Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बेस्टम्बेस्ट गुरूजी. लैच भारी ब्वा तुमचे यजमान. बादवे पारवा ह्या रंगाचे नाव लै वर्षानी वाचनात आले. एमराल्ड ब्ल्यू बहुतेक. :-D

लेखातली काही प्रसंगवर्णने वाचून प्रत्यक्षात पाहिलेली उदाहरणे आठवली. भन्नाट लेखमालिका.

मस्त. तुमचं इतरही लिखाण वाचतोय. पण मिपाअ‍ॅक्सेस अभावी दरवेळीच लॉग इन करुन ते सांगता येतं असं नाही.

दु दु .... :-/ आणी मला , तो भाग वाचत खौटपणे राक्षसी हास्य करणारा तुमचा चेहेरा डोळ्यासमोर येतोय! :-/ मित्राची उडताना पाहून फजिती दु..दु..पणे हसतो अगोबा ढगोबा हत्ती! :-/

कहर मेलोय धोनी आत्मा, फुल फोडलाय =)) वाक्या वाक्याला ब्येक्कार हसतोय... अरे काये हे :-D

खतरनाक !!!! भारीच बूवा. आता ते ताकाचं भांडं खरंच लपवून ठेवा आणि असं चांगलं चुंगलंच लिहित जा. :)
पोर-आपण कोण? मी-(क्लीन-बोल्ड!)
बुवा तुम्ही गेला बाजार दहा वर्ष तरी या व्यवसायात असाल. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येऊ नये म्हणजे कमाल आहे. अहो लाईन बदलून नुकताच या क्षेत्रात आलेला नवशिक्यासुद्धा "चिदानंद रुपो शिवोहम" किंवा "अहं ब्रम्हास्मी" वगैरे म्हणतो.

@बुवा तुम्ही गेला बाजार दहा वर्ष तरी या व्यवसायात असाल. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येऊ नये म्हणजे कमाल आहे. अहो लाईन बदलून नुकताच या क्षेत्रात आलेला नवशिक्यासुद्धा "चिदानंद रुपो शिवोहम" किंवा "अहं ब्रम्हास्मी" वगैरे म्हणतो>>> ज्याच्या त्याच्या जाणिवा वगैरे..... असो!

उत्तम खुसखुशीत लेख... एकदा पुरोहित मण्डळीन्च्या सान्केतिक भाशेबद्दलही लिहा की आत्माराव ! नैमिश , कौरव ............ इत्यादि ;)

व्वा... परिभाभाषाच लोकांन्ना सांगितली.. तर आपण (त्याच्या समोर!) बोलायचं कंसं? :) ही आचारसंहिता आम्ही मोडणार नाही. :)

गुरुजींच्या डोक्यावर उदक सोडून त्या मनुक्षाने त्याला या कोणत्याही धार्मिक विधींची आवश्यकता नसल्याचे सुचवले आहे. ;) लहान मुलाचा संवाद भारी.

चांगलं लिहीलंय!! एक शंका: लेखमालेत "बिझ्झी" सिझन मधे आल्यामुळे बरीच गॅप पडली... की "बिझ्झी" सिझन मधे आल्यामुळे लेखमालेत बरीच गॅप पडली...

भारीच लिवलंय! मला गोत्र जाम लक्षात रहात नाही. गोत्र म्हणजे ऋषींचं नाव हे कुठेतरी वाचलं आणि गुर्जींनी गोत्र विचारलं की कोणत्यापण रँडम ऋषीचं नाव डोक्यात येतं. बाकी काही विशिष्ट प्रसंगी गुर्जींनी "अपसव्य करा" म्हटलं की सचिन तेंडुलकर लेफ्टी ब्याटिंग करतोय किंवा आमिर खान "क...क...क...किरण" म्हणतोय असली चित्रं डोळ्यासमोर येऊन हसू फुटेल की काय अशी भीती वाटते!

लई भारी, हा डाव्या उजव्याच्या घोळ भन्नाट प्रकार असतो. एखाद्याला आपण फोनवर बोलताना उजवीकडे बघ म्हटलं की तो हट्कून दाविकडेच बगतो

"हाताला हात लावा" म्हणजे नवर्याच्या हाताला हे यजमानीण बाई जाणून असतील असे गृहीत धरण्याचे पाप मी केले आहे. यजमानीण बाई जोर लावून "माझ्या हातापर्यंत" पोहोचण्याचा प्रयत्न करू लागल्यावर त्यांना सांगावे लागले कुणाच्या हाताला हात लावा ते.

हा भाग वाचुन मज्जा आली.. विशेषता मुलाबद्दल्चे लिखान आवडले आणि हे विनोदी जबरीच
आचमन करा..डाव्या हतानी पाणी घेऊन तीन वेळा पाणी प्या-ओम केशवाय नमः... पण पुढे काहिच होत नाही. मी थंड! मग काही सेकंदात या कंदाला ओळखून,,, "डाव्या हतात पळी घ्या(हे सर्व मंत्र म्हणतो त्याच टोन मधे..) ..अहो यजमान तो उजवा हात... हा डावा... (परत) डाव्या हातानी पळी घ्या.तिनी समोरच्या भांड्यातलं पाणी घ्या..अता ते उजव्या हतावर ओता..नंतर उजवा हात तोंडाशी नेऊन (एकदाचे) प्या!!!!" अता पुन्हा असच दोन वेळा प्या... आणी आणी आणी... (काय होतय याची वाट न पहाता) तिसर्‍यांदा समोरच्या पसरट तांब्याच्या थाळीत (जीला बाकिची गाढव लोकं ताम्हन म्हणतात) त्यात सोडा. (एकदा एका अश्या'च एकटक्क्यांनी एका गुरुजिंच्या कालच गुळगुळीत केलेल्या-डोक्यावर ते पाणी सोडल्याचं ह्या आत्मंभट्टानी स्वतःच्या डोळ्यांनी पाह्यलय!) इतकं बाळबोधाच्या तयारीनी ते तंत्र सांगूनही हे एकटक्के कधिकधी पळी हातात घ्या म्हटल्यावर तांब्या हतात घेतात. आमच्या मनात शंका.. सकाळी बहुतेक "साफ" झाली नसावी... पण असं साफ..साफपणे बोलता मात्र येत नाही.. मग पुन्हा (त्याच मंत्र म्हणयच्या टोन मधे..) अहो अहो यजमान ,, हा जो तांब्याचा जाड चमचा (डोक्यात मारल्यावर झोपेतनं जाग येइल इतका जाड दिसतो..) दिसतो ना.. तो म्हणजे पळी (आणी मी आजच्या पुजेचा बळी!) ती पळी हतात घ्या....(इथे पार वैतागल्यामुळे..उघड..) ह्हांssssssss! आता ती समोरच्या भांड्यात घाला.. बुद्कन आवाज आला की तिनी पाणी उचला... (आणी मग ते आपल्या दोघांपैकी जमेल त्याच्या) तोंडात घाला.. इत्यादी इत्यादी...