंकनाला उत्तर देऊन तुमच्या पातळीवर गटारी कुस्ती खेळता येईल. तुम्ही आधीच बिनबुडाचे बाळबोध प्रतिसाद खरडून गटारात उतरला आहात. मला तिथे यायची इच्छा नाही. >>> >>बोल्ड, इटालिक, अंडरलाईन असे काहीही करून लिहिले तरी काय फरक पडतो? उत्तर: त्यामुळे लिहिलेले जरा 'आत' शिरेल असे वाटते. पुन्हा तेच. आपण काहीतरी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" अशा स्वरूपाची वाक्ये लिहून ती ५० वेळा एडीट करून बोल्ड, इटालिक वगैरे करत आहात. पण मुळातच हे खरडलेलं बाळबोध स्वरूपाचं आहे. त्यामुळे बोल्ड वगैरे करून आणि ५० वेळा एडीट करून काहीही फरक पडत नाही. >>> पण तुमच्या पातळीवर उतरता येत नाही, मास्तुरे. सबब फाटा. मी सुद्धा तुम्ही उतरला आहात तितक्या खालच्या पातळीवर उतरू शकत नाही. सबब टाटा. >>> शब्दशः 'रेप' कदाचित चुकीचा दृष्टांत होईल, पण जे काय चाल्लंय ते समजतच नाही अशा वयात जर ते केलं, तर त्याला बलात्कार हाच शब्द योग्य होईल. उदा. बाळाला कपडे घातलेले नको असतात. चप्पल नको असते. काढून फेकतात. त्यावर कपडे घालून फिरण्याचे "संस्कार" आपणच "ज ब र द स्ती च" करतो. आपण काय खरडलं आहे ते तुम्हाला तरी समजत आहे का? काहीतरी अर्थहीन बाळबोध वाक्ये ५० वेळा एडिट करून खरडण्यापेक्षा वरील वाक्ये ५० वेळा वाचून पहा आणि त्यातून काही अर्थबोध होतोय का ते बघा. >>> रच्याकने, ते इटॅलिक केलेले व न केलेले याबद्दल मुद्द्यास धरून बोलणे सोडून विदा कसला मागताय कसलं इटालिक आणि कसलं काय? आपण काहीतरी जबरदस्त लेखन केलेलं आहे हा तुमचा गोड गैरसमज आहे. प्रत्यक्षात तुम्ही जे काही लिहिलं आहे, ते अर्थहीन व तर्कहीन बाळबोध आहे. असो. जे काही करत आहात त्यात तुमचा दोष नाही.

"पुन्हा तेच. आपण काहीतरी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" अशा स्वरूपाची वाक्ये लिहून ती ५० वेळा एडीट करून बोल्ड, इटालिक वगैरे करत आहात. पण मुळातच हे खरडलेलं बाळबोध स्वरूपाचं आहे. त्यामुळे बोल्ड वगैरे करून आणि ५० वेळा एडीट करून काहीही फरक पडत नाही." आधीच्या प्रतिसादातील वरील वाक्य खालीलप्रमाणे वाचावे. "पुन्हा तेच. आपण काहीतरी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" किंवा "बचेंगे तो और भी लढेंगे" अशा स्वरूपाची काहीतरी जबरदस्त वाक्ये लिहिली आहेत असा तुमचा गैरसमज झालेला आहे व त्यामुळे ती वाक्ये खरडून आणि ५० वेळा एडीट करून बोल्ड, इटालिक वगैरे करत आहात. पण मुळातच हे खरडलेलं अत्यंत बाळबोध स्वरूपाचं आहे. त्यामुळे बोल्ड वगैरे करून आणि ५० वेळा एडीट करून काहीही फरक पडत नाही.

>>> गुर्जी ते शेंगा आणि टरफले राह्यलं की... आणि ती एकनाथांचि आणि यवनाची गोष्ट कधि लिवणार? ते तुमच्यासाठी ठेवलंय. लिहिल्यावर बोल्ड आणि इटालिक करायला विसरू नका. आणि प्रकाशित करायच्या आधी कमीतकमी ५० वेळा एडीट पण करा, म्हणजे त्याच्यात जरा वजन येईल.

>>> ते नथूगुग्गुळवटी विसरलात काय हो सांगायला ते वेगळं सांगायची गरज नाही. विषय कोणताही असला (उदा. विश्वचषक फूटबॉल, जपानमधील भूकंप इ.) तरी ते नथूग्ग्गुळवटी आणतातच.

अहो नथुगुग्गुळवटी ,गोपाळारीष्ट ही औषधे खास हिंदुत्ववाद्यांसाठी तयार केली आहेत. आम आदमी वगैरेंची सरशी पाहून पोटात दुखल्यास रोज रात्री झोपताना घ्यायचे ते चुर्ण आहे..

असो. जे काही करत आहात त्यात तुमचा दोष नाही.
कर्रेक्ट! दोष माझा नव्हे, तुमचा आहे, हे खरेच समजले की काय तुम्हाला? :o एकंदरितच कुठे मध्यमवयिन स्त्री-पुरुष समाजधुरिणांनी समाजाच्या चलनवलनाबद्दल, त्याच्या नियमांबद्दल उर्फ धर्माबद्दल चर्चा केली, तर उग्गं 'हिंदू खत्रेमे' करत ओरडा का घालायलात तुम्ही??

>>>>>>असो. जे काही करत आहात त्यात तुमचा दोष नाही. >>> कर्रेक्ट! दोष माझा नव्हे, तुमचा आहे, हे खरेच समजले की काय तुम्हाला? :o "तुम्ही जे करत आहात यात तुमचा दोष नाही" या वाक्यातील उपरोध तुम्हाला कळेल असे वाटले होते. पण तुम्हाला ते समजलेले दिसत नाही. असो. त्यात तुमचा दोष नाही. >>> एकंदरितच कुठे मध्यमवयिन स्त्री-पुरुष समाजधुरिणांनी समाजाच्या चलनवलनाबद्दल, त्याच्या नियमांबद्दल उर्फ धर्माबद्दल चर्चा केली, तर उग्गं 'हिंदू खत्रेमे' करत ओरडा का घालायलात तुम्ही?? मी कोणत्या प्रतिसादात "हिंदू खत्रेमे" असे ओरडलो ते जरा दाखवाल का? "बाळाला कपडे घालणे हा त्याच्यावर केलेला बलात्कार आहे" अशा अर्थाची अत्यंत हास्यास्पद विधाने तुम्ही केलीत. तसं पाहिलं तर बाळाला लस असलेलं इंजेक्शनही टोचून घ्यायचं नसतं. त्याचे आईवडील त्याला रोगप्रतिबंधक लस देतात हा त्याच्यावर केलेला बलात्कारच नाही का? तुमच्या अत्यंत अतर्क्य तर्कानुसार बाळ सज्ञान झाल्यावरच आपल्याला लस हवी का नाही हे त्याने ठरवायला हवे, नाही का? लहान मुलांना शाळेत पण जायचं नसतं, अभ्यासही करायचा नसतो. जरा विचार करा तुमच्या पालकांनी तुमच्यावर शिक्षणाची बळजबरी केली नसती (तुमच्या भाषेत शाळेत बळजबरीने घालण्याचा बलात्कार केला नसता), तर तुम्ही आज इथे येऊन खरडत बसला असता का? एनीवे, चालू द्यात. जे घडतंय त्यात तुमचा दोष नाही.

श्रीगुरुजी आपण वैयक्तीत पातळी उतरत आहात ...असो ,यात दोष तुमचा नाही माझाच आहे... मीच तसं करायला नको होतं (उपरोध समजला ना!)

कुठे लक्ष देताय यांच्याकडे? जाने दो पियेला ---आपलं, " अर्धी चड्डीवाला है! : कुणीतरी कसलं तरी "बौद्धिक" घेतल्याशिवाय यांच्या डोक्यात कधी शिरत नाही, इतका केविलवाणा प्रकार आहे हा, कुठे तुम्ही यांच्यापुढे गीता-बिता वाचत बसताय?

हिंदू वगळता इतर मुख्य धर्मात सरसकट सर्व मुलांवर हे संस्कार थोपविले जातात.
अ‍ॅबसोल्यूट बिनडोक वाक्य आहे. :)

"अ‍ॅबसोल्यूट बिनडोक वाक्य आहे. " मागचे पुढचे संदर्भ न वाचता व न समजता मधलेच एखादे वाक्य उचलले की असेच वाटायला लागते. त्यामुळेच "स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल" अशासारखी बिनबुडाची हास्यास्पद विधाने खरडली जातात. असो. यात तुमचा दोष नाही.

"स्वतंत्र विचार करण्याचे वय व स्वातंत्र्य आल्यानंतर सुंता/बाप्तिस्मा/मौंज इत्यादि कराची इच्छा आहे काय असे विचारल्यास, एक मोठी टक्केवारी कोणताच धर्म नको असे म्हणणारीच आढळळेल"
यात बिनबुडाचे काय ते कळाले नाही. अन अशी लोकं पाहिलीत तस्मात हे बिनबुडाचं नाही हेही ठौक आहे.

>>> यात बिनबुडाचे काय ते कळाले नाही. अन अशी लोकं पाहिलीत तस्मात हे बिनबुडाचं नाही हेही ठौक आहे. यात मोठी टक्केवारी म्हणजे किती टक्के जनता असे म्हणते? एखादे डॉ. लागू किंवा डॉ. दाभोळकर असे म्हणतात म्हणजे मोठी टक्केवारी होते का? असे काही सर्वेक्षण झाले आहे का? याच्या बाबतीत काही पुरावे/आधार/आकडेवारी आहे का? आकडेवारी असल्यास धर्मनिहाय आकडेवारी आहे का? पुरावे/आकडेवारी उपलब्ध नसेल तर हे विधान बिनबुडाचे का म्हणता येणार नाही?

यात मोठी टक्केवारी म्हणजे किती टक्के जनता असे म्हणते? एखादे डॉ. लागू किंवा डॉ. दाभोळकर असे म्हणतात म्हणजे मोठी टक्केवारी होते का? असे काही सर्वेक्षण झाले आहे का? याच्या बाबतीत काही पुरावे/आधार/आकडेवारी आहे का? आकडेवारी असल्यास धर्मनिहाय आकडेवारी आहे का?
इथे पहा. ३ टक्के भारतीय पक्के नास्तिक असल्याचे यात म्हटले आहे. आणि तसेही नास्तिकांचा कसला आलाय धर्म?

हिंदूंमध्ये फक्त एक ४-५ टक्के असलेला अल्पसंख्य वर्ग मुंज वगैरे करतो. उर्वरीत ९४-९५ टक्के अधिकृत हिंदू होण्यासाठी असे कोणतेही औपचारिक संस्कार करत नाहीत. त्यामुळे तुमचे वरील विवेचन फक्त ४-५ टक्के हिंदूनाच लागू पडेल.
आमच्या निमसरकारी शाळेत धर्म लादायचे बुवा! मुलगी म्हणून जन्माला आल्याने नशीबाने ते मुंज वगैरे भैताडं घरून गळ्यात पडली नाहीत. पण मग बांगड्या घाला, टिकली लावा वगैरे जबरदस्ती शाळेकडून होत असे, धर्माच्या नावाखालीच. (घरातल्या माफक निधर्मीपणावर शाळेत बोळा फिरवला गेलाच.) शिवाय प्रार्थना असायचीच रोज. ती पण हिंदू देवांची. सक्तीने. प्राथमिक शाळेत गीता, गीताई, रामरक्षा, मारुतीस्तोत्र वगैरे हिंदू लोकांच्या गोष्टी लादल्या गेल्याच ... काहीही समजत नसताना. माझा एक मित्र (दुसऱ्या निमसरकारी शाळेत होता) शाळकरी वयातच नास्तिक बनला. त्याने हिंदू देवाची प्रार्थना म्हणायला नकार दिला तर प्रार्थना सुरू असताना, भिंतीकडे तोंड करून उभं रहाण्याची शिक्षा हिंदू शिक्षकांनी त्याला दिली होती. तरी बरं, हा मुंजवाल्या गटातला नाही हो! आणि हे सगळं कॉंग्रेसच्या राज्यात घडलेलं. शिवाय गणपती, दिवाळी, संकष्ट्या, वटपौर्णिमा, रामनवमी, गोकुळाष्टमी वगैरे प्रकारही घराघरांतून होताना दिसतात. हे हिंदू संस्कार नाहीत असा दावा आहे का काय तुमचा? अगदी रामचंद्र गुहांसारखे लोक स्वतःला सांस्कृतिक हिंदू म्हणवतात ते कशामुळे असावं?

पुन्यांदा माझ्याकडुन एका धाग्याचे शतक

मी हाच आणि असाच प्रतिसाद दिला होता तो ताबडतोब उडाला. =)) चिन्मय साहेब मोठ्या वर्तुळातले दिसताहेत... मज्जा आहे ब्वा ! ;)

संप्रदाय म्हणजे अफूची गोळी. धर्म म्हणजे त्या त्या गोष्टीचे मुलभूत गुण. उदा: अग्नीचा धर्म उष्णता नि प्रकाश, पाणी वाहते नि थंड, माती- वजन इ.इ. (धर्म हे चुकीचं नाव पडलंय. आता म्हणूया तेच्च पण ते चुकीचं आहे.) तर पहिली गोळी संपण्यापूर्वीच , पहिल्या गोळीचा नीट अनुभव न घेता, कदाचित नुसतीच टेस्ट घेऊन झालेली अस्ताना, नवीन गोळी आकर्षक वेष्टनात, साखरेचा लेप लावून, सुरुवातीला गोड वाटेल अशा प्रकारे अशा माध्यमातून नि लोकांमार्फत दिली जाते की आधीची गोळी दिसत नाही, दिसली तरी फेकावीशी वाटते, दुसर्‍यानं घेतलेली असता त्या व्यक्तीला नाकारलं जातं वगैरे